निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिक्षकदिनानिमित्य ह्या धाग्याला वंदन. अजूनही एक विद्यार्थिनी असलेली मी (कायम विद्यार्थिनीच असेन), धाग्यावरील सर्वांना वंदन करते. ___/\___. Happy .

इथे खूप छान शिकायला मिळते. कधी कधी वाटते आपली ओंजळ अपुरी आहे हे सर्व ग्रहण करायला.

जागुले, गोड आहेत फुलं पेंव ची...

हीरा , खूप सुंदर माहिती दिलीस.. नागकांडी, पेव बद्द्ल

अन्जू, खरंय गं, इथे इतकं काही सतत शिकायला मिळत असतं, खूप आवडल्या तुझ्या शिक्षक दिना बद्दलच्या भावना.. तुला १०० % अनुमोदन Happy

जिप्स्याने काही दिवसांपूर्वी या फळांचा फोटो टाकून कोडं घातलं होतं, साधना ने बरोबर उत्तर दिलं होतं.. Happy

मी ही पहिल्यांदाच पाहिली ( आणी ऐकली सुद्धा!!) ही फळं ..

हिरा छान माहीती.

अन्जू खरच खुप काही शिकायला मिळाल ह्या धाग्यामुळे. माझा रानफुलांच्या वाटेवर हा लेख जेव्हा माझ्या ओळखिच्या लोकांनी वाचला तेव्हा बर्‍याच जणांनी हाच प्रश्न विचारला की तुला एवढी फुलांची नाव माहीत कशी? त्याचे सगळे श्रेय ह्या धाग्यालाच जाते.

वर्षूताई माझ्याकडे आहे तो फोटो पण घरी जाऊन लिंक टाकावी लागेल मला.

अर्रे पण माझ्या फोटोतील फुलांचं नांव अजून कुणीच सांगितलं नाहीये !!! क्यूं क्यूं????>>>>>>

white alba coral vine - वर्षूदी - हे आहे का ते फूल ??? तू दिलेल्या फोटोवरुन त्याची पाने वा फुलांचे इतर डिटेल्स कळत नाहीयेत - जरा गुगलून बघितलेस वा तुझ्याकडे इतर फोटो असल्यास त्यावरुन चेक केलेस तरी कळू शकेल... Happy

अन्जू, खरंय गं, इथे इतकं काही सतत शिकायला मिळत असतं, खूप आवडल्या तुझ्या शिक्षक दिना बद्दलच्या भावना.. तुला १०० % अनुमोदन स्मित >>>>>>

निसर्गासारख्या महान गुरुपुढे आपण सगळेच कायम विद्यार्थीच...... _____/\______

निसर्ग हा महागुरू आहे. पण त्या निसर्गातील घटकांचे ज्ञान देणारे, ओळख करून देणारेही सगळे गुरूच.

माझ्या माहेरी कळलावी नेहमीच्या ठिकाणी बरोबर दरवर्षी यायची. ती फुलण्याकडे माझे लक्ष असायचे. फुलली की गवतात जाऊन मी काढून आणायचे फुले. माहेरी नागदौणा म्हणतात.

कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
त्या निमित्त फुलांनी रचलेली रास की आरास......
आज आलेली फुलं (सोनटक्का)

sontakka1.jpg

.

निसर्ग हा महागुरू आहे. पण त्या निसर्गातील घटकांचे ज्ञान देणारे, ओळख करून देणारेही सगळे गुरूच.

जागुला मम.

उजू मस्त फुले.

जो एस, कसला आहे तो सोनटक्का. सॉलिड मस्त आणि हा कलर मी इथेच बघितला नि ग वर. मला कायम पांढराच दिसतो. कित्ती गोड.

माझ्या सोनटक्याचे शेवटचे फुल आत्ता फुलतेय, ते मी रात्री १२ वाजता कृष्णाला वाहणार आहे. कालच ठरवले आणि आज जो एस यांनी पण सोनटक्का आणि कृष्णजन्म सांगड लावली त्यामुळे मस्त वाटलं.

जो_एस.. अगदी मस्त फोटो.

मी मॉरिशियस मधे आणि श्रीलंकेतही पिवळा सोनटक्का.. रस्त्याच्या कडेने माजलेला बघितलाय.

जो एस अतिशय सुंदर फोटो काढलाय.

जिप्स्याने काही दिवसांपूर्वी या फळांचा फोटो टाकून कोडं घातलं होतं, साधना ने बरोबर उत्तर दिलं होतं

अगं माझ्या इथे चाफ्याचे वृक्ष आहेत भरपुर, फुलांनी आणि फळांनी लगडलेले. Happy

बाभळी

बाभळी
लवलव हिरवीगार पालवी - काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे - फांदी तर काळोखी काळी
झिरमिळ करती शेंगा नाजूक - वेलांटीची वळणे वळणे
या सार्‍यातुनि झिरमिर झरती - रंग नभाचे लोभसवाणे
कुसर कलाकृति अशी बाभळी - तिला न ठावी नागर रीती
दूर कुठेतरी बांधावरती - झुकून जराशी उभी एकटी
अंगावरती खेळवि राघू - लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनिया मन - रमते तेथे सांज सकाळी
येते परतुन नवेच होऊन - लेवुन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखुन अवघ्या - धुंद सुवासिक पिवळे उटणे
(कवियत्री: इंदिरा संत)

शशांक, गुगलून पाहिलं.. माझ्या फुलांशी मिळती जुळती वाटताहेत ही फुलं.. अजून एखादा स्पष्ट फोटो शोधते माझ्या जवळ असला तर..

कळलावी, सोनटक्का अतिसुंदर!!!

बाभळी चं सुंदर रूप, जिप्स्या च्या कॅमेर्‍यातूनच पाहावं.. वाह!!!

Saglya gappa mast..
Anju tai shikshak dina cha mag khup awadala..
Ani kitti chaan ga. Tu pahila phul devila ani shevtacha gopal krushnala
Vahilas...
Jipsy ... Babhali apratim... Dhanyavad share kelya baddal....

जिप्सी क्या बात है, इंदिरा संतची ही कविता मी वाचली नव्हती. फार सुंदर आणि तुझे काटेही सुरेख.

सायली ५ फुले मी देवालाच वाहिली. फक्त १ फुल झाडावर ठेऊन बघितलं, किती दिवस राहते. जवळजवळ सर्व देवांना वेगवेगळ्या दिवशी फुले. समाधान वाटतं नाही आपल्या मेहेनतीची फुलं देवाला वाहिला.

एक मस्त विडिओ मिळाला यूटुबवर.

सुगरण आपले घरटे कसे बांधायला सुरवात करतो त्याबद्दल.

मागच्या पानावर मी एका कोकिळेचा उल्लेख केलेला. कोकिळ कसे दुस-याच्या घरट्यात अंडी घालुन आपली जबाबदारी दुस-याच्य गळ्यात अडकवते. आणि ते पिल्लु अंड्यातुन बाहेर पडल्या पडल्या आप्ले रंग दाखवायला लागते. आणि हे सगळे होत असताना त्या बिचा -या मुळ पक्ष्याला काहीच क्ळत नाही. तो आपला भरवतोय हा घरापेक्षाही मोठ्या झालेल्या पिल्लाला. सर अ‍ॅटनबरोंचा विडिओ आहे.

Pages