राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

भारत हा शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचा देश आहे. भारतात असहिष्णुतेला कोणताही थारा नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला असलेल्या विचार स्वातंत्र्याचं रक्षण करणं हे मी माझं कर्तव्य मानतो', असं स्षष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे

बुद्ध आणि गांधी दोघानीही तळागाळातील लोकांच्या सेवेचे व्रत घेतले होते.

त्यामुळे मोदी गँगने मोदींच्या शब्दाचा मान राखून आरक्षण , दलित इ विषयी अपशब्द काढू नयेत.

अन्यथा तो मोदींचा अपमान ठरेल.

मनीष तू जे वर लिहीले आहेस तेच दीड्मा, साती, भम, मोगा आणि सक्रीय .. यांच्याही पोस्टींना लागू होते >> ते त्यांच्या आणि इतर कोणाच्याही पोस्टला लागू होइल नंद्या.. झक्कींचा आयडी गेल्याचं मलाही वाइट वाटलंच आहे म्हणूनच माझ्या पोस्टमधे सेनापतींच्या पोस्टला +१ दिलंय.. झक्कींना प्रोव्होक केलं गेलं असं केदारची पोस्ट म्हणते ते पटलं नाही म्हणून मी ती पोस्ट टाकली आहे. एकतर प्रोव्होक केलं गेलं नव्हतं आणि झक्की प्रोव्होक होतील असं मला नाही वाटत..

राजच्या पोस्टला अनुमोदन.

अ‍ॅडमीन टीम त्यांच स्वतःच काम खुप सोप करु शकत, वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे फक्त ७~८ आयडी आहेत जे मायबोलीवर गदारोळ करत आहेत. जर शक्य असेल तर त्यांचा आयपी/ मॅक अ‍ॅड्रेस ब्लॉक करा. दररोज उठुन काही कोणी नवीन मोबाईल आणि लॅपटॉप घेऊ शकणार नाहीत. अ‍ॅडमीन टीम विचार करुन बघा.

झक्की यांचा आयडी उडाला याचे वाईट वाटले. उपरोधिक पण प्रामाणिक लिहिणाऱ्यापैकी ते एक होते.>>> +१

बापरे इथे बरंच काही घडून गेलेलं दिसतंय. मला सगळ्या वाच्य-अर्वाच्य चर्चा वाचायची इच्छा नाही. पण एकच मुद्दा -

झक्कीनी दलितांबद्दल हिणकस विधान/विधाने केली असतील (भिकारडे म्हणणे हे अति हिणकस आहे) तर दलित atrocity act प्रमाणे तो गुन्हा होऊ शकतो हे इथे झक्कीना सपोर्ट करणाऱ्यांच्या लक्षात येत आहे का?
याचा त्रास माबो प्रशासनाच्या भारतीय सदस्यांना होईल आणि पोलिस त्यांना अटक करू शकतील हे बहुदा इथे परत वेगळ्याने अधोरेखित करायची गरज दिसते आहे

बाकी माझं झक्की किंवा कुणाशीच वैर नाही आणि इथल्या du id च्या उच्छादाला वैतागून मी इथला वावर कधीच मर्यादित करून टाकला आहे.

वरदा,

>>>दलित atrocity act प्रमाणे तो गुन्हा होऊ शकतो हे इथे झक्कीना सपोर्ट करणाऱ्यांच्या लक्षात येत आहे का?<<<

मग त्यांनी ती विधाने केल्याकेल्या (किंवा त्यांनी तसे केल्याची तक्रार मिळाल्यावर लगेच) मायबोलीच्या भारतीय प्रशासनाने त्यांचे सदस्यत्त्व गोठवणे योग्य ठरले असते नाही का? Happy

त्या विधानांची ह्या धाग्यावर (प्रशासकांकडे नव्हे, तर ह्या धाग्यावर) तक्रार करणे, त्यानंतर झक्कींनी स्वतःहून सदस्यत्त्व गोठवण्याची विनंती करणे आणि मग त्यांचे सदस्यत्त्व गोठवले जाणे हे तुम्हाला योग्य वाटत आहे का? Happy

झक्कींच्या त्या विधानांचा, आज त्यांना इथे सपोर्ट करणार्‍यांनीही निषेधच केलेला होता हे वेगळे.

