निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या बाबतीत, कुत्रे आपणहून माझ्या जवळ येतात. श्रीलंकेतही एक देखणा भूभू भेटला होता. पुढच्या भागात येतोच आहे फोटो त्याचा.

मला तर कोण्ताही प्राणी खूप आवड्तो. लुई आहेच. आणि बरीच मांजरं येऊन जाऊन असतात.
दोन्ही प्राणी खूप गोड असतात.
मंड्ळी....निबंध लिहिल्यासारखं वाट्लं????
माझ्या बाबतीत, कुत्रे आपणहून माझ्या जवळ येतात. दिनेश......सेम हियर!
माझाही वाचा ना या दोन्ही प्राण्यांवरचं लिखाण. Proud
http://www.maayboli.com/node/4355
http://www.maayboli.com/node/17378

.

तरीही मला अटेंबरोचा साहेबांचा हेवा वाटतो, अगदी कुठलाही प्राणी, पक्षी, मासा.. त्यांच्या जवळ न बिचकता वावरतो ( ते सोबत असताना कॅमेरालाही बिचकत नाहीत ते.. ) एकेक शॉट्स लक्षात आहेत त्यांचे.

unnamed[1]_1.jpgunnamed[1]_2.jpg

.

सकुरा, मस्त फोटो. मलाही असाच आनंद होतो फोटो टाकता आला की... आम्ही कायम शिकाऊ उमेदवार Happy बोटनिकल गारड्न उटी.

मंजूताई मलापण फोटूचे तंत्र काही जमत नाही, नवऱ्याची मदत घ्यावी लागते.

इथे बाकी सर्वाना प्रणाम बाबा. किती सुंदर फोटो टाकत असतात.

अन्जू, मझा पण पोपटच होत आहे.
आधिचे फोटो गायब
हम होंगे कामयाब एक दिन ......

मनमे है विश्वास...........

मंजूताई, तू पिकासा वरून इथे अपलोड करून तुझ्या कडचे डिलीट केले असशील तर इथेही दिसणार नाहीत..कारण पिकासा एखाद्या खिडकी सारखे आहे, तिच्यातून फक्त डोकावून बघता येते Happy
या साईट वर सेव होणार नाहीत फोटोज!!

दिनेश्,याला सोलापुरात मराठीत शेंदाड म्हणतात व कन्नड मधे पुट्टीकाई म्हणतात.हे फळ पावसाळ्यात शेतात आपोआप उगवते रानभाज्यांसारखे.

इथ कुणाला शेरण्या ममाहिती आहे का?
शेतात वेलअसतो बरेचदा..
िमनी काकडी म्हणता येइल.. पण लांबुळकी नसते, अंडाकृति असते..
उन्हाळ्यात आप्पा त्यांना उभ्या चिरतात आणि वाळू घालतात.. जेवताना त्या कडकडीत वाळलेल्या शेरण्या सुकलेल्या लाल मिरच्यांसा बाजुला काढायच्या आणि मग त्यावर मिठ भुरभुरुन जेवनासोबत खायच्या..

उन्हाळ्यात आप्पा त्यांना उभ्या चिरतात आणि वाळू घालतात.. >>>>
हायला!!! Wink

मुंबईत दोन दिवस ढग भरून आलेत. पाउस खूप नाही पण येतोय अधूनमधून... इथे जास्त नाही आला तरी चालेल, पण पाणीपुरवठ्याच्या वेगवेगळ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पडो.. आणि तिथेही शिस्तीत पडो, उगा शेते वाहून जाण्याईतका जास्त किवा अगदीच तुटपुंजा नको प्लीज...

पाऊस..
काल जपान मधे आलेला पुर पाहीला..बेक्कार..काय हाहाकार माजवलाय तिथ..
या लोकांची कमाले बा..इतकी संकट येतात..पण ना मनाने हरत ना शरीराने कधी..यांना फिनीक्स पक्ष्याची उपमा अगदी सही सही लागु पडते.. भारी लोकैत..

टीना,
तिथले हवामान खाते खुप प्रगत आहे.आधिच काय घडणार माहित असते त्या दृष्ट्ने ते पावले उचलतात.
मनुष्यहानी होऊ देत नाहित.हवामान खात्याचे अंदाज ९९.९९% बरोबर असतात.

आणि त्या जपान ला क्षणाचा देश म्हणतात
त्याची भौगोलिक रचना अशी आहे की समुद्र त्याला कधिही गिळंकृत करू शकतो
व तो माउंट फ़ुजी जिवंत ज्वालामुखी कधिही फुटू शकतो.
म्ह्णुन ती लोकं प्रत्येक क्षण समरसुन जगतात.

हो पन वित्त हानी तर होतेच ना..
कमाल याची वाटते कि हे लोक तरीही स्थिर आहे आणि शांत सुद्धा..
स्वतःच्या चुकितून धडा घेउन समोर जाणे याच परफेक्ट उदाहरण म्हनजे जपान..
दुसर्‍या महायुद्धाचे चुकिचे निर्णय, त्यानंतर वाटी आलेले भयंकर परिणाम आणि तरीही मनात कसलाच आकस न ठेवता समोर जाणारे लोक म्हणजे दंडवत घालावा वाटतो मला यांना..
नै तर आपले शेजारी Angry

हो टिना बरोबर आहे तुझे
चुकीतुन ते धडा घेतात व ती चुक पुन्हा होऊ देत नाहीत.

शांतता तर त्यांच्या नसानसात भिनलीय चालताना ते पावलांचा आवाज पण येऊ देत नाहीत.
बोलणे एकदम हळुवार.
आपण कल्पना पण नाही करु शकणार त्याची. (आवाज न करता चालायची इतक्या हळुवार बोलायची)

Pages