फुसके बार – २१ फेब्रुवारी २०१६ - पप्पूच्या रक्तातील देशद्रोह व बिनडोकपणा, जाट संघटनांचे आव्हान व चहावरची साय

Submitted by Rajesh Kulkarni on 20 February, 2016 - 15:01

फुसके बार – २१ फेब्रुवारी २०१६ - पप्पूच्या रक्तातील देशद्रोह व बिनडोकपणा, जाट संघटनांचे आव्हान व चहावरची साय

१) पप्पू, तुझ्या रक्तात असलाच तर देशद्रोह व बिनडोकपणा. देशभक्ती नाही.

पप्पू काल म्हणाला की माझ्या रक्तात देशभक्ती आहे. माझ्या कुटुंबातील दोघे मेले (मरे). अतिरेक्यांनी त्यांना मारले. तर यामुळे पप्पूच्या रक्तातच देशभक्ती आहे म्हणे.

पप्पू, तुझ्या आजीने या देशाचे जेवढे भले केले त्यापेक्षा कितीतरीपट वाटोळे केले. राजकीय स्वार्थासाठी पूर्वोत्तर राज्यांमधल्या बांगला देशी निर्वासितांचा व नंतरच्या घुसखोरीचा प्रश्न मुद्दाम सोडवला नाही, झालेच तर त्याला खतपाणी दिले. राजकीय स्वार्थासाठी देशात आणीबाणी पुकारली. जनता पक्षाचे पंतप्रधान व मंत्री पुचाट निघाले म्हणून, अन्यथा काहीही कारण नसताना पुकारलेली आणीबाणी हा देशद्रोहच होता व त्यासाठी तुझी आजी फासावर गेली नसती तरी आयुष्यभर तुरूंगात तरी नक्कीच राहिली असती इतका गंभीर गुन्हा होता तो. तेव्हा तुझ्या रक्तात काही असलेच तर देशद्रोह आहे हे लक्षात ठेव. आज आणीबाणी हा शब्द उगाळलेल्या दगडासारखा बोथट झाला आहे म्हणून; अन्यथा त्यावेळी आजीने व तुझ्या काकाने जे अक्षरश: थैमान घातले होते, त्याची तीव्रता भयानक होती. अर्थात आज सगळेच ते विसरलेले आहेत असे दिसते.

तशाच राजकीय स्वार्थापोटी अकालींना शह देण्यासाठी तुझ्या आजीने पंजाबमध्ये भिंदरावालेला प्रोत्साहन दिले, तो हाताबाहेर जाऊन त्याचा राक्षस झाल्यावर मग सुवर्णमंदिरावर कारवाई करावी लागली. त्यातून त्या मारल्या गेल्या. स्वत:च प्रश्न निर्माण करून त्यात मारले गेले, तर त्याला देशभक्ती म्हणत नाहीत, हुतात्मा म्हणत नाहीत. उलट राजकीय स्वार्थापोटी तेथे दहशतवादाला जन्म देण्यास जबाबदार असणे हा देशद्रोह आहे. शिवाय त्यांच्या वैयक्तिक प्राणहानीपलीकडे देशाचेही जे अपरिमित नुकसान झाले याची तुला कल्पना तरी आहे का पप्पू? पुढच्यावेळी असले भंपक उद्गार पप्पूने काढले तर त्याला हे कोणीतरी ऐकवले पाहिजे.

