निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या भाजीला कडवंची म्हणतात.
पावसाळ्यात आपोआप उगवणारी ही एक रानभाजी आहे.

वर्षू नील, तज्ञ लोकंच त्या फळाबद्द्ल सांगु शकतिल.
खजुर असेल का?

सुपारी वरुन प्लेन असते आणि साधारण केशरी कलर जास्त असतो. खजुरपण प्लेन असतोना (ओली खारीक पण प्लेन असते.)

नलिनी, फोटो अगेंस्ट लाईट असल्याने पानं स्पष्ट नाही आलीयेत.. पण निगकर्स ता वरून ताक भात ओळखणारे, म्हणून कॉन्फिडंट आहे ,हे फळ नक्कीच कुणीतरी ओळखेलच म्हणून.. Happy

सुप्रभात निगकर्स
सध्या जमेल तसं रोमात!
वर्षू ...ते लिची वाटतय.
हे परवा पडले होते

आणि हे आम्ही सुरू केलेल्या एका प्रोजेक्टची पहिली वहिली फळं........

किड्याची पंख छान आहेत.
मानुषी, कसला प्रोजेक्ट आहे?

हा माझ्या आंगणातला पाहुणा.
unnamed[1]_29.jpg

सकुरा तो भुंगा आहे.
नवा प्रोजेक्टः आम्ही २० गुन्ठे जमिनीत शेडनेट मधे सिमला मिरचीचं पीक घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आणि नव्या प्रोजेक्टबद्दल इथे सविस्तर लिहीनच.

नव्या प्रोजेक्टबद्दल इथे सविस्तर लिहीनच. <<< वा !!
प्रोजेक्टचे सुरुवातीपासुनचे फोटो सुद्धा दिलेत बरे होईल

सुपारीच वाटते आहे ती. फक्त देशी सुपारी पिवळट शेन्दरी रंगाची असते. अरेका नट पाम म्हणून सर्च करून पहा..

नव्या प्रोजेक्टबद्दल इथे सविस्तर लिहीनच>>>वाचायला आवडेल.

वर्षू नील च्या फळाबद्दल ठामपणे सांगणारे कोणी भेटले नाही का अजुन?
असेल, असावे, वाटतय,शकते असेच चालु आहे अजुन पर्यन्त.:)

जागू,ती भाजी(कडवंची) मुंबई,नवी मुंबई मधे मिळणे आवघड आहे. मला ती सोलापुरातच दिसली आता सध्या ती सोलापुरच्या भाजी मार्केट मध्ये विकायला येत आहे.

नलिनी.. ते नेपाळमधले बरेला नावाचे रानटी फळ असते ते पण असेच दिसते.

वर्षू.. तो भेरली माड. यातही सुपार्‍याच होतात पण त्या नेहमीच्या नाहीत. त्याचे निसर्गतःच दोन तूकडे झालेले असतात. अर्धशिशी ( अर्धे डोके दुखते ) वर औषध म्हणून देतात.. पण त्या आजारावर सकाळीच जिलेबी खाणे हाही एक उपाय आहे Happy

अभिनंदन मानुषी... एकदा इस्रायलला भेट द्या बघू, त्यांच्या मार्गदर्शनाने इथे अंगोलातही आता भाज्या पिकवल्या जात आहेत.

दिनेश्दा,
भेरली माडाची पाने आणि 'फलसंभार' अगदीच वेगळा असतो.
हा Christmas Palm / Manila Palm / adonidia merrillii वाटतो आहे.
गूगल इमे़जेसः
https://www.google.co.in/search?q=christmas+palm&biw=769&bih=385&source=...

भेरले माड नाही. हे शोभेचे झाड आहे, याच्या या बीयाही शोभेच्याच. आपल्याला काहीही उपयोग नाही. मी खुप रिसॉर्ट्समधल्या बागांमध्ये हे झाड पाहिलेय.

टीना, तु ज्याला घोळ म्हणतेयस ते घोळच्या फॅमिलीतले शोभेचे रोप आहे. याची भाजी करता येईल पण आपण ती खाऊ नये, कारण ही जात शोप्लांट म्हणुन मुद्दाम वाढवलेली आहे. घोळ हे शेतातले तण आहे, घोळीची भाजी करता येते आणि आपण ती अधुनमधुन जरुर करुन खावी. पोर्चुलिकासी फॅमिलीतली ही सगळी मावस चुलत भावंडे आहेत.

दिनेश धन्यवाद! तसंही इस्राइलला जाऊन यायचं मनात आहेच कधीचं. आमचे काही शेतकरी मित्र जाऊन आले आहेत इस्राइलला. अर्थातच हे शेतकरीही पारंपारिक शेती करत नाहीतच.
आणि मी पूर्वेही इथं उल्लेख केला होता..........मी शाळेत असताना वडिलांनी "इस्राइल ...दुधामधाचा देश " नावाचं पुस्तक मला दिलं होतं. तेव्हापासून या देशाबद्दलचं गारुड आहे मनावर. पण या पुस्तकाचे लेखक आठवत नाहीत.
वि.स.वाळिंबे आहेत की काय??? कुणाला माहिती असल्यास सांगणे.

Pages