निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा.. मस्त गप्पा... फोटोज

साधना.. मल्टीमिडिया राँग वर्ड आय यूस्ड.. मला अ‍ॅक्चुली मिक्स मिडिया म्हणायचे होते..म्हंजे मी या पेंटिंग मधे
वॉटर कलर, पेंसिल कलर्स आणी अ बिट ऑफ क्रेयॉन कलर्स वापरलेत..

सायली, दुनीयाभराचे झाड तुझ्याचकडं गं.>>>> हो ग.
साधना, तुम्ही सांगितलेला पक्षी गुगलला ,पण नॉट फाऊंड म्हणून येतेय.मग इंडियन सिल्वरबिल पाहिला तर साधारण तसा तो पक्षी दिसतो.पण वरचा रंग तपकिरी नसून फिका ग्रे(दगडी रंगाचा) होता.

https://en.wikipedia.org/wiki/Ashy_prinia अ‍ॅशी प्रिनिया मिळाला.पण माझा पक्षी हा नव्हे.हा वरून मस्त गडद आहे.कदाचित अंजू पहात असेल तो आहे का हा?

देवकी,
Ashy_prinia मला बरेचदा दिसलाय..

Arctic warbler सुद्धा बघुन आहे.. Happy

लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद Happy

Happy Happy :

मगरीचे लेकर..
मला काही केल्या Crocodile आणि Alligator मधला फरक एवढा कळायचा नाही..तरी जरासा विचार आला पाहिल्या पाहिल्या कि हे अ‍ॅलिगेटर असणार ..
उलट वाटायच कि मगरी जाड असतात आणि अ‍ॅलिगेटर त्यामानाने बारीक..
म्हटल आता विचारावच काय आहे ते.. परत म्ह्टल कि आपणच आधी गुगलुन पहावं. आता कळाला खरा फरक..
त्यातही सर्वात महत्त्वाचा मला वाटला तो म्हणजे ;
Alligators in the wild are only found in the US and China while crocodiles are found all over the world.

हुश्श किती ते विचार एकसात सप्पाट्यान डोस्क्यात घुमले..

निरु , प्रचि मस्तच.. आता खर सांगा हि मगरीचीच पिल्लावळ नं ?

मनाचा हिय्या करुन नविन प्रतिसाद बघायला घेतला..
म्हटल टिने तु चुकली असणार नक्की परत Lol
बघतो तर काय..आयला लयच हुश्शार झाली मी एवढ्यात Wink कठीणे इतरांच Lol

क्या बात है १००० पेक्षा जास्त प्रतिसाद Happy

४० दिवसात हजारी..या धान्याची तर रावळपिंडी एक्स्प्रेस झाली..रेकॉर्ड ब्रेक..>>>>>+१००००

सर्वांचे अभिनंदन!!!!

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा
घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा......

(फेसबुकवर पूर्वप्रकाशित Happy Happy )

टीना मलाही मगर आणि सुसर म्हणजे कोण नक्कीकोण , कोण मगर आणि कोण सुसर ते कळायचे नाही. आता फिक्स केले डोक्यात की बारीक चिञ्चोळे लाम्ब्लचक तोंड म्हणजे सुसर allegatoर आणि मोठ्ठा जाडा जबड़ा असलेल्या त्या मगरी क्रोकोडाइल.

जिप्स्या मस्त.

बालमगरी अगदी गोडुल्या आहेत.

देवकी ग्रेट. हरयाणामधे आढळतो तो मधला डाव्या बाजुचा पक्षी दिसतो मला. Thanx.

जिप्सी मस्तच रे. फेसबुकवर बघितलं होतंच.

दुसरी पाने आणि गोगलगायपण मस्त.

Mast dhavtoy dhaga...
Magrichi pille chhanach niru...
Jipsy khup chhan photo
Ani tyahun chhan oli..

जिप्सी, फोटू मस्तच.. ओळी पन छान..

बारीक चिञ्चोळे लाम्ब्लचक तोंड म्हणजे सुसर allegatoर आणि मोठ्ठा जाडा जबड़ा असलेल्या त्या मगरी क्रोकोडाइल. >> चुकतेयस न गं Sad

हे घे नेटवरुन साभार Happy

मस्त फोटो आहेत.. मी आज श्रीलंकेला जातोय.. आल्यावर आणखी एका भागाची हजारी उलटलेली बघायला आवडेल !!!

गुड रिविजन टीना.. Happy

क्रॉक बाळे , माकडू बाळ क्यूट आहेत. मला माहीत नव्हतं कि तामिलनाडूमधे क्रॉक फार्म आहे ते..
मग तिथे क्रॉक लेदर फॅक्टरीज पण आहेत का?? दक्षिण भारत अजून पाहायचा राहिलाय//,,,

जिप्सी. सुंदर कविता.. पानं फ्रेश ,सुरेख आहेत.

.. ते मोराच्या पिसार्‍या सारखं कसलंय पान??

जिप्स्या तुला झब्बू..
इथे बागेतील तलावाकाठी इतके दिसताहेत ना.. हा सीझन असावा त्यांचा..
आणी नशिबाने (त्यांच्या) जवळपास फ्रेंच रेस्टॉरेंट ही नाहीये Happy

मगरी/सुसरींबाबत एक गमतीदार माहिती -
( http://animals.mom.me/factor-crocodile-egg-male-female-10726.html )

Temperature Dependent Sex Determination

While genetic information determines the gender of most mammals, snakes, birds and many other animals, environmental conditions determine the gender of many other species -- including crocodilians. Though scientists are still investigating the specifics of the various species, crocodilians -- including crocodiles, alligators, caimans and gharials -- typically produce inherently female embryos, which can become male when certain environmental conditions are met. Typically, when a sufficiently high temperature is reached, the embryo begins producing androgenic hormones, which cause male sex organs to develop. In some species a second temperature threshold exists; when temperatures reach this point, they again spur the production of females, rather than males. Often, the egg deposition location -- sunny or shady -- determines the temperatures of the nest, and therefore the sex of the embryos.

थोडक्यात अंडी ज्या तापमानात उबवली जातात त्यावरुन त्यातून "नर" निर्माण होणार का "मादी" हे ठरते... Happy

वर्षू, ते लोक स्नेल खातात का?

मस्त माहिती शशांक Happy

हे बघा घरीयल..पुण्यातले..इथे नाव्,गाव्,वस्तु,प्राणी यांपैकी काहीही विचारु नये अशी पाटी लावलेली होती Wink Lol
मोबाईल मधे काढलेला प्रचि आहे..हो त्यावेळी मी 2MP Camera मधे गप ऐश करायची..मस्त दिवस होते Proud

https://photos.gstatic.com/media/slideshow.swf" width="800" height="533" flashvars="host=picasaweb.google.com&hl=en_US&feat=flashalbum&RGB=0x000000&feed=https%3A%2F%2Fpicasaweb.google.com%2Fdata%2Ffeed%2Fapi%2Fuser%2F1

Pages