आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
खूप दिवसांन्नी सगळा बॅकलॉग
खूप दिवसांन्नी सगळा बॅकलॉग भरून वाचून काढला! सुरेख फोटो आणि माहिती!!
आज गुरूपौर्णिमा ! निसर्गासारखा दुसरा गुरू नाही! सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा!
३ MARTIAL EAGLE सारखा
३ MARTIAL EAGLE सारखा दिस्तोय..>>>> Falcon. ही मादी आहे. हिचे वय साधारण १५-१६ वर्ष. फाल्कनची झेप ताशी ३०० मैलांची असते.
२ माहीत न्हाय >> सदर्न ग्राउंड हॉर्नबील.
आणखी काही....
OH THANKS , NALINI.. फाल्कन
OH THANKS , NALINI..
फाल्कन चे पाय कसले दणदणीत स्ट्राँग दिस्ताहेत.. रिअल किलर लूक्स चा बर्ड!!!
हे रेनडिअर आणी अँटीलोप ना???
नलिनी, तो पहिला आउल दाजीकाका
नलिनी, तो पहिला आउल दाजीकाका भाटवडेकरांसारखा दिसतोय (मुख्यतः भुवया)
फाल्कन तर एकदम मजबूत दिसतोय, ढाई किलोका पाँव!!
नंतर १. युरोपिअन रेड डीअर,
२. Antelope
3. मस्ती करणारी पिल्लं आहेत ना ही?
नलिनी ते घुबड किती आगावु
नलिनी ते घुबड किती आगावु दिसतेय. मिरकॅट पाहुन मादागास्कर आठवला.
वर्षू, हे तर गोड्या पाण्यातले वाटताहेत मासे... आम्ही नै खात बै.......
(हे कोल्ह्याला द्राक्षे आंबट च्या चालीवर आहे असे कोणाला वाटल्यास त्याला बरोबरच वाटलेले आहे)
वॉव.. नलिनी, कुठ होतीस इतके
वॉव..
नलिनी, कुठ होतीस इतके दिवस हं ?
मस्तम मस्त फोटो..
मिरकॅट पाहुन मला लाइफ ऑफ पाय
मिरकॅट पाहुन मला लाइफ ऑफ पाय आठवला
Falcon. ही मादी आहे. हिचे वय
Falcon. ही मादी आहे. हिचे वय साधारण १५-१६ वर्ष. फाल्कोनची झेप ताशी ३०० मैलांची असते. >> बाप्पा बाप्पा.. तरीच तर पाय..साष्टांग स्विकारावा बये.. कसली कातील दिसतेय ती..हाय का शामत तिच्या नवर्याची तिच्या शब्दाबाहेर जाण्याची.. चिर डालुंगी काट डालुंगी अस म्हणत असणार ती.. ते पण सनी देओल च्या आवाजात..
नलिनी माहितीसाठी फोटो नावासहीत सेव्ह करुन ठेवते..चालेल ना ?
साधना.. सी फिश है.. प्ला
साधना..
सी फिश है.. प्ला क्रापून डँग.. रेड स्नॅपर... वेरी टेस्टी!!!!
खूप दिवसांन्नी सगळा बॅकलॉग
खूप दिवसांन्नी सगळा बॅकलॉग भरून वाचून काढला! सुरेख फोटो आणि माहिती!!
आज गुरूपौर्णिमा ! निसर्गासारखा दुसरा गुरू नाही! सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा!>>>
+१
धन्यवाद! आत्मधून,
धन्यवाद!
आत्मधून, बरोबर.
टीना, विचारायचे कशाला? मोठ्या साईजचे फोटो हवे असल्यास कळव.
आज गुरूपौर्णिमा !
आज गुरूपौर्णिमा ! निसर्गासारखा दुसरा गुरू नाही! सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा.
अगदी खरं. फार सुंदर. इथे निसर्गमय झालेले बरेच आयडी माझे गुरु आहेत, इथे येऊन खूप शिकायला मिळते. त्या सर्वांनाच नमस्कार.
सर्व फोटो मस्तच.
नली.. उत्तर ही सांग की!!
नली.. उत्तर ही सांग की!!
नले, किती मस्त टिपलेत
नले, किती मस्त टिपलेत फोटो..
मीरकॅट, क्यूट दिसत असला तरी खुप धाडसी असतो. साप आणि विंचू कौशल्याने मारू शकतो.
धन्यवाद नलिनी.. पहिल्या आऊल च
धन्यवाद नलिनी..
पहिल्या आऊल च शाळेतल नाव काय आहे ?
निसर्गासारखा दुसरा गुरू नाही!
निसर्गासारखा दुसरा गुरू नाही! >>>>>+१००००
इथे निसर्गमय झालेले बरेच आयडी माझे गुरु आहेत, इथे येऊन खूप शिकायला मिळते. त्या सर्वांनाच नमस्कार.
सर्व फोटो मस्तच.>>>> + १०००००००
पहिल्या आऊल च शाळेतल नाव काय
पहिल्या आऊल च शाळेतल नाव काय आहे ? >>>>>

नलिनी, मस्तच आहेत सगळेच
नलिनी, मस्तच आहेत सगळेच फोटो.
