निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे अळूचे कंद म्हणजे अरवी फारशी खात नाहीत, पण न्यू झीलंडमधले स्थानिक माओरी लोक ते खुप खातात. त्यांच्यासाठी ते मुख्य अन्न आहे.

आज सॉलिड मजा आली सगळ्यांच्या पोस्टी वाचताना.
आमच्याकडे पांढर्‍या सोनटक्क्याच बन माजलं होतं पावसाळ्यात टोपली टोपली भरुन फुलं येत असत . त्यांच्या मंद सुगंधाने घर भरुन जाई संध्याकाळी. पण फुलं फार नाजुक. जास्त वेळ टिकत नाहीत, लगेच कोमेजतात. पाणी खूप लागत त्याला सायली.
अळुचे कंद म्हणजे अळकुड्या मला फार आवडतात. उकडताना मीठ आणि कोकम घालायचं . कोकम घशाला खाजु नये म्हणुन . मस्त लागतात. त्याचं दही घालुन भरीत ही मस्त होत.
वर्षु, तुझ्या गुड मॉर्निंग फोटो ची सवय झालेय ग .

कोकणातल्या अंगण ह्या विषयावर " अंगणात माझिया " नावाचा मी एक लेख लिहीलाय. त्याची ही लिंक . वाचा हे ही

http://www.maayboli.com/node/54165

हे माझ्याकडुन
From mayboli

जागू हो ग तसेच आहे पण मला नाही ठेवता येणार मोठी.

अळू मस्त. बहिणीला सांगेन बघ फोटो तिला ते पिकल्यावर खायला खूप आवडतात.

दिनेशदा अळकुडी आईकडे आणतात. हेमाताईनी सांगितले तसं भरीत करतात. नुसती उकडून खातात मीठ लावून. मी कधी कधी मावेमध्ये शिजवते. हा कोकम आयडिया मस्त हेमाताई.

अरे व्वा.. कोकमाची आयडिया चांगलीये ममो.. नाहीतर अळकुड्या खाताना मला इमॅजिनरी सुद्धा खाजंलंय घशात Proud

अगेन वन मोर ट्री...

मोठी झाल्यावर

उपयोग कळला नाही

अरे व्वा.. कोकमाची आयडिया चांगलीये ममो.. नाहीतर अळकुड्या खाताना मला इमॅजिनरी सुद्धा खाजंलंय घशात>>>>> सेम हिअर ..... Happy

काय योगायोग मी आजच अळकुड्या उकडल्या. मि मधून मधून उकडते. आवडतात घरातही सगळ्यांना. कोकमची आयडीया चांगली आहे. गरम असताना थोड्या खाजतात पण थंड झाल्यावर नाही खाजत.

मनीमोहोर ताई माझ्या माहीरीही बाहेरच्या नळाच्या आवारात असेच रान माजले होते सोन्टक्याचे. गावातल्या बायका-मुली संध्याकाळी फुले न्यायसाठी यायच्या आमच्याकडे. तो सुगंध म्हणजे आहाहा. आमच्याकडून सगळे लोक रोप घेऊन जायचे. आता खुप कमी उरला आहे सोनटक्का. माझ्याकडे तर मी एका टबातच लावलाय. आता मुळे काढून थोडा खाली लावणार आहे.

आम्ही अळकुड्या कायम कोकमे घालुनच उकडल्या आहेत. मला आवडतात, थोड्या बुळबुळीत लागतात हाताला, सोलताना सुळ्ळ्कण पळतात Happy

हे लाल राखी फळे असलेले झाड कोणते???????????

मी मागे इथे लिहिलेले. आम्ही बेलापुर तळ्यात गणपती विसर्जन करायला गेलेलो तेव्हा एका आगरी कुटूंबाची गौरी आलेली विसर्जनाला. गळ्यात पांढ-या शुभ्र ताज्या सोनटक्क्याच्या फुलांचा हार. रात्रीची वेळ आणि त्या अर्धवट प्रकाशात गळ्यात शुभ्र हात घातलेली गौरी............ काय दृश्य होते ते. गौरी अशी सुंदर दिसत होती की मी पाहातच राहिले. फोटो काढायचे सुचलेच नाही. आणि आज त्याचे खुप वाईट वाटतेय.

साधना काय सुरेख दिसत असतील गौरी... Happy

हेमा ताई,जागु काय नशिबवान आहात तुम्ही, सोनटक्क्या नी बहरलेलं आंगण... क्या बात है! कल्पना करुनच सुखावते आहे..

अय .. कुणीतरी त्या सोनटक्क्याच्या फुलाचे फोटू डकवा बर.. माझ्या वरच्या मजल्यात कै केल्या प्रकाश पडून नै राहिला Uhoh

गोव्यात कासाळू नावाचा एक अळूचा कंद मिळतो. ताजा खाल्ला तर खुपच खाजतो. पण तो पंधरा दिवस भिंतीला टेकवून ऊभा ठेवला तर त्याची खाज आपोआप जाते.

मुंबईला, हँगिग गार्डन ( कमला नेहरू पार्क ) मधेही खुप सोनटक्का आहे.

कुणी रिप्लाय द्यायलाच तयार नै तर मी आधीच बघुन घेतला न रहावुन .. आठवला मला .. तरी धन्यवाद सायली Happy
बाकी सोनटक्का आणि अबोली बहिण भाऊ आहेत का ?

वर्षुताई पहिला फोटो दिसत नाहीये. दुसरा सॉलिड मस्त.

सायली सोनटक्का क्युट.

पाऊस पडून गेला की मी माझ्याकडचा सोनटक्का खाली लावेन सोसायटीत. फुलेल तरी नीट. Happy

बाकी सोनटक्का आणि अबोली बहिण भाऊ आहेत का ?

प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग आहेत तसेच Happy

नाही, सोनटक्का.. आले, हळदी कुळातला आहे. दोन्हींचा पुष्पकोष साधारण सारखा असतो, तरी कूळ वेगळे आहे.

प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग आहेत तसेच स्मित + Lol Lol Lol
दा, अगदी योग्य शब्दात खुलासा..
अन्जु ताई, सोसायटीची कल्पना बेस्ट...

वर्षू, पहिला फोटो तू तूझ्या अल्बममधूनच डिलीट केलास का ? इथे दिसत नाही.
फळे फार इंटरेस्टींग दिसताहेत !

शेड नेट प्रोजेक्ट्ला भेट दिली <<< मानुषी, यावर जरा सविस्तर लिहा ना. गावाला येताजाता नेहमी उत्सुकता ताणून धरतात या शेडस्.

सायली, मला प्रथमदर्शनी ते कलिंगडाचेच रोप वाटले.

माधव, अकूपारचा अर्थ काय? पुस्तकाचे डिटेल्स द्याल का?

वर्षूताई, तुझा एकही फोटो दिसत नाही. Angry

दातून ला थेट मराठी शब्द नाही. दातवण असा शब्द आहे पण तो मशेरीला वापरतात.>>>>>>दिनेशदा, दातवणवरून एक मराठी लोकगीत आठवलं "दाताच दातवण घ्या हो कुणी, कुंकु घ्या कुणी काळंमणी" Happy

Pages