(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
वर्षू, नुसते फोटो नकोत एक
वर्षू, नुसते फोटो नकोत एक सविस्तर लेख हवाय. परत ट्रीपवर जायच्या आधी प्लीज पूर्ण कर.
सविस्तर लेख हवाय.>>>>>>>>>>>
सविस्तर लेख हवाय.>>>>>>>>>>> वर्षू ...मला पण! मला पण! मला पण! मला पण!
मला पण लेख हवाय.
मला पण लेख हवाय.

वॉव ..जागू काय मस्त टिपलास
वॉव ..जागू काय मस्त टिपलास राघू!
बरं बरं ट्राय करते..
बरं बरं ट्राय करते..
camouflaged पोपट मस्त टिपलायेस जागु..
जागु मस्तच ग... दिल खुश हो
जागु मस्तच ग... दिल खुश हो गया!!
रंगीत
रंगीत पाल
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/leopard-geckos/a...
भरपूर पावसाने मर्क्युरी
भरपूर पावसाने मर्क्युरी डाऊन. मस्त हवा.
लेपर्ड गेको .. आपल्या घरच्या
लेपर्ड गेको ..
आपल्या घरच्या पालीपेक्षा कित्येक पट सुंदर दिसते ही.. आणि तेवढी किळसपन नाही येत ..
मानुषी .. मर्क्युरी डाऊन पहिले कळलच नाही
मानुषी , इथे पण पारा खाली
मानुषी , इथे पण पारा खाली !!!
मी मध्यंतरी कढीपत्त्याच्या
मी मध्यंतरी कढीपत्त्याच्या बिया लावण्याबद्दल इथे विचारले होते त्याचे अपडेट - बिया रुजल्या
मी मध्यंतरी कढीपत्त्याच्या
मी मध्यंतरी कढीपत्त्याच्या बिया लावण्याबद्दल इथे विचारले होते त्याचे अपडेट - बिया रुजल्या >>>>> वा, ग्रेट ...
हे कुंडीत लावले आहे का जमिनीत ???
(No subject)
मानुषी, मस्त फोटो.
मानुषी, मस्त फोटो.
(No subject)
swati congrats. Manushi,
swati congrats.
Manushi, Hematai mast photo.
स्वाती अभिनंदन माझ्या लेकानी,
स्वाती अभिनंदन
माझ्या लेकानी, चल रे भोपळ्याची गोष्ट ऐकुन भोपळ्याची बी पेरली,, ती रुजली...:) मला इतका आनंद झालाय!
जमल तर उद्या फोटो टाकते..
मस्त फोटो हेमा ताई आणि मानुषी ताई
मानुषी सुंदर फोटोज.. ममो..
मानुषी सुंदर फोटोज.. ममो.. मस्त .. हाय टाईड..
कढीपत्ता कुठे लावलाय??? सायली.. किती गोड...
मस्त फोटो मानुषीताई आणि
मस्त फोटो मानुषीताई आणि हेमाताई.
पिकासावरुन फोटोची ट्रायल
मानुषी, कुठले आहेत फोटो
मानुषी, कुठले आहेत फोटो ?
सायली.. भोपळ्याचा वेल भरपूर पसरतो. त्याचे शेंडे खुडत रहायचे म्हणजे वाढ आटोक्यात राहते आणि भोपळा लागायचे चान्सेस वाढतात. खुडलेल्या तुर्यांची ( कोवळ्या पानांची ) भाजी छान होते.
मंजूताई, मस्त फोटो . ( कुठे प्रॉब्लेम येतोय ? )
दिनेशदा, विपु टाकलीये.
दिनेशदा, विपु टाकलीये.
वॉव मंजु ताई... कुठला फोटो?
वॉव मंजु ताई... कुठला फोटो? काय नाव आहे या आरकेड च?
वर्षु दी,
दिनेश दा आभार... नक्की करीन कुलरच्या टाकीतच रोप आल आहे, आणि मुख्य म्हणजे गच्चीत आहे, त्या मुळे
पसरायला वाव आहे.
सायली, किती गोड ग . फोटो ची
सायली, किती गोड ग . फोटो ची वाट बघतेय.
मंजू मस्त जमलाय की ग !! तुला काय प्रॉब्लेम आहे
आज पडतोय तसा नाही पण थोडा कंट्रोल मध्ये पडला तर आता थोडेच दिवसात शेती अशी बहरेल. आम्ची भात शेती ( फोटो यावर्षीचा नाहीये. )
दिलखुश!!! पावसाने आणि इथल्या
दिलखुश!!!
पावसाने आणि इथल्या फोटोनी!!
मुंबईत पाऊस वेड्यासारखा
मुंबईत पाऊस वेड्यासारखा कोसळतोय. सकाळपासुन एक सेकंदही थांबला नाही.
महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडु नये असे मनपा आयुक्तांनी सांगितलंय.
मानुषी, कुठले आहेत फोटो
मानुषी, कुठले आहेत फोटो ?>>>>>>.दिनेश...फोटो अगदी गावातलेच आहेत. एका ओळखीच्यांच्या मळ्यातले. ते रहातातही तिथेच. म्हटलं तर फार्म हाऊस. गुरं आहेत.गावात बर्याच ठिकाणी दूध जातं त्यांचं. तिथंच गुरांसाठी कडवळ गवतही लावलंय. आणि एक विठ्ठल रखुमाईचं छोटंसं मंदिरही आहे यांचं याच मळ्यात.

हा फोटो....नंतर लक्षात आलं की इलेक्ट्रिसिटीचं डबडंच दिसतंय प्रोमिनन्टली.
मानुषी, कुठले आहेत फोटो
मानुषी, कुठले आहेत फोटो ?>>>>>>.दिनेश...फोटो अगदी गावातलेच आहेत. एका ओळखीच्यांच्या मळ्यातले. ते रहातातही तिथेच. म्हटलं तर फार्म हाऊस. गुरं आहेत.गावात बर्याच ठिकाणी दूध जातं त्यांचं. तिथंच गुरांसाठी कडवळ गवतही लावलंय. आणि एक विठ्ठल रखुमाईचं छोटंसं मंदिरही आहे यांचं याच मळ्यात.

हा फोटो....नंतर लक्षात आलं की इलेक्ट्रिसिटीचं डबडंच दिसतंय प्रोमिनन्टली.
धन्यवाद. अजून कुणाला प्रयोग
धन्यवाद. अजून कुणाला प्रयोग करायचा असेल तर माहिती



४८ तास पाण्यात भिजवून घेतलेल्या बिया
बिया २४ तास भिजल्यावर थोड्या खरचटवून पुन्हा २४ तास भिजवल्या होत्या. बिया ओलसर पेपरनॅपकिनमधे गुंडाळून ३-४ दिवस काउंटरवर ठेवल्या. अधून मधून पाणी शिंपडून नॅपकिन ओलसर ठेवला जेणेकरुन बिया कोरड्या पडणार नाहीत.
या मोड आलेल्या बिया दह्याच्या रिकाम्या डब्यात पॉटिंग मिक्समधे १/४ इंच खोल लावल्या. ४-५ दिवसांनी हिरवे अंकूर वर आले.
आता पिल्लं डॅम्पिंग ऑफ होऊ नये म्हणून काळजी घेतेय.
अर्रे छान गं स्वाती..
अर्रे छान गं स्वाती.. पहिल्यांदाच पाहिल्या क प च्या बिया?? कुठे मिळतात???
हॅपी ग्रोइंग..
Pages