निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे...मस्त चाललय इथे!
सगळ्यांचे फोटो आणि माहिती मस्तच. स्निग्धा बातमी छान.
हे काही प्रचि. नगर पाथर्डी रोडवरचे.


या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पवनचक्क्या आहेत.

बापूराव ऊर्फ प्रभाकर मांडे यांचे हार्दिक अभिनंदन ... या सुरेख बातमीकरता स्निग्धा यांना अनेकानेक धन्यवाद ..

स्निग्धा बातमी आवडली. आपण पण आपल्या परीने खारीचा वाटा उचलायला हवा.

मी आता ठरवले आहे. की आता कोणाला कशा निमित्ताने भेट द्याय्ची असेल तर झाडेच द्यायची.

स्निग्धा, बातमी छानच. असे प्रयोग आणखी सविस्तरपणे बातम्यात यायला हवेत. झाडे लावली पण जगवली कशी ते पण लोकांना कळायला हवे. ( हाच सगळ्यात कठीण भाग असतो. )

तसेच याबाबतीत ( ओसाड जमिनीवर झाडे लावण्याबाबत ) काही सरकारी नियम आहेत का ते पण समजले पाहिजे.

मानुषी... गूगल अर्थ वर तूमचा भाग बघितला तर गोदावरी आणि तिच्या कालव्याभोवतीचा भाग(च तेवढा) हिरवागार दिसतो.

इजिप्त बाबतही तसेच दिसते.

प्रभाकर मांडे याचा उपक्रम खुपच आवडला.. धन्यवाद स्निग्धा शेयर केल्याबद्द्ल..
टिना , मानुषी ताई मस्त प्र.ची..

स्निग्धा, मस्त हुरुप देणारी बातमी.
मानुषी, फोटो मस्त. नगरला यावसं वाटतय फोटो बघुन.
वर्षु, निळा रंग किती गोड आहे. जनरली, निळ्या रंगाची फुलं कमी आहेत पण आहेत ती सगळीच सुंदर ..... कृष्णकमळ, गोकर्ण, कमळ इ.
आज शनिवार वीकेंड सुरु. मजा करा ऑल निगकर्स. पाऊस पडला तर अजुनच मजा येईल. माझं एक निरीक्ष्ण.... पहिला पाऊस बहुतेक वेळा शनि रविच येतो.

हे वीकेंड्साठी माझ्याकडुन

From mayboli

ममो. मस्त पिवळा रंग! ..........यू आर ऑल्वेज वेल्कम! कधी येतेस?
आज सकाळी एक मस्त व्हिडिओ क्लिप मिळाली असती......गेले ३/४ दिवस परिसरात दोन मांजरांचं गुर्र्म्यांव आणि झटापट ऐकू येतेय. कधी दुसर्‍या गच्चीत कधी आमच्या कडुलिंबावर.
आमचे लुई महाराज सारखे आवाजाच्या दिशेने धाव घेतात..आणि गर्जना करतात.
तर हे दोघे मला अचानक माझ्या किचनच्या खिडकीतून दिसले. ही जागा दोन घरांमधली(सिक्युअर) असल्याने दोघांनी ती निवडली असावी. यातलं एक स्वच्छ पांढरे आणि दुसरे जिंजर कॅट. जाड भरघोस शेपट्या!
दोघेही समोरासमोर उभे होते. संपूर्णपणे वक्राकार आणि त्यांच्या अंगावरचा प्रत्येक केस ताठरलेला! अस्सले सॉल्लिड दिसत होते दोघे. आणि जबरदस्त मारामारी सुरू होण्याची चिन्हं दिसत होती. एकाने दुसर्‍याला पंजा मारला देखील. आता हे भांडण होतं की कोर्टशिप .....ते तज्ञ सांगतील........................(जरबेरा.....हाजिर होSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS}
मी आय पॅड आणायला धावले.
तेवढ्यात एक अरसिक शेजारी त्यांना काठीने हुसकावायला आला. आधी दोघांनीही त्याला इग्नोर केलं. कारण तसे ते बरेच उंचावर होते. पण शेजारी चिवट........... त्याने खालून काठी ढोसून त्यांना पळवलंच.
श्या: काय राव..........................................................!

हि असली भांडण मला रात्री २ ३ कडे ऐकु येतात .. अगदी कातावून अंगावर धावतात एकमेकांच्या .. भितीपन वाटते मग ऐकुन.. झोपुन जाव लागत मग Sad ..

वर्षू...पहिला पाइनकोन टाइप काही तरी वाट्तंय. >> +१ आहे कि नै नक्की ते नै माहिती पण .. पाईनकोन जरा जास्त इंटॅक्ट असतात न ? सेम फॅमिली पैकी एखादं असावं .. नीळी फुल मस्तच.
आणि मनीमोहोर तो पिवळ्या फुलांचा गुच्छ पण भारी .. माझ्याकडे आता त्या झाडांना शेंगा लागल्यात .. प्रचि टाकला असता पण घरी लागल्यात ..

वर्षुनील , हा वेली गुलाब आहे नं ? .. असेच गुच्छ लागतात त्यांना .. पांढरा रंग पन असतो नं यात ..
सुंदर प्रचि .. प्रसन्न अगदि Happy

Pages