निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूषकबाला:
हे मूषकबाला नसून Mushk bala / Mushk-e-Bala असावे.
ही जटांमासी आहे. पानांचा आकार जुळतो आहे.
वनस्पतीशास्त्रीय नावः Valeriana jatamansi
हिमालय, सिक्किम, नेपाळमधे सापडते असे दिले आहे.

नमस्कार!!! बरेच दिवसांनी लिहायला आले.... वाचन मात्र नेहमीच...

मार्चच्या मध्यात एक उद्योग सुरु केला.... बिसलेरीच्या एक लिटरच्या बाटलीत स्वयंपाकघरातला कचरा गोळा करण्याचा. काय काय भरले... कच्ची केळीची साले, संत्र्याची साले, तोंडलीचे शेंडे-बुडखे, रताळ्याचे शेंडे-बुडखे, कांद्याची साले, टोमॅटोच्या चकत्या. पण खरकटे, चहाचा चोथा, निर्माल्य हे काही भरले नाही. पाउण बाटली ठासून भरल्यानंतर सगळे साठलेले बाहेर काढले, त्यात अर्धी वाटी माती मिसळली आणि पुन्हा बाटलीत भरले. बाटलीला खालून भोके पाडली आणि वरचा निमुळता भाग देखिल कापून टाकला. थोडे पाणी घातले. सुकुन लाल झालेली हिरवी मिरची होती. तिचे बी पेरले.
रोज पाणी घालत होते. ७-८ दिवसांनी कोंब बाहेर आले. वाढू लागले. बघता बघता हातभर लांबीचा वेल झाला. मी तर मिरची पेरली होती मग हे काय उगवले? नीट आठवून पाहीले, बाटलीत काय काय घातले होते? रताळे वाढू लागले असे वाटले. गुगलून पाहीले. पानांच्या आकाराने खात्री पटली.
आता महीना झाला. वेल छान दिसतो. वाढतही आहे. पण बिसलेरी बाटली ही जागा, अगदी थोडी माती असा कस अशावेळी रताळे लागेल का? कसे कळावे?

मला नै म्हटल तर >>>>>>>>>>> टिने गोडीत विचारयचं.........कुण्णी नै म्हणणार नै तुला.

अदीजो थँक्स, उपयोग काय आहे या वनस्पती चा बरं??

मानु.. छान विजिट.. मलाही खूप दिसल्या या पॉलीशेड्स( हिमाचल मधे हे नांव).. दरीत उतरूनन ही इथे जायचा
रस्ताच सापडला नाही Sad

धन्यवाद दिनेशदा.
मी कढीपत्त्याच्या काही बिया ४८ तास पाण्यात भिजत घातल्या. नंतर वरच्या आवरणाला थोडे खरचटवले आणि पेपर नॅपकिन मधे गंडाळून पाणी शिंपडले आहे. आता वाट बघणार. अंकूरल्यास कुंडीत लावेन. काय होते ते इथे लिहिनच.

हे झाड कुठल्या फुलांचे आहे ? माझ्याकडे असलेला दुसरा फोटो सध्या रिसाईझ होत नाहीये त्यामुळे टाकता येत नाहीये.

Flower 1.jpg

madhu-makarand मस्तच. महराष्ट्र विज्ञान परिषदे च्या 'शहरी शेती' च्या वर्गात कचर्यातच रुजलेला मोठा भोपळ्याचा वेल बघितला आणि त्याला भोपळे ही आले होते. त्यामुळे माती न घालता ही असे होऊ शकते.

अन्जू, हो, वेगळेच आहे. एक प्रकारचा मंद सुगंधही आहे फुलांना. भरपूर कीटक होते झाडाभोवती. झाडांना वेलींसारख्या फांद्या पाहून वीपिंग विलोची आठवण झाली.

निवर / तेवर हे नावच ऐकले नाही कधी. धन्यवाद जागू. गुगलल्यावर बरीच माहिती दिसतेय ती वाचून काढते Happy
साधना, तू ह्या झाडाचा फोटो आणि नाव दिले आहेस ह्या धाग्यावर तेही मिळाले http://www.maayboli.com/node/22629

ह्या झाडाला समुद्रफळ किंवा इंडियन ओक असेही म्हणतात.

हो, नीवर आहे.

बाटली पारदर्शक असेल ना? रताळे लागले की दिसेलच मग. Happy

मी नविन मिळालेले ज्ञान वापरुन प्लॅस्टीकच्या कुंडीला खालुन भोके पाडुन अगदी जाळी केलेली त्याची. पुदिन्याची फक्त एक काडी खोचकलेली. काल पाणी घालताना पाहिले, पुदिना खालुनही वाढतोय, चार पाच भोकांमधुन एकेक काडी बाहेर पडलीय आणि लांबच्या लांब वाढलीय Happy

मधूमकरंद फोटो टाका. उत्सुकता लागलेय. >>>> उद्या परवा टाकेन.

