निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> निळा जाभंळा जरबेरा >>
नाही नाही, मी नेटवर शोधलं. हे फूल मला Cornflower / Bachelor's button या फुलासारखं दिसतंय (Centaurea cyanus). लिंक देते आहे. त्यातली या फुलाची गोष्टही मजेदार आहे:
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Cornflower.html
फारच सुंदर फूल आहे वर्षुताई.
-अश्विनी.

माझ्याकडचे १२ वर्ष जुने कैलासपतीचे झाड अचानक वठत (सुकत) आहे, फुले आली नाहीत अजुनतरी आणि त्या झाडाच्या शेजारी १३ वर्ष जुने नारळाचे झाड आहे त्यालाही अजुन नारळ लागले नाहीत.
कैलासपतीला वाळवी नाही लागली पण असे का होत आहे ते समजत नाही.
साबांना वाटतेय की नारळाच्या झाडामुळे होतेय. Sad
कैलासपती तर ऑलमोस्ट सुकले आहे.
नारळाचे झाड काढावे का?

इंद्रा शोभेचेच आहे.

सारीका तुला जाणकार देतीलच उत्तर . पण जर कैलासपती सुकला आहे तर नारळाचे झाड काढून तेही जाईलच ना ग. त्यापेक्षा नारळाला वाढू दे.

जागु नारळाजवळचे आधिचे भरलेले लिम्बाचे झाड पुर्ण सुकले आता त्याच्याच बाजुचे दुसरे लिंबाचे झाडही सुकत आहे आणि आत कैलासपती त्याच्या बाजुला सोनचाफा आहे तोही सुकला तर मग..
नारळाला अजुन एकही नारळ लागला नाही पण त्याच्या आजुबाजुची झाडं मरत आहेत गं. Sad

सगळीच झाडे सुकताहेत म्हणजे जमिनीत काहीतरी लोचा आहे.

बहुतेक ५-६ फुट खाली मोठा खडक असावा. आमच्या कॉलनीतही जमिनीखाली मोठमोठे खडक आहेत. त्यामुळे काही जणांची झाडे, जिथे खाली खडक नाही, ती छान वाढतात तर काहीजणांची झाडे काही फुट वाढल्यावर सुकायला लागतात. झाड वर वाढत असते तेव्हा मुळेही खाली वाढुन खडकापर्यंत जाऊन पोचतात. मग ती झाडे सुकायला लागतात.

हे माझ्या घरचे दोडक्याचे फूल. सध्या आमच्याकडे सूर्य फारच उत्तरेला गेल्याने ऊन फारसे नसते, त्यामूळे दोडके धरतील अशी अपेक्षाच नाही. हि फुले रात्री उमलताहेत आणि चक्क सुगंधी असतात. ( रात्री काढल्याने फोटो स्पष्ट नाही. )

खडक असेल तर काहीच उपाय नाही.

माझ्या कॉलनीत काही जागी झाडे अमुक एक उंचीवर येऊन तिथेच थांबलीत. माझ्या बाजुच्या घरातला नारळ पुर्ण वाढुन आता फळे देतोय तर त्याच्यापासुन ६ फुटावर असलेले दोन्ही नारळ दोन्ही शेजा-यांनी काढुन टाकले. ते ७-८ फुट वाढले आणि नंतर सुकायला लागले.

लहान झुडुपे लावणे हा एक उपाय असु शकतो.

वर्षू, मस्तच फुले. निळा रंग निसर्गात खूप कमी आढळतो म्हणून निळ्या फुलांचे आणखी अप्रूप वाटते.

मला आधी ते कॉसमॉससारखे वाटले होते पण अदिजोंच्या लिंकमुळे त्याचे खरे नाव कळले.

टीना, ही फुलं कुल्लू हून मनाली ला जायच्या रस्त्यावर बियास( व्यास) नदीच्या किनार्‍यावर असलेल्या एका रेस्टॉरेंट च्या गार्डन मधे फुलून आली होती.. रंग वेड लावणाराय खरा.. नांव ही कळलं अदिजो मुळे..

हे रानावनात उगवणारे फूल, हिमाचली औषधी मानतात.. पोटदुखी, अपचन इ. वर ही फुलं शोधून , तशीच चावून खातात किंवा काढा बनवून पितात..

नाव माहीत असेल तर सांगाच प्लीज..

varshutai, hyach nav - catharanthus roseus - apli sadaphuli. hi khoop aushadhi ahe. pandhri sadaphuli cancervar upayukt ahe asa mhantat.

कुल्लू येथील नेचर पार्क मधे फिरायला खूप मजा येत होती..

वन हल्दी, मूषकबाला, रामबाण इ.नावाच्या वनस्पती तिथे लावलेल्या आहेत.. फोटू टाकते लौकरच्

त्यापैकी मूषकबाला प्रकरण अजिबात समजलं नाही...

रानफुलांच्या रानवाटेवर मी २०११ ला ब्लॉग बनवायला घेतला होता. आज अचानक उघडला आणि पुढची फुले टाकली आहेत. https://www.blogger.com/blogger.g?blogID=6740706806205471050#allposts

वर्षू, मस्तच आहेत फुले. तूला तिथे बिच्छु का पौधा दिसले का ? याचा स्पर्श झाला तरी वेदना होतात आणि नवल म्हणजे यावरचा उतारा असणारे झुडुपही त्याच्याच बाजूला असते.

बिच्छु का पौधा >>> इंटरेस्टिंग . दा फोटो टाका न .. अथवा कुठल्या नावानी शोधाव गुगल वर ?

Scorpion Grass भेटल भेटल .. फुल कसली सुंदर आहेत याची ..
याबद्दल माहिती नसेल तर माझ्यासारख व्यक्ती तर आंजारागोंजारायला लागेल लगेच त्याला Sad

बिच्छु का पौधा >> माझ्या बागेत पण एक झुडूप आहे असे. स्पर्श झाला तर एक-दोन दिवस तरी वेदना होतात.

मंडळी, एक मदत हवेय.
माझ्याकडे घरात कढीपत्याचे झाड आहे. त्याला या वर्षी मोहोर येवून फळे लागली. यथावकाश पिकून मऊ झाली. त्याच्या आतल्या बिया गोळा केल्यात. या बिया रुजवण्यासाठी काही खास करावे लागते का?

Pages