निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश ने चिमण्यांबद्दल ची नवीन माहिती पुरवलीये, मलाही त्या थंडावा शोधताहेत असं वाटलेलं..

रामबाण उपाय असं नुस्तच ऐकलेलं होतं.. त्यामुळे उत्सुकता वाटली या प्लांट बद्दल.. Happy

आहा! जंगली गुलाब! वर्षुताई, मस्तच!
एका ट्रेकसाठी जोशीमठला गेलो होतो. पीपलकोटीपासून पुढे रस्त्याच्या दुतर्फा हे गुलाबच गुलाब फुलले होते. जोशीमठ तर निव्वळ गुलाबांचं गाव आहे. प्रत्येक घरासमोर वेगवेगळ्या रंगाचे गुलाब. एकेका झाडाला ५०-५० फुलं आणि एकेक फूल ओंजळीएवढं! लवकरच फोटो टाकीन.

वर्षु दी ही कुंतीच ना ही... कसली टवटवीत दिसतेय.
आदिजो प्र.ची टाकाच
जोशी मठ आहे तरी कुठे? डीटेल्स प्लीज

अल्पाईन गुलाब पण असेच माजलेले असतात. पण त्यांना अजिबात सुगंध नसतो आणि रंग फक्त फिक्कट पिवळा, गुलाबी आणि पांढरा एवढेच असतात. बाकिचे सर्व रंग मानवनिर्मित. केनयात तर तपकिरी ते निळा, अश्या रेंजमधे गुलाब फुलवतात.

Ashwini link sathi thanks.

are sagale kuthe gele ni.g. kar? sagalyanvar kalacha jhinga effect aahe ki kay ajun ?

थक्क झालो फोटो पाहून आणि माहिती वाचून.

इथे हेमाताई नक्की कोण आहे?

मनीमोहोर - ते निळे फुल फारच छान आहे.

मधु - चिमण्यांचे असे फोटो पुर्वी कधी पाहिले नाही.

जर्बेरा - अमलताशची रोपटी आली असतील तर त्याचेही फोटो टाक.

दिनेश, मागील पानावरुन पुढे प्रकरण सुरू करायचे आहे का?? मग जागु म्हणेल की काल मी मंगळवार होता असे सांगितले तरी आज मला बुधवार आहे सांगुन लोक फसवताहेत. Wink

are saangitale na kal ki parava mangalvar hota tari aaj kay sangata budhvar aahe?

आदिजो धन्यवाद, जोशी मठ फार सुरेख असेल ना.. फोटो टाका प्लीज..
मंजु ताई तुझा पण खजीना येऊ देत..
जागु कसली फुलं आहेत ती?

सायली ..पपई च झाड, पपई चे फुलं आणि बेबी पपया ( पपई च अनेकवचन ) आहेत त्या .. oh, i miss मेरे घर के झाड्स Sad
घराच्या मागील बाजुस जवळपास १५ ते २० झाड होते .. नुसती चंगळ असायची Lol

It's raining here ..
रात्री ३ ४ के आसपास विजा भी कडकर्‍या थ्या मालुम .. AddEmoticons04221.gif

हा व्ह्यु माझ्या गॅलरीतुन/ पुढील दरवाज्यातुन Happy
हिरवळ .. शेजारच्या घरची झाड ..

DSC05792.JPG

तुमच्या डावीकडून.. पहिला हिरवाकंच आंबा ( त्या पलिकदे मोठ्ठाले पाम आहेत ३ ४ आणि समोर तेवढाच उंच पारिजात Wink ), मग निंबाच/ निंबोणीच झाड, बाजुला निलगिरी ( झुम केला तर दिसेल पानं ) , इंग्लिश आवळा आणि सर्वात डावीकडे आमच्या ओनरचं आंब्याच झाड Happy

कुणीच कस बोलल नै .. च्यायला या डाव्या उजव्या, पुल पुश च्या Proud

सुप्रभात निगकर्स, आजच्या सकाळमधे वाचण्यात आलेली बातमी सगळ्यांनी वाचावी अस वाटलं Happy
लिंक कॉपी करता येत नाही Sad म्हणून इथेच पोस्ट करते आहे -

जळगाव - सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला 33 एकरचा ओसाड भू-भाग. त्यावर एका ध्येयवेड्या माणसाने प्रयत्नपूर्वक 15 हजार झाडे लावली आणि ती जगवलीदेखील. आता हा परिसर हिरवागार झाला आहे. पशू-पक्ष्यांचा किलबिलाट येथे अखंडपणे सुरू झालेला आहे.

हरिपुरा (ता. यावल) येथे हा आगळा प्रकल्प उभा राहिला आहे. बापूराव ऊर्फ प्रभाकर मांडे यांनी 33 एकरचा परिसर फुलविण्यासाठी अखंडपणे कष्ट घेतले. संत ज्ञानेश्‍वर शिक्षण मंडळ भुसावळ या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ठोस पावले उचलायला हवी असे त्यांच्या मनात येत होते. त्या अनुषंगाने मांडे यांनी सातपुड्याच्या पायथ्याशी हा वेगळा प्रयोग राबविला.

ओसाड, बरड जमीन बहरली
हरिपुरा गावाच्या सुरवातीलाच उताराची बरड आणि ओसाड जमिनीची त्यांनी प्रयोगासाठी निवड केली. 2000मध्ये त्यांनी तेथे कामाची सुरवात केली. जमीन ओसाड, बरड आणि उताराची होती. तेथे पावसाचे पाणी थांबत नव्हते. त्यामुळे ते एक मोठे आव्हानच होते. अशा जागेत वेगवेगळी 15 हजार झाडे सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने लावली. झाडे लावून भागत नाही, तर त्यांचे संगोपन झाले पाहिजे, हे लक्षात घेऊन मांडे यांनी स्वत: लक्ष घालून ही सर्व झाडे जगवली. यामध्ये नीम, चिंच, पिंपळ, अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. याशिवाय आंबा चारशे, आवळा 1200 झाडे लावण्यात आली आहेत. भविष्यात येथे प्रक्रिया उद्योग सुरू केला जाणार आहे.

अन चित्र पालटले
ओसाड, बरड जमिनीवर झाडांची लागवड आणि जोपासना झाल्याने जमिनीचे चित्र पालटले. तसे ते परिसराचेही पालटले. परिसर हिरवागार झाला. झाडे बहरल्याने पशू-पक्ष्यांचा राबता वाढला. किलबिलाट वाढला. कीटकांचा वावर वाढल्याने निसर्गचक्राला पूरक असे वातावरण तयार झाले. याच ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र देखील सुरू केलेले आहे.

जमिनीची पोत सुधारली
वृक्षलागवडीमुळे जमिनीची पोत कमालीची सुधारली. तसेच परिसरातील जमिनीची पाणी साठवण क्षमता देखील वाढली. पाणी साठविण्यासाठी या भागात उताराला समांतर असे 14 चर तयार केले असून त्यांची लांबी 2500 फूट इतकी आहे. वृक्षलागवडीमुळे वाहून जाणारे पाणी थांबू लागले. 33 एकराच्या परिसरात तीन लहान धरणे होती, मात्र त्यात गाळ भरलेला होता. हा गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविली. त्यामुळे जमिनीची प्रतवारी सुधारण्यास मदतच झाली.

निसर्ग आणि मानव हे एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाची हानी झाली तर पर्यायाने मानवाची हानी होणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लावणे आणि जगवणे महत्त्वाचे आहे.
- बापूराव मांडे, अध्यक्ष गो-विज्ञान अनुसंधान बहुउद्देशिय संस्था हरिपुरा.

Pages