वरदा, >>झक्कीनी दलितांबद्दल हिणकस विधान/विधाने केली असतील (भिकारडे म्हणणे हे अति हिणकस आहे) तर दलित atrocity act प्रमाणे तो गुन्हा होऊ शकतो हे इथे झक्कीना सपोर्ट करणाऱ्यांच्या लक्षात येत आहे का>> झक्कींना सपोर्ट म्हणजे काय? इथे झक्की सोडून गेल्याबद्दल चर्चा होते आहे. ते काय बोलले ह्याची तारीफ झालेली वाचली नाही.
गुन्हा हा फक्त दलितांबद्दल बोलण्यानेच होतो का? हिंदू किंवा ब्राम्हणांना धरून वाट्टेल ते लिहिलं तर ते चालतं का? तू मर्यादीत वावर केल्यामुळे बाकीचे आयडी काय लिहित असतात हे तू पाहिलं नसशील, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला दिसला नाही आजवर. सगळं गुण्यागोविंदाने चालू आहे इथे, रामराज्यच जणू.

हिणकस विधान केलं असेल तर ते विधान तेव्हा किंवा आजही उडवलं आहे का? त्याचवेळी तक्रार/ कारवाई झाली का? आत्ता सुद्धा कारवाई झाली की त्यांनी सांगितलं की माझा आयडी उडवा म्हणून उडवला?
माझा असा समज आहे की त्यांनी उबग येऊन सांगितलं मला काढा, आणि adminनी काढलं. जर admin नी हिणकस विधानामुळे मायबोली टीमला त्रास होईल म्हणून / कारवाई म्हणून काढलं असेल तर प्रश्नच मिटला. हे जर admin नी क्लियर केलं तर त्या पोलला धागा ही ताबडतोब उडवावा.

वरदा, तुझ्या प्रतिसादातले अधोरेखित करण्याजोगे वक्तव्य

>> बाकी माझं झक्की किंवा कुणाशीच वैर नाही आणि इथल्या du id च्या उच्छादाला वैतागून मी इथला वावर कधीच मर्यादित करून टाकला आहे. <<

बाकी इथे 'सपोर्ट करते आहे' म्हणजे काय करते आहे ? किंवा कसे ? या बद्दल न वाचताच टिपण्णी करण्याचे चातुर्य चांगले आहे. Happy

राजेश कुलकर्णींचे अलीकडचे काही धागे वाचताना अ‍ॅडमिन टीमने दिलेल्या या सूचनांची आठवण आली.

"शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं "
यांबद्दलचे मायबोली प्रशासनाचे धोरण आता बदलले आहे की श्री कुलकर्णींना या धोरणातून सूट देण्यात आलेली आहे ते कळेल का?

त्यांनी राजकीय नेत्यांबद्दल वापरलेले हे शब्द :

http://www.maayboli.com/node/57281 लालू नावाच्या दैत्याशी

http://www.maayboli.com/node/57281?page=1 ठोंब्या

http://www.maayboli.com/node/57371 उद्धव ठकवणारे

http://www.maayboli.com/node/57418 छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना आज अखेर अटक झाली. जनतेच्या पैशावर गबर झालेल्या या भ्रष्ट रेड्यांची ही अवस्था केवळ आताच्या सरकारबदलामुळे झाली शक्य झाली आहे हे स्पष्ट आहे
लाज-लज्जा नसते म्हणजे काय असू शकते हे आपण पहात आहोत.

हे नालायक लोक, असे हे दळभद्री व निर्लज्ज लोकप्रतिनिधी

http://www.maayboli.com/node/57590 भारताचे एक दळभद्री राजकारणी चरणसिंग

http://www.maayboli.com/node/57594 राज ठकवणारेंचा केवळ माजोरडेपणाच

http://www.maayboli.com/node/57685 अखिलेश, त्याचा दळभद्री व भुईला भार असलेला बाप, तेवढाच भुईला भार असलेला त्याचा काका आणि आझम खान नावाचा त्यांनी पाळलेला दैत्य

http://www.maayboli.com/node/56647 बिनडोक पंकजा

त्यांचा लेटेस्ट धागा तर या सगळ्या गोष्टींचा वस्तुपाठच म्हणावा लागेल.
http://www.maayboli.com/node/57698

