निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनपसंत या देव आनंद, टीना मुनीम ( आताच्या सौ अंबानी ) यांच्या चित्रपटात, तिच्या आवाजात दातून, दातून अश्या आरोळ्या आहेत. त्या ( चित्रपटातील) देव आनंदला एवढ्या गोड वाटतात कि तो तिला गाणे शिकवायचे ठरवतो.. ( हे एक साधे वाक्य आहे. कृपया विनोद शोधू नये Happy )

पिवळा सोनटक्का मस्त. वर्षू आता सर्व फुटु दिसले गं बाई दिसले! Proud
ममो ...गुलाबी चांदण्या सुरेख.
मानुषी, यावर जरा सविस्तर लिहा ना>>>>>>>>> गजानन प्रयत्न करते.

मी दरवेळी तीन चार पाने झाली की इथे येतो.

आज पिवळा सोनटका बघून मन सुखावले. सोनटक्याचा सुगंध भारी वेड लावणारा असतो.

वाह, किती छान आहे लेख, आणी ती फुलं कसली गोड दिस्ताहेत.. लावायला ही सोपं आहे आणी निगा राखायला ही.. छान..

हिमाचल चे स्टेट फ्लॉवर.. ब्रास.. बर्‍यापैकी दुर्मिळ आणी दुर्गम भागात पाहायला मिळतं
पुढच्या वेळी कुल्लू ला गेलं कि दिसेल बहुतेक
तो पर्यन्त या छोट्या रोपट्यावरच समाधान मानून घ्या आणी फुलाचा कंपाउंड वॉल वर लावलेला फोटोच गोड मानून घ्या..

माझ्या धरमशाळेच्या लेखात आहे या फुलाचा उल्लेख!!!

मला आमच्या ट्रेनर्स बुरास नाव सांगितलेले. अपभ्रंश असेल.

अजून उंचावर गेल्यावर गुलाबी रंग अजून डार्क होतो.

वर्षू, याचे सरबत छान लागते असे म्हणतात. मी असे वाचले कि याचे अनेक नमुने ब्रिटीश संशोधकांनी तिथे नेले आणि रुजवले. मी न्यू झीलंडमधेही याचे अनेक प्रकार बघितले. अगदी भरभरून फुलतात हि फुले.

वर्षू "मूड" छान पकडलास.
गजानन ...................
शेड नेट व पॉलीनेटची सर्व साधारण माहिती:
पारंपारिक शेतीत आत्तापर्यंत शेतकरी शेतात जे पेरायचा त्यातलं किती उत्पन्न मिळेल याची काही गॅरन्टी नसायची. यात अनेक फॅक्टर्स् असायचे.
पेरलेलं बी किती उगवेल यांची गॅरंटी नाही. उगवलेलं पक्ष्यांनी खाल्ल, पावसाने झोडपलं, उष्णतेने करपलं इ.इ.
पण आता आधुनिक/प्रगत शेती पद्धतीत शेड नेट आणि पॉलीहाऊस या दोन पद्धतींचा वापर सुरू झाला आहे.
यातलं मुख्य तत्व म्हणजे रोपलेली रोपं सुरक्षित वातावरणात वाढतात. आणि निसर्गातल्या टोकाच्या वातावरणामुळे .... ऊन, वारा, पाऊस यांच्या पिकांवरील वाईट परिणामांची काळजी खूप कमी होते. याच बरोबर पक्ष्यांकडून, टोळधाडीमुळे होणारे नुकसानही व कीड, रोगराई टाळता येते.
अ‍ॅक्रिलिक/सिन्थेटिक् कापडाच्या धाग्यांनी शेड नेटचे जाळीदार कापड बनलेले असते. जमिनीवर लोखंडी पाइप्सचे सांगाडे उभे करून या सांगाड्याच्या वर गोलाकार डोम शेप जाळ्या बसवून शेड नेट उभे करतात. हे सर्व करून् देणाऱ्या टीम्स् गवोगावी उपलब्ध आहेत.
यात खालून अडीच ते तीन फ़ुटांपर्यंत चारी बाजूंनी पॉलीफ़िल्मही लावतात, यामुळे कार्बाम्ल वायू बाहेर न जाता तो झाडांद्वारे शोषला जाऊन प्रकाशाचं फ़ोटो सिन्थेसिस् चांगल्या प्रकारे होऊन झाडाच्या वाढीला मदत होते.
शेड नेट ची उभारणी झाल्यावर जे पीक घ्यायचे ठरवलं असेल, त्याला सूटेबल अशी माती टाकून त्या त्या प्रकारचे वाफ़े बनवतात.

