(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
स्वाती२.. त्या बिया रुजत
स्वाती२.. त्या बिया रुजत नाहीत असा माझा अनुभव आहे. काही पक्षी त्या खाताना बघितलेत, कदाचित त्यांच्या विष्ठेतल्या बिया रुजत असतील. पण कढीपत्त्याचे मोठे झाड असले कि झाडाजवळ लहान लहान रोपयेताततच्च. ती उपटून दुसरीकडे लावली तर सहज जगतात.
नले, ते युरपमधले एक खास झाड
नले, ते युरपमधले एक खास झाड आहे, पण त्याच्यासारखे दिसणारे दुसरेही झाड असते, त्याला हात लावल्यावर मात्र काही होत नाही.
आपल्याकडे जास्वंदीसारखे पान असणारे आणि हिरवे आडवे तुरे येणारे एक रोप पावसाळ्यात उगवते, त्यालाही हात लागला तर खुप आग आग होते.
हे बिच्छु का पौधा, व्हॅली ऑफ फ्लोवर्सच्या वाटेवर खुप उगवते असे प्रा. घाणेकरांनी लिहिलेले आहे. पण त्याच्यावरचा उतारा पण तिथेच उपलब्ध असतो. दोन्ही ओळखता मात्र आले पाहिजेत.
https://www.google.com/search
https://www.google.com/search?q=FRESH+NETTLE+PLANT&biw=699&bih=295&tbm=i...
इथे फोटो आहेत.
व र्षु दी लोभस आहे रंग त्या
व र्षु दी लोभस आहे रंग त्या फुलांचा. ..
दा बिच्छु का पौदा खतरनाक.
स ध्या घरचा मोगरा असा टपोरलाय.....



आ णि भर उ न्हाळ्यात सोनचाफा बहरलाय ....
कुंडीत चक्क ४० कळ्या आल्या आहेत.
(No subject)
ओय होय सायली, किती मस्त.
ओय होय सायली, किती मस्त. आहाहा.
दिनेशदा तुम्ही दिलेल्या लिंक
दिनेशदा तुम्ही दिलेल्या लिंक मधे तर त्या झाडाला फक्त पानच दिसत आहेत..
म्हणजे यांना फुलं नसतात का ?
मग मी पाहिल ते झाड कुठल ?
अ न्जु ताई रच्याकने,
अ न्जु ताई
रच्याकने, पांढर्या गुलमोहर चे फोट टाका ना!
खुप पुर्वी नाशिक ला पाहिलेला....
sayali, मस्त वाटत असेल ना!
sayali,
मस्त वाटत असेल ना!
सायली, किती टप्पोरा आहे
सायली, किती टप्पोरा आहे मोगरा... आहाहा.. सुगंधी!!!!!!!!
पांढरा गुलमोहोर.. वॉव.. टाका फोटोज लौकर!!!
बिच्छू पौधा ,, खतरनाक!!!
मोगरा काय सुरेख दिसतोय !!
मोगरा काय सुरेख दिसतोय !! चाफाही मस्तच!
अगदी आडबाजूला असलेल्या एका
अगदी आडबाजूला असलेल्या एका हिमाचली खेड्यात दिसलेली ही गमतीदार कँडी
हिमाचल मधे काँग्रेस राज्य असून ही
मोदी का जादू
मोदी का जादू
सायली वा मस्त सगळ्या फुलांचा
सायली वा मस्त सगळ्या फुलांचा घमघमाट असेल.
सायली याच सोनचाफ्याच्या
सायली याच सोनचाफ्याच्या आगमनाबद्दल तु एकदा ललित लेख लिहलेलास ना१
टपोरलेल्या मोगरयाची बा..सी.नी कवितेतल्या गर्भिणी च्या पोटास दिलेली उपमा किती चपखल आहे नाही?
इतर सर्वान्च्या प्रचितीसुद्धा आवडल्या. नवी माहिती डोक्यात सेव्ह करुन ठेवलीय... सर्वांचे धन्यवाद .
सायली, मोगरा अप्रतिम. फोटो
सायली, मोगरा अप्रतिम. फोटो सुंदर. कुंडीतल्या चाफ्याला चाळीस कळ्या !! मजा आहे.
वर्षु, मोदी का जादू मजेशीर.
मी तर पांढरा गुल्मोहोर पाहिलेला काय ऐकलेला ही नाहीये. फोटो लवकर येऊ द्या.
मध्यंतरी वर्षुने एक निळ्या
मध्यंतरी वर्षुने एक निळ्या फुलांचा फोटो टाकला होता. अप्रतिम दिसत होती फुलं. पण ते हेच आहे का
हेमा ताई कसला चकचकीत फो टो
हेमा ताई कसला चकचकीत फो टो टाकलायत....व्वा!
मो दी का जादु.... भारीये हं!
भुई कमळ अगदी बरोबर , हा तोच सोन चाफा आहे ..
इ थेच नी.ग. व र मार्ग द र्श न मिळाले म ला...आ णि आता घ र चा एक स द स्य च झालाय हा..:)
जागु खुप घमघमाट अ स तो घ र भ र .....
हे मा ताई ख र च म ज्जाच आहे..
हेमाताई मस्त फोटो. मी पण
हेमाताई मस्त फोटो.
मी पण पहिल्यांदाच ऐकलं कि पांढरा गुलमोहर असतो.
मानपाडा रोडवर बकुळीची झाडे आहेत पण traffic खूप असते तरी आज संध्याकाळी २- ३ फुले ताजी पटकन गोळा केली.
ममो.. कसला सुर्रेख आहे रंग..
ममो.. कसला सुर्रेख आहे रंग.. ब्राईट.. हे तेच दिसतंय कॉर्नफ्लॉवर (फ्लोअर नाही ,) )
बकुळी ची फुलं पाहून जमाना झालाय... !!! फक्त वास तेव्हढा ताजा राहिलाय आठवणीत ..
कुल्लू तील नेचर पार्क मधे
कुल्लू तील नेचर पार्क मधे दिसलेली ही मूशकबाला..
म्हंजे कोणती वनस्पती ?? काय उपयोग आहे तिचा?? नावाव्यतिरिक्त इतर कोणतीच माहिती दिलेली नव्हती
पण निग वर माहिती मिळेल अशी खात्री(च) आहे
सायली मोगरा काय टप्पोरा आहे!
सायली मोगरा काय टप्पोरा आहे! ममो निळा रंग झ्याक.