मायबोली सदस्यांबद्दल त्यांनी वापरलेल्या भाषेचे नमुने :

http://www.maayboli.com/node/57281
मुळात तुमची समज मर्यादित असल्याचे व लेखाचा रोख तुमच्या समजेच्या पलीकडचा आहे
तुम्ही बेाक्कल अाहात हे आता स्पष्ट झाले.
हे निव्वळ दळभद्रीपणाचे लक्षण आहे

http://www.maayboli.com/node/57594
तुमची विक्ृत मनोव्ृत्ती यापूर्वी असंख्य वेळा दाखवली अाहे

http://www.maayboli.com/node/57594?page=3
तुम्हाला काही समजण्याची तुमची थोडीही कुवत राहिलेली नाही हे तुम्ही पुन्हापुन्हा दाखवत आहात. तेव्हा केवळ इथे दुस-याच्या पोस्टवर येऊन घाण करायचा तुम्हाला हक्क दिला आहे तो निर्लज्जपणे बजावत रहा.
थोडी जरी लाज शिल्लक राहिली असेल तर काय लिहिले अाहे ते समजून कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा तरी प्रयत्न करा. पोस्टमधले मुद्दे काय आहेत, तुम्ही येथे काय ओकत अाहात, कशावरून खिदळत आहात, थोडीतरी लाज ठेवा.
तुमचे दुसरे भाऊबंदही येथे हेच उद्योग करत आहेत. त्यांनाही हा निरोप पोहोचवा.
तुमची तर किवही येत नाही. बाकी वर लिहिलेले समजेल याचीही खात्री नाही. नेहमीप्रमाणे थयथयाट करा. घाण करत रहा

त्यांना न रुचणारे प्रतिसाद देणार्‍या सदस्यांबाबत ते काहीतरी वेगळा विचारही करत आहेत.
http://www.maayboli.com/node/57594?page=3
तरी या दोघांनाही माझ्या पोस्टवर काहीही कमेंट न करण्याची समज देण्यात यावी. त्यांच्याकडून चालू असलेली ही हरॅसमेंट अशीच चालू राहिली तर मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. मी हे अतिशय गांभिर्याने लिहित आहे.

याशिवाय भारताच्या प्रजासत्ताक दिनाबद्दलचे त्यांचे विचार अत्यंत मननीय आहे.

http://www.maayboli.com/node/57343
माझ्या अंदाजाने १५ ऑगस्टची स्वातंत्र्याची तारीख एकदा ठरल्यानंतर दुसरा एक राष्ट्रीय दिवस त्यानंतर लगेचच नको या भावनेने स्वातंत्र्यचळवळीतील २६ जानेवारी हा दिवस ओढूनताणून निवडला गेला

तेव्हा प्रजासत्ताक म्हणवला जाणारा हा दिवस आपल्या भोंदूपणाचेच प्रतिक आहे व तो भोंदूपणाच आपण अगदी दिमाखात साजरा करतो, यात मला अजिबात संशय नाही. तेव्हा असा दिवसाच्या शुभेच्छा वगैरे मी देत बसत नाही.

हे लिहून वर मायबोली सदस्यांची देशद्रोह आणि राष्ट्रवादाबद्दल शिकवणी घ्यायलाही ते तयार आहेत.

एकंदर आपण मांडलेल्या मुद्द्यांच्या विरोधात लिहिणार्‍यांनी आपल्या धाग्यावर लिहूच नये असा त्यांचा आग्रह दिसतो.

यावर काही सूचना करण्याची माझी पात्रता नाही, पण एवढं सगळं लिहिलंच आहे तर हेही लिहितो.

मायबोलीने श्री. कुलकर्णी यांच्या लेखनासाठी एक वेगळा ग्रुप उघडून द्यावा, तो केवळ निमंत्रितांसाठीच ठेवावा आणि त्या निमंत्रणाचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच ठेवावेत. त्यांचे लेखन त्या ग्रुपपुरतेच मर्यादित राहील हेही पहावे.

किंवा

श्री कुलकर्णी यांच्या लेखनावर प्रतिसाद देता येणार नाहीत अशी सोय करावी.