पॉलीहाऊस म्हणजे बाकी सर्व वरीलप्रमाणेच फ़क्त पाइपच्या सांगाड्यावर नेट ऐवजी अर्धगोलाकार पॉलिथिनचा डोम. शेड नेट पेक्षा पॉलिहाऊस बरंच खर्चिक आहे.
पण याच्यात फ़ायदाही शेड नेटपेक्षा बराच जास्त असतो. कारण शेडनेटमधे डोक्यावर जाळी असल्याने निसर्गाशी थोडाफ़ार संपर्क येतोच. पण पॉलिहाऊसमधे मात्र संपूर्णपणे कृत्रिम कंडिशन्स खाली पीक वाढते.
यासाठी लागणारी माती सप्लाय करणारेही आहेत.
यात पिकाला लागणारे पाणी हे स्प्रिंकलर, ठिबक सिंचन पद्धतीने घातले जाते. त्याचीही पाइपलाइन शेड नेट/ पॉलीहाऊस उभारताना जमिनीवर टाकली जाते.
एक पाइपलाइन वरच्या बाजूलाही टाकली जाते. तिथे फॉगर्स बसवले जातात. याला असलेल्या सूक्ष्म छिद्रांद्वारे वरच्या वर हवेत पाणी फ़वारण्याची व्यवस्था केलेली असते. यातून बाहेर पडणार्‍या पाण्याची वरच्या वर हवेतच वाफ होते. जेव्हा आतलं तापमान आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते तेव्हा हे फॉगर्स चालू करून तापमान कमी करण्याची सोय आहे.
संपूर्णपणे बदिस्त वातावरणात पीक अत्यंत सुरक्षित वातावरणात वाढविल्याने रोगराईची, कीड पडण्याची शक्यता खूप कमी होते.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ....इथे टिश्यू कल्चर करून वाढवलेली रोपे लावतात. त्यामुळे या रोपांचा डेथ् रेट् अगदी कमी असतो. त्यामुळे जे रोपलं त्याचं खूप मोठं रिटर्न मिळण्याची शक्यता वाढते.
या साठी ५०% सबसिडी मिळते.
याचं रीतसर ट्रेनिन्ग "सकाळ इन्टरनॅशनल लर्निन्ग सेन्टर" पुणे इथे मिळते.
सध्या या शेड्नेट, पॉलीहाउसमधे ....रंगित सिमला मिरची, काकडी, जरबेरा, कार्नेशन, गुलाब इ. पिके घेण्याचा ट्रेन्ड दिसतो.

मानुषी, सुंदर माहिती.

या टिश्यू कल्चरबाबत मी एक माहितीपट खुप वर्षांपुर्वी बघितला होता. त्यात तर हि रोपे, मातीशिवाय वाढवली होती. झाडांना आवश्यक असणारे क्षार पाण्यात विरघळवून दिले जात होते. हि झाडे कृत्रिम आधार देऊन पाण्यातच ऊभी केली होती. ( पाणी मात्र वाहते ठेवले होते. )

शेतीच्या बाबतीत आता जितके प्रयोग होतील तितके चांगलेच. फक्त त्याचा खर्च, शेतमालाच्या विक्रीतून भरून निघाला पाहिजे.

शेड्नेट पॉलीहाऊस मधली केलेली इन्वेस्टमेन्ट २ वर्षाच्या आत भरून निघते. कारण मुळात रोपलेल्या रोपांचा डेथ रेट अगदी कमी. रोगराईची शक्यता कमी. त्यामुळे प्रॉडक्षन भरपूर असं गणित मांड्लं जातय.+५०% सब्सिडी.

माझ्या धरमशाळेच्या लेखात आहे या फुलाचा उल्लेख!!!
मला आमच्या ट्रेनर्स बुरास नाव सांगितलेले. अपभ्रंश असेल. >>>>>ऐशु, उत्तराखंडचा राज्यवृक्ष "बुरांश" आहे. बॉटेनिकल नावः Rhododendron arboreum Sm.

आणि
हिमाचलप्रदेशचे राज्यफुल Rhododendron campanulatum जे वर वर्षूदीने सांगितलंय. Happy

थांकु जिप्सी .. Happy

मानुषी किती छान समजावून दिलंस,, वाह.. !!!

हिमाचल मधे अगदी दुर्गम खेड्यांत (काहीच ठिकाणी) ही शेड्स पाहिली.. फुलं, मशरूम्स इ. पिकं घेतली जात होती इथे!!

इथे पाहिलेली अजून काही झाडं

२ घृतकुमारी म्हंजे अलोवेरा का???

५ अश्वगंधा

हो... घॄतकुमारी म्हण्जेच कोरफड्/ कुवारफोड.....ज्यापासून कुमारीआसव बनवतात.
...आणि अक्करकेरा म्हणजे अक्कलकाढा म्हणून काही असते तेच का?

धन्यवाद दिनेश. आळु पहिल्यांदाच बघितले आणि ऐकले.
अरवी गुजराती लोकांत आवडत असावे. माझ्या २-३ मैत्रिणींच्या घरी बनवतात.

गुलाबी चांदण्या सुरेख.>>> +१११११ Happy

सगळे फोटो सुरेख!

मानुषी, धन्यवाद माहितीबद्दल. Happy

काही ठिकाणी या शेड्सवर प्लास्टिकच्या कागदांचे आवरण टाकलेले दिसते. (निदान लांबूनतरी प्लास्टीक वाटते.) हे पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी करतात का?

वर्षूताई, आता दिसताहेत तुझे फोटो. प्रत्येक फोटोत एक बारकुसा ढग दिसतोय. Wink बहुदा लेन्सवर काही कचरा बसला असेल त्यावेळी.

वर्षू ......हिमाचलातली मस्त सुप्रभात! ढग खूप छान.
..........काही ठिकाणी या शेड्सवर प्लास्टिकच्या कागदांचे आवरण टाकलेले दिसते. (निदान लांबूनतरी प्लास्टीक वाटते.) हे पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी करतात का?>>>>>>>>>>
गजानन........मी वर म्हटल्याप्रमाणे शेड नेट हा एक प्रकार आणि पॉलीहाऊस हा दुसरा प्रकार. यात पॉलीहाऊस हे संपूर्ण प्लॅस्टिकचं.त्यामुळे यावर परत प्लॅस्टिक टाकण्याची वेळ येत नसावी.
आणि शेड नेटवर...... आत पावसाचं पाणी जाऊ नये म्हणून किंवा बाष्पिभनवन रोखण्यासाठीही असेल कदाचित ...... प्लॅस्टिक टाकत असतील. कारण शेड नेट ही जाळीच असते.
तसे पॉलीहाऊसमध्ये पूर्णच पॅक असते.

Pages