बाटली पारदर्शक असेल ना? रताळे लागले की दिसेलच मग. >>>>> पण स्वयंपाकघरातला कचरा काळा झाला आहे. तोच दिसतो. त्याच्या आत काही तयार झाले आणि मोठे झाले तर नक्कीच दिसेल. तसा फलधारणेचा काळ १६-२० आठवडे असा असतो असे गुगलून कळले. मलापण उत्सुकता आहे.

मधूमकरंद, रताळी हे मुळाशी लागतात. मुळांना पसरायला मोकळी जाग हवी असते त्यामुळे त्यांना बाटलीतली जागा अपुरी पडणार.

खरच जागु ताई .. त्यांची ती फडफड बघुन खुप कसस वाटतं .
कधीकाळी उन्हाची काहिली घालवायला पाण्याच्या डबक्यात आंघोळ करताना बघायचो त्यांना .. मज्जा वाटायची..
आणि आता हि गती आहे..
तरी बर निदान माती मिळाली तरी नै तर आजकाल रस्त्याच्या बाजुनही टाईल्स लावलेल्या असतात..मातीची तर सोयच नै.. आणि झाडं .. ती तर नावाला असतात .. बिचार्‍या पक्षांना नावालाही सावली नसीब नै होत तिथ डुबकी मारायला पाणी कुठ भेटणार ..
म्हणुन न घर छोट असल तरी चालेल पण घराला अंगण हवचं अस वाटतं .. आणि त्यात निदान दोन तरी मोठे आंबा लिंबाचे झाडं हवेत .. घरी तर आहे.. बघु समोर काय होत ते Sad

Mushk bala, निवर, काकड्या सगळ काही झक्कास...
बिच्चार्‍या चिमण्या..
म्हणुन न घर छोट असल तरी चालेल पण घराला अंगण हवचं अस वाटतं+++१००
मधु मकरंद खुप छान प्रयोग... फोटो च्या प्रतिक्षेत... मी सुदधा करुन पाहिन म्हणते...

चिमण्या धुळीत अंघोळ करायला लागल्या कि पावसाळा जवळ आला असे समजायचे.

दुसर्‍या एका झाडाला पण रामबाण म्हणतात. साधारण पाणथळ जागी असतोच. मोठा उभट दांडा आणि त्याला तपकिरी रंगाचे कणीस असते. त्यातल्या दांड्याचा खरोखरच बाण म्हणून उपयोग होतो तर कणीस जखम सुकवायला वापरतात.

.... गेले दहा दिवस ४५ डीग्रीच्या वर्च तापमान होतं..विजा, गडगडाट, अंधारलंय....सडा पडलाय ... मातीचा गंध अहाहा! अहाहा! नागपूरकर सुखावले

दिनेशदा करेक्ट. तुम्ही म्हणता ते रामबाण मला माहितेय. पूर्वी डोंबिवलीत खूप होती आणि नालासोपारा येथे आमच्या सोसायटीच्या मागेपण खूप होतं.

ते औषधी असते आणि त्यातल्या कणसातले ते पांढरे कापसासारखे पसरते सगळीकडे. ते पण जखमेवर लावतात पण ते डोळ्यात गेलेलं वाईट असं म्हणतात.

बेअर ग्रिल ने मासे मारायला पण त्याचा बाण म्हणून उपयोग केला होता.

चिमण्या धुळीत खेळतात त्याच्यामागे त्यांच्या पिसात शिरलेले बारीक किटक निघून जावेत असा हेतू असतो, असे कुठेतरी वाचल्यासारखे आठवतेय.

माणूस इतक्या भाषा शिकतो, पण पक्ष्या प्राण्यांची भाषा काही शिकू शकत नाही !

चिमण्या धुळीत खेळतात त्याच्यामागे त्यांच्या पिसात शिरलेले बारीक किटक निघून जावेत असा हेतू असतो, असे कुठेतरी वाचल्यासारखे आठवतेय. >> हो ?
मी त्या थंडाव्याच्या शोधात असे करतात हेच वाचुन होती ..
आता माहिती काढायला हवी आणखी ..

माणूस इतक्या भाषा शिकतो, पण पक्ष्या प्राण्यांची भाषा काही शिकू शकत नाही ! >>त्यांचा हवा तेवढा सहवास लाभत नसल्यामुळे असेल Happy .. पण एका अर्थी चांगलय नै का .. इथ एकमेकांबद्दल सगळ जाणुन असल्यामुळे माणसचं एकमेकांच्या जीवावर उठलीय तिथं निसर्गाबद्दल हरेक गोष्ट जाणून घेतल्यावर त्याला तर स्वर्थापायी कसली भितीच उरणार नै , नै का ?

Pages