(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मानुषी, मस्त ग. पहिला विशेष
मानुषी, मस्त ग. पहिला विशेष आवडला.
मानुषीताई पहिल्या फोटोतल्या
मानुषीताई पहिल्या फोटोतल्या पानांबरोबर मी लहानपणी खेळायचे. त्या पानातला जो मधला दांडा असतो ना तो कट कट तुटतो. अगदी बोटे मोडल्यासारखा आवाज येतो.
हो का जागू? हा प्रयोग नाही
हो का जागू? हा प्रयोग नाही केला तिकडे. हे तुरे आपल्याकडेही येतात का?
मानुषी चौथा जो फोटो आहे ती
मानुषी चौथा जो फोटो आहे ती वेल गोव्याला सरकारने रस्त्याच्या कडेने लावली आहे. ( पणजी मार्केट जवळ ) रंग मात्र गुलाबी आहे तिथे.
शनिवारी १६ मे रोजी
शनिवारी १६ मे रोजी तुंगारेश्वरला DCP Mumbai तर्फे Photo Walk in support of Great Nature Project असा भटकंती कार्यक्रम होता. आम्ही सकाळी ७:३०ला विसएक जण तुंगारेश्वरच्या पाथ्याला भेटलो. National Geographic's Great Nature Project पुरस्कृत हा भटकंतीचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. मुख्य हेतू जैव विविधतेच documentation करणं. या Project बद्दलची अधिक माहिती तुम्ही वाचू शकता. www.greatnatureproject.org
आमच स्वागत केल ते या लाल हिरव्या पानांच्या झाडाने.



Indian Scops Owl ही चार भावंड गपचुप नारळाच्या खोपीत बसली होती.
धोतरा


हा Tiger Spider असावा अंदाजे..


बेहडाच्या झाडावर उगवलेली वेल...
Lizard Tree Camouflage
आवळा
काळ्या टोपीचा हळद्या... ह्यांच्या तीन चार जोड्या होत्या आणि सकाळच्या उन्हात त्यांच्या सोनेरी पंख फडफडवत उडण्याच्या अदा फारच मोहक दिसत होत्या
ताडगोळा
गुलमोहर
या भटकंतीत सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे Racket Tailed Drongo दर्शन!
हो मानुषी आपल्याकडे पण येतात
हो मानुषी आपल्याकडे पण येतात ते तुरे.
Indra, tee vel vaagharee
Indra, tee vel vaagharee orchid aahe. PaavasaaLyat tilaa chhaan phoole yetaat. Tyache design vaaghaasaarakhech asate.
सगळे फोटो सुंदर आहेत. इंद्र
सगळे फोटो सुंदर आहेत. इंद्र ते पहिले झाड कुसुंब आहे का? ("http://www.flowersofindia.net/catalog/slides/Kusum%20Tree.html")
बेहडाच्या झाडावर वेल आहे की ऑर्किड?
गुलमोहर ऑल टाईम फेवरीट!!
सर्वच फोटो सुंदर, सुंदर.
सर्वच फोटो सुंदर, सुंदर. मागच्या पानापासुनचे.
बापरे काय वहातोय हा धागा मस्त
बापरे काय वहातोय हा धागा
मस्त चाललाय
हा माझा नविन घागा
हा माझा नविन घागा पहा
http://www.maayboli.com/node/53951
ee vel vaagharee orchid aahe.
ee vel vaagharee orchid aahe. >> अगदी बरोबर दा... मी नाव विसरलो होतो.
इंद्रा मस्त आहेत फोटो.
इंद्रा
मस्त आहेत फोटो.
मस्त फोटो सगळ्यांचे.
मस्त फोटो सगळ्यांचे.
चाला वाही देस.. कहो तो
चाला वाही देस.. कहो तो कुसुंबी रंग साडी रंगावा.... त्यातला कुसुंब आहे तो !
हे घर ,घरमालक ओळखा.
हे घर ,घरमालक ओळखा.


कुम्भारिण नाही ना!
कुम्भारिण नाही ना!
गांधील माशी हि, कुंभार माशी
गांधील माशी हि, कुंभार माशी घटांच्या आकाराचेच घरटे बांधते.
या अशा माश्या, मुंग्या आणि मधमाश्या दोघींच्या पूर्वज. त्यांची उत्पत्ती गांधील माश्यांच्या पूर्वजांपासूनच झालीय.
इंद्रा, सगळेच फोटो मस्त आलेत.
इंद्रा, सगळेच फोटो मस्त आलेत.
Manushee tai, te pandhre ture
Manushee tai, te pandhre ture mala atta chya atta aanun de (byaa.... radnari baguli)
ani magnolia ghara pudhe...kay view asel wow!
endradhanushya yaanchyaa photo mule aaja dhaga indradhanushi zala:)
bhuee kamal, ran mevyachi nustee nava aikun tondala paani sutalay....
Da kiti patkan olakhalit itki barilshi vel....
Ghar ani gharmalAk donhi bhari...
आज कृ.विद्यापीठा च्या एका
आज कृ.विद्यापीठा च्या एका न. गेले होते...

तीथे सीते चे अ शोक प हिल्यान्दाच पाहीले..
खुप म नोह र दृ ष्य होते ..
काल मी माझ्या फेसबुकावर
काल मी माझ्या फेसबुकावर पारिजात आणि प्राजक्त असा उल्लेख करुन पारिजातकाचे फुल टाकले. तर तिथे मला एक कमेन्ट मिळाली की हे दोन्ही वृक्ष वेगळे आहेत. मी हे वाचून अगदी अवाक झालो. खरेच ही दोन झाडे वेगळी आहेत का? मी स्वतः कित्येकदा वेगवेगळ्या आकाराच पारिजातकाची फुले पाहिली आहेत. पण हे तर पेरुच्या किंवा इतर कुठल्याही फळाफुलांच्या बाबतीत होते. पण म्हणून ती वेगळी होत नाही. रुप रंग गंध पाने जर सारखीच असली तरी झाड मात्र तिच असतात.
चुभुदेघे.
इंद्रधनुष्य .. सगळेच प्रचि
इंद्रधनुष्य .. सगळेच प्रचि मस्त. घुबड जास्त आवडलेत
इंद्रा प्रचि मस्त जमल्यास
इंद्रा प्रचि मस्त
जमल्यास चक्कर मारतो तुंगारेश्वरला.
इंद्रा सगळे फोटो मस्त.
इंद्रा सगळे फोटो मस्त.
हा काल टाकायचा राहिला
हा काल टाकायचा राहिला

(No subject)
भारद्वाज मस्तच.
भारद्वाज मस्तच.
भारद्वाजाचे डोळे काय मस्त
भारद्वाजाचे डोळे काय मस्त दिसतात.
आणि हो.......... इंद्राची घुबड फॅमिली फनी वाटतीय.
प्लीज माझ्या प्रश्नाचे उत्तर
प्लीज माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.
Pages