तुझे वडील राजकारणात नवखे होते तरी देशाच्या डोक्यावर बसवले गेले. कारण एकच तुझ्या आजीचा मुलगा. गादीचा वारसदार. शाहबानो प्रकरणी कायदा बदलून, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात न आणून मुस्लिम महिलांवर अन्याय करण्याचा पराक्रम त्यांनी केलाच होता. भारत देशापेक्षा अगदी छोट्या असलेल्या श्रीलंकेचे चतुर अध्यक्ष जयवर्धने यांनी राजकारणात बच्चा असलेल्या तुझ्या वडलांना अक्षरश: मूर्ख बनवले आणि त्यांच्या धूर्त चालीला बळी पडत तुझ्या वडलांनी तिथल्या तमीळ दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी आपले म्हणजे भारतीय सैन्यच खर्ची पाडले. त्यातूनच ते पुढे मारले गेले. तेव्हा त्यांनी देशरक्षणासाठी काही केले म्हणून व त्यातून त्यांचा मृत्यु झाला यामुळे त्यांना हुतात्मा म्हणावे अशी स्थिती अजिबात नाही. तुझी आजी काय किंवा वडील काय, त्यांच्या अशा प्रकारचे मारले जाण्याचे दु:ख मलाही आहेत, पण त्यातून तू तुझ्या रक्तातच देशभक्ती आहे असे म्हणतोस तो तुझा मूर्खपणा आहे हे सांगत अहे. तुमच्या गांधी घराण्याशिवाय देशाचे काही होणार नाही असा तुमचा जो माज आहे त्यातून ही तुमच्या रक्तातच देशभक्ती आहे वगैरे डायलॉगबाजी जन्माला येते.

मागे तुझ्या मातोश्रींनीही मी माझ्या सासूचा रक्ताळलेला देह माझ्या मांडीवर घेतला होता, माझ्या पतीनेही बलिदान केले अशी नाटकबाजी मते मिळवण्यासाठी केलेल्या भाषणात केली होती. तेव्हा लोक भुलले होते, आता तसे होणार नाही, याची खात्री बाळग.

एवढेही सांगतो, की तू तर तुझ्या आजीपेक्षा, वडलांपेक्षाही बदतर आहेस. वडील नवखे होते, पण बुद्दू नव्हते. तू तर बुद्दू आहेस, बिनडोक आहेस. तुझ्या पक्षात तुझ्यापेक्षा चांगले व अनुभवी असलेले कितीतरी नेते आहेत, पण तरीही त्यांच्याऐवजी तुझे बोबडे बोल रोज ऐकणे आमच्या नशिबी आहे. काल मनरेगाच्या मजुरांसमोर म्हणालास, की मोदी म्हणतात की गरीबांना काम मिळायला नको. हेही तुझे बोबडे बोलच. हे बोबडे बोल खरोखर एखाद्या बाळाचे असते तरी हरकत नव्हती. पण तू तर तुझ्या रक्तात देशभक्ती असल्याचे बरळत आहेस.

म्हणून हे सांगावे लागले पप्पू.

२) जाट संघटनांचा माज व सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आव्हान

हरयानातील जाटा संघटनांनी आरक्षणावरून फारच हिंसक आंदोलन सुरू केले आहे. हॉस्पिटल्स, शाळा जाळण्याचे प्रकार झाले आहेत. राजधानी दिल्लीचा पाणीपुरवठा रोखण्यात आल्याचे कळते.

एकूण आरक्षण ५० टक्क्यापेक्षा वाढू शकत नाही हे घटनात्मक कारणामुळे वास्तव आहे. शिवाय अगदी सर्वोच्च न्यायालयाने मुळात जाट समाज मागासलेला नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही असा निवाडा दिला आहे. तरीही अशा प्रकारचे हिंसक आंदोलन चालू करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्यासारखे आहे. हे आंदोलन कठोरपणे मोडून काढणे आवश्यक आहे.

त्यामुळे अशी आंदोलने देशविरोधी आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही.

महाराष्ट्रातही मराठा आरक्षणावरून आरपारची लढाई लढण्याचे संकेत गुंड राणे पिता-पुत्रांनी दिले आहेत. मुळात गुंड राणे यांच्या अध्यक्षतेखाली अशी आरक्षणासंबंधीची समिती नेमणे हाच विनोद होता. एकापाठोपाठ निवडणुका हरल्यामुळे राणे यांचे राजकीय भविष्य सध्या अंधारमय आहे. शिवाय राज्यातल्या निवडणुकांना आणखी बराच अवधी आहे. तेव्हा स्वत:चे राजकीय पुनर्वसन करून घेण्यासाठी राणे या नादाला लागलेले असण्याची शक्यता आहे.

