निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाऊस पडु दे अगदी गणपतीत आणि नवरात्रीतही पडु दे.. आज पेपरात वाचले पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अजून ७३ % साठा आहे. वाढो तो ही ....

ह्म्म... तसे व्हायची काही चिन्हे नाहीत. आता पडणारा पाऊस हा खुप तुरळक पडतोय आणि तो परतीचा पाऊस पडतोय. ढग गडगडुन पडणारा पाऊस आहे हा.

http://www.accuweather.com/en/in/navi-mumbai/189315/hourly-weather-forec...

वरिल साईट खुप बरोबर माहिती आणि अण्दाज देते. मी या साईटवर विसंबुन निर्णय घेते. आणि आजवर कधीही चुकलेले नहीत. त्यांचे तासाचे अण्दाजही इकडे तिकडे होत नाहीत. या साईटवर मुंबईचे येत्या महिन्याचे अंदाज पाहिले तर या महिन्याच्या शेवटपर्यंत तुरळकप्पाऊस पडेल. आनि पुढच्या महिन्यापासुन कडक उन दिसतेय. Sad

पुण्यात मुंबईच्या मानाने जरा ब-यापैकी पाऊस आहे या महिन्यात. पण पुढच्या महिन्यात तिथेही ब्रिलियंट सन आहेच. Sad

पण वातावरण मात्र मस्त झालेय कालपासुन. ब-याच दिवसात काल पहिल्यांदा एसी न लावता झोपलो.

सध्या मुंबई पश्चिम उपनगरात पाउस भरून आलाय... पण अजून गळायला सुरुवात नाही झाली. सगळं एकदम थांबल्यासारख झालय... वाराही नाही! होपफुली येईल...

साधना...जाउ दे मग फॉलो नको करु त्या साईटला आता..
लोकांकडून असल्या नसल्या आशा पन हिसकुन घ्यायच्या म्हंजे काय..

इदर तो कलसे आरामच नै पाऊस को..सतत सतत सुरु आहे..असो..छानच आहे म्हणा..हवा तिथे हवा तितका पडला म्हणजे मिळवल _/\_ ..

त्यादिवशी एक मांजर आळवणी करत असल्यासारखी ओरडत होती..
मला मांजर हा प्राणी दुरुन साजरा वाटतो..त्या प्राण्याचा स्वभाव आवडत नसल्याने जास्त गोंजारण्याच्या भानगडीत मी पडत नाही..तर ती गॅलरीमधेच होती म्हणून म्हटल चला एक दोन फोटो काढूया.. रात्र असल्याने फ्लॅश ऑन केला आणि त्यामुळे जे काही समोर दिसल त्यावरुन मी लगेच दार बंद करुन खिडकिच्या जाळ्या लावुन गप बसली..
रात्रीला मांजर कश्शीच आवडत नाही हे सुद्धा एक कारण..मुळात मला तिच्या डोळ्यात प्रेम कधी दिसतच नै म्हणुन.. त्यापेक्षा कुत्रा बरा.. नाय नाय इथ मांजर कुत्रा भांडण सुरु करायचा अजिबात हेतू नै आहे माझा.. Wink
तर हे बघा प्रचि..

कुणाची हिला घरात घ्यायची हिम्मत होईल..नकोच रे बा..

नो वरीज टिना. मला मांजर आणि कुत्रा दोन्हीही (घरात) आवडत नाहीत. सर्व प्रकारचे लोक्स असतात या दुनियेत. जियो और जिने दो.

बरं तू ते हमिंगबर्डचं लिहिलंय नं वर तो इथं रोज दिसतो मला. आमच्या फीडरवर असताना एखादा चांगला फोटो काढता आला तर पाठवेन तुला.

कुत्रा आणि मांजर दोन्ही लांबुन बघायला आवडतात, स्वतः पाळायला अजिबात नाही. सासरी कोकणात मांजरी आहेत. दीर आणि नवरा दोघांना मांजर प्रिय. भाऊ आणि बहीण दोघांना भु भु.

