निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू.. मोगरा प्लस "तो" वास कसा असेल याची कल्पनाच करवत नाही !

बाय द वे, मुंबईत मला खादी ग्रामोद्योगचा जास्मिन साबण मिळाला होता. त्याला मात्र खुपच छान सुगंध आहे. आणि शेवटपर्यंत टिकतोही.

Ok da.. Thank u...
Patanjali cha ojas mogra soap koni try kelay ka? Hube heb mogryacha Suva's
Ani long lasting ..

वर्षु, आजचा ही फोटो मस्त. मस्त पोज दिलीय तुला फोटो काढण्यासाठी. .
सायली, करते ट्राय मोगरा साबण . मोगर्‍याचा वास मला तसाही खूप आवडतो.

पतंजली चा नीम साबण ट्राय केलाय मी .. करतेय खर तर.. हमाम ची आठवण येते.. आणि हो सुवास खरच लाँगलास्टिंग आहे याचापन.. Happy

रुद्राक्षाच्या झाडाच्या फांद्यांना पण असे काटे असतात? म्हणजे सगळ काही खडबडीत Lol

वर्षूताई, हे कुठे दिसले? हिमाचलमध्ये?

हे कसले दांडे आहेत, येतायेत का ओळखता??>> हे बद्रीनाथजवळ माणा गावात एका जडीबुटी विकणार्‍याकडे पाहिले होते. भूतबाधा होऊ नये म्हणुन त्याची फांदी जवळ ठेवायची असे त्याने सांगितले Happy

भूतबाधा होऊ नये म्हणुन त्याची फांदी जवळ ठेवायची असे त्याने सांगितले>>> हे दांडके मारले तर मजबूत लागेल :-P.

अ‍ॅक्यूप्रेशरचे नैसर्गिक उपकरण म्हणूनही उपयोग होईल Wink

मेपल ट्री च्या फांद्या असाव्यात त्या ..

ट्रेकर्स , चढाई करता आधार घेतात यांचा असं दुकानदारा ने सांगितलेले..

गम्मत म्हणून तेजपानाच्या फांद्यांपासून केलेले दातून आणलेत.. दात घासायचे देसी टूथब्रश
मराठीत दातून ला काय म्हणतात??

हेमा ताई:)
टिना वापरुन बघेन नीम..
वर्षु दी बापरे कीती ते खडबडीत दांडे
आदिजो, हे दांडे बघुनच भुतं पळतील..:)

रच्याकने, काल भावाने पुण्याहुन पिवळ्या सोनटक्याचे रोप आणुन दिले... Happy
तो म्हणतोय नर्सरी वाल्यानी सांगीतले की पाणी कमी घालायचे..
हो का? म्हणुन माझा पांढरा सोनटक्का जळाला की काय!

आणि हो कुंडीतले अनंत पण मीळाले...:) पावसाळ्याची तय्यारी सुरु झाली... Happy

साधना :स्मितः

सायली अग उलट आम्ही तर अळू प्रमाणे सांडपाण्यावर लावतो सोनटक्का भरपूर पसरतो.

मलाही काटेसावरच आठवली.
दातून ला थेट मराठी शब्द नाही. दातवण असा शब्द आहे पण तो मशेरीला वापरतात. तेजपान म्हणजे तमालपत्र का ? त्याची सालच आपल्याकडे दालचिनी म्हणून विकतात.

होका जागु, धन्स ग...
पण मग माझ्या कडले रोप का जगले नाही, चांगले वाढुन ५, ६ नविन रोपं तय्यार झालेली आणि अचानक सगळी
जळालीत..:( Sad Sad

माझ्या कुंडीतल्या सोनटक्याला कधीच फुले येत नाहीत. तीन चार कुंड्यात लावलाय मी. मोठ्या नाहीत माझ्या कुंड्या कारण ग्रीलमधे जागा नाही तेवढी. रोपं येत रहातात त्यात. काही सुकतात.

बहीणीने मोठ्या बादलीत लावलेय, तिची ग्रील मोठी आहे, तिच्याकडे छान फुले येतात.

सोनटक्क्याची मुळे पसरतात त्यामुळे त्यांना मोठीच कुंडी लागणार. एखादी बालदी किंवा टब मध्ये लावले तरी चालेल.

सायली कधी करपली? उन्हाळ्यात जुनी रोपे जातात. आणि आता कोंब येतात.

जागु आत्ता गेल्या १५, २० दिवसा पुर्वीच करपलीत ग...
हा नविन पिवळा मात्र मी गच्चीत एका कुलरच्या टाकीत लावला आहे... त्यात अजुन दोन तीन झाड पण लावली आहे
धन्स माहिती बद्द्ल..

आळु मस्त..

पुर्वी, सोनटक्का, कर्दळी, हळद, भाजीचा अळू असे सगळे न्हाणीघराच्या पाण्यावरच वाढायचे. मुंबईची मोनोरेल ( चेंबूर ते वडाळा ) जाते त्या ट्रॅकच्या बाजूला वडाळ्याला अजूनही अळू माजलेला दिसतो.

व्हीटी, ते अळू म्हणजे फळ असते. पिकून चॉकलेटी रंगाचे होते. चवीला थोडे चिकूसारखे लागते पण त्याला स्वाद साधारण ऑलिव ऑईलचा असतो.

Pages