कारणे काहीही असोत, यापुढे कोणालाही नव्याने आरक्षण मिळणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जाट आंदोलनाची स्वत: दखल घेऊन द्यावा. त्याशिवाय स्वत:च्या राजकीय लाभासाठी देशाला वेठीला धरण्याचे देशाच्या विविध भागात यावरून घडणारे प्रकार बंद होणार नाहीत. शिवाय अशा आंदोलनांना फूस देण्यात कोणाचा काय हेतु असेल याचा नेम नसतो. त्यामुळे हे प्रकार बंद व्हायलाच हवेत.

बाकी भाजप असो, कॉंग्रेस असो वा आप असो, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आरक्षण मिळणार नाही असे हे बेकायदेशीर आंदोलन करणा-या जाट संघटनांना स्पष्टपणे सांगताना दिसते आहे का हो? त्यामुळेही अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी वाढलेली आहे.

३) कन्हैयाकुमारचे वकीलच त्याला जामीन न मिळण्यास जबाबदार?

परवा सर्वोच्च न्यायालयात जाताना कन्हैयाला मारहाण झाली, या कारणाने त्याच्या वकिलांनी तेथेच त्याच्यासाठी जामीन मागितला. दिल्ली पोलिसांनी त्याला जामीन देण्यास त्यांची हरकत नसल्याचे सांगूनही केवळ उच्च न्यायालयात जामीन न मागितल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुनावणी घेऊनही त्यांना परत उच्च न्यायालयातच जाण्यास सांगितले. याबाबतीत उशीर झाल्यामुळे आता कन्हैया कुमारच्या जामीनाची सुनावणी थेट पुढच्या आठवड्यातच होईल. मात्र जेव्हा ती होईल त्यावेळी त्याची जामीनावर सुटका होण्यात अडथळा येणार नाही असे दिसते.

४) अंनिसच्या व्यासपीठावर राजकीय पक्षांना मोकळे रान?

गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात काढलेल्या मोर्चामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेही दिसले. पुण्यात दाभोळकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने पानसरेंचीही आठवण काढली गेली होती. पण त्या निमित्ताने ‘लाल सलाम’च्या घोषणा दिल्या जातात, हे अंनिसला मान्य आहे का?

मागे पुण्यातल्या अंनिसच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या हुसेन दलवाईंनीही यापुढे बहुजन समाजातल्या जवानांचे बळी सीमेवर पडलेले खपवून घेतले जाणार नाही (म्हणजे तेथे कोणाचे बळी पडावेत, असे त्यांचे म्हणणे होते हे वाचकांनी लक्षात घ्यावे) असे तद्दन मूर्खपणाचे विधान केले होते. तेव्हा अंनिसच्या कार्यक्रमामध्ये राजकारणीदेखील आपले हात धुवून घेत असताना दिसतात, हे अंनिसला मान्य आहे का?

गोविद पानसरे ही चांगली व्यक्ती होती, मग त्यांची जी विचारसरणी होती तिच्या अनुषंगाने लाल सलामच्या घोषणा दिल्या तर बिघडले काय, असे कोणालाही वाटेल. मात्र आज जेएनयुमध्ये फुटीरतावादी व डावे यांच्यात असलेले उघड संबंध, केरळमध्ये रा.स्व. संघ व कॉंग्रेस यांच्यात राजकीय हत्या करणारे कम्युनिस्ट, आपल्या राजवटीदरम्यान कम्युनिस्टांनी बरबाद केलेला बंगाल हे सगळेच त्यामुळे पावन होते. आता केरळमध्ये रा.स्व. संघाकडूनही कम्युनिस्टांच्या हत्या झालेल्या आहेत असे कोणाचे म्हणणे असेल तर तेथे या हत्यांना सुरूवात कशातून झाली हे पहावे व हिंसाचारातून क्रांती हीच कम्युनिस्टांच्या विचारधारा आहे हे लक्षात घ्यावे आणि केरळमधील कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्वच राजकीय हिंसाचारावर अवलंबून आहे हे लक्षात घ्यावे. वैयक्तिक पातळीवर माझा कोणत्याही हत्यांना विरोधच आहे.

अंनिसने यापुढे कम्युनिस्टच नव्हे, सर्वच राजकीय विचारधारांना बाजूला ठेवावे. दाभोळकर हे आधुनिक संत होते, म्हणजे इतक्या उच्च विचारांचे होते असे मी मानतो, त्यांच्या चळवळीला राजकीय वळण लागू नये असे वाटते.

