एक चतुर फार....

Submitted by पुरंदरे शशांक on 1 May, 2011 - 13:14

एक चतुर फार....

चतुर किंवा ड्रॅगन फ्लाय हे आपण नेहेमीच पहातो. पण फोटो मिळवणे म्हणजे फार अवघड काम किंवा लक (luck) पाहिजे. आजच संध्याकाळी हे महाशय आमच्या बागेत दिसले व निवांत फोटो ही काढून दिले की. या आधी मी तरी याच्या पंखावर असे काही ठिपके पाहिले नव्हते- जाणकारांनी कृपया काही माहिती (पंखांवरील नक्षी / ठिपके या संबंधात) असल्यास जरुर सांगणे -

Picture 049_0.jpgPicture 046.jpgPicture 079.jpgPicture 095.jpgPicture 063.jpgPicture 040.jpg

हे दुसरे महाशय असेच कुठल्यातरी भ्रमंतीत सापडलेले -

Picture 376.jpgPicture 377.jpg

गुलमोहर: 

मस्त फोटोज.. तिसरा तर एकदम शीर्षासन करतोय असा.. Happy
पाऊस येण्याआधी हे चतुर मोठ्या संख्येने फार उडतात म्हणे? खरंय का?

तिसरा जास्तच आवडला..
पंखांवरचे ठिपके मस्तच आहेत.

व्वा ! शशांक, लहानपणीची आठवण आली.
आजोळी नदीच्या काठावर ते उंच वाढणारं एकदम लवचिक गवत असतं ना ( बहुतेक लव्हाळं म्हणतात त्याला !) त्याच्यावर खूप चतुर असायचे. त्यातले लालचुटुक रंगाचे चतुर माझे सगळ्यात लाडके असायचे.
ते पकडून त्यांच्या शेपट्यांना दोरा बांधून खांद्यावर घेऊन फिरणे हा माझ्या भावाचा एक (क्रूर) उद्योग असायचा.....तसं केल्याने ते मरत नव्हते, पण मला मात्र वाईट वाटायचं.
ठिपक्यांवाला चतुर मात्र कधी पाहिला नव्हता.

अरे व्वा सुंदर प्रची ! ती आमची 'भिंगरी' Happy
याहुन बारीक सुई सारखी एक 'भिंगरी' येते, तिला आम्ही 'टाचणी' म्हणतो.

मस्तच प्रचि..
आम्ही याला हेलिकॅप्टर म्हणतो Biggrin
लाल रंगाचा दुसरा खुपच अनुभवी दिसतोय त्याच्या पंखावरुन Happy