निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज हे बिच्चारं बागेत पडलं होतं. आधी वाटलं बहुतेक शेवटचे श्वास मोजतंय.
पण काही वेळाने ते तिथं नव्हतं. बहुतेक उडून गेलं असणार.

जागूताई,
नवीन भागाबद्दल अभिनंदन..
ह्या भागाच्या पाहुण्या संपादकांचेही अभिनंदन... छान प्रस्तावना देऊन समर्थपणे जबाबदारी पेलल्याबद्दल..

नविन धाग्याला आणि सगळया निगकराना खूप खूप शुभेच्छा...
नवीन भागासाठी माझा वाटा...(फुलं तशी कमी टिपतो मी, पण इथे मात्र सुरुवात फुलांनीच...)
पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील शेरबागेतुन....
01

IMG_20150803_233445684.jpg

Morning Glory बहुतेक......

आणि यापुढील सर्व प्रचि जाणकारांनी नावे / माहिती देण्यासाठी...
02..
IMG_20150803_233314268.jpg

03..
IMG_20150803_233241925.jpg

04..
IMG_20150803_233417987.jpg

05..
_IMG_000000_000000_9.jpg

06.. हे झाड मात्र मुन्नार च्या Tea Plantation मधले..

IMG_20150803_233139825.jpg

पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा...

काल एक न्युज वाचनात आली..

एका डेंटिस्ट ने हौसेसाठी गाईड ला पैसे देऊन एका सिंहाला आमिष दाखवुन नॅशनल पार्क मधुन बाहेर आणलं आणि त्याची शिकार केली..

तो म्हणतोय कि मला जर माहिती असत हे लिगल नै तर मी हे केल नसत..
मला शिकारीची हौस आहे म्हणुन मी हे केल..
त्या सिंहामागे त्याच्या सिंहीनी आणि जवळपास २० कब्स आहेत..
खुप ओरडा सुरु आहे त्या डेंटिस्ट च्या नावाने..लोकांनि त्याच क्लिनीक बंद पाडल आणि बराच राडा केला..
न्युज खाली एका बयेनं प्रतिक्रिया दिलीय की .'ओह, पुअर डेंटिस्ट Sad '..यावर एका पोरानी तिची उजळणी घेतल्यावर ती म्हणे कि ओके त्यानं कबुल केलय पण या असल्या इन्फेरिअर स्पेसिज साठी मानवाला शिक्षा देण मुर्खपणाच आहे..एकेरी किल्ला लढवतेय ती तिथं..

आजकाल लोक कित्ती मुर्दाड झाले आहेत याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण..असली चिड येतेय ना..
तो सिंह त्या नॅशनल पार्क मधला आकर्षणाचा बिंदु होता आणि कित्येक वर्षापासुन तिथला अनभिषिक्त राजा..आता त्याच्याजागेवर येणारा दुसरा अल्फा सिंह एक तर त्या २० कब्स ला मारुन तरी टाकेल अथवा हुसकावुन लावेल..
त्या सिंहाला बाहेर काढल्यावर या डेंटिस्ट ने त्याला बाण मारला..त्यात घायाळ झालेया त्या सिंहाने खुप वेळ झुंज दिली पण त्याच्या मागावर असलेल्या या नराधमान त्याला परत मारुन त्याच डोक धडावेगळ केल आणि पन बरच काही .. त्याचे फोटो पन काढलेत..
Sad
चिड्चिड होतेय माझी हे सर्व वाचल्यापासुन..त्या पोरीला तर धरुन सुतवावं वाटतयं..बिनडोक लोक..

मानुषी, तुझ्या पोस्ट चा शेवट आवडला गो..

निरु Lol
फुल मस्तच सर्व..
नाव..अरे जाणकार कुठ गेले जाणकार.. या लवकर लवकर टॉर्च घेऊन..
जालावर सर्वांचे प्रचि आधीही बघितलेय पण नाव नै माहिती ..
त्यातल ५वं फुल बघितलय फक्त Happy

मस्त माहिती आणि फोटो ही.
गाईड ही धन्यच म्हणावा लागेल.
टीना ने मनोगतातल्या फोटो मध्ये फुलांमधुन इंद्रधनुष्य साकारलाय हे जाणकारांच्या नजरेतुन निसटलं की काय ?

अभिनंदन.

टिने मस्त प्रस्तावना आणि फोटो!

बाकी सर्व फोटोपण सुंदर.

निरु किती वेगळी छान फुले आहेत.

अर्रे वा, मला कळ्ळं ही नाही आणी २७ वा भाग आला आणी पळू ही लागला..

अभिनंदन समस्त निगप्रेमींचे!!
टीना, अगदी सुंदर लिहिलीयेस प्रस्तावना.. तुझ्या सिग्नेचर भाषेत न लिहिता, सगळ्यांना समजेलशा भाषेत . Wink

Light 1 घेणे!!!

