निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तगर ला आम्ही बटमोगरा पण म्हणतो .. मस्ताय Happy
पांढरा कांचन पन सुंदरच ..
इथ कुणाला हजारमोगरा माहितीये का ?

धन्यवाद पुरंदरे शशांक Happy
खुप दिवसांनी हि फुल नजरेस पडली . बघुनच सुवास आला Happy .. घराभोवती भरपुर लागायची पण आजकाल कुठ दिसतच नै Sad
याचा गुच्छ बघायला काय दिसतो .. वॉव .. मिसींग इट ..

वर्षुताई गुलाब फारच गोड आणि कलरफूल.

मानुषीताई आमच्या सोसायटीत आहे डबल तगर. gallaryतून दिसते माझ्या. Happy

जागू पांढरा कांचन मस्त. गावाला आहे.

मानुषीताई स्टोरी माऊची वाचते नंतर.

हेमाताई फुले मस्त. नाव काय.

मानुषी माझ्याकडेही आहे ही तगर. मागिल वर्षी थोडी कटिंग केली होती कारण फुले इतकी लागायची की त्याच्या वजनाने फांद्या खाली लोंबकळायच्या व तुटेल की काय असे वाटायचे. अगदी भरभरून बहरते ही तगर.

मानुषी ताई त्याला एकडे दुध मोगरा म्हणतात... मस्त बहरलाय अगदी.. Happy
पांढरा कांचन सुरेखच...
टिना मी परवाच हजारी मोगर्‍याचे रोप लावले..:) फुलं लागली की फोटो टाकीनच..

कुठनं असल्या मस्त स्मायली आणता टीना? Happy अगदी माझी भावना!

सगळे फोटो सुरेख!
तुम्ही छोट्या शहरातली लोकं किती भाग्यवान. इकडे मुंबईत इंटूकल्या बाल्कनीत कसली झाडं आणि कसली फुलं! Sad

मुंबईत पावसाची परत प्रतीक्षा! Sad आज जरा जास्तच पांढरे उन पडल्यासारखे वाटतेय...

vt220 >> मला इथल्या स्माईल्या पुरतच नै .. म्हणुन छोट्या छोट्या आधीच लोड करुन ठेवल्या मी जेणेकरुन माझ्या फिलींग्स ची इन्टेन्सिटी कळावी .. up.gif

नुकतेच एक पुस्तक वाचले - अकूपार. 'मी वाचलेले पुस्तक' या बाफवर पण त्याची चर्चा झाली आहेच.

प्रत्येक निसर्गप्रेमीने आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते खुप सुंदर तर्‍हेने उकलून दाखवलय. त्याहीपेक्षा 'अपरीग्रह' या तत्वाचे महत्व सांगितले आहे. आजपर्यंत फक्त शब्द माहीत होता, पुस्तक वाचून त्याचा अर्थ समजला - अगदी नीट समजला.

हा हजारी मोगरा आमच्या गावी कुणी मुद्दाम लावत नाही पण नदीकिनारी, रस्त्याच्या कडेने आपोआप माजलेला असायचा, मावश्या वगैरे कधीही हि फुले माळत नसत. त्यात मोठे किडे असतात असे म्हणायच्या. आणि खरेही असायचे ते.

हा हजारी मोगरा आमच्या गावी कुणी मुद्दाम लावत नाही पण नदीकिनारी, रस्त्याच्या कडेने आपोआप माजलेला असायचा, मावश्या वगैरे कधीही हि फुले माळत नसत. त्यात मोठे किडे असतात असे म्हणायच्या. आणि खरेही असायचे ते. >> +१ .. पण आजकाल तो पण दिसेनासा झालाय ..

अकुपार .. केव्हाच शोधतेय हे पुस्तक.. कुट मिळेना झालय .
महिन्यांपुर्वी तत्वमसी भेटलं .. पण अकुपार नैच नै . एक दोन ठिकाणी संपर्क देऊन ठेवलाय . मिळेल लवकरच मलापन .. fingers crossed ..