५) बंगळुरूमध्ये शंकर बेलगावी ही वयाच्या चार वर्षांपासूनच अंधत्व आलेली व्यक्ती लिंगायत समाजाच्या जवळजवळ २०० शैक्षणिक संस्थांचे उपाध्यक्ष आहेत. लहानपणी त्यांच्या आईने त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला तर नंतर पत्नीची अमूल्य साथ. त्यांना चार मुली आहेत. त्यांना दररोजची वर्तमानपत्रे वाचून दाखवली जातात. त्यांच्या आविर्भावावरून शंकाही येत नाही की त्यांना अजिबात दिसत नाही.

काल टीव्हीवर याबाबतची बातमी ऐकताना त्यांचे आडनाव नीटसे कळले नाही.

६) चहावरची साय

ज्यांना पहिल्या वाफेचा चहा पिण्याची सवय नसते त्यांनी तो पिण्यास सुरूवात करेपर्यंत किंवा चहा आणण्यासच थोडा उशीर झालेला असेल तर त्यावर साय जमते. दूध कितीही कमी दर्जाचे असले तरी सायीचा हलकासा थर जमतोच जमतो. असा चहा पिताना काही जणांची धांदल उडते. तेही इतरांसमोर असताना. काही जण सरळ दोन बोटांनी माशी पकडावी तसा हा थर बाजुला सरकवतात. त्यावेळी आपली बोटे स्वच्छ आहेत का हेही पाहिले जात नाही. काही जण फू-फू करून त्या थराला मागे सरकवण्याचा प्रयत्न करतात. झुपकेदार मिशा असतील तर मात्र हा थर मिशीत अडकलाच समजा. हा प्रकार म्हणजे पाहुण्यांची छोटीसी परीक्षा घेण्यासारखा प्रकार असतो.

पूर्वी जावयाची परीक्षा घेण्यासाठी जेवायला पक्वान्न म्हणून शेवयाची खीर बनवत. ही खीर खायची तीदेखील चमच्याने. म्हणजे चमचा तोंडात पोहोचेपर्यंत ती हमखास खाली सांडणार व जावई परीक्षेत अनुत्तीर्ण होणार. त्यापेक्षा खिरीची वाटीच तोंडाला लावणारा जावई हुशार समजला जाई. चहावरच्या सायीच्या थराचा प्रश्न यामानाने किरकोळ असतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्यथा काहीही कारण नसताना पुकारलेली आणीबाणी हा देशद्रोहच होता व त्यासाठी तुझी आजी फासावर गेली नसती तरी आयुष्यभर तुरूंगात तरी नक्कीच राहिली असती इतका गंभीर गुन्हा होता तो.
>> कोणत्या कलमाखाली हो? देशद्रोहाच्या का? आणीबाणीचा निर्णय हा पार्लमेंटच्या बहुमताचा होता आणि त्याला राष्ट्रपतीनी मान्यता दिली होती. ( त्याचे इंप्लिमेंटेशन हा वेगळा मुद्दा आहे) राजकीय व्यवस्थेतून लोकशाही पद्धतीने घेतलेला निर्णय कधीपासून फाशीसाठी गुन्हा मानला जायला लागला. ?
राकु तुम्ही भाजपचे अत्यंत ओंगळवाणे समर्थन करणारा छुपा अजेंडा राबवणारे आहात आणि आव मात्र नि: पक्ष विश्लेषणाचा आणीत आहात. त्यामुळे तुमच्या लिखाणाकडे एखाद्या वेड्याच्या बडबडी कडे करावे तसे दुर्लक्ष करणे हे उत्तम.......