सर्व फुलं, फुलपाखरू सुरेख आहेत..

एका डेंटिस्ट ने हौसेसाठी गाईड ला पैसे देऊन एका सिंहाला आमिष दाखवुन नॅशनल पार्क मधुन बाहेर आणलं आणि त्याची शिकार केली..>>>>>>५० का ५५ हजार डॉलर्ससाठी सेसिलला मारले.

पहिले मॉर्निंग ग्लोरी नाही आहे. ते धोत र्‍याच्या कुळातले एक झाड आहे. Brugmansia
४ बोगनवेलीची एक जात असु शकेल.

ससा म्हणजे नॉट गुड..

खरेतर माझ्या ल्लिस्टीतले कोणीच गुड नाहीयेत गं. कारण आज जे दुर्मिळ यादीत गेले ते कधीकाळी भरपुरच्या यादीत होते. आणि कुठल्या ना कुठल्यातरी मानवी कारणाने ते आता दुर्मिळ यादीत गेले. मी जे खातेय ते असेच भरमसाठ खात राहिले तर अजुन काही वर्षांनी हेही प्राणी जाणार दुर्मिळ यादीत.

ससा आणि डुक्कर हे वन्य जीव आहे आणि त्यांना मारण्यावर कायद्याने बंदी आहे, कोंबडी व मासे हे मानवी अन्न आहे. त्यांना मारण्यावर बंदी जरी नसली तरी अमर्याद खाण्याने हे अन्नही संपणार एके दिवशी.

गावी माझ्या घराच्या आजुबाजुला तसेच इतरत्र रात्री ससे फिरतात आणि त्यांना फासे लावुन लोक पकडतात. गावातल्या काही सणानिमित्त आणि इतर काही खास प्रसंगी डुक्कराची वा हरणाची शिकार करायला स्थानिक वन्य खाते परवानगी देते कारण तसा पुर्वापार रिवाज आहे. अन्य वेळेस शिकार केली तर मात्र कारवाई केली जाते.

टिना .. सुंदर प्रस्तावना!
नविन भागाबद्द्ल अभिनंदन.. चला लवकर मस्त मस्त माहिती नि फोटो येवु देत Happy

सुप्रभात
आमच्या नगरात गेले काही दिवस प्रचंड पावसाळ्याची हवा होती Proud
कालपासून बरा पावसाळा लागलाय!
वर्षू तुझं रेघारेघाचा फ्रॉक घातलेलं फूल मस्तय!

वाह टीना - भारी प्रस्तावना ...

निरु गुलजार यांनी टाकलेल्या प्र चि -

१] पिंक ट्रंपेट फ्लॉवर म्हणजेच Brugmentia

2] Fuchsia

3] Match stick plant

4] rhododendron बहुतेक

5] पिटुनिया

०४ -होडोडेंड्रोन नसावेत. गुच्छाने आलेले पॉइन्सेटीया असावेत.

अरे कोणीतरी हेही गुपित उलगडा ना - शशांक धावा जरा इकडे ----

वरच्या फुलाचा क्लोजप

गुच्छाने आलेले पॉइन्सेटीया असावेत. >>>> पॉइन्सेटीया नक्कीच नाहीत Happy

साधना - ते गुलाबी फूल शांकली (अंजू) देखील बरेच दिवस शोधतीये - माल्व्हेसी कुळातले आहे हे नक्की पण नेमके नाव समजत नाहीये ... Happy

http://youtu.be/2PcyvkmWnDA

हा व्हिडिओ उघड्तोय का पहा आणि सांगा ...कोकिळेव्यतिरिक्त कोण्ता पक्षी कर्कश्य ओरडतोय? आता मी सेटिन्ग्ज बदलली.
जरी व्हिडिओ असला तरी पक्षी दिसत नाहीये. कारण सेल फोनातला व्हिडिओ आहे.

अगं हॉलीहॉक वेलावर येतात का? जर असतील तर मग हे हॉलिहॉक असतील. नेटवर हॉलिहॉक उभ्या दांड्याच्या दोन्ही बाजुला आलेले दिस्सताहेत. मीही त्या फुलांना असेच उभ्या दांड्यावर पाहिलेय.

शशांक मला रंगावरुन आणि रचनेवरुन पॉइन्सेटीया वाटले. निरू, मोठा फोटो टाका ना म्हणजे लक्षात येईल.

वर्षू, मला नाही ग ओळखता येत गुड आणि बॅड मश्रुमस. जर मश्रुम्स देखणे असतील तर ते नक्कीच खाण्याजोगे नसणार. आमच्याकडे सध्याच्या दिवसात जे मश्रुम्स उगवतात ते पसरट असतात आकाराने. हाताचा पंजा मावेल इतका मोठा आकार असतो.

माझ्याकडे फोटो होता पण आता सापडत नाहीय.

Pages