निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना, नलिनी, नीरु मस्त मस्त फोटो.

रेड vented बुलबुल आणि साळुंकीबाय खूपदा असतात सोसायटीत.

हल्ली पिवळसर छोटुकल्या चिमणीसारखे पक्षी खूप दिसतात. ते वेगळ्याच आवाजात ओरडतात, नाजूक आहेत. नाव नाही माहिती. गोड आहेत पण. अगदी चिमुकले.

हे प्रचि साधना ताईंची आधीच क्षमा मागून...:D Lol
खरं तर ह्या पक्षाबाबत आम्ही समदु:खी...
एके काळी मी आमच्या गच्चीवर वेगवेगळ्या रंगाची 125 कबुतरं पाळली होती.... पण Somehow आता खूप त्रासदायक वाटतात..
पण ह्या प्रचि मधला छायाप्रकाश मला स्वतःलाच खुप आवडला म्हणून....

197569_207299299286214_5364965_n.jpg

पण ह्या प्रचि मधला छायाप्रकाश मला स्वतःलाच खुप आवडला म्हणून.... >> त्याच्या मानेवरच्या तेवढ्याच छटेसाठी मला हे रानटी कबुतर आवडत..बाकी त्याच्या आवाजानं अजुनही डोक उठतं..
प्रचि छनच हे वेगळ सांगायला नको Happy

थँक्यु अन्जू Happy

Vaa khup chhan prachi niru ani.. Ani saglyanchi charcha dekhil..
Tina bala tu ashakya ahes... (halke ghe)

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दोस्तांनो..

हा माझ्याकडुन उलटा रावण..

देव करो,
मऊ माती आहे कि कठीण खडक, ऊन्ह, वारा, पाऊस, सकाळ, सांज, रात्र कशाकशाची तमा न बाळगत वेड्यासारख्या बहरणार्‍या या फुलझाडाप्रमाणे निसर्गाच्या गप्पा वरील सर्व सदस्यांचे नाते सुद्धा कुठलीच गोष्ट मनाला लावुन न घेता असेच फुलत राहो..
मैत्रीदिनानिमित्त या पिवळ्या फुलांच्या शुभेच्छा..

तळटिप : निसर्ग निसर्ग आहे..त्याला कुठलीही फुलं चालतात त्यामुळं कुणी पिवळ्या गुलाबाचा हेका धरु नये अन कुठलीही गडबड न करता या फुलांचा स्विकार करावा..

अर्रे व्वा अन्जू ,
तु जगरी अबी.. मेरेको लगा मै अकेलीच निशाचर हु यहां.. तुच गं तुच मैतरीन माजी..
हे हे हे हे.. तुला बी मैत्रीदिनाच्या ढिगभर शुभेच्छा...

वाह, निरू , पक्षी निरिक्षण आणी स्वभाववर्णन प्रभावशाली शब्दांत.. क्यूं नही!!आपका तो तखल्लुस ही गुलजार है!!

नलिनी, मी पण भारतात दोन हम्प्स चे उंट नाही पाहिलेत अजून.. वॉव.. केव्हढे मोठे आहेत..
टीना , निग कट्ट्यावर घालवलेला प्रत्येक दिवस मैत्री दिवसच असतो, नै?? जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात असू आपण, इथे आल्याशिवाय, तुम्हा सर्वांना भेटल्याशिवाय चैन कुठे पडतंय. Happy

अरे वा काय मस्त फोटो आहेत सगळ्यांचे.........नलिनी खूप सुंदरफोटो ! वर्षू , टिना.साधना सर्वांचेच!
अल्पावधीत निरु गुलजार यांना साधनाचं कबूतरप्रेमाविषयी समजलेलं दिसतंय! Proud >>>>>>>>>>>>> हे प्रचि साधना ताईंची आधीच क्षमा मागून.>>>>>>>
आपल्या 16,18 वर्ष वयाच्या मुलांसारखा.. मोठा दिसला तरी चेहर्‍यावरचा अननुभवी पणा सहज दाखवणारा आणि कोवळीक लपवू न शकणारा.>>>>>>>>>>>> वॉव...........काय मस्त निरीक्षण आणि तितकीच चपखल शब्दात नोंद. आणि वटवाघूळ चक्क गोड दिसतंय!

वर्षू नील अगदी बरोबर.. फुल छान्च गं.. नाव सांग न त्यांचे.

शँकी, सुतार आहे न तो..
त्या झाडाची अक्षरशः चाळणी करुन टाकलीए Lol

निरु
निसर्गाच्या गप्पा ...याच्या समोरच तुम्हाला किती पोष्टी झाल्या त्याचा आकडाच दिसेल....त्याच्या पुढे किती नवीन पोष्टी पडल्या त्याचा आकडा.
मायबोलीवरचे नवीन लेखन. याच्या खाली
शीर्षक ..लेखक ....प्रतिसाद .... ग्रुप असे रकाने दिसतील.

उंटांच्या माहितीत हे भारतीय आहेत असा उल्लेख होता, म्हणजे साधना म्हणते तसे हे लडाख भागातून आणलेले असावेत. वरचा हत्ती सुद्धा भारतीय आहे. स्विडनच्या राजाला थायलंड मधून एक हत्तीण भेट म्हणून देण्यात आली होती. तिचे पिल्लू पाहायला मिळाले ह्यावेळी.

गेंडा

४० दिवसात हजारी..या धान्याची तर रावळपिंडी एक्स्प्रेस झाली..रेकॉर्ड ब्रेक..

निरु बहोत कौतुक आहे तुमच...त्यामानाने मी पहिले ४ ५ महिने निव्वळ रोमात...मग सदस्यत्व घेऊन जवळपास पहिले दिड दोन वर्ष रोमातच जास्त आणि मग कुठ हळूहळू प्रतिसाद द्यायला लागली Lol त्यातही लिखानाच्या नावानी बोंब आहे माझी..म्हणुन अजुनही अर्ध्या धाग्यांमधे रोमातच असते Wink आता अरी प्रॅक्टिस झाली इथ लिहायची नै तर पहिले गुगल जिंदाबाद होत..

नलिनी हे फोटो कुठलेत ?
दुशिंगी गेंडा भारीच हं.. कसला शांत बसुन आहे पण..हा चिडचिडा असतो न मुळ स्वभावाने..

टीना, Kolmården Zoo, Sweden
आम्ही गेलो तेव्हा ते वामकुक्षी घेत होते.

Maitri dina chya mazya kadun pan khup khup shubhechha..
Nalini khup chhan safar karavte ahes.
Varshu di khup god phul...
Tina tuzya spcl coment vachayala khup majja yete

टिने.. फुलांची नांव गांव सागण्याचे काम दिनेश्,जागु,साधना,शांकली,शशांक, अदिजो इ.इ, वर सोपवलेलंय.. Wink

@निरू..,'मी दरवेळेला विचार करायचो... किती हे उत्साही लोकं..' Rofl Lol

मानु
.. किती लौकर शंका समाधान केलंस निरु चं.. जरा तेव्हढाच भाव खाऊन घेतला असता नं.. Proud

हल्ली पिवळसर छोटुकल्या चिमणीसारखे पक्षी खूप दिसतात. ते वेगळ्याच आवाजात ओरडतात, नाजूक आहेत. नाव नाही माहिती. गोड आहेत पण. >>>>>> पिवळसर नाही ,पण अ‍ॅश कलरचा,पोटाखाली पांढर्‍या रंगाचा आणि चिमणीपेक्षा चिमुकला पक्षी..त्याचे नाव काय असावे.आवाज मंजुळ पण खणखणीत.चोच लांब नाही.

Pages