मोदी का जादू.....:खोखो:
मूषकबाला?.?
काल एका शेड नेट प्रोजेक्ट्ला भेट दिली.
बिच्छू का पौधा!! आम्ही नुकतेच
बिच्छू का पौधा!!
आम्ही नुकतेच उत्तराखंडमध्ये ट्रेकला गेलो होतो. मैत्रिणीला याचा प्रसाद मिळाला. पहातापहाता हातावर रॅश आला, पण थोड्यावेळात आपोआप गेलाही.
सायली, मोगरा आणि सोनचाफा खूप सुंदर!
मानुषीताई, काकड्या अगदी तोडून खाव्याशा वाटताहेत.
हेमाताई काय सुंदर आहे हो तो
हेमाताई काय सुंदर आहे हो तो निळा रंग आणि फुल आणि फोटो सुद्धा.
मानुषीताई मस्त.
मुषकबाला पहिल्यांदाच पाहिले.
वर्षुताई, मूषकबाला नाव आणि
वर्षुताई, मूषकबाला नाव आणि फोटो दोन्ही सही. डोंबिवलीत आहेत बरीच बकुळीच्या फुलांची झाडे अगदी आमच्या मेन रोडवर, फक्त त्याला तारेची कुंपणे घातलीत आणि अर्ध झाड बंदिस्त. फुले पडत असतात पण गोळा करणं कठीण असतं traffic मुळे. तरी मी आणि बहिण पटकन वाकून दोन-तीन उचलतोच (गाड्यांकडे लक्ष ठेऊन, काळजी घेऊन). लोकं बघत राहतात पण आम्ही लक्ष देत नाही .
मानुषीताई, किती मस्त काकड्या त्या.
काल एका शेड नेट प्रोजेक्ट्ला
काल एका शेड नेट प्रोजेक्ट्ला भेट दिली. >> अशी भेट देता येते ?
कसयं बाहेर जातो त्यावेळी बरेच असे प्रोजेक्ट दिसतात आणि तिथ आत काय आहे हे पाहायची खुप इच्छा होते.
अस कुणालाही ते दाखवतात कि परमिशन हवी असते ?
सगळे प्रचि मस्तच
टिना अगं.......... शेड नेट
टिना अगं.......... शेड नेट प्रोजेक्ट्ला भेट.............व्यवसायातला एक भाग. :स्मितः
आणि खरंच वाटलं तर आत जाऊन विचारावं टिना . दिली परवानगी तर पहायचा प्रोजेक्ट........ हाकानाका!
फक्त काय असतं एस्पेश्यली शेड नेट/पॉलीहाऊस यात टेम्परेचर मेन्टेनन्स, आणि रोग, कीड पडू नये यासाठी खूपच प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. म्हणून जरा आत लिमिटेड एन्ट्री असते.
अंजू, बकुळीची फुलं वेचतेस?
अंजू, बकुळीची फुलं वेचतेस? लकी यु !
मानुषी, काकड्या बघुन ही गार गार वाटल.
वर्षु, मुषकबाला नाव मस्त आहे.
ओह .. अस्स आहे त ते .. मला नै
ओह .. अस्स आहे त ते ..

मला नै म्हटल तर ..
पुढल्या वेळी नाय काय त निदान डोकावून तरी येईन्नचं
क्वचित हेमाताई.
क्वचित हेमाताई.
Pages