आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
आभार दिनेश दा,, केळ फुलाची
आभार दिनेश दा,,
केळ फुलाची भाजी आणि वडे ऐकले होते पण भरित पण करतात हे माहिती नव्हते,,
अख्खे केळफूल भाजून केलेले
अख्खे केळफूल भाजून केलेले भरीत>> हाइला, हे लैच एक्झॉटिक दिसतंय.. रेस्पी टाका ना दिनेशदा..
आपण आतला पांढरा भाग जो सोलत
आपण आतला पांढरा भाग जो सोलत नाही तर चिरतो, तो थेट विस्तवावर भाजायचा. मग तो कुस्करून त्यात कांदा, मिरची व दाण्याचे कूट, ओले खोबरे घालून फोडणी घालायची. मीठ घालायचे व लिंबू पिळायचा.
कच्चट अननसाचे असेच सालासकट भाजून भरीत करतात. काजूच्या बोंडाचे पण उकडून भरीत करतात.
अहाहा, आज गप्पा छान रंगल्यात
अहाहा, आज गप्पा छान रंगल्यात बघुन मस्त वाटलं.
फोटो, माहिती नेहेमीप्रमाणे सुंदर.
केळफुलाचं भरीत करतात मलाही माहिती नव्हतं. अननस भरीत पण नाही माहिती. काजूच्या बोंडाचं करतात ते मात्र माहितेय.
सायली रांगोळी, कविता कुठे आहे? शिंपल्याची कविता वाचली मी.
अरे व्वा छानच पा. कृ. दिनेश
अरे व्वा छानच पा. कृ. दिनेश दा.
अरे हो अन्जु ताई तुम्ही वाचली होती कविता..
इतर कला विभागात रांगोळी म्हणुन धागा आहे..
सायली प्लीज अग, तुग कर. अहो
सायली प्लीज अग, तुग कर. अहो जाहो नको.
वॉव एकदम एक्झॉटिक पाकॄ..
वॉव एकदम एक्झॉटिक पाकॄ.. अननस, काजू सगळीच झाडं आहेत कोकणातल्या घरी.. धन्यवाद
अन्जु ताई आत्मधुन ह्म्म
अन्जु ताई
आत्मधुन ह्म्म निसर्ग सम्रुद्ध कोकण.
आमच्या घरी दिव्यावर आलेला
आमच्या घरी दिव्यावर आलेला Pray Mantis....
दिव्यावर आलेल्या दुसर्या किटकाला मजेत खाताना...
वा, गुलजार —सुरेख फोटो. याला
वा, गुलजार —सुरेख फोटो.
याला माझा हा झब्बू .....
http://www.maayboli.com/node/24610
अरे वा... शशांकजी.... छान
अरे वा... शशांकजी.... छान झब्बू...
फोटो सुंदर आणि लेख त्याहुनही सुंदर....
आणि लेखावरच्या प्रतिक्रियाही
आणि लेखावरच्या प्रतिक्रियाही मस्त..
आणि हे आमच्या बागेतील.... _ _
आणि हे आमच्या बागेतील.... _ _ _ _ .
ओळखा पाहू....
पैसा ? मी नेमका जेवताना धागा
पैसा ?

मी नेमका जेवताना धागा उघडला
(No subject)
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/48938 मी कात टाकली
हे पैसे आहेत? मी हे किडे
हे पैसे आहेत? मी हे किडे पावसाळ्यात पुण्यात पाहिलेत. अगदी गठ्ठाच्या गठ्ठा एकत्र फिरत असतो. पैसे तसे माझ्या बागेतही आहेत पण असे गठ्ठ्याने फिरताना पाहिले असते तर माझे काय झाले असते देव जाणे.
ही आहेत "गोम बाळे" किंवा "घोण
ही आहेत "गोम बाळे" किंवा "घोण बाळे"...
ही आहेत "गोम बाळे" किंवा "घोण
ही आहेत "गोम बाळे" किंवा "घोण बाळे"... = म्हणजेच पैसा न ? मी बरोबर होती न ?
किळसवर्गात मोडतात हे माझ्यासाठी..
जेवण नै गेल मला
बाकी ह्यांना मी डार्क ब्राऊन रंगात पाहिलय..हे इतके गोरे कधीच नै पाहिले..
टीनाबाय जेवताना गुमान जेवावं
टीनाबाय जेवताना गुमान जेवावं ना. हिकडं-तिकडं कशाला बघावं.
फार फार तर पाककृती किंवा तुझा वऱ्हाडी ठेचा बघायचास ना, काय तू.
जेवताना वाचायची सवय गं आई लय
जेवताना वाचायची सवय गं

आई लय रागावते मला यासाठी..
कधी एकदा हे पान उलटलं जातयं
कधी एकदा हे पान उलटलं जातयं असं झालयं. पैसे नकोत आम्हाला ( स्मित )
पैसे नकोत आम्हाला ( स्मित )>>
पैसे नकोत आम्हाला ( स्मित )>> अच्छा तर मग, आम्ही आलोत कोलमार्डन प्राणिसंग्राहालयातून.
Southern ground hornbill

Falcon

मी पहारेकरी: Meerkat
क्रमशः
१. ब्यूटीफुल ईगल आऊल ४
१. ब्यूटीफुल ईगल आऊल
४ पहारेकरी Meerkat
३ MARTIAL EAGLE सारखा दिस्तोय..
२ माहीत न्हाय
पडवळा चं रूप घेतलेले कॅक्टस
पडवळा चं रूप घेतलेले कॅक्टस
टीना किती टाहो फोडुन रडतिय
टीना किती टाहो फोडुन रडतिय पैसा बघुन.
नलिनी,छान फोटो.
कॅक्टस एवजी मुळ्याच्या शेंगा वाटतात आहेत त्या.
जागु..आणू का तुझ्याकरता..
जागु..आणू का तुझ्याकरता..
येथील फिश मार्केट एकदम चकाचक आणी फिशी वास विरहित.. कसं काय जमतं बरं यांना..
पैसा याक.... वर्षु दी ती हाड
पैसा याक....
वर्षु दी ती हाड जोडी आहे का?
नलिनी काय मस्त फोटोस.. घुबड खुपच रोखुन बघत आहे..
नलिनी , काय मस्त फोटो
नलिनी , काय मस्त फोटो आहेत..
पहिल्या फोटोत त्या इगल आऊल ची नजर आणि दुसर्यात त्याचा अॅटिट्युड चुम्मेश्वरी एकदम..
चौथ्या फोटोत त्या इगल चे पाय कसले दणकट दिसताहेत..
काळ्या रंगाचा तो कोण ? मस्त आहे तोपन..
वर्षूनील, कॅक्टस आणि फिश मार्केट चे फोटो सही आहेत.. मला तर मासे पण त्यांच्याच चेहरेपट्टीचे वाटत आहेत
हा मासा कुठला पण ?
निसर्ग चक्र, जेवताना जेवणाच्या ताटाबरोबर एक डीश म्हणुन हे समोर आल तर कस वाटणार..म्हणुन..बाकी कै नै
मला तर मासे पण त्यांच्याच
मला तर मासे पण त्यांच्याच चेहरेपट्टीचे वाटत आहेत >>>
एवढा भला मोठा मासा कुठला?
त्या पैश्यांच्या गाठोड्यानंतर पडवळांचं गाठोडं. त्यामुळे पडवळंही कैतरीच वाटतायत. असं वाटतं की आत्ता सरपटू लागतील.
नलिनी, फोटो मस्त!
Pages