फुसके बार – २६ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 25 January, 2016 - 14:54

फुसके बार – २६ जानेवारी २०१६
.
१) आज २६ जानेवारी पुन्हा एकदा.

माझ्या अंदाजाने १५ ऑगस्टची स्वातंत्र्याची तारीख एकदा ठरल्यानंतर दुसरा एक राष्ट्रीय दिवस त्यानंतर लगेचच नको या भावनेने स्वातंत्र्यचळवळीतील २६ जानेवारी हा दिवस ओढूनताणून निवडला गेला. मला त्याचे प्रत्यक्ष कारण माहित आहे तरीही. तेव्हा याउपर मला त्याचे काही विशेष महत्त्व वाटत नाही.

राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी अनेक देशांमध्ये असतो तसा एक राष्ट्रीय दिवस (नॅशनल डे) साजरे करण्याचे ठरवण्यात यावे. अर्थात असा दिवस तेवढेच मोठे औचित्याचे कारण शोधून ठरवण्यात यावा.

बाकी लोकशाहीच्या नावाखाली होणा-या आपल्याकडच्या सार्वत्रिक किंवा कोणत्याही निवडणुका कसा लढवल्या जातात हे आपल्या सर्वांनाच चांगले माहित आहे. या निवडणुका किती बंदोबस्तात घ्याव्या लागतात, किती मतदारसंघ आजही संवेदनशील म्हणून जाहिर होतात हे सगळे आपल्याला माहित आहे. बिहारसारख्या राज्यातील निवडणुकांचे दळण किती दिवस चालते व तसे का चालते हेदेखील आपल्याला चांगलेच माहित आहे. तिथल्या जाऊ दे, आपल्याकडच्या महानगरपालिकांच्या, नगरपलिकांच्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका कशा लढल्या जातात हे तरी पाहू. तेव्हा प्रजासत्ताक म्हणवला जाणारा हा दिवस आपल्या भोंदूपणाचेच प्रतिक आहे व तो भोंदूपणाच आपण अगदी दिमाखात साजरा करतो, यात मला अजिबात संशय नाही. तेव्हा असा दिवसाच्या शुभेच्छा वगैरे मी देत बसत नाही.

धन्य हे अशा भोंदू व भंपक लोकांचे प्रजासत्ताक. पुन्हा जगातली सगळ्यात मोठी लोकशाही वगैरे म्हणत आपल्यातलाच कोणी आपलीच लाल करून घेऊ पाहिल तेव्हा या वास्तवाचे स्मरण होऊ दे.

बाकी ते फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद सुखरूप त्यांच्या देशात परतोत हीच इच्छा.

२) सामना सिनेमाची चाळीस वर्षे

सामना सिनेमाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टीव्हीवर कार्यक्रम पाहिला. जब्बार पटेल, रामदास फुटाणे वगैरे होते.

जब्बार पटेलांचा पहिलाच सिनेमा असला तरी कॅमे-यातून गोष्ट सांगणा-या दुर्मिळ सिनेमांपैकी तो एक आहे असे आवर्जून सांगितले गेले.

सिनेमाची निवड बर्लिन चिर्तपट महोत्सवासाठी झाली. कलाकारांच्या विमानतिकिटांची एकूण रक्कम होती ६४हजार, तर हे सोय करू शकले केवळ २५हजारांची. त्यामुळे बर्लिनला कसे जायचे हा मोठाच प्रश्न. हे गेले मुंबईच्या कमिशनरकडे. त्यांनी यांची अडचण समजून घेतली आणि म्हणाले, पुन्हा थोड्या वेळाने त्याच एअरलाइनच्या ऑफिसमध्ये जा. त्याप्रमाणे हे तिकडे गेले. तर तिथला अधिकारी यांना म्हणाला, काय राव तुम्ही कुठला लग्गा लावलात, त्या साहेबांनी तुमच्या तिकिटांची सोय केली नाही तर आमच्या बिल्डिंगचे पाणी तोडण्याची धमकी दिली आहे. पण माझ्या डोक्यावरही इतर साहेबलोक आहेत. काय करता येते ते मी पाहतो. त्यानंतरही तिकिटाचे काय होते याची काळजी. अखेर आम्ही ठरवले, की नाहीच जमले, तर एक गोव्याची ट्रीप करून तेथून काही इंपोर्टेड वस्तु आणून लोकांना सांगायचे की या बर्लिनहून आणल्यात. अखेर अगदी काही तास आधीच तिकिटांची सोय झाली. तेथे कितीतरी वेळ आधीच जायचे असते हे आम्हाला कोठे माहित? आम्ही आपले एसटीस्टॅंडसारखे तेथे पोहोचलो, तर आमच्या नावाचा पुकारा चालू होता. कसेबसे विमानात बसलो.