लिटल जिमी
कुलकर्णी काका जोशात आणि पादुकानन्द काका कोमात गेलेत.
तू कोमात जाऊ नकोस. तुला माहीत नाही का कसं वाचावं ते ?
मी पुन्हा लिंक देतो. नीट मनन कर. चिंतन कर. हसू नकोस. रुसू नकोस.
हा जोष भरून घे. मग फुसके बार वाच.
करशील ना असं ? या वेड्या लोकांना कळतच नाही काही.
कुलकर्णी काका, जिमी कसा वाचतोय त्यावर लक्ष ठेवा. चुकला की ठेचा त्याला.
फोडून काढा. मी येईन मलम लावायला
निघतो हं जिमी. निघतो कुलकर्णी. निघतो काका .

https://www.youtube.com/watch?v=9XH7pI9Vws0

पादुकानंद, तुमचा खोडसाळपणा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
अनेकदा सांगूनही इथले संचालक कुणाला ब्लॉक करायची सुविधा देत नाहीत.
त्यामुळे तुमच्यासारख्यांचे फावत आहे
यापुढे तुमच्याकडे दुर्लक्ष करण्यात येईलच,
तुम्हीही इथे आला नाहीत तरी चालेल.

मी या आधी पण लिहीले आहे, जेव्हा आणि जिथे शक्य आहे तिथे लिहीणार.

राहुल गान्धी यान्चा पप्पू उल्लेख करणे टाळा. त्याने काही साध्य होणार नाही, तुमचा मेसेज पोहोचणार नाही. ते जे काही आहे ते आहे पण देशद्रोही, निर्बुद्ध, बिनडोक असे शब्द टाळावे. कृपया टाळा...

इन्दिरा गान्धी (भिन्द्रनवाले) आणि राजिव गान्धी (तमिळ अतिरेकी) यान्नी घेतलेले निर्णय चुकीचे होते, असतील. तुम्ही निर्णयाबद्दल लिहा, आम्ही वाचू.... पण घेतलेले निर्णय देशाचे पन्तप्रधान म्हणुन घेतले होते. त्या निर्णयामुळे (धोरणामुळे) त्यान्ना त्यान्चे अनमोल प्राण गमवावे लागले. तो त्यान्नी देशासाठी केलेला त्याग, बलिदान आहे असे मी मानतो.

खुप लिहायचे आहे... तुर्तास अनिच्छेने रजा.

राकु तुम्ही भाजपचे अत्यंत ओंगळवाणे समर्थन करणारा छुपा अजेंडा राबवणारे आहात आणि आव मात्र नि: पक्ष विश्लेषणाचा आणीत आहात. त्यामुळे तुमच्या लिखाणाकडे एखाद्या वेड्याच्या बडबडी कडे करावे तसे दुर्लक्ष करणे हे उत्तम..

+१

फक्त दुर्लक्ष नको, उपचार हवे.

>> तो त्यान्नी देशासाठी केलेला त्याग, बलिदान आहे असे मी मानतो.<<

उदय - या वाक्यांपर्यंत मांडलेल्या मतांशी सहमत, पण या वाक्याशी नाहि...

१. अनेकदा सभ्य शब्दात सांगुनही रागाला पप्पू म्हणणे न सोडणाऱ्या गृहस्थाला कुxल्या असं म्हणायला सुरुवात करायची का? म्हणजे हे सद्गृहस्थ त्यांच्या नेहेमीच्या शैलीत स्तुतीसुमनं उधळतील. त्याची त्वरित तक्रार करून पापाच्या घड्यात भर टाकता येईल. बॅकफायर झालं तर मी पण शहीद.
२. हरियाणात जाट संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची जवाबदारी वाढली आहे. म्हणजे नक्की काय? तिकडचं सरकार कुचकामी ठरल्यामुळे का? सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही. त्यांची जवाबदारी वाढली म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तो गर्भितार्थ समजतोय पण ते स्वच्छ शब्दात लिहा.
३. रास्वसंघ हत्या करतो हे धाडसी विधान केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर निषेध पण इतर सर्व पातळ्यांवर समर्थन केल्या बद्दल आणखी अभिनंदन.
४. दुधातल्या फॅटच्या प्रमाणावर साय येईल का नाही/ किती येईल ते ठरते, जास्त फॅट म्हणजे चांगला दर्जा नाही. ग्रो अप.

या प्रतिसादावर शैलीदार प्रतिसाद दिलात तर तक्रार केली जाईल. सांभाळून.

