निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो...
धन्यवाद दिनेशदा..
तशी मी हुशारे म्हणा..रामायण वाचताना मला वाटलच कि आणखी एखाद्याला अशोक म्हनत असणार नक्की. कितीही बारीक असली तरी आपल्याकडल्या नेहमीच्या अशोकाखाली सिता मावुच शकत नै.. अन रावणाबद्दल लय सहानुभुतीये मला..कुछ बी हो जाए पण आलल्याकडला अशोक असता तर त्यानं गार्डन चेंज केल असत तिला ठेवायचं पण तिथं नसत ठेवल..

चला आता आपल्याकडला अशोक (वृक्ष .. सोच बदलो , देश बदलेगा) गुगलुन बघते जरा..

अग टीना तुझ्याकडे तर ज्ञाना चे भांडार आहे की..
सांडत जा थोडे-थोडे धाग्यावर.

मला तो अशोक खोटा म्हणुन माहित असते तर लावलाच नसता(खरा वाला लावला असता) ४० झाडे आहेत पुर्ण घरा भोवती झाडूवाली बाई त्या बियांना वैतागुन ड्बल पगार मागत होती आता त्या बिया संपल्या जुन-जुलै ला खुप पडत होत्या.

श्री लंकन खर्‍या अशोकाची फुले छान आहेत.

सकुरा..
लय्यच अडाणी आहे गं मी खरच्चं...
इथं आजपावेतो वाचलेल्या फुलाम्चे माव फुल दाखवून जरी विचारले तर त्यातही मला १०० पैकी पासिंग पन मिळणार नै..
राज कि बात बताउ, एखाद फळ, फुलं, झाड आणि व्यक्ती मला जर परत परत निदान दोनदा दिसल्या त्याही निव्वळ पासर्बाय सारख्या नै तर त्यांचा स्पेशली इंट्रो करुन दिला तर कुठ मला त्यांचा चेहरामोहरा लक्षात राहतो नै तर पहिले पाढे पंचावन्न.. बेक्कार मेमरी आहे माझी याबाबत.. मात्र पुस्तक दे लागन तर हातात ; ते बी गोष्टींच..एक्का वाचनात पाऊण त पाठ करतेच मी Wink Proud

अरे सुर्यकिरण किती दिवसांनी आगमन झाले.

सायली धन्यवाद ग. हो तो रोहीतच आहे.

दा श्रीलंकन अशोक मस्त आहे. आपला सीता अशोक चे बरेच फोटो आहेत माझ्याकडे पण इथे नो पिकासा. लिंक कॉपीकेलेल्या नाहीत माझ्याक्डे.

टीना तू विनोदी लेखन लिहायला सुरुवात कर. खुप गमतीशीर लिहितेस.

उरण पाणजे खाडीतील पेंटेड स्ट्रोक/चित्रबलाक

फ्लेमिंगो/रोहित. हे डोके वरच करत नव्हते. पुर्ण डोके पाण्यात घालून खाद्य शोधत होते सकाळी.

हा वर बघताना पटकन क्लिक केल.

जागू न सुर्यकिरण फोटो मस्तच !!!
दा, श्री लंकन अशोक छान आहे.
सायली, प्राजक्ताची फूल छोट्याश्या सुपात ठेवली आहेस का?
मस्त आहेत सगळेच फोटो आणि माहिती.

टीने, तू खर्‍या आशोकाचे फोटो टाका म्हणालीस तेंव्हा मी आशोक सराफचा फोटो टाक्णार होते Proud
पण मला नाही येत इकडे फोटोज टाकता.

वॉव काय फुलं आहेत.. श्रीलंकन अशोकाच्या फुलाचा रंग फार सुर्रेख आहे
बाप्रे उजू, हे तर अगदी पहिल्यांदाच ऐकलं आणी पाहिलं .. हाफ फ्लावर.. सो प्रिटी..
सुकि?? तू??? ओ एम जी... किती वर्षांनी आलास इकडे.. कुठेशी आहे सध्या मुक्काम पोस्ट??? Happy

अशोकाच्या झाडाला फुले येण्यासाठी सुंदर तरुणीने त्या झाडावर लत्ताप्रहार करणे गरजेचे असते... पुढे नो कमेंट !

हे राणीच्या बागेतले सीताअशोकाचे झाड. ह्या झाडाखाली अगदी जाडजूड सीता देखील मावेल. Happy

फुल येण्यासाठी लत्ताप्रहार करायचा का? मी ऐकलेले सुंदर मुलीने झाड हलवले तरच फुले पडतात... म्हणून कधी हिम्मत नाही केली झाड हलवायची!! Blush

सगळे फोटो सुरेख.

.

.

सुर्यकिरण काय सुरेख फोटो.. बालभारती आठवली.
जागु सुंदर प्र.ची
उजु काय सुरेख अशोकाची फुल
व्हीटी..:)
टिटवी मला तर खुप आवडते.. हीचा आवाज अशुभ का? माहिती नव्हते,,
सकुरा,, मस्त मज्जा आहे तुमची

Pages