आणि हो किती दिवसांनी आलीस !
वर्षु , मासे काय उपयोग ( स्मित )
मासे काय उपयोग >>> उपयोग नसला
मासे काय उपयोग >>> उपयोग नसला तरी चौकश्या करायच्या असतात
ममो, तू कंसात का हसतेस?
अश्वे,
अश्वे,
वर्षुताईंनी जागुला विचारलंय
वर्षुताईंनी जागुला विचारलंय माशाचं, तिला आहेना उपयोग.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/23471 - पिल्लू घरी येता ...
अश्विनी , अग मी सध्या मोबाइल
अश्विनी , अग मी सध्या मोबाइल वरुन माबो वर येतेय. आणि मला मोबाइल वरुन माबोच्या स्मायल्या टाकण जरा डिफिकल्ट जातं म्हणून कंसात स्मित असं लिहिते.
उपयोग नसला तरी चौकश्या करायलाच पाहिजेत तुझं अगदी बरोबर आहे .
तशा तर जागूच्या माश्याच्या रेसिप्या मी ही अगदी डिटेलवार वाचतेच.
ममो
ममो
तशा तर जागूच्या माश्याच्या
तशा तर जागूच्या माश्याच्या रेसिप्या मी ही अगदी डिटेलवार वाचतेच. >> म्हणजे तु मासे खात नाही..अरे..
म्हणजे पुर्ण चालीवर तु जागु ची रेसिपी वाचुन मग सुस्कारा सोडत, 'हमसे ना होगा :(' असं म्हणत असणार.. काय बा तु पन ना ममो..
बिन भिंतीची शाळा... बिन
बिन भिंतीची शाळा...
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू
बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील
फिरते फुलपाखरू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...
सुग्रण बांधी उलटा वाडा,
पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे
बेडकिचे लेकरू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...
कसा जोंधळा रानी रुजतो,
उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...
भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...!
– ग. दि. माडगूळकर
आहा.. मस्त कविता.. शेअर
आहा..
मस्त कविता..
शेअर केल्याबद्दल धन्यवाद
लदाखवारीचे फोटो पाहताना
लदाखवारीचे फोटो पाहताना मोबाईलवरील फोटोमध्ये हा सापडला. ह्याचे सुरेख क्लोजप्स मागच्या पानावर आहेत. (पान २९,३०) या फोटोत फुले निट दिसत नाहीयेत पण पुर्ण फोटो असल्याने आता ओळख पटायला सोपे जाईल.
मला उगीच हुरहुर लागलेली की पुर्ण झाडाचा फोटो मी का आणि कसा काय नाही घेतला. शक्यतो पुर्ण झाडाचाही फोटो घेण्यचा माझा प्रयत्न असतो कारण मग ओळख सोपी जाते. फुल खुपच लहान असेल तर शेजारी काहीतरी व्स्तु ठेऊन फोटो घ्याय्चा प्रयत्न असतो.
तर मंडळी आता ओळखा.
अर्थात फोटो खुप चांगला नाहीये पण आहे हेच खुप झाले हे म्हणावे लागतेय आता.
माल्विसीमध्ये वेल हा प्रकार असतो काय?
आणि ज्या उभ्या
आणि ज्या उभ्या दांडोर्याबद्दल आपण बोलत होतो (हॉलीहॉक) ती ही - लाल गुलाबी रंगाची जी आहेत ती, पिवळी वेगळी फुले आहेत. ही एका मोनास्ट्रीच्या बागेत सापडली.
या मोनास्ट्रीच्या आमच्या स्वारीच्या आठवणी अतिशय्च गोड आहेत. ह्या गडावर स्वारी करताना वाटेत किती वेळा बसकण मारली त्यची गणती नाही. तरी गाडीने फिरत होतो. लडाखला जमिनीला जरा जरी चढ असला की एकएक पाऊल उचलुन वर टाकायचे म्हटले की ब्रम्हांड आठवते. मला तो अवघड चढ दोनदा चढावा लाग्ला कारण ऐशु इतकी दमली की तिने वर जाय्चे नाकारले. आणि मग पुर्ण वर जाऊन मी परत खाली आले व दादापुता करुन तिला कसेबसे वर नेले आणि तिथल्या हॉटेलात नेऊन खायला घालुन तिच्या जिवात जीव आणला.
(अधिक माहितीसाठी इथे जा http://www.maayboli.com/node/45221
)
ही माझ्या बागेत फुललेली पाहायचीत मला (आमेन....) या फोटोत खुप फुले एकत्र मिसळलीत. त्यातले हॉलिहॉक तेवढे पाहा.
कसले गोड फुल आहेत साधना.. बर
कसले गोड फुल आहेत साधना..
बर झाल हा पहिला प्रचि टाकला..मला उगाच भ्रम झाला होता कि माझ्या हॉस्टेलवाल्या फुलांशी मिळतजुळत आहे ते म्हणुन..अज्जिब्बातच नै सारख..छाने..
हॉलिहॉक भेंडी सारख वाटतय का ? म्हणजे सेम फॅमिली म्हणतेय मी..
Pages