या माणसाला वेड्यांच्या इस्पितळात त्वरित भरती करावे
यांच्या रक्तात खरा बिनडोकपणा, देशद्रोह, व्यक्तिद्वेष भरलेला आहे
रक्त बदलून टाकावे Wink

अन्यथा काहीही कारण नसताना पुकारलेली आणीबाणी हा देशद्रोहच होता व त्यासाठी तुझी आजी फासावर गेली नसती तरी आयुष्यभर तुरूंगात तरी नक्कीच राहिली असती इतका गंभीर गुन्हा होता तो.
>> कोणत्या कलमाखाली हो? देशद्रोहाच्या का? आणीबाणीचा निर्णय हा पार्लमेंटच्या बहुमताचा होता आणि त्याला राष्ट्रपतीनी मान्यता दिली होती. ( त्याचे इंप्लिमेंटेशन हा वेगळा मुद्दा आहे) राजकीय व्यवस्थेतून लोकशाही पद्धतीने घेतलेला निर्णय कधीपासून फाशीसाठी गुन्हा मानला जायला लागला. ?
>>

बर!

व्वा! राकु मस्त लिहिलेय,
तुमच्या लेखातील वाक्या-वाक्याशी सहमत!

जातिनिहाय जणगणना करावी व प्रत्येक जातिच्या लोकसंख्ये नुसार आरक्षण द्यावे.
>>

प्रचंड सहमत! खाजगी क्षेत्रातही आरक्षण असावे. कारण आता सरकारी नोकऱ्या कमी कमी होत चालल्यात.

'रथ समतेचा असा आणिला , सांभाळून न्या रे' असं एक गाणं होतं आंबेडकरांवर त्याची आठवण झाली.
छानच सूचना!
Happy

१. उदय यांच्या पोस्टशी सहमत. आदरणीय इंदिराजी व राजीवजी यांबद्दल वापरलेल्या भाषेचा निषेध. राहुल गांधींबद्दलही अतिशय हीन भाषा वापरल्याचा निषेध. मायबोलीवर मोदींचे विरोधक त्यांना मोदीकाका म्हणतात तसं तुम्ही रागांना राहुलकाका म्हणू शकता.

२. <<मागे पुण्यातल्या अंनिसच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या हुसेन दलवाईंनीही यापुढे बहुजन समाजातल्या जवानांचे बळी सीमेवर पडलेले खपवून घेतले जाणार नाही (म्हणजे तेथे कोणाचे बळी पडावेत, असे त्यांचे म्हणणे होते हे वाचकांनी लक्षात घ्यावे) असे तद्दन मूर्खपणाचे विधान केले होते. तेव्हा अंनिसच्या कार्यक्रमामध्ये राजकारणीदेखील आपले हात धुवून घेत असताना दिसतात, हे अंनिसला मान्य आहे का?>>

हे इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर असे अनेक उच्चवर्णिय माहीत आहेत जे इतर 'सेफ' प्रोफेशन्समध्ये जाणं वा परदेशात जाणं शक्य असूनही सैन्यात कार्यरत आहेत अथवा शहीद झालेले आहेत. अगदी अंधश्रध्दा निर्मूलनासाठी बलिदान दिलेले डॉ.नरेंद्र दाभोलकरही ब्राम्हण होते. काँग्रेसला शहीद व्यक्तींचीही जात बघितल्याशिवाय प्रतिक्रिया काय द्यायची हे ठरवता येत नाही हे दुर्दैवी आहे.

ज्या खाजकी क्षेत्रातिल कंपन्यांना सरकार मदत करते तिथे आरक्षण नक्किच असावे.

जाट आरक्षण आंदोलन यानी जातिवार जनगणना के आंकड़े जारी न करने का साइड इफेक्ट.

सरकार इस देश को अनंत जाति युध्द की ओर ले जा रही है. किसी को भी लग सकता है कि पिछड़ेपन को साबित करने के लिए सरकार की बांह मरोड़ना काफी होगा, क्योंकि आकड़े हैं ही नहीं.
4,300 करोड़ रुपये जब जाति जनगणना पर खर्च हो चुके हैं, तो अब आंकड़े जारी किए जाएं. जिनकी हिस्सेदारी कम है, उसको हिस्सा दिया जाए. 50% की लिमिट से आगे बढ़िए.

