(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
निरु गुलजार दोन्ही फोटो मस्त.
निरु गुलजार दोन्ही फोटो मस्त. आणि नाकतोडा खरंच खतरनाक.
जागू विपु पाहिली.
हरियाल मस्तच.. लकी आहात
हरियाल मस्तच.. लकी आहात तुम्ही
आमच्या बागेतील Jewel
आमच्या बागेतील Jewel Beetle....

मी ह्याला कर्नाळ्याला
मी ह्याला कर्नाळ्याला पाहिलेला. जोडी होती आणि मादी अंडी उबवत बसलेली. अर्थात तिथे आमच्या आधी एक पक्षीतज्ञ तोफेएवढी लांब कॅमे-याची दुर्बिण लावुन बसलेले त्यांनी त्यांच्या त्या दुर्बिणीतुन दाखवला म्हणुन दिसला. नाहीतर त्या झाडाच्या हिरव्या पानात हा हिरवा हरियाल कुठे दिसणार आमच्यासारख्यांना.
रच्याकने कर्नाळ्याच्या बर्ड ट्रेलचे नावही हरियाल असेच आहे
जेवेल बिटल एकदम एमेराल्ड रत्नच दिसतेय. कुठे आहे तुमची ही बाग?
बदलापूर, ठाणे....
बदलापूर, ठाणे....
Jewel Beetle.... - मस्त फोटो
Jewel Beetle.... - मस्त फोटो आहे.... फार वर्षापूर्वी आमच्या बागेत रायआवळ्याच्या झाडावर हे खूप दिसायचे ....
Jewel Beetle mast
Jewel Beetle mast aahe.
nisargachya gappancha navin dhaga nighala aahe. tithe ya aata saglyanni.
ओके. जाता जाता.... ते
ओके.
जाता जाता.... ते आवळ्याचेच झाड आहे..
निरु गुलजार, दोन्ही फोटो मस्त
निरु गुलजार, दोन्ही फोटो मस्त आलेत.
Jewel Beetle एकदम एमेराल्ड
Jewel Beetle एकदम एमेराल्ड रत्नच दिसतेय >> मला पण तीच उपमा आठवली.. कदाचित म्हणुनच त्याचपन हेच नाव असावं..
गावी बरेच असायचे हे..पण त्यांच्यावर ठिपके नसत. आणि रुपरंग वर्णाव तर पाण्यात ऑईल्/पेट्रोल चा थेंब पडल्यावर जसा बहुरंगी तवंग दिसतो तसा .. आम्ही याला सोनपाखरु म्हणतो..
हा प्रचि जालावरुन साभार .. यात हिरवट आभा जास्त आहे आम्ही ज्यांना प़कडायचो त्यांच्यावर निळा सोनेरी रंग जास्त असायचा ..
निगच्या नविन भागाबद्दल सर्व
निगच्या नविन भागाबद्दल सर्व निगकरान्च हार्दीक अभिनन्दन!!

हा किडा बघुन लहानपणीच्या कित्येक आठवणी जाग्या झाल्या.
याच्या मानेच्या मागच्या फटीमागे दोरा घालुन आम्ही त्याला कॉलनीतल्या फरशीवर ठेवायचो. उन्हाने तापलेल्या फरश्यामुळे हे किडे उडायला लागले की त्या दोर्याच एक टोक आमच्या हातात असल्याने आमचीही गम्मत व्हायची.
खरतर निर्दयीपणा होता हा.
हिन्गाच्या रिकाम्या डबीत झाकणाला भोक पाडुन त्यात ठेवायचो. आणि त्यान्ना खायला काय तर पीठ
याच्या मानेच्या मागच्या
याच्या मानेच्या मागच्या फटीमागे दोरा घालुन आम्ही त्याला कॉलनीतल्या फरशीवर ठेवायचो. उन्हाने तापलेल्या फरश्यामुळे हे किडे उडायला लागले की त्या दोर्याच एक टोक आमच्या हातात असल्याने आमचीही गम्मत व्हायची.
खरतर निर्दयीपणा होता हा. >> म्हणुनच मी लिहिलेय कि त्यांना पकडायचो.. अर्थात हे काम दादालोक वगैरे करायचे कारण किडे म्हटल्यावर मागोमाग किळस हा पन शब्द यायचा माझ्यासाठी.. आणि आम्हि त्यांना माचिस च्या सब्बीत ठेवायचो .. मग खेळून झाल्यावर सोडून द्यायचो.. आता खुप वाईट वाटत पण..
Pages