
रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. " या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
.. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सायली, एकदाच फुले आली
सायली, एकदाच फुले आली हिवाळ्यात नंन्तर झाडे जळुन गेली.
हा एक छान फोटो.
हा एक छान फोटो.
सकुरा.. ऑस्स्म!!!
सकुरा.. ऑस्स्म!!! केशरफुलं.. व्हॉट अ ट्रीट!!!!!!!!! सुपर..
सायली, पिकासावरून जिथून लिंक टाकशील तिथे स्क्रोल करून बघ, साईझ चे ऑप्शन्स मिळतील.. दिनेश ने सांगितलेच आहे वरती..
केशराचे कंद होतात.. परत
केशराचे कंद होतात.. परत उगवतील ते. कुंडी तशीच राहू दे.
दिनेश्, माहिती बद्दल
दिनेश्, माहिती बद्दल धन्यवाद.
.
केशरफुले मस्तच. अजूनही काही
केशरफुले मस्तच.
अजूनही काही ठिकाणी सोनमोहर फुललाय. उशिरा फुललेली झाडे असतील. माझ्या घराच्या मागच्या झाडावर तुरळक फुले आहेत पण काही ठिकाणी बरीच आहेत.
अरे वा। मला वाटले नव्या
अरे वा। मला वाटले नव्या मुंबईत आले केसर
सोन मोहर. बहावा, स्पथडिया।
सोन मोहर. बहावा, स्पथडिया। सगळे फुललेत. अवेळी फुललेत ऎसे वाटतेय पण निसर्ग चक्र स्वताच्या तंत्राने चालते, माणसाच्या अंदाजावर नाही.
सकुरा.मस्त फोटो.
सकुरा.मस्त फोटो.
सहिच..
सहिच..
सोनमोहोराला तसेही तंत्र नसते
सोनमोहोराला तसेही तंत्र नसते पण बहाव्याचे नवल वाटतेय.. कदचित पुढे उष्णता वाढण्याचे संकेत झाडांना मिळाले असतील. त्यांना फळे पिकवायला, बिया वाळवायला ती लागतेच.
झाडांचे असे, तर पक्ष्यांचे काय होणार ?. त्यांनादेखील पावसाची, थंडीची गरज असते.
नवरात्रातही पाऊस पडायला हवा.
साकुरा केशर फुलं सुंदर वाढवण
साकुरा
केशर फुलं सुंदर
वाढवण कठीण काम आहे
रुईची फुलं आणि फळ
रुईची फुलं आणि फळ


(No subject)
जो_एस, छान आहेत फुले.. रुईचे
जो_एस,
छान आहेत फुले..
रुईचे फुलेच दिसलेली फळ नाही दिसले कधी.
जो खुप सुंदर गुलाब..
जो खुप सुंदर गुलाब..
जो_एस मस्त फोटो. गुलाब फार
जो_एस मस्त फोटो. गुलाब फार गोड.
मी रुईची फळे पहिल्यांदाच पाहतेय.
शांतता.
शांतता.
पाऊस कुठाय?
पाऊस कुठाय?


रुईची फळे फुटून त्यातून
रुईची फळे फुटून त्यातून सावरीसारखाच कापूस बाहेर पडतो ( म्हणून हिंदीत कापसाला रुई म्हणतात असे मला लहानपणी वाटायचे
)
रीया, पिण्याच्या पाण्याची सोय केलीय ना पावसाने ? बाप्पाने आपले काम केलेय आणि नवरात्रातील देवी, रब्बी पिकाची काळजी घेतील... म्हणतात ना देवाक काळजी !!!
(No subject)
(No subject)
Tari hava paus Dinesh da I
Tari hava paus Dinesh da
I miss paus
सकुरा.. सकुराचा बहर
सकुरा.. सकुराचा बहर मस्तंये.... ब्यूटीफुल!!!!
पाण्याची चिंता मिटलीये बहुतेक आता... इथे धूमधडाक्यात पाऊस पडलाय..
पुढच्या वर्षी लवकर या.. असे
पुढच्या वर्षी लवकर या.. असे बाप्पासोबत पावसालाही सांगायला हवे आता.
सकुरा.. मस्त फोटो.
सकुरा आ हा हा! मस्त प्र.ची.
सकुरा आ हा हा! मस्त प्र.ची.
यावर्षी गणपतीला गावी गेलेले.
यावर्षी गणपतीला गावी गेलेले. तिथेले काही फोटो...
छान फोटो. कास पठार चे
छान फोटो.
कास पठार चे बहिन-भाऊ आहे का हे गाव?
साधना काय सुंदर फोटो दिल खुष
साधना काय सुंदर फोटो दिल खुष हो गया...
साधना, सुंदर प्रचि.. मनानेच
साधना, सुंदर प्रचि.. मनानेच कोकणात जाऊन पोहोचले.
Pages