दिलिप मंडल.

कॉंग्रेसच्या हुसेन दलवाईंनीही यापुढे बहुजन समाजातल्या जवानांचे बळी सीमेवर पडलेले खपवून घेतले जाणार नाही
>>

अगदी बरोबर आहे सनवताई. असेच चाललेय. वर्णव्यवस्थेत उच्चवर्णियांनी बहुजनांना सैनिकादी कामे इतरांना लाऊन दिली. त्यामुळे ते सेफ राहिले आणि इतर मरत राहिले. तेही त्यांना नेहमी अपमान करीत राहिलेल्या लोकांसाठी.

राजे काय सरदार काय पंडित काय, सैन्य हरले की आपल्या स्थानांचा व्यवस्थित उपयोग करून जिंकलेल्या राजांशी डील मारून घेत आणि सुखी राहत.

गुलामी ती बहुजनांच्या माथी पडते.

ज्या खाजकी क्षेत्रातिल कंपन्यांना सरकार मदत करते तिथे आरक्षण नक्किच असावे.
>>

हो. अहो पण जमीन सरकारची असते. स्वस्तात सरकारच विकते. मग ती मदतच नाही का? पाणी देणे, वीज पुरवणे आदी गोष्टी सरकार करते. प्रसंगी सवलतीच्या दरात.

मग प्रत्येक ठिकाणी आरक्षण असलेच पाहिजे.

उदय,
पप्पूबद्दलची व त्याला तसे संबोधण्यामागची माझी भूमिका मी आधीच सांगितली आहे. ती पुन्हा सांगत बसत नाही. तुमच्या त्याग-बलिदान याबद्दलच्या संकल्पना भलत्याच आहेत हेच यावरून कळते. त्यांचे प्राण जाण्यात मलाही आनंद नाही हे तर मी म्हटलेलेच आहे.

पादुकानंद,
तुम्हाला माहित नसेल तर शहा कमिशनबद्दल वाचा. "आणीबाणीचा निर्णय हा पार्लमेंटच्या बहुमताचा होता आणि त्याला राष्ट्रपतीनी मान्यता दिली होती." हा तर तुचा बॉल सापडूच नये इतका मोठा सिक्सर आहेत. मी तर तुम्हाला यावरून तुम्ही कॉंग्रेसचे पित्ते आहात हे ही म्हणणार नाही इतका तुमचा प्रतिवाद उथळ आहे.
शिवाय स्वार्थासाठी इतर राजकीय नेत्यांना तुरूंगात डांबणे हा देशद्रोह नाही का? देशद्रोहाची तुमची कल्पना बोथट झालेली आहे हा माझा दोष नाही. मनमानी करण्यावरून आताच्या सरकारवर आणीबाणीसद्ृश्य परिस्थिती आणली आहे असे आरोप होताना पाहत आहात ना? मग सोनिया-पप्पू-येचुरी-लालूसह ही सगळीच डोकी दीड-दोन वर्षांसाठी आता तुरूंगात बसली तरी कायहोईल याचा विचार तरी करू शकता का? कारण नसताना असा अन्याय झाला तरच मग तुम्हाला देशद्रोह म्हणजे काय याचे भान येईल.
बाकी तुमचे म्हणणे तुम्हाला लखलाभ. मला भाजपचा छुपा, उघड समर्थक म्हणा, मला काही फरक पडत नाही. मी माझ्यासाठी मला योग्य वाटेल त्याप्रमाणे लिहितो. मी भाजपच्या विरोधातही लिहितो हे तुम्ला कावीळ झाली असेल कदाचित त्यामुळे दिसणारही नाही, ना माझी तुम्हाला ते दाखवण्याची इच्छा अाहे. एकूण तुमच्या कमेंट्स पाहता त्यांचा प्रतिवाद करण्याचेही खरे कारण नाही. यापुढे ते पथ्य जरूर पाळेन.

