निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उजु, मस्त फुले आहेत.

इथे अंगोलातही हवामानाचा घोळ आहे. एव्हाना गरम व्हायला सुरवात व्हायला हवी होती पण अजून थंडीच आहे.
या महिन्यात नेहमी भरपूर पाऊस पडतो, पण तोही कमीच आहे. अर्थात इथे ( आमच्या भागात तरी ) शेती वगैरे काही नाही... पण तरी मला पाऊस हवाय कि !!!

मागील पानावर उजू यांनी टाकलेल्या प्र चि (पांढरी फुले) बहुतेक याच्या आहेत ----

Mexican Sword-Plant, Botanical name: Echinodorus palaefolius Family: Alismataceae (Water Plantain family)
Synonyms: Sagittaria palaefolia

ह्म्म्म.

पाऊस रुसलाय. बळीराजा जगला तर आपण जगु.

ये रे ये रे पावसा. आमच्याच करणीची फळे आहेत ही. पण तू नको रे असा बदला घेऊस, तू आमच्यासारखा नको होऊस. तू ये रे.

बाभळीचा फोटो अप्रतिम! बाकी सारे फोटो आणि त्यातली फुले, पाने सुरेख...

गेले २-३ दिवस मुंबईत आर्द्रता एकदम नाहीशीच झालीय... दुपारी आकाश निरभ्र, निळे, रखरखीत! Sad

दहिसर नदीच्या कडेने लावलेल्या झाडांची आज छाटणी चालू आहे... रखरख आणखी तीव्र वाटतेय... Sad

आज सुरुवातीला तो भुरभुरला..
जरा वेळा पूर्वी वीजा गडगडाट आणि काही टपोरे थेंब...
आणि आता परत सगळ शांत ... रस्तेपनओले नै झाले धड Sad
कठिणे...

आज बायो चा अभ्यास करत असताना गॅलरीत बसुन होती तेव्हा निंबोणीणीच्या झाडावर काही सनबर्ड बागडताना दिसले..लगेच शशांक यांचा सनबर्ड पक्ष्याचे पिल्लु हा धागा आठवला कारण हे लोकपन सेम होते दिसायला बस जरा अडल्ट होते एवढच..मनात लगे किती मोठा, आकार बिकार वगैरे विचार आला.. मग आठवल माझ लहानपण जेव्हा पप्पा जनरल नॉलेज अस ठ्ळक अक्षरात लिहिलेल पुस्तक आणायचे आणि कौतुक, वाचायची घाई, जेवताना समोर टिव्ही (जो आईने नंतर मना केला..तसही दुरदर्शनच असल्यामुळे काही एवढे ऑप्शन पन नसायचे बघायला) किंवा पुस्तक आणि परत परत वाचायची आवड ह्या सर्व गोष्टींमुळे कोळून प्यायलेले ते पुस्तक आठवलं..त्यात जगातील सर्वात छोटा पक्षी जो जमिनीवर पायही टेकवत नाही तो हमिंगबर्ड अस वाचलेल अजुनही ठळक आठवलं.. मग परत एकदा अरे आपल्याकडं पन आढळतो का हा असा विचार करुन इथ प्रश्न विचारुया असा विचार आला पन तेवढ उत्तर मिळेपर्यंत स्वस्थ कुणाला बसवेल म्हणुन लगेच गुगलबाबांना प्रश्न विचारता झाली..

हुश्श किती ते विचार एकसाथ आलेले काही क्षणात..
तर मी सर्वात अडाणी आणि खालील माहिती जमवली ती थोडक्यात लिहतेय..सर्व काही जालावरुन साभार आणि चुकुन कुणाची यांमधे गल्लत झाली (जरी तस व्हायची शक्यता कमी आहे तरी) तर समोर माहिती असावी म्हणुन इथं देतेय Happy

सनबर्ड----------------------------------------------------------- हमिंगबर्ड

->पॅसेराइन पक्षी - ज्यांचे पाय तुलनेने मजबुत असतात -------- ->अपोडीफॉर्म पक्षी - ज्यांचे पाय तुलनेने कमजोर
व ते पायांचा उपयोग पकडीसाठी करु शकतात.--------------- असल्याने ते जास्तीत जास्त पंखांचा वापर करतात.

->आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलियामधे आढळतात.--------------- ->फक्त अमेरिकेत आढळतो.

-> प्रामुख्याने फुलांमधील नेक्टर ---------------------------------- ->फुलांमधील नेक्टर.