कुलकर्णींचे लेखन न वाचण्याची व त्यावर प्रतिसाद देण्याची सक्ती नाही हे कबूल आहे, पण ते इथे एका ओपिनियन मेकरच्या भूमिकेत लिहीत असतात, त्यामुळे त्यांनी मांडलेल्या विचारांचा गरज पडेल तिथे प्रतिवाद करणे अपरिहार्य होते.

हे नालायक लोक, असे हे दळभद्री व निर्लज्ज लोकप्रतिनिधी
>> या वाक्यावर काही आक्षेप नसावा. सर्वनाम घेऊन लिहिले आहे. एफओई प्रमाणे यात कहीही वावगे नाही / नसावे.

मी तेवढंच वाक्य दिलंय. त्या वाक्याआधीचा मजकूर पाहिला तर ते मुंबई मनपाच्या नगरसेवकांबद्दल आहे.

आता या विशेषणांत काही वावगं नाही असंही म्हणणारे म्हणतील. पण मग कोणीही मायबोलीकर कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल या शब्दांत लिहिणार असेल तर ते चालणार आहे का?

असो. अ‍ॅडमिन टीम वाचून वाटलं तर उत्तर देतील.

पण मग कोणीही मायबोलीकर कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल या शब्दांत लिहिणार असेल तर ते चालणार आहे का?
>> नाही. वयक्तीक व्यक्तीचे / संस्थेचे नाव घेऊन लिहिले असेल तर नाही.

^ बंप

<<पण मग कोणीही मायबोलीकर कोणत्याही राजकीय नेत्याबद्दल या शब्दांत लिहिणार असेल तर ते चालणार आहे का? >>

------
भरत- सहमत, आणि मुद्दा विस्तृत पणे येथे मान्डल्याबद्दल एक वाचक म्हणुन धन्यवाद.

आज एका नेत्याचा, त्याला उत्तर म्हणुन उद्या दुसर्‍याचा, मग सर्वान्चाच. या सर्व प्रकारात मायबोली वर घडणार्‍या चर्चेची वैचारिक पातळी खालावते. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही..... काळ सोकावतो आहे.

केवळ राहुल गान्धी, राजिव गान्धी, इन्दिरा गान्धी, नेहेरु (मी दुरान्वयेही गान्धी, नेहेरु किव्वा कॉन्ग्रेस समर्थक नाही आहे किव्वा मोदी भाजपा विरोधकही नाही आहे - कुठल्याही पक्ष आणि नेत्याबद्दल मला सॉफ्ट किव्वा हार्ड कॉर्नर नाही आही. :स्मित:) आहेत म्हणुन काही आय डी आज शान्त रहाणे पसन्त करतील... तटस्थ रहाणे, पुर्ण दुर्लक्ष करणे हा उपाय असू शकत नाही. येथे भाषा कशी वापरावी हा मुलभुत प्रश्न आहे.

अड्ड्यावर होणारे 'मोदि व इतर भाजपा' नेत्यांचे उल्लेख देखिल, इथे एवढ्याच प्रामाणिक पणे टाकले असते तर वरच्या एवढ्या लांबलचक प्रतिसादाला अर्थ होता, नाहीतर आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते ** एवढाच अर्थ उरतो त्या प्रतिसादाचा.

आय डी बॅन किव्वा धागा गोठवणे हे उपाय परिणामकारक नाही आहेत. प्रत्येक राजकीय धागा सुरु करताना त्याचा मायना Editorial Team च्या नजरेखालुन जायला हवा. Editorial Team मधे किमान १, ३ किव्वा ५ सभासद ठेवा... जेणे करुन सभासद परस्पर धागे काढुन आपल्या वैचारिक शत्रुन्ना झोडपणार नाहीत.

Editorial Team ने केवळ भाषा बघावी, कुठलेही वैचारिक बदल करु नयेत. पॉलिसी काय असावी हे ठरवता येईल.

प्रतिक्रियेत विखार आढळला तर "Editorial Team कडुन प्रतिक्रिया सम्पादित" असा रिमार्क ठेवायचा. वाचकान्ना कळायला हवे कुणाच्या प्रतिक्रिया सम्पादित होत आहेत.

पाक कृती, बाग काम यासाठी Editorial Team ची अवशक्ता आज तरी नसावी.

हे काही उपाय आहेत, इतरान्नाही काही सुधारणा सुचवता येतील.

