निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्षी निसर्गाची...:)

IMG_20150916_160100.jpgIMG_20150916_160130.jpg

वडेलीया.. नाव एका निसर्ग स्नेही व्यक्ती कडुन कळले...:)

सायली..........बरोब्बर ओळखलंस! तशी अधून मधून आहे गं...पण खूप नाही वेळ होत आता! :स्मितः

गणपतीबाप्पा मोरया.

सर्वांकडे लक्ष दे बाप्पा. सर्वांसाठी सुख समाधान घेऊन ये. सर्वांचं भलं कर. सर्व तुझीच लेकरे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

ओम गणपतये नमः

तुमच्या आयुष्यातील आनंद
गणरायाच्या विशाल कानांसारखा असावा
अडचणी, उंदरा सारख्या लहान असाव्या
आयुष्य , सोंडे इतके लांब असावे
आणी आयुष्यातील क्षण, मोदका सारखे गोड असावे
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा

हो

वा!

सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
मस्तय गणराया.......... वर्षू हा गणराया पाहिल्याचं आठवतय.

तुमच्या आयुष्यातील आनंद
गणरायाच्या विशाल कानांसारखा असावा
अडचणी, उंदरा सारख्या लहान असाव्या
आयुष्य , सोंडे इतके लांब असावे
आणी आयुष्यातील क्षण, मोदका सारखे गोड असावे>>>>>>>>> हे तर फारच आवडलं!

सकुरा... ग्रेट .. खुप इच्छा आहे हे झाड प्रत्यक्षात बघायची.

सायली, फोटो साईझ सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे तिथेच.

.

वर्षु, शुभेच्छा सुंदर.
सकुरा, केशराचे फुल पाहुन धन्य झाले.

सकुरा.. धन्यवाद आणि अभिनंदन,केशर बिया यशस्वी पणे रुजवल्यात... Happy

दिनेश दा धन्स.

Pages