तिथून परत आल्यावर आमच्यातले बहुतेक जण पुन्हा एकदा ख-याखु-या एसटी स्टॅंडवर. जामखेड वगैरेच्या एसटी पकडायला.

कार्यक्रमात सामनातील अनेक प्रसंगही दाखवले गेले.

विचार आला की सिनेमातल्या मालकांना मास्तर भेटू शकले, कारण त्या ताकदीचे निस्पृह मास्तर 'होते'. आज बहुतेक मास्तरच अशा मालकांनी आपल्या वळचणीखाली घेतले आहेत. तेव्हा अशा माजलेल्या मालकांच्या डोळ्याला डोळा भिडवून जाब विचारायला शिल्लक कोण राहिले आहे? ज्यांना जाब विचारायचा त्यांचेच अमृतमहोत्सव साजरे करणे चालू आहे. व अशा मालकांना अपल्या गैरकृत्यांची उपरती होईल हा चमत्कारही संभवत नाही. त्यावर एक उपाय होऊ शकतो, या मालकांना सामना हा सिनेमा रोज एकदा असा सलग दहा दिवस एकट्याने पाहण्याची सक्ती करण्यात यावी आणि काही फरक पडतो का पहावे.

नाही तरी एका मालकांनी आम्हा राजकारण्यासारखे वागू नका असा उपदेश नुकताच केल्याचे वाचले. तेव्हा आशेचा काही किरण आहे वा उपरती आहे असे समजायचे की नुसताच पोकळ बुडबुडा?

३) युनिट बेस्ड इंशुरन्स विकणा-यांमध्ये अनेकदा स्त्रियांचा भरणा असतो. त्यातही अर्थात सुंदर स्त्रियांचा. अनेक जण त्यला बळी पडतात हा अनुभव अगदी माझ्या एका मैत्रीणीने सांगितला आहे.

मी परदेशात असताना अॅलिको या अमेरिकी कंपनीच्या ललना आमच्या ऑफिसमध्ये यायच्या. शिवाय सगळेच एनआरआय. काही जण त्यांना लगेच बळी पडायचे तर काही नट्स फोडायला ब-यापैकी कठीण असल्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा यावे लागायचे. पॉलिसी विकण्याची नेहमीची युक्ती म्हणजे आधी कौटुंबिक माहिती विचारून घेतलेली असायची. मुले किती, केवढी, बायको काय करते, वगैरे. मग त्यानंतर टचवुड, पण तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचे काय होईल हा मार्मिक प्रश्न. या प्रश्नाला समोरचा हमखास बळी पडलाच पाहिजे हा साधा आडाखा. ती एका इनस्ट्रुमेंटेशनच्या ड्राफ्ट्समनच्या मागे ब-याच दिवसांपासून लागली होती. बरे, हा पठ्ठ्या त्याला पॉलिसी घ्यायचीच नाही असे स्पष्टपणे सांगायचाच नाही. एवढी सुंदर स्त्री माझ्याकडे येते आहे, मी स्वत:हून तिला येऊ नको असे का म्हणू असे याचे म्हणणे.

अखेर खूप वेळा अशा चकरा झाल्यावर तो तिला म्हणाला, की या विषयावर माझ्या बायकोशी बोललेलो आहे. तिने मला सांगितले आहे की माझ्यानंतर ती काही दिवसांनी सरळ दुसरे लग्न करेल. आता तुम्हीच सांगा मी अशा बायकोची काळजी का करू? अर्थात तुमची ही पॉलिसी चांगलीच आहे, तरी मी माझ्या कमाईचे पैसे तिच्यासाठी का घालवू?

त्या बाई पुन्हा त्याच्याकडे फिरकल्या नाहीत. जेवणा-या वेळात विविध मुद्द्यावरून चर्चा होत असे. त्यामुळे हळुहळु त्या बाईंचे आमच्या ऑफिसमधले दुकान बंद झाले हे वेगळे सांगायला नको.

