(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
स्वाती मस्तच काम! वर्षू हे घे
स्वाती मस्तच काम!


वर्षू हे घे तुझ्यासाठी आत्ता काढलेले ताजे ताजे ट्री फ्रेश फोटो.
फक्त खिडक्यांना जाळ्या असल्याने फार स्पष्ट नाही. संपूर्ण झाड लगडलंय. आणि आजूबाजूला परिसरात भरपूर छोटुकली रोपं आलीयत. एक नर्सरीवाला मित्र आहे त्याचा माणूस येऊन घेऊन जातो ही रोपं.
हे जुने क्लोजप्स

मानुषी, मस्त ग. झाडावरुन
मानुषी, मस्त ग. झाडावरुन तोडुन खावीशी वाटतायत. !!
मस्त फोटो मानुषीताई. माझा
मस्त फोटो मानुषीताई.
माझा कुंडीतला कडीपत्ता फार छान झाला होता. अशीच फळे लागली होती पण मग नंतर काहीतरी रोग लागल्यासारखे झालं आणि मग गेला सगळा. तेव्हा मी माबोकर नव्हते नाहीतर मदत मिळाली असती.
मा>>नु...मस्त मस्त मस्त
मा>>नु...मस्त मस्त मस्त फोटो... महाटेंप्टिंग....
आठवणी ने माझ्याकरता पाठवल्याबद्दल थांकु थांकु
मस्त आलाय फोटो !
मस्त आलाय फोटो !
मस्त फोटो मानुषी! अंजू, माझा
मस्त फोटो मानुषी!
अंजू, माझा पण कढीपत्ता कुंडीत आहे. फल धारणेत सगळी ताकद गेल्याने पाने पिवळी पडून एकदम मलूल झाला होता. त्याला पाण्यात विरघळवून खत घातले. करपू नये म्हणून १ गॅलनचे खताचे पाणी थोडे थोडे ३ आठवडे दिले. आता परत छान फुटवा फुटलाय.
सध्या आमच्या बागेत एका बदकाने म्हणजे बदक आईने मुक्काम ठोकलाय. जेरानियमची दाट वाढ बघून त्याच्या बुंध्यात मालार्ड डक ने तीन अंडी घातलेत. आता २८ दिवस हे प्रकरण सांभाळून घ्यावे लागणार. हे प्रकरण फाउंडेशन गार्डन मधेच असल्याने त्याला लागून असलेले लॉन/ गवत कापता येणार नाहिये.

दिवसभर बापडी अंड्यावर बसून असते. संध्याकाळी ८ च्या सुमारास रस्ता ओलांडून तळ्यावर जाते अणि अर्ध्यातासात परत येते.
काय छान फोटो घेतलास स्वाती२.
काय छान फोटो घेतलास स्वाती२. पुढच्या डेवलप्मेन्टचेही मस्त टिपता येतील.
"मालार्ड डक" चा फोटो मस्तए
"मालार्ड डक" चा फोटो मस्तए स्वातीतै .....
प्रकरण फाउंडेशन गार्डन >>> हे काय प्रकरण असते ???
999
999
आणि हज्जार
आणि हज्जार
मायबोलीकरांकडे हक्काने बर्याच
मायबोलीकरांकडे हक्काने बर्याच पक्षिणी बाळंतपणाला येतात
अच्छा स्वाती, गुड. मी काढून
अच्छा स्वाती, गुड. मी काढून टाकला सगळा
५ वर्षे झाली त्या घटनेला.
बदक मस्त आहे.
दिनेश स्वाती ,वॉव.. सो लक्की
दिनेश
स्वाती ,वॉव.. सो लक्की यू , मस्तं गा
शशांक, फाउंडेशन गार्डन, फ्रंट
शशांक, फाउंडेशन गार्डन, फ्रंट यार्ड ला म्हणत असावेत.. स्वाती सांगेलच काय ते!!! "
>> फाउंडेशन गार्डन, फ्रंट
>> फाउंडेशन गार्डन, फ्रंट यार्ड >> हो वर्षू . फ्रंट यार्ड मधेच आहे. दर्शनी भागात घराच्या जोत्याला लागून जी बाग केली जाते ती फाउंडेशन गार्डन.
Swati tai kadhi patta
Swati tai kadhi patta biyanchi kay mast kalji ghetalis...
Ani badkin bai balabtpana sathi ali ahe. ... Kya bat hai...
Amchya kade punha parvyani don andi ghatalit....
Manushi tai massst photo....
SukhD ni lal bhoplyach b
SukhD ni lal bhoplyach b perala hota na.... Ťyatun ivlese rop dokawate aahe...