->आकार साधारण चिमणीएवढा ----------------------------------- -> -५ सेमी

->वजन ५ ग्रॅ ते ४५ ग्रॅ ------------------------------------------------ -> -१.८ ग्रॅ

->घरटी पर्स च्या आकाराची ------------------------------------------ ->कप च्या आकाराची

दोहोंची चोच टोकदार आणि जिभ लांब आणि ट्युब्सारखी..जिभेला समोर ब्रश सारखी रचना परागकण चिटकुन ओढून घ्यायला.

Downloads.jpg

माहिती आणि प्रचि जालावरुन साभार..फक्त फरकासाठी आजुबाजुला द्यायचे म्हणुन कोलाज मी केला..

वाचताना हनीइटर्स नावाच्या पक्ष्याचा सुद्धा उल्लेख होता पण बघीतला नै कधी आणि वाचनात पन नै आला म्हणुन इथ मी ती माहिती दिली नाही..बाकी हनीइटर्स फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतात..

ते मधले धागे फक्त गॅप साठी आहे Proud
उगा फरक सांगा या प्रश्नात दोघांमधील संबंध ओळखण्याचा यत्न कुणी करु नये Wink

गुड.

इतके डीटेल्स दिलेत गूगलवरून का होईना. माझ्यासारख्या आळश्याला, आयतं नॉलेज. अर्थात नेहेमीच इथे मिळते बऱ्याच जणांकडून.

गेले आठ दिवस इथे नो पाउस
रो ज सकाळी पुर्ण तयारी करुन येतो अनि मग गुल होतो. तसा नाही पडला तॠ चालेल आता. जिथे गरज आहे तिथे जा?उन पडला म्हनजे झाले

इतना सन्नाटा क्यूंहै भाई यहाँ???? Happy

त्या रानभाजी प्रदर्शनाचे फोटोज इकडे का बरं नाही आले अजून.. निगप्रेमी, उठो, जागो!!!

प्रसन्न फुले

टीना मस्त कंपॅरीझन.

मला अनेकांना सोनटक्क्याच्यी फळे माहीत नाहीत हे वाचुन आश्चर्य वाटले. त्या फळात गुलाबी लालसर भाग असतो व आतमधे काळ्या बिया. अनेक पक्षी हमखास खाता ही फळे. आजकाल मिळणार्‍या कलमी सोनचाफ्यामुळे फळे माहीत नसतील कदाचीत. पण मोठ्या झाडाची ही फळे कायम बघीतली आहेत.

जागू

त्या धार्मीक स्तोत्रांच्या धाग्यावर केलेली अनुक्रमाणिका पाहिली का , तसे आपल्याला काही करता येईल का

निसर्गाच्या गप्पा (भाग २७) काही निवडक पोस्ट

खुळ्खुळ्या साप (रॅटल स्नेक)

Green Pit Viper Sri Lanka..

Indian Flying Ornate Snake..

Vine Snake..हरणटोळ

आंबोली बेडुक..

टीना, मस्त पोस्ट आणि आईबाबांनी लहानपणी ज्या छान सवयी लावल्या, त्याबद्दल आयूष्यभर अभिमान वाटेल.

वर्षू.. मस्त फोटो.

मला अनेकांना सोनटक्क्याच्यी फळे माहीत नाहीत हे वाचुन आश्चर्य वाटले. त्या फळात गुलाबी लालसर भाग असतो व आतमधे काळ्या बिया. अनेक पक्षी हमखास खाता ही फळे. आजकाल मिळणार्‍या कलमी सोनचाफ्यामुळे फळे माहीत नसतील कदाचीत. पण मोठ्या झाडाची ही फळे कायम बघीतली आहेत.

सोनटक्का की सोनचाफा??? Happy

शहरात मोठा सोनचाफा कुठे मिळतो पाहायला? मी पहिल्यांदा ही फळे पाहिली ती पुण्यात मुलीच्या शाळेत. तिथली झाडे ४-५ वर्षे जुनी होती आणि त्यामुळे फारशी उंच नव्हती. त्याआधी मला सोनचाफा माहित होता पण त्याला अशी फळॅ लागतात हे माहित नव्हते. हे झाड कायम हिरवेगार असते आणि ही फळेही शेवटपर्यंत हिरवीच असतात त्यामुळे लक्ष जात नसावे हेमावैम.

सशा, आयड्या चांगलीय पण हे करणार कसे? माझ्या आय इ मध्ये कमेंटची लिंक नाही मिळत, पानाची लिण्क मिळते.

ससा आपण पूर्वी च्या धाग्यावर तसे केले होते. पण आपला धागा वेगाने धावल्याने शक्य होत नाही मला. जर तुम्ही सगळे हेल्प करत असाल तर करूया.

Pages