४) कल्पना करा. आपल्याकडे भाजलेल्या शेंगा आहेत, मटारचे दाणे आहेत किंवा तत्सम काही आहे, ज्यातून आपल्याला निवडून-निवडून खायचे आहे. आणि हे मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. तेव्हा सहसा काय होते, आधी कोवळे दाणे संपतात, मग त्यातल्या त्यात कोवळे असलेले पण थोडे निबर झालेले दाणेही चालतात, नंतर त्यापेक्षा थोडे अधिक निबर दाणे. आणखी इच्छा असेल तर राहिलेले पूर्णपणे निबर दाणेही संपतात.

विपुलता असेल तर मात्र केवळ कोवळे दाणे शोधून त्यावरच ताव मारण्याची ऐष करता येते.

तेव्हा दाने-दाने पे लिखा होता है खानेवाले का या ना खानेवाले का नाम। ये तो निर्भर होता है दाने कितने हैं और खानेवाला कौन है इसपर।

५) माझ्या एका पणजोबांना त्यांच्या एका नातवाने बरेच मोठे झाल्यावर एक प्रश्न विचारला. तुमच्या बरोबरच्या अनेकांचे निधन झाले आहे, तरीही या वयातही तुमची प्रकृती अजुनही चांगली आहे. तुमच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी हा प्रश्न विचारत आहे. नातवाची अपेक्षा की पणजोबा ते नियमितपणे करत असलेल्या व्यायामाचे, त्यांच्या निर्व्यसनीपणाचे दाखले देतील.

पणजोबा अजिबात रागवले नाहीत. ते सर्वांना अहोजाहो करत, अगदी लहानांनाही. म्हणाले, अगदी चांगला प्रश्न विचारलात. तुम्ही शेतकरी आहात ना, शेतीतलेच उदाहरण देऊन सांगतो. तुम्हाला व्यवस्थित कळेल.

शेतातली ज्वारी जेव्हा तुम्ही कापणीला काढता तेव्हा शेतात किती कणसे असतात, हजारो. त्यांची कितीही काळजीपूर्वक कापणी केली तरी दोनचार कणसे मागे राहतातच. तसा मी मागे राहिलो आहे. जेव्हा ‘त्याच्या’ ते लक्षात येईल तेव्हा माझाही नंबर येईल रे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रजासत्ताक दिनाची टिप्पणी नाही आवडली...

बिहार आणि अजुन काही भागात अनेक टप्प्यामधे निवडणुका घ्याव्या लागतात... ८४ कोटी लोक मतदानात भाग घेण्यास पात्र आहेत. पैकी ३०० नासकी टाळकी निवडणुक प्रक्रियेत सहजपणे अडथळे निर्माण करु शकतात. मतदान निर्धास्त आणि निष्पक्षपाती पणे होणे गरजेचे आहे... ८४ कोटी लोकान्च्या मतदान याद्या, मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, बन्दोबस्त, मतमोजणी अशी सम्पुर्ण प्रक्रियाच माझ्यासाठी जगातले मोठे आष्चर्य आहे.

निव्वळ टिका करणे सोपे आहे.... या प्रक्रियेचा भाग बनुन त्यात सुधारणा सुचवाणे आणि त्या घडवुन आणणे सहस्रपट मोठे आव्हान आहे.

घटना आणि स्वातन्त्र्य यावर एक छान अनुभव येथे वाचायला मिळेल.
http://www.maayboli.com/node/57339

सर्व मायबोलीकरान्ना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासुन शुभेच्छा... Happy

