निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्या फळाच्या बिया आहेत या???
कोडं नाहीये..खरंच उत्तर हवंय.. स्मित >>>>> वर्षूदी - बहुतेक करुन sterculia जिनसचे आहे - स्पिसिज मात्र कोणी जाणकारच सांगू शकतील ..... Happy

unnamed[1]_3.jpg
या बिया कशाच्या?

वर्षू नील, बिया कशाच्या माहीत नाही पण दिसतायत भारी एका शिंपल्यात दोन वेगळे रंग.

वर्षु नील,
ही फळं Sterculia monosperma ला जवळची वाटताहेत. Chinese Chestnut, Thai Chestnut, Seven Sisters' Fruit, Phoenix Eye Fruitअशी नावे दिसताहेत. पिकलेली फळं खातात अशीही माहिती दिलेली दिसतेय.
(मी जाणकार नाही Happy गुगलून काढलेली माहिती आहे)

अ के,
नाही.
तुम्हाला माहित आहे
कसे काय ओळखता येत नाहिय नुसता सडा पडतो या बियांचा.
सुरवातिला या बिया हिरव्या असतात.

अदिजो.. थँक्स.. थायलँड मधे भाजीबाजारात विकायला होती ही फळं .. थाय चेस्टनट्स असतील ही..

चायनीज चेस्टन्ट्स अगदी वेगळी होती यांच्या पेक्षा

सकुरा.. मस्त होतं तुझं कोडं..

सध्या रोज ऑफिसला येताना खुप छान वाटत असत. अस वाटत रस्त्याच्या दोन्ही कडावरील रानफुल माझे स्वागत करत आहेत. सगळी रानफुले फुललीत. खुप प्रसन्न वाटत सकाळी.

हा कुर्डूचा ताटवा.

वर्षू, तश्याच एका फळाचा फोटो माझ्या मालिकेत येणार आहे.. पण त्या बिया फळाच्या बाहेर होत्या !

त्या खोट्या अशोकाची फळे, कुणीच ( कुठलाही पक्षी, खारी ) खात नाहीत त्यामूळे झाडाखाली खच पडलेला असतो.

जागू, जंगली बदाम आणि याचं आडनाव एकच - स्टर्क्युलिया. भाऊ भाऊ आहेत हे.
जंगली बदामात बिया जास्त असतात. यात मात्र दोनच आहेत.

ओके.

व्वा काय मस्त गप्पा..
आदिजो खुप छान माहिती..
bixa.jpgIMG_20150914_170022.jpg

ह्या फुलांपासुन खायचा रंग तयार करतात.. आणि सौंदर्य प्रसाधनात ही वापरतात..
bixa olerana ( नाव आणि माहिती दिनेशदा कडुन कळली :))

सायली, बिक्साची फुलं छान! त्याला शेंद्रीही म्हणतात. त्याच्या बिया पाण्यात कालवल्या की छान शेंदरी-लाल रंग होतो. तो तसाच खाण्याच्या पदार्थात वापरता येतो.

अहाहा मस्त फोटो सर्वच.

ते खोटे अशोक खूप आहेत सोसायटीत पण फळे, बिया नाही दिसल्या, आता नीट बघेन.

Pages