<<अड्ड्यावर होणारे 'मोदि व इतर भाजपा' नेत्यांचे उल्लेख देखिल, इथे एवढ्याच प्रामाणिक पणे टाकले असते तर वरच्या एवढ्या लांबलचक प्रतिसादाला अर्थ होता, नाहीतर आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते ** एवढाच अर्थ उरतो त्या प्रतिसादाचा.>>
------ सर्वान्चेच... येथे आपला, तुपला असा भेद कुणीच करु नये. तसे करणे दुधारी शस्त्र आहे.

माझ्या वाचनात जेव्हा केव्हा असे उल्लेख दिसत आहेत तेव्हा मी सान्गितले आहे. निव्वळ राहुल गान्धीच नाही तर केजरीवाल, आणि मोदी यान्चे जेव्हा एकेरी, अनादराने उल्लेख वाचलेले आहेत त्या वेळी मी माझे मत स्पष्ट केले आहे.

अड्ड्यावर वैचारिक मतभेत आहेत पण अनादराने मोदी यान्चा उल्लेख मी वाचलेला नाही. मी तेथे २४-७ पडिक नसतो पण जेव्हा केव्हा माझा अड्डा-वावर असतो त्या मर्यादित काळात असे उल्लेख वाचलेले नाही.

मोदी यान्च्या उल्लेखाबद्दल बद्दल (ते देशाचे प्रधान आहेत) एक-दोन वेळा मी माझा विरोध दर्शवला आहे. हा उल्लेख अड्ड्यावर वाचलेला नाही, ज्या धाग्यावर वाचला होता तिथेच लिहीले होते. माझ्याकडे लिन्क नाही आहे.

गेल्या दोनच दिवसात 'लिंबुटिंबु' ह्या सदस्यांना "येडबांम्बु लिंब्या" हा वैयक्तिक प्रतिसाद व "पलटायला मला काय मोदी समजलास का?" हा नरेंद्र मोदी यांच्या बद्दलचा उल्लेख अड्ड्यावरचाच आहे. आणि त्यावेळी ह्या धाग्यावर किंव्हा प्रशासकांच्या विपूत एवढ्या तळमळीने प्रतिक्रिया/कंप्लेंट दिसली नाही. उलट अड्ड्याचे पावित्र राखा वैगेरे कॉंमेट आल्या होत्या त्यावेळी.

शिवाय ती अड्ड्यावरची लोक इथुन-तिथुन स्क्रिन क्रॅप घेतच असतात त्यांच्याकडे असेलच तो.

प्रसाद - जशी भरत यान्नी रितसर तक्रार केली आहे तशीच तुम्ही पण करायला हवी. मुद्दा भाषा वापरण्याचा आहे त्याला अपवाद असता कामा नयेत. तुमच्याकडे स्क्रिन शॉट असतील तर डकवा.

मी असा उल्लेख झालेला वाचलेले आहे (पण दुर्दैवाने तक्रार केली नाही हे मान्य, चुकले म्हणुन क्षमस्व... तापमान जास्त असताना सुविचार कानावर पडले तरी ते डोक्यात शिरत नाही). हे प्रकार कसे थाम्बवता येतील किव्वा कमी करता येतील ?

प्रसाद, तुम्ही म्हणताय त्यातला एक प्रतिसाद कट्ट्यावरून प्रशासकांच्या विपुत पोचलाय आणि तो लिहिणारा आयडीही उडालाय. तुम्ही म्हणताय त्या दुसर्या सदस्यांचे प्रतिसाद मी व अड्ड्यावर येणारे बहुतेक सदस्य वाचत नाही वा त्यांना उत्तरही देत नाही. याउपर , अयोग्य भाषा वापरणार्या सदस्यांची मी पाठराखण करत नाही.

<<मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.>>
------ Sad

<< मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.>>
------ छान विचार आहेत.

धागा वर काढणे हा उद्देश होता. Happy

वादे वादे जायते तत्वबोधः
म्हणून चर्चा होणे आवश्यक आहे, पण माझी ही शंभराव्या वेळा विनंति की कुणि जाणकाराने या धाग्यांमधून जर काही चांगले तार्किक, सत्याधारित मुद्दे मांडण्यात आले असतील - तर तसे संकलन करून लिहावे.

Pages