
रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. " या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
.. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
कृष्णकमळ
कृष्णकमळ
अग टीना कृष्णकमळ निळे असते
अग टीना कृष्णकमळ निळे असते ना? आणि ते पावसाळ्यात असे कुठेही उगवते का?
पॉम पॉम... रिक्षा
पॉम पॉम... रिक्षा रिक्षा..
http://www.maayboli.com/node/54395?page=3
Sakura te pandra krishna
Sakura te pandra krishna kamal aahe..
Va kay mast dhavala dhaga aaj..
Da veDa raghu baddal chhan mahiti...
Tina mast phula ga..
अजुन खुप सारे... हि कंबरमोडी
अजुन खुप सारे...
हि कंबरमोडी :
एक लाजरा न साजरा मुखडा.. जास्वंद..
गुलाब :
आप्पांकडला कृष्णकमळ..
त्यावरचा हा पाहुणा :
आणि हा घरचा वेल .. अजुन बाळच आहे..
हे पारिजात.. आणि त्याचा हार धारण केलेले बाप्पा
फुलच फुल :
छान छान, सुरेख. कंबरमोडी हे
छान छान, सुरेख.
कंबरमोडी हे नाव मला माहीतीच नव्हतं.
वा टीना खुप सुंदर. आणि ती
वा टीना खुप सुंदर. आणि ती पाढरी लिली माझ्या आई कडे आहे बर का. बहुतेक मी घरी पण आणून लावलीये. पण फुलली नाही अजुन.
ते रानटी कृष्णकमळ असेल का? मागे साधनाने पण फोटो टाकला होता ना ह्याचा?
नवी मुंबई उरण मधला आहे तो वेडा राघू. बघा कसा शहाण्यासारखा आहे
जागू, रानटी का म्हणतेस ? हेच
जागू, रानटी का म्हणतेस ? हेच तर खरे कृष्णकमळ. या प्रकारात रानात एक पांढर्या छोट्या फुलांचा वेल दिसतो खरा.
टीना, मस्त फोटो.
टीना, मस्त फोटो. प्राजक्तांच्या फुलांचा लक्ष वाहता येईल. ( म्हणजे एक लाख फुले वहायची ! )
रानात उगवते म्हणून रानटी. हा
रानात उगवते म्हणून रानटी.
हा आमच्याइथला खाटीक

सुंदर सुंदर फुलं...
सुंदर सुंदर फुलं... वाह!!!!!!! टीना , जागु चे पक्षी ब्यूटिफुल!!!!
गेट टुगेदर
गेट टुगेदर

जा ब्वा.. यांच कसं जम्लं गटग
जा ब्वा.. यांच कसं जम्लं गटग झटपट..........
सद्ध्या वेडे राघुच उडताहेत
सद्ध्या वेडे राघुच उडताहेत वाट्ट धाग्यावर...
मस्तच....
माझ्या हॉस्टेल ला बकुळीच्या झाडांच कुंपण होत...रिंगण म्हणुया तिथं हे भरपूर दिसायचे..काय अप्रुप मला..
२मेगापिक्सेल ने झुम करुन फोटो काढायची मी त्यांचे
Tina kay surekh photo..
Tina kay surekh photo.. Parijatak...ah ha ha
Ya veles mi pan daha divas bappala parijatkache har vahile..
Jagu to khatik mastay
...
परवा जवळच्या बागेत
परवा जवळच्या बागेत संधिप्रकाशाच्या वेळेस जाणे झाले. तिथल्या दिव्यावर बरेच कीटक आलेले आणि दयाळ (मॅग्पाय रॉबिन) वेड्या राघूसारखे कीटक पकडत होते. मी पहिल्यांदाच अशी शिकार बघितली.
सु प्र
सु प्र
हा पिटुकला पण बघा....
हा पिटुकला पण बघा....
आमची आ़जी वहायची
आमची आ़जी वहायची प्रजक्ताच्या फुलांचा लक्ष. फुलं वेचुन आणण्याचं काम आमचं असायचं
जागु, वर्षु मस्त फोटो. साधना विंचु ना हा ? गावाला आमच्यायाकडे असतात फटीत लपलेले.
हेमाताई ह्या विंचवाला आम्ही
हेमाताई ह्या विंचवाला आम्ही खातो.
अहो चिंबोरा/खेकडा आहे तो.
वर्षूताई बघ ना ग त्यांना किडे मिळाले की लगेच गटग होतो. आता तो साधनाचा खेकडा कधी मोठा होणार गटग जमवायला
वेड्या राघूचे खुप फोटो आहेत टिना माझ्याकडे पण पिकासाला ऑफिसने हायजॅक केल्याने मलाच असे छोटो फोटो टाकायची इछा नाही होत.
ए जागु सॉरी हं मला नाही
ए जागु सॉरी हं मला नाही ओळखला.
हेमाताई सॉरी बोलून लाजवता
हेमाताई सॉरी बोलून लाजवता काय?
गेटटुगेदर ला फक्त राघूच नसतात हो. अजुन वेगळे पक्षी पण असतात. मुनीया, खाटीक, साळुंखी, बुलबुल अशी गंमत जंमत पाहीली मी.
खरतर वरच्या सगळ्या पक्षांचा
खरतर वरच्या सगळ्या पक्षांचा धागाच काढायचा होता मला पण इथे शेयर केल्याशिवाय राहवत नाही.
मस्तच जागू... साधना , शिजवला
मस्तच जागू...
साधना , शिजवला का ग त्याला पण ? कि मोठा करायला ठेवलाय ? त्याच्या कितव्या वाढदिवसाला तो कढईत उकळत्या तेलाची शिक्षा भोगणारे ?
अग तो इतका लहान होता की
अग तो इतका लहान होता की त्याला सोडुन दिला... तु भी क्या याद करेगा, जा तुझे छोड दिया.... हा डायलाग ऐकवुन.
जागू, तुझ्याकडे गटग भरलेय गं......
गुण्णी माझ्झी बाय ती..
गुण्णी माझ्झी बाय ती..
सगळे फोटो छान
सगळे फोटो छान छान...
माझ्याकडुन रानफुलाचा गुच्छ.
जागु अगं कसलं ग्वाड आहे हे
जागु
अगं कसलं ग्वाड आहे हे मिक्स्ड पक्षी गटग..
म>>>मो>>>> खेकड्याला चक्क विंचू म्हणलीस???? मेले हसून हसून ,
घ्येच तू आणी खेकडा गटग ला जात्तीने हजर राहा- हुकुमावरून!! 
साधना.. छोड दिया??? मग त्याने लगेच तुला तीन विशेज नाही का दिल्या वर म्हणून?? हाँ??
जागू, सम्मेलन मस्त.. आणि आपण
जागू, सम्मेलन मस्त.. आणि आपण दलित, विद्रोही, नाट्य, कवि.. अशी वेगवेगळी सम्मेलने भरवतो.
ममो.. हाच तो तात्या विंचू !
मला वाटलचं की काही तरी चुकलय
मला वाटलचं की काही तरी चुकलय आणि माझी पोस्ट विनोदी होणार म्हणून . खेकडे गटग ला यायलाच पाहिजे प्रत्यक्ष बघायला ( स्मित)
Pages