निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ये सोचकर छोडा था के प्रिन्स मे चेन्ज होगा............ लेकिन हाय रे किस्मत., वो साला भाग गया... प्रिन्स नहि रे, खेक्डा.... Wink

काय मस्त पक्षी संम्मेलन.. व्वा
सकुरा मला वाटतय त्या रानफुलांना काशिद म्हणतात.. (नाव शांकली कडुन कळले:))
खेकडा - विंचु....:D Lol Lol

जागू, वेडे राघू भारीच, मस्त शाळा जमल्ये..
टीना, खूप मस्त फुलं आहेत सगळीच..
खूप काही मिसलं एवढे दिवस. संयोजनातून फ्री झाल्यामुळे आता इकडे फिरकता येईल Happy

धन्स जागू, ममो. माबोकरांनी पण खूप मदत केली.
आमचा गणपती कोकणात मूळ घरी असतो आणि यंदा सुट्टी नव्हती त्यामुळे संयोजनातून तोच आनंद मिळवला..
तसंही बाप्पा भरपूर उत्साह घेऊन येतो Happy

दोन दिवसांपूर्वी खतपाणी केल होत... आता सगळे भरभरुन फुलताहेत अस वाटतय Wink

हा तिहेरी रंगाच्या कलमी गुलाबाच्या रोपट्याला तीन पैकी दोन रंगाची फुलं उगवलीत पाहा..

मागे जो अर्धवट फुललेला जास्वंद टाकला होता त्या जास्वंदाच पूर्ण फुललेलं फुलं :

हे छोटे बटन गुलाब.. एक गुलाबी आणि दुसरा पिवळा :

आणि हे घोळ :

मस्त चालल्यात गप्पा! सद्ध्या मोबाईलवरूनच बघते मी इथली पोस्ट्स, त्यामुळे प्रतिक्रिया देता येत नाहीत. आज मात्र लिहिलंच पाहिजे!
शशांक, तुम्ही ताम्हिणीच्या वाटेवरची कारवी फुलल्याचं सांगितलंत म्हणून धन्यू! कारवी आज बघितली. मला पांढरी कारवी नाही दिसली, नेहेमीची जांभळीच दिसली.
हे थोडे फोटो:

वेका, किती सुरेख सोनेरी गुलाब.. ब्यूटिफुल!!! Happy
गौरी, कसली गोड्,नाजुक फुलं आहेत..
सकुरा, तुझा हम साथ साथ ,भारीये.. मस्त!!!

तो नेपाली बरेला नव्हे दिनेशदा..
काकड्या सुरुवातीला तशाच दिसतात..
माझ्याकडे पन होता काकडीचा वेल तेव्हा त्या सुद्धा अश्याच दिसायच्या सुरुवातीला मग त्यावर दिसनारे ते काटे गायब होऊन जातात.. Happy

इथे संततधार आत्ता. मस्त वाटतंय. काल तासभर छान पाऊस पडला विजांचे कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह.

Pages