निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश,अदिजो ने दिलेल्या लिंक मधे आहेत तश्शीच होती ही झाडं..

भेरली माड करता Caryota urens शब्द वापरलेला दिसला.. झाड ही वेगळंय

मानुषी वॉव.. मस्त गं..

नमस्कार!

शशांकना धन्यवाद! विकांताला त्यांनी सांगितलेल्या ताम्हिणी घाटाच्या वाटेवर गेलेले. पहिल्यांदा कारवी बघितली... Happy
परंतु त्यांनी दिलेला क्विक बाईट पत्त्यावर जायला गुगलने मुंबईतून व्हाया लोणावळा अँम्बी व्हॅली मार्ग दाखवला. म्हटलं जाताना ह्या मार्गाने जाऊन येताना पुण्याकडून येऊ. लोणावळ्यात लायन पॉंइंटच्या आसपास गौरीने वरती टाकलेत तसले कारवी बरेच दिसले, पण इंद्रधनुष्यने कारवी महोत्सव धाग्यावर जसे निळे, जांभळे गालिच्याचे फोटो टाकलेत, तसे दृश्य दिसले नाही.
अँम्बी व्हॅलीपर्यंत रस्ता उत्तम होता. पण पुढे ताम्हिणी घाटाकडे वळल्यावर रस्ता अगदीच अरुंद आणि खराब होता आणि आजूबाजूला अगदीच सुमसान वाटले. तरी जात राहिलो पण एके ठिकाणी अगदीच दाट जंगल लागले. पाउस पडत होता, थोडे काळवंडलेले, दुपारचे २ वाजलेले. अजून जेवलो नव्हतो. जीपीएस आणखी १.५ तास अंतर दाखवत होता. १.५ तास त्या रस्त्यावर एकट्याने जाण्याची भीती वाटली म्हणून परतलो.

कुणी त्या रस्त्याने पुढपर्यंत प्रवास केला आहे का? कसा आहे तो रस्ता? की पुण्याच्या बाजूनेच जाणे बरोबर?

हे काही माझे फोटो...

Koraigad

मानुषी, पीक मस्तंय.
व्हीटी२२०, मस्त फोटो.

लिचीची झाडं पाम वर्गातली नसतात. आंब्यासारखं झाड असतं ते. इथे पहा:
http://www.tropicalfloridagardens.com/2011/06/07/planting-and-caring-tip...

व्हीटी२२०, मस्त फोटो. इंद्रधनुष्यच्या धाग्यावर बरेचसे फोटो टोपली कारवीचे आहेत. ती वेगळी.

लिचीची झाडं पाम वर्गातली नसतात. आंब्यासारखं झाड असतं ते. इथे पहा:

हो, अगदी डेरेदार वृक्ष असतो त्याचा. मी शिलाँग की गुवाहाटी, कुठेतरी एका बंगल्याच्या आवारात पिकलेल्या लिचीने भरलेले झाड पाहिलेले. पहिल्यांदा कळलेच नाही की झाडावर हे काय दिसतेय ते कारण लिची कायम फळवाल्याच्या टोपलीत पाहिलेली. नंतर प्रकाश पडला टाळक्यात. Happy

धन्यवाद लोकहो! पण श्रेय निसर्गाच्या सौंदर्याचे आणि शशांकचे. त्यांनी सांगितली जागा म्हणून जाणे झाले.

कुणी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल का? अँम्बी व्हॅलीकडून मुळशी तलावाच्या काठाकाठाने ताम्हिणी, क्विक बाईट आणि पुण्याकडे जाणारा रस्ता कसा आहे? एकट्या, दुकट्याने गाडीने जाण्यासारखा आहे का?

>>>>>लिचीची झाडं पाम वर्गातली नसतात. आंब्यासारखं झाड असतं ते. इथे पहा:>>>> मला पण वाटलेले. वरच्या फोटोतली पहिल्यांदा मला जंगली खजुराची वाटलेली पण ते पिवळे असतात नं? एनिवे मस्त लाल रंग आहे!

मानुषी शेडनेट शेती बद्दल शुभेच्छा! सध्याच्या बदललेल्या हवामानात अतिवृष्टी, गारपीट गृहीत धरून सगळीकडे अशी शेती करण्यामध्ये काय अडचणी असाव्यात? आणि तश्या अडचणी नसल्यास का नाही केल्या जात?

धन्यवाद लोकहो! पण श्रेय निसर्गाच्या सौंदर्याचे आणि शशांकचे. त्यांनी सांगितली जागा म्हणून जाणे झाले. >>>>
माझे त्यात काही फार कर्तृत्व नाही - सारे काही निसर्गाचेच आहे...

मुळशीच्या आसपास, तसेच क्विक बाईटच्या थोडे पुढे पावसाळ्यात बघण्यासारखे इतके काही आहे की बस्स...
फक्त कोणी जाणकार पाहिजे. मला व शांकलीला पुणे विद्यापीठातील दोन बोटॅनिस्ट भेटल्यामुळे आम्हाला बरेच काही पहाता आले..
१] दुर्मिळ ऑर्किड
२] ड्रॉसेरा
३] पांढरी कारवी
४] कॅशिया आलाटा
बाकीची आता आठवत नाहीयेत, शांकलीला विचारुन सांगेन मग...

