निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना, खूप सुंदर फुलं आहेत.. लदाख मधे चढ चढताना ऑक्सीजन ची कमी जाणवते ना खूप?? थकवा ही त्यामुळेच येत असेल.. सोच समझ के जाना पडेगा मुझे.. जर पुढच्या वर्षी ठरवलं तर...

गोड कविता सायली..

टिना, भेण्डी पण ह्याच कुटूंबातली. Happy

वर्षू, हिंडताफिरताना त्रास होतो पण तिथे जाऊन काही दिवस काही न करता मुक्काम् केल्यास एवढा त्रास होत नाही.

तिथे येणारे परदेशी अगदी ४ ५ वर्षांची मुले ते ६० ७० वर्षांचे जेष्ठ नागरीक ह्या सगळ्या रेंजमध्ये आहेत. बिपी वगैरेचा त्रास नसेल तर आयुष्यात एकदातरी लदाख भेट द्यायला हवीच. आमची ही भेट फक्त ४ दिवसांची होती, अजिबात आराम न करता. पण परत कधी गेलोच तर निवांत वेळ घेऊन जाय्चे आणि एकेक जागा निवांत पाहायची असेच ठरवले आहे.

वर्षू नील, फोटूतल्या फुलांचा रंग मस्तच गं..

साधना , हाच कॉसमॉस न ?
यात केशरी रंग पण येतो आणि हि मुख्यत्वे रानात वाढतात..आम्ही रानफुल म्हणतो यांना..
चिमुरी च्या लेखात कॉसमॉस येऊन गेल होत आणि नि ग च्या मागच्या धाग्यावर पन बहुतेक..
मला कळेना रानफुलाला एवढ भारी नाव कस्काय ते Lol

काल धागा फारच मस्त धावला.. खुप मज्जा आली सगळ्या पोस्ट आणि प्र.ची बघताना..
टीना तुझ ह्युमर... Rofl
नलिनी मस्त मस्त प्र.ची.
ग.दीं च्या कविता मला देखिल खुप आवडतात
वर्षु दी काय सुंदर केशरी फुल आहे ते.. सोनटक्का + कर्दळीचे फ्युजन वाटते आहे..
साधना सुरेख फुलं एक फिकट तर एक गर्द जांभळा... Happy

वर्षू, साधना, सुरेख फुले. तुम्हा सर्वांच्या पोतडीतून भरपूर माहिती आणि सुरेख फोटो पहायला मिळ्तात.
निरू गुलजार यांचे फोटो म्हणजे डोळ्यांना मेजवानीच असते.
निगवर येवढ्यात जिप्सीचे फोटो आले नाहीत.
सायली, कवितेसाठी धन्यवाद!

आणि वर्षु नील, तुमचे रेड स्नॅपर पण मस्तच... आपल्याकडे मला वाटतं त्यांना तांबोशी म्हणतात.. आम्ही गोव्याला गेलो की बाकी मासे बदलतात पण ह्याची Order कायम Fix असते... तोंपासु...

.

मागे म्हटल्याप्रमाणे खिडकीतले पिंपळ फळांनी लगडले की त्याला पक्षांचा बहर येतो...
त्यापैकी थोडासा बहर आपल्या निग करांसाठी...

हा Red Vented Bulbul... बर्‍यापैकी वाढ झाली असली तरी Adolescent वयाचा असावा असा तर्क..
आपल्या 16,18 वर्ष वयाच्या मुलांसारखा.. मोठा दिसला तरी चेहर्‍यावरचा अननुभवी पणा सहज दाखवणारा आणि कोवळीक लपवू न शकणारा... Happy

IMG_20150801_001647835.jpg

आणि ही साळुंकी.... अतिपरिचयात अवज्ञा झालेली...
पण एवढी सुंदर....??
ही अशी भावमुद्रा टिपण्याची संधी मिळणं हे भाग्यच नाही का....??

197209_207299125952898_1664316_n_0.jpg

Nlini double hump camel mastach..
Niru tumche photos , nirikshan ani likhan kya kehene..
Apratim.. Amchya sarkhe pakshi dekhil tumchya camera chi wat baghat asatil...

नलिनी चे उंट दिसेल तर शप्पथ..चर वेळा रिलोड करुन झाल पेज Sad

निरू, प्रचि मस्तच..
Red Vented Bulbul ला त्याच्या वर्णनाप्रमाणे अगदी चपखल बसणारा बोलीभाषेतला शब्द आहे Wink
इथ देऊ कि नको ?
राहुच दे.. साळूंकी पण खरच सुंदर आहे..
प्रोफेशनल कॅमेराचा एक मोठ्ठा फायदा..लेन्समुळे जी गोष्ट हवी ती फोटोत येऊन बाकी गोष्टी ब्लर होतात..आणि आमच्या डिजी मंदी जवळुन फटू काडाला जाव त बहिन पाहिजे तिच गोष्ट धुसर अन आजुबाजुच स्पष्ट दिसते ..
Angry दुनीयाभराचा तरास..

खिडकीतून दिसणारी ही दोन पिंपळाची झाडं आणि त्या मागचा पर्जन्यवृक्ष ह्या केवळ तीन झाडांच्या छोट्याशा निसर्गामुळे पक्षा प्राण्यांचा हा अनमोल ठेवा सतत आजूबाजूला असतो आणि टिपायलाहि मिळतो....

पक्षांच्या बरोबरीने वास्तव्य असलेल्या खारी आणि कधीकधी फळं पिकल्यावर रात्री धाड घालणारी आणि क्वचित सकाळीही चुकारपणे रेंगाळणारी वटवाघळं तुमच्या साठी...

IMG_20150801_001746183.jpg

Indian Flying Fox... -- A Large Fruit Eating Bat..

IMG_20150801_001520886.jpg

आणि हा समोरुन.... उलटा लटकलेला...

199117_207298715952939_3816859_n.jpg

निरु, पिकासावरुन टाकता येतात फोटो. इथे पाहा. फॉटो छान. ते उल्टे वटवाघुळ मला कायम मोडकी छत्री घेउन बसलेय असे वाटते.

http://www.maayboli.com/node/43465

साळूण्की खुप छान् दिसतेय. ही इतकी दिसतेय् की बिचारीची अतिपरिचयातवज्ञा झालीय.

हे दोन मदारीचे उंट फक्त नुब्रा खो-यात दिसतात फक्त. राजस्थानात एकाच मदारीचे दिसतात.

लालबुड्या..??? >> निरू, बुड्या च्या ऐवजी आणखी पिवर गावठी शब्द आहे Proud

खार..मला खुपच आवडते..
पण तिची नेहमीचीच घाई असते..आजकल पाव जमीनं पे नही रुकते मेरे..

वटवाघळ पुर्ण काळी नसतातच का ? मधल्या भागात शेंदरी रंग असतोच का ?
मी पुण्यात कोथरुड इथल्या मृत्युंजयेश्वर मंदिरात जाते तिथल्या परिसरात भरपुर वटवाघळ लटकुन असतात ती पन अश्शीच..शेम टू शेम..

तुमचा पण डिजी आहे..अर्रे..मग मी फोटो काढण्यात जरा अडाणचोट आहे म्हणायची कारण जवळून फोटो काढायला गेल्यावर ज्याचा काढायचा आहे तो कधीच स्पष्ट दिसत नाही मला Sad निरु विपू पाहा प्लीज..

Pages