निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकुरा मी मागच्या वर्षी काश्मिरला गेले होते पण तेव्हा शेती काढून झाली होती केशराची. रोपेही अस्तित्वात नव्हती. मला फक्त एका दुकानात सुकलेले फुल पहायला मिळाले आणि फोटोतली केशराची फुले. तुम्ही ग्रेट आहात. मस्तच. मलाही आधी वाटल नमुत आल की काय केशर म्हटल कस शक्य आहे Happy मस्त. स्वतः पाहताना काय धन्य वाटल असेल.

जो एस. मस्त फोटो

साधना सुंदर फोटो ग.

माझ्या गावाचे आहेत Happy आंबोली आणि आजुबाजुचा परिसर. तिथे असली काही स्थळे आहेत जी अजुन बाहेरच्या लोकांना माहित नाहीत आणि माहित करुन देण्यात मला रसही नाही. ही असली सुंदर स्थळे जितकी अस्पर्शीत राहतील तितकीच ती जास्त काळ टिकतील. एकदा लोकांना कळले की त्याचे कास पठार व्हायला वेळ लागत नाही. Sad

टीना मस्त फोटो.

साधना एकदम बरोबर. आमच्या गावाचा समुद्र पण पर्यटनस्थळ नसल्याने एवढा सुंदर आहेना, फक्त गावच्या लोकांसाठीच.

जागूच्या पिटुकल्या चिमनी साठी पिटुकले फुल>>> अहं! तो वेडा राघू... किडे पाहिजेत त्याला. इंग्रजीतले नावच त्याचे बीइटर. पण हो फुलाजवळ कीटक येतील त्याच्यासाठी! Happy

जागू कुठे म्हणजे मुंबईत की? आमच्याइकडे दहिसरमध्ये बीइटर नाही दिसले कधी! Sad

टीना सुपर्ब जास्वंद! काय कलर आहे!!!

बी इटर / वेडा राघू मुंबईत खुप कॉमन आहे. खुपदा तारेवर बसलेला असतो. किटक दिसला कि त्याच्यामागे लागतो. किट्क जसा वेडावाकडा वळेल तसा हाही वळतो. आपल्याला किट्क दिसत नाही, फक्त याचे उडणे दिसते म्हणून तो वेडा राघू.. किटक पकडून झाला कि परत तारेवर त्याच जागी येऊन बसतो.

सध्या पुण्याहून मुळशी धरणाच्या पुढे जाताना ताम्हिणी घाटाच्या जरा अलिकडे (क्विक बाईटच्या आसपास) भरपूर कारवी फुलली आहे - जरुर जाऊन पहाणे... Happy (मी आणि शांकली काल जाऊन बघून आलो - लवकरच फोटो टाकेन इथे ... Happy ) - अप्रतिम नजारा आहे - जांभळी आणि पांढरीही (ही बारा वर्षांनी एकदा फुलते म्हणे... )

सात आणि बारा वर्षाचा काय हिशोब असावा ? किट्क या फुलांची ओळख विसरत नाहीत हे चांगले आहे.
आता बाजारात कारवीचा मध येऊ लागेल... शिवाय कातकर्‍यांच्या घराच्या भिंतीही नव्याने उभ्या राहतील.

उलटा रावण..का म्हणतात यार याला .. कसला मस्त दिसतो ना..

हि पांढरी लिली..
जागु तुला समर्पित गो.. Wink

हा एक क्लोजअप..परागकण बघा..

हा काळ्या अंगुर चा वेल :

Pages