'कास'ला जाऊन गर्दी करण्यापेक्षा या बाजूला तसेच कात्रज घाट इ. ठिकाणीही खूप रानफुले आढळतात - ती जरुर पहावीत....

अँम्बी व्हॅलीकडून मुळशी तलावाच्या काठाकाठाने ताम्हिणी, क्विक बाईट आणि पुण्याकडे जाणारा रस्ता कसा आहे? >>> कल्पना नाही, आम्ही नेहमी पुण्यातूनच तिकडे जातो ... Happy

अजूनही कारवी फुललेली आहे - जरुर पाहून येणे .... Happy

अशी शेती करण्यात खर्च ही सगळ्यात मोठी अडचण आहे. सध्या बाजारात सिमला मिर्च जर ६० रुपये किलोने मिळत असेल तर शेडनेटने ती १२० पर्यंट जाऊ शकते. बाजारत जर दोन्ही मिरच्या मिळत असतील तर १२० वाल्याला कोण विचारणार?

खरेतर रानफुले पाहायला कास किंवा तत्सम ठिकाणीच जायला हए असे नाही. गेली कित्येक वर्षे नव्या मुंबईच्या रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजुस मी पावसाळ्यात रानफुलांचे ताटवे पाहतेय. घराबाहेर पडल्यावर निसर्गाकडे पाहात चालल्यास भरपुर निसर्ग नजरेस पडतो. बस आप आंखे खोलके रखो. Happy

घराबाहेर पडल्यावर निसर्गाकडे पाहात चालल्यास भरपुर निसर्ग नजरेस पडतो. बस आप आंखे खोलके रखो. स्मित>>>>> +१११११११११११११११११११११११११११११११

अशी शेती करण्यात खर्च ही सगळ्यात मोठी अडचण आहे. सध्या बाजारात सिमला मिर्च जर ६० रुपये किलोने मिळत असेल तर शेडनेटने ती १२० पर्यंट जाऊ शकते. बाजारत जर दोन्ही मिरच्या मिळत असतील तर १२० वाल्याला कोण विचारणार? >>>>>
खरे आहे. पण हा खर्च सुरुवातीचा "establishment cost" स्वरूपाचा की प्रत्येक पिकाचा?

घराबाहेर पडल्यावर निसर्गाकडे पाहात चालल्यास भरपुर निसर्ग नजरेस पडतो. बस आप आंखे खोलके रखो. स्मित >>> +१ दोन वर्षापूर्वी दसर्याला गावी कोकणात जाणे झाले. तिकडच्या सड्यावर कासमधली १५-२० वेगवेगळ्या प्रकारची फुले दिसलेली. ती सर्रास सहज डोळ्याला दिसणारी... बाकी किती असतील कोण जाणे...

>>कुणी त्या रस्त्याने पुढपर्यंत प्रवास केला आहे का? कसा आहे तो रस्ता? की पुण्याच्या बाजूनेच जाणे बरोबर?>>
vt220, घुसळखांबवरून एक रस्ता तेलबैला मार्गे ताम्हिणीला जातो आणि एक रस्ता शेडाणी, नांदिवली-वडवाथर देवराई वरून मुळशीला जातो. दोन्हि रस्ते थोडे अरुंद आहेत, खराब आहेत, पण मस्त आहेत.
फोटो मस्तच!

लिचीचे एक मोठे झाड लोणावळ्याच्या रामकृष्ण हॉटेलच्या परिसरात आहे. लोणावळ्यात आणखीही एका बंगल्याच्या आवारात लिचीचे झाड आहे. मे महिन्यात त्याला लिचीचे घोस लटकलेले होते, त्यामुळे ते लिचीचे आहे हे कळले.

शेडनेट उभारायचा खर्च एकदाचा असु शकतो. पण आपल्याकडाच्या तिव्र उन्हात शेडनेट किती वर्षे टिकते, ती घालायचा एकदाचा म्हटला तरी किती खर्च येत?, या खर्चासाठी न्कर्ज वगैरे मिळू शकते का हा सगळाअ विचार करायला हवा.

मागे मी आणि मुलगी शेडनेटमध्ये गहु लावला तर काय ही चर्चा करत होतो तेव्हा आम्ही ह्या बाबींचाच विचार करत होतो. पण तो विषय पुढे वाढला नाही. अर्थात गहु शेडनेटमध्ये लावता येणार नाही कारण गव्हाला १००% उन लागते.

सगळीच पिके शेडनेटमध्ये घेता येणार नाही. ज्या पिकांची थेट सुर्यप्रकाशाची गरज कमी आहे अशीच पिके शेडनेटमध्ये घेता येतील.

ग्रिनहाऊस वेगळे आणि शेडनेट वेगळे.

वर्षूतै, तुझ्या रिक्षेला इकडे ईईईईईईईईईईई म्हनते Proud
(तिकडे लिहू नका म्हणालीयेस म्हणून Wink कुठेच लिहू नका म्हणालीस का? Proud )

Pages