भारत का संविधान विश्व का सबसे लंबा लिखित संविधान है। इसमें अभी 465 अनुच्छेद तथा 12 अनुसूचियां हैं । 15 अगस्त 1947 को भारत के आज़ाद हो जाने के बाद संविधान सभा की घोषणा हुई , संविधान सभा के सदस्य भारत के राज्यों की सभाओं के निर्वाचित सदस्यों के द्वारा चुने गए थे। इस संविधान सभा ने 2 वर्ष, 11 माह, 18 दिन मे कुल 114 दिन बैठक की। इसकी बैठकों में प्रेस और जनता को भाग लेने की स्वतन्त्रता थी।
संविधान में प्रस्तावना , 25 भागों में 465 अनुच्छेद 12 अनुसूचियाँ तथा 5 अनुलग्नक हैं । पहली अनुसूची में राज्य तथा संघ राज्य क्षेत्र का वर्णन है । दूसरी अनुसूची में मुख्य पदाधिकारियों के वेतन-भत्ते का उपबंध है । तीसरी अनुसूची में व्यवस्थापिका के सदस्य, मंत्री, राष्ट्रपति, उपराष्ट्रपति, न्यायाधीशों आदि द्वारा लिए जाने वाले शपथ के प्रारूप दिए गए हैं। चौथी अनुसूची में राज्यसभा में स्थानों के आबंटन की रीति दी गयी है । पाँचवी अनुसूची में अनुसूचित क्षेत्रों और अनुसूचित जन-जातियों के प्रशासन और नियंत्रण से संबंधित उपबंध हैं । छठी अनुसूची में असम, मेघालय, त्रिपुरा और मिजोरम राज्यों के जनजाति क्षेत्रों के प्रशासन के विषय मे उपबंध हैं । सातवीं अनुसूची में संघ सूची, राज्य सूची, और समवर्ती सूची के अधिकार क्षेत्रों का वर्णन है । आठवीं अनुसूची में 22 भाषाओं का उल्लेख है ।नवीं अनुसूची में भूमि सुधार संबंधी अधिनियमों को लागू कराने के उपबंध हैं । दसवीं अनुसूची में दल परिवर्तन संबंधी उपबंध तथा परिवर्तन के आधार पर अयोग्यता संबंधी उपबंध हैं । ग्यारहवीं अनुसूची में पन्चायती राज/ जिला पंचायत से सम्बन्धित प्रावधान हैं । बारहवीं अनुसूची में शहरीकरण संबंधी नियामक उपबंध हैं ।
भारतीय संविधान के प्रस्तावना के अनुसार भारत एक सम्प्रुभतासम्पन्न, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक, गणराज्य है और केशवानन्द भारती मामले में सर्वोच्च न्यायालय द्वारा दिये गए निर्णय के अनुसार संविधान के इस बेसिक फीचर को नहीं बदला जा सकता ।
एक स्वतंत्र गणराज्य बनने के लिए 26 नवम्बर 1949 को भारतीय संविधान सभा द्वारा इस संविधान को अपनाया गया और 26 जनवरी 1950 को इसे लागू किया गया ।
सभी मित्रों को गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई !

राजेश कुलकर्णी , २६ जानेवारी १९५० या दिवसाला भारतीय इतिहासात फार महत्व आहे. उगाच कोणाला वाटलं म्हणून हा दिवस साजरा होत नाही
वर उदय यांनी दिलेली लिंक आणि पराग यांनी नुकताच माबोवर लिहिलेला लेख संदर्भासाठी उपयुक्त आहे

अजूनही स्पष्टीकरण हवं असेल तर एम लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटी नावाचं पुस्तक आहे . मला वाटत शाळांच्या नागरिकशास्त्र विषयातही प्रजासत्ताक दिवस का साजरा केला याचं विवेचन असतं .:)

बाकी <<<निव्वळ टिका करणे सोपे आहे.... या प्रक्रियेचा भाग बनुन त्यात सुधारणा सुचवाणे आणि त्या घडवुन आणणे सहस्रपट मोठे आव्हान आहे.>>>> याला प्रचंड अनुमोदन

सर्वाना भारतीय प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हा देश सोडुन युरेशियाला जायचे का?

लोकमान्य तिळकांनी लिहिलेल पुस्तक, 'आर्कटिक होम इन वेदाज' मधे आहे मुळ देश कुठे आहे ते.

या धाग्यातिल उदय यांनी जिज्ञासा यांच्या लेखाच्या दिलेल्या लिंक मुळे एक चांगला लेख वाचायला मिळाला

उदय,
धन्यवाद.

प्रजासत्ताक दिनावरच्या कॉमेंट्स ह्यांच्या म्हणजे इतर ३६४ दिवस सोडुन (हे वर्ष लीप असल्यामुळे ३६५) नेमक्या वाढदिवसाच्या दिवशी आपली आई उर्फ़ भारतमाता किती कुरूप आहे अन आपल्याला तिच्या अस्तित्वाची कशी लाज वाटते हे सांगणे होय.