मस्तच गं सायली. लेक अगदी खूष
मस्तच गं सायली. लेक अगदी खूष झाला असेल ना!
काल बदकिण जरा लवकर पाय मोकळे
काल बदकिण जरा लवकर पाय मोकळे करायल गेली. त्यामुळे घरट्याचा फोटो घ्यायची संधी मिळाली.

वा स्वाती मजा येतेय फोटो
वा स्वाती मजा येतेय फोटो बघायला.
सायली, वेल मस्त आलाय.
वा सुखद आईसारखा
वा सुखद आईसारखा होणार.
स्वाती, अंडी क्युट आहेत.
सायली,वेल मस्त आलाय.>>>> +१
सायली,वेल मस्त आलाय.>>>> +१
Wa kay mast swati
Wa kay mast swati tai....
Badkachi andi fakta bazarat ch pahili hoti...
Pratyksh ghartyat tumchyamule baghayala milatyat...
Khup chhan.... Pudhchi pragati pan kalwa...
Hema tai, anju tai devki ..:)
स्वाती..किती क्यूटी दिस्तायेत
स्वाती..किती क्यूटी दिस्तायेत अंडी..
आतापर्यन्त बदकीणी ला ही समजलं असेल कि ती तुझ्याकडे सेफ आहे म्हणून
स्वाती कीपिटप! अंडी बटाटेच
स्वाती कीपिटप! अंडी बटाटेच वाटताहेत पटकन.
सायली ...लेकाची निसर्गाची आवड चांगली जोपासतीयस हं!
बदकीणीची अंडी भारी! .. आता
बदकीणीची अंडी भारी! .. आता पुर्ण पिल्लांपर्यंतचे फोटो येवु देत..
एक भाप्र निगकर्स.. कारल्याच्या बिया मी अशाच कुंडीत टाकुन दिल्या होत्या एखादी तरी वेल येवु दे म्हणुन .. पण सगळ्याच बियांना अंकुर आले नि वेल सुरु होत आहे
.. तर त्यातल्या २ मोठ्ठ्या ठेवुन बाकीच्या काढुन टाकु का म्हण्जे अडचण होणार नाही नि १ कारलं तरी नीट येईल? का राहु दे तशाच?
चनस एकच वेल ठेवा व्यवस्थित
चनस एकच वेल ठेवा व्यवस्थित वाढेल. बाकीच्या काढून दुसरीकडे लावा.
स्वाती ग्रेट. बदक आणि कढीपत्ता एकदम आवडल. पिल्लांच्या फोटोच्या प्रतिक्षेत...
हेमाताई शेताच्या फोटो बद्दल धन्यवाद. डोळे पाणावले. तुम्हाला माहीतच आहे माझे बालपण ह्या शेतांच्याच सानिध्यात गेले. असे हिरवे शेत पाहिले की बालपणात हरवायला होत.
ओक्के.. प्लीज अरे-तुरे म्हणा
ओक्के..

प्लीज अरे-तुरे म्हणा .. मी लहान आहे तुमच्या पेक्षा ...
चनस... काढुन नको टाकुस!
चनस... काढुन नको टाकुस! माझ्यासाठी राहु दे.
नगरचा भुइकोट किल्ल्याचा एक
नगरचा भुइकोट किल्ल्याचा एक बुरुज. हा किल्ला महाराष्ट्रातल्या काही मोजक्या भुइकोट किल्ल्यांत याची गणना होते.इथेच पं.नेहेरूंनी "डिस्कव्हरी ऑफ इण्डिया" हा ग्रंथ लिहिला.

माझ्या वॉकच्या रस्त्यावरचं चर्च
Pages