मांजरीपण असतात ग प्रेमळ. सासरी तर दिर गप्पा मारतात आणि त्या पण खुप प्रेम करतात त्यांच्यावर. त्या अवतीभोवती असतात दीरांच्या सतत (जेवताना, झोपताना). Happy

माझी मुलं माझ्याकडे कुत्रा आणण्यासाठी कधीपासून मागे लागतील. मी कुत्र्याला घाबरते म्हणून पपी आणुया हे पण सांगून झालंय. मी त्यांना आमच्या शेजारच्यांच्या कुत्र्यांचे लाड करायला मध्ये मध्ये पाठवते.
आता मुंबईत एका देवळाच्या बाहेर एक कुत्र्याचं पिल्लु असंच होतं. मुलाला ते घरी आणून पाळायचं होतं पण मग तू परत आल्यावर त्या पिलाला तुझी आठवण येईल असं इ.बी. करून ठेवलं ते तिथेच.

हो गड्यांनो,
पण त्या सतत अंगाखांद्यावर करतात, बिछान्यात घुसतात,ताटात तोंड टाकतात ते मला अज्जिब्बात आवडत नै..
गाजवल्यासारख..
त्याउलट कुत्रे लवकर शिकतात.. उठसुठ अंगावर बसत नै, म्हटल्याशिवाय बिछान्यात येत नै, ताटात तोंड टाकत नै .. पळपुटे तर अज्जिब्बात नसतात..एनिथिंग फॉर यु माय लव्ह म्हणत हमेशा प्रोटेक्टिव्ह असतात मालकाप्रती..

मला कुत्रा, मांजर कोणीच नाही आवडत असं अंगाखांद्यावर.

मी पाठीवरून वगैरे हात फिरविन, बास.

कोकणात मांजरी प्रिय असल्याचे दुसरे कारण असेल. उंदीर घरात येत नाहीत. साप किंवा विंचू वगैरे मांजरीला पटकन दिसतात आणि ती सावध करते (बहुतेक).

भुभु's are really adorable creature अन्जू..
प्राण्यांपैकी तो एक आहे ज्याला मनुष्य दु:खी असेल तर चटकन कळत आणि त्याला आनंदी करण्यासाठी तो प्रयत्न करतो.. म्हणुन कुत्रा असावा.. माझ्याकडे होता एक.. शेरु.. डॉबरमॅन जातीचा होता. पण त्याच्याजागी आता दुसरा कुणी आणायचि हिम्मत होत नाही आता.. खुप लळा लावलेला त्याने.. आईवर तर जीव टाकायचा अक्षरशः.. सर्वात जास्त तिच्याच हातचा मार खाल्लाय पन त्यानं.. तिच ऑपरेशन झाल तेव्हा ती येईस्तोवर उपाशी राहिला होता तो..निव्वळ पाणी पिउन.. बापरे त्याची हालत खराब आणि त्याला पाहुन आमचा पन जीव वरखाली व्हायचा..
कुत्रा खरच खुप छान असतो..
निरपेक्ष प्रेमाच मुर्तिमंत उदाहरण..

बाकी काय गं, झोपली नै अजुन..
मुंबईत पन ३.३७च झाले असणार ना रात्रीचे.. आपण दोघीही आता निशाचर गटात मोडत असु.. Proud

टीना, भिजलेला बुलबुल गोड दिस्तोय.. लक्की यू ,पाऊस पडतोय म्हणून..

इथे काल थोडा वेळ धुंवाधार पाऊस पडला पण तितक्याने मुंबईतील पाणी संकट दूर होईलसे वाटत नाही.. Sad

कोण रे ते मांजरांना नांवं ठेवतंय.. थांब येऊ दे साधना ला इथे.. Wink

मी टू सेम सेम वेका, टीना ,अन्जू , अ‍ॅनी अ‍ॅनिमल्स, बर्ड्स आर अ बिग नो नो इन द हाऊस.. Lol

टीना वर्षू, छान फोटो...
मला मांजर भु भु दोन्ही आवडतात.सध्या १२ वर्षाचा भु भु आहे पामेरियन.
एक कारवान शेतावर.

http://www.maayboli.com/node/1633 - वान्या - भाग १ - श्वान प्रेमी असा वा नसा - हे सर्व भाग इतके सरस आहेत की वाचता वाचता केव्हा या वान्याच्या प्रेमात पडाल कळणारही नाही - आणि लेखिका आहेत श्री. टण्या यांच्या मातोश्री - सौ. मीना बेडेकर - जबरदस्त लेखनशैली आहे यांची.... Happy

आता माण्जरांछा विषय चाललाय तर माझीही रिक्षा. http://www.maayboli.com/node/12327

पण मला मांजरे अजिबात आवडत नाहीत हे आजही खरे आहे. फक्त घरात माण्जरप्रेमी असल्याने मी चालवुन घेतेय Wink

Pages