किळस येते असल्या लोकांची, तीव्र निषेध.

उदय, जाई,
प्रजासत्ताकाचा अर्थ गमावला आहे हे वास्तव नाकारणे हे योग्य नाही असे वाटते. एरवी इंग्रजांपासून सुटका झाली तरी आजच्या स्वातंत्र्याचे स्वरूप काय आहे यावरून १५ ऑगस्टवरूनही टीका होतेच की. प्रजासत्ताक दिन का साजरा होतो हे मला माहित नाही असे तुम्हाला वाटते का? मी त्याहीपुढे जाऊन लिहिले अाहे हे लक्षात घ्या. मुळात २६ जानेवारी ही तारीख (१९४७च्या आधीच्या) ज्या प्रसंगावरून ठरवली ती तेवढी महत्त्वाची नाही असे मला म्हणायचे नाही.
बाकी दोन्ही दिवशी मी कोठेही असलो तरी ध्वजवंदनाला जातोच जातो.

<< स्वातंत्र्यचळवळीतील २६ जानेवारी हा दिवस ओढूनताणून निवडला गेला>>

मला तर त्या तथाकथित स्वातंत्र्यचळवळीचंच महत्त्व पटत नाही. इतिहासात उगाच ओढूनताणून बसवलंय तिला. पुन्हा नव्याने लिहायला हवं सगळं.

कुलकर्णी आजोबा , तुम्हाला २६ जानेवारीचा इतका राग का?
आज मायबोलीवरच २६ जानेवारीनिमित्त एक कविता वाचली.
तुमच्या लेखाचेच नाव होते.
तुम्ही २६जानेवारीला फुसका बार म्हाणालात आणि हा कवी तडका म्हणाला.
तुमच्यासाठी इथे चिकटवते.

"तडका - २६ जानेवारी
vishal maske | 26 January, 2016 - 23:23
२६ जानेवारी

न्याय आहे, हक्क आहेत
आहे एकात्मता अन् समता
भेटला आश्रय संविधानिक
जगण्यात आली निर्भयता

राज्य पध्दती या देशाची
ठरलीय जगात भारी
प्रजासत्ताक या राज्याची
साक्ष देते २६ जानेवारी"

आवडली तर जरूर कविला प्रतिसाद द्या.
-- तुमच्या नातीसारखी - संजना.

संघाचे लोक घटना , तिरंगा व अशोकचक्र मानत नाहीत ,असे ऐकुन आहे.

ते खरे असेल , तर अशा लोकाना फटके दिले पाहिजेत

संजना,
तुम्हाला २६ जानेवारी हा दिवस निवडण्याच्या प्रयोजनाबद्दल व प्रजासत्ताकाचे म्हणजे लोकशाहीचे म्हणून आज जे खरे स्वरूप आहे त्याबद्दल जे लिहिले आहे ते लक्षात आलेले दिसत नाही.
हरकत नाही.

"ते लक्षात आलेले दिसत नाही"
<<
अय्या!
त्यांचा वकूब नाही. त्यांची कुवत नाही. त्यांची झेप नाही. गाभा समजेल इतकी ती ही नाही, वगैरे भाषा कुटं गेली वो राकुभौ?
सुदरला म्हनायचं का काय तुमी?

अॅडमिनने या भिक्कार आणि देशद्रोही आयडीवर कारवाई करावी .
या **ड्याला स्वतच्या आयडीचे प्रयोजन माहीत नाही आणि वाट्टेल ते लिहीतो .

अभिव्यक्ती स्वातंत्रांच्या नावाखाली माजोरडेपणा चाल्लाय

कुलकर्णी आजोबा आणि शाहिर दादा,
का बरं भांडताय.
भांडणार्‍या लोकांसाठी विशालदादाने हे बघा काय लिहून ठेवलेय.

"तडका - विरोध करताना
vishal maske | 15 December, 2015 - 08:37
विरोध करताना

करायचा म्हणून उगीचंच
विरोध करता कामा नये
विरोधातही तथ्य असावे
निखळ फूसका ड्रामा नये

आपणच लावलेली आगही
आपल्यालाच पोळू शकते
स्वत:च्या कधी दुसर्‍याच्या
अनुभवा वरून कळू शकते"

वाचलंत ना आजोबा? मग नक्की विचार करा.

- तुमच्या नातीसारखी- संजना.

Pages