आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
ओळखीची वाटताहेत का ही पानं??
ओळखीची वाटताहेत का ही पानं??
हे हवाईयन फूल पहिल्यांदाच
हे हवाईयन फूल पहिल्यांदाच जायंट साईझ मधे पाहिलं
आणी हे मी काढलेलं.. कॉपी कॉपी..
यूजिंग मल्टी मिडिया
@ देवकी..... हा आहे का तो
@ देवकी..... हा आहे का तो पक्षी....?
जर हा असेल तर शिंपी पक्षी... Tailor Bird..
ओळखीची वाटताहेत का ही पानं??
ओळखीची वाटताहेत का ही पानं?? >>>> Kaempferia laotica, Zingiberaceae (ginger family) ही आहेत ती पानं ....
निरू माझे कबुतरप्रेम
निरू
माझे कबुतरप्रेम सगळ्यांनी वाटुन घ्या आणि कबुतरांना इथुन हटवा. 
वर्षू, मस्त फुले आहेत गं. तु अगदी फुलांच्या गावात राहतेस. हे पुर्वेकडचे लोक फुलांचे वेडे आहेत बहुतेक. पुलंच्या पुर्वरंगमध्ये पण वाचलेले पुर्वेकडच्या फुलवेडाबद्दल. त्यानी लिहिलेले की देवाला फुले वाहतानाही ही मंडळी काहीतरी पुष्परचना करुनच वाहणार.
आणि तुही फुले मस्त काढलीस. कागद तर ट्रेवर ठेवल्यासारखा वाटतोय. हातानेच काढलेस ना चित्र? मल्टीमिडीया लिहिलेस?
निरू, शिंपी छान टिपलाय.
देवकीचा पक्षी कदाचित हा किंवा मग अॅशी प्रिनीयाही (वटवट्या) असु शकतो. अॅशी आमच्याकडे खुप येतो.
शँकीने टाकलेले फोटो बहुतेक
शँकीने टाकलेले फोटो बहुतेक ग्रेट टिट्स चे असावेत.
@ देवकी..... हा आहे का तो
@ देवकी..... हा आहे का तो पक्षी....?
>>> नाही. धन्यवाद इतक्या तत्प्रतेने सांगितल्याबाबत.आता साधनांनी सांगितलेला पक्षी गुगलून पहाते.
ओळखा कोण आहेत हे ! ! >>>>
ओळखा कोण आहेत हे ! ! >>>> शँकी - बहुतेक acorn woodpecker असावा तो पक्षी ...
वर्षूताई, मस्त काढलं आहेस
वर्षूताई, मस्त काढलं आहेस चित्रं
मस्त मस्त पोस्टी.. वर्षू तु
मस्त मस्त पोस्टी..
वर्षू तु खरच का ग गुलांच्या गावात राहतेस ?
ते फुल जास्वंदासारख वाटतय..नै जास्वंदच आहे का? पानावरुन तरी तसाच वाटतोय..
निरु, शिंप्याचा प्रचि छानच
चार दिवस नव्हते तर भरपूर साठा
चार दिवस नव्हते तर भरपूर साठा झाला होता. वर वर वाचून फोटो पाहीले. अतिशय सुंदर आहेत सगळ्यांचे फोटो.
आमच्या ओनर कडे घेतलेल्या
आमच्या ओनर कडे घेतलेल्या गुलाबाच्या झाडाची नविन कळी
उन्ह पडलेल असताना :
मग मी जरा सावली (= छाया = शाडो..माबोवरची नै) घरली त्यावर
फुल आणि बोल, दोन्ही छान.
फुल आणि बोल, दोन्ही छान.
वर्षुताईन्च्या पोतडीतून मस्त
वर्षुताईन्च्या पोतडीतून मस्त मस्त बाहेर पडतेय. ती पाने सुरेख. पेंटिंग खुपच सुंदर.
टीना मस्त फोटो.
पक्षाचा फोटो मला दिसत नाहीये, नीरु.
वाह सुंदर.
वाह सुंदर.
आता दिसला पक्षाचा
आता दिसला पक्षाचा फोटो.
आमच्याकडे चिमुकला दिसतो तो जरा ह्याच्यापेक्षा नितळ आणि नाजूक कांतीचा वाटतो. अगदी गोड दिसतो. किंचित पिवळसर छटा.
मस्त फुल !!
मस्त फुल !!
वर्षु, फुलं आणि पेंटिंग
वर्षु, फुलं आणि पेंटिंग दोन्ही सुंदर.
टीना, गुलाबाचा रंग सुंदर आहे.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/51480 -आशीर्वचन वृक्षराजाचे - नवीन नि ग प्रेमींकरता ...
व्वा छान गप्पा.. वर्षु दी तु
व्वा छान गप्पा..
वर्षु दी तु टाकलेल्या पहिला प्र.ची तल्या चितकबर्या पानांना जांभळी फुलं पण येतात..
नाव आठवत नाहीये..
आणि ती जास्वंद कीती छान चितारलीयेस..
टिना कीत्ती गोड आहे ती कळी.
निरु शिंपी पक्षी मस्तच.
टेलर बर्डला माझा झब्बू - हा
टेलर बर्डला माझा झब्बू -
हा जरा क्लोज अप या पिटुकल्याचा
गोग्गोड...
गोग्गोड...:)
हा अशा type आहे पण अजून
हा अशा type आहे पण अजून स्लीम, स्लीम आणि शायनिंग. मला फोटो काढता आला तर बघते, कठीण आहे माझ्यासाठी.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/42223 - आईसबॉल होणारे बेडुकराव... नवीन नि ग प्रेमींकरता ...
पुन्हा तुती... पण अजुन
पुन्हा तुती...


पण अजुन सगळ्याच पिकलेल्या नव्हत्या..
आणि त्यावर एक छोट्ट्स घरट पण दिसल.. म्हटल पाहुया आत कोण कोण आहे ते..


पण रिकामेच होते..
बुलबुल चे असावे बहुदा...
बुलबुल चे असावे बहुदा... >>>>
बुलबुल चे असावे बहुदा... >>>> येस्स, बुलबुलचेच घरटे ...
शशांक, झब्बु मस्तच.. सायली,
शशांक, झब्बु मस्तच..
सायली, दुनीयाभराचे झाड तुझ्याचकडं गं..घरट मस्तच..
टीना ये तर एकदा इकडे, माझे
टीना ये तर एकदा इकडे, माझे सग़ळे अड्डे दाखवते तुला...:)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/25440 - एक चतुर फार.... नवीन नि ग प्रेमींकरता ...
तुझे अड्डे .. वॉव..मग आपण तिथ
तुझे अड्डे ..
वॉव..मग आपण तिथ डब्बापार्टी करु हं
Pages