Tina Nagpur LA mar ki ek chakkar, gheun thevu ka ek top tuzyasathi...
Madhav mahiti baddal aabhar...
Da Tina mhante the khara aahe alikade tya phulanmadhe kids baghitlyache athavat nai ..
Ashwini gulmohar chaan..

माधव, माहीतीबद्दल धन्यवाद.
केश्वे, गुलमोहोर सुंदर दिसतोय.
हजारी मोगर्‍याला थोडी गुलाबी छटा असते का ? नक्की आठवत नाहीये.

इतक्यात तर नै येण होणार अग सायली .. आणि मी म्हणतेय कि नेहमी रस्त्याच्या कडेला सापडणारा हजारमोगरा सुद्धा आता दिसेनासा झालाय .. मोठे तर नै पण बारीक किडे असायचे बघायचो तेव्हा .. त्याच्या सुवासामुळे आणि गुच्छामुळे आकर्षित होत असावेत बहुधा ते ..

वॉव मस्त फुलं मानुषी,
गुलमोहोर .. वाह!!!

शशांक.. बाप्रे.. विस्मरणातच गेलं होतं हे नाव.. हजारी मोगरा..
कित्येक दशकांनी (खरंच) पाहायला मिळाला या फोटो मुळे Happy

हा पक्षी नेहमी दिसत राहिला , कुल्लू च्या नेचर पार्क मधे वॉक करताना.. अगदी जोडी ने राहात असावा हा ..>>>> हा असावा तो पक्षी - The Yellow-billed Blue Magpie (Urocissa flavirostris) - जरा गुगलून पहाणार का ??

फोटो सुर्रेखच आलाय ...... Happy

नुकतेच एक पुस्तक वाचले - अकूपार >>>> अवलकडे ही सगळी पुस्तके असणारच ..... ध्रुव भट तिचे अगदी आवडते लेखक ...... Happy

Magnificent दिसतो हा पक्षी >>>> उडताना तर पॅरेडाईज फ्लायकॅचरसारखा दिसत असणार - त्याच्या लांबलचक शेपटीमुळे .... Happy
तुला प्रत्यक्ष पहाता आला हे भाग्यच - ग्रेट ... Happy एन्जॉय दि वंडरफुल ग्रेट नेचर ...

वर्षू ..................म्हटलं होतं ना.........आता मस्त फोटो पहायला मिळणार!
मस्त मॅगपाय! खरंच छानच टिपलायस! कीपीटप!

लेहला गेलेलो तिथे हा मॅगपाय खुप दिसला. जमिनीवरच रेंगाळत असतो.

हजारीमोगरा बहुतेक गोड असणार कारण त्यात खुप मुंग्या असतात. मी हल्ली गावी एका नातलगाकडे गेलेले तिथे मोठे बन होते याचे. एक छोटे रोपटे उपटुन आणुन कुंडित लागले आंबोलीला, पण जगले नाही. पुढच्या वेळेस कुंडीच घेऊन जाईन आणि आणुन लावेन. तिथे उकिरड्यावर आलेला. आणि बहुतेक वेळा उकिरड्यावरच येतो हा.

हजारीमोगरा बहुतेक गोड असणार कारण त्यात खुप मुंग्या असतात. >>> खरंय - खूप गोड असतो - आमच्या अंगणात होता फार पूर्वी - खूप मुंगळे असायचे त्यावर... तसाच कृष्णकमळाचा वेल - प्रचंड मुंगळे असायचे त्यावरही... Happy

वर्षू, मस्तच फोटो.

हो, हजारी मोगरा कचर्‍याजवळच असायचा गावाला. पण तो गावातला कचरा. मुंबईतला कचरा मानवणार नाही त्याला नाहीतर सर्व कचरापेट्याजवळ तो लावावा असे सुचवले असते.

Pages