तिथे गारूडी नावाचा सदस्य एका ओळौच्या कमे़ट वेड्यांच्या इस्पिथळात बसूनच करत आहे. ज्यांच्या कमेंटचा मी उल्लेख वा प्रतिवादही करत नाही ते दीडशहाणे मायबोलीकरही त्यांना तेथे सोबत करत आहेत असे दिसते. स्वत:चे नावही न सांगणारे हे भेकड माझ्यावर आरोप करताना गंमत वाटते. जसे हे दीडशहाणे माझ्या पोस्टवर नियमितपणे फुदकत असतात तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, तसे या महाशयांचेही.

अमितव,
"३. रास्वसंघ हत्या करतो हे धाडसी विधान केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर निषेध पण इतर सर्व पातळ्यांवर समर्थन केल्या बद्दल आणखी अभिनंदन.
४. दुधातल्या फॅटच्या प्रमाणावर साय येईल का नाही/ किती येईल ते ठरते, जास्त फॅट म्हणजे चांगला दर्जा नाही. ग्रो अप." यावरूनच तुमची समज समजली. दुधातल्या फॅटबद्दलची तुमची अक्कल तुमच्याजवळच ठेवा. यापूर्वीही काय लिहिलेले असते, त्यावरून तुम्ही काय समजून काय कमेंट करता यावरून तुमच्या कमेंटच्या लायकीबद्दलही सांगितलेले आहे पुन्हा सांगत बसत नाही. आणि हो, तुमची धमकी फारच मजेशीर आहे. अशा भुक्कड कमेंट करणा-या भुक्कड लोकांच्या भुक्कड धमक्यांची मी पर्वा करत नाही यापूर्वीही काहींनी तुमच्यापेक्षाही गंभीर धमक्या दिल्या आहेत. तेव्हा तुम्ही निघा.

तिथे गारूडी नावाचा सदस्य एका ओळौच्या कमे़ट वेड्यांच्या इस्पिथळात बसूनच करत आहे. ज्यांच्या कमेंटचा मी उल्लेख वा प्रतिवादही करत नाही ते दीडशहाणे मायबोलीकरही त्यांना तेथे सोबत करत आहेत असे दिसते.
<<

21.gif

राकु एकदम फुल फॉर्ममध्ये हं!
मला तर राकु असे बोलायला लागले की मशीनगनमधून बेछूट फैरी झाडणारे अतिरेकीच डोळ्यासमोर येतायत.

'राकु गोळ्या मारत चाललेत आणि सगळी माबो धारातिर्थी!
आणि हे मागचे जी जी रं जी वाले राकुंच्या पाठी लपून मज्जा बघतायत.'

असे चित्र दिसते.

राकु, मी कुणाला जी जी रं जी म्हणत्येय?

काय हे, अहो मी स्वयंभू आहे.
माझ्या मागे जी जी गं जी वाल्यांची फौज आहे.
तुम्हाला माहित नाही का?
Wink

'राकु गोळ्या मारत चाललेत आणि सगळी माबो धारातिर्थी!
<<
अगदि सहमत! पण
इथे "सगळी माबो" ऐवजी सगळी 'अड्डा गॅंग' असे हवे.

राहुर गांधिंनि भाजपच्या गोटात खळबळ माजवलिय एवढे मात्र खरे.काँग्रेस संपलिय, राहुल गांधिंना राजकारणातले राजकारणातले काही कळत नाही असा प्रचार एकिकडे चालतो तर दुसरीकडे राहुल गांधिंच्या प्रत्येक वक्तव्यावर, क्रुतिवर मिडियात डिबेट चालतात, सोशल साइटवर गदारोळ माजतो हे मनोरंजक आहे.विरोधकांकडुन त्यांची कुठलीही क्रुति ही दुर्लक्षणिय ठरत नाही
. ह्याचा अर्थ राहुल गांधि योग्य मार्गावर आहेत विरोधकांचा बिपी वाढवण्यात यशस्वी ठरत आहेत.

थोडे आणिबाणीबाबत... माझ्या द्रूष्टिने आणिबाणी अयोग्य होती.आणिबाणिबाबत भिन्न मतमतांतरे आहेत. एका आदरणिय व्यक्तिमत्वाने तर आणिबाणिला अनुशासनपर्व म्हटले होते.इंदिराजींनी आणिबाणिसाठी घटनेचा आधार घेतला होता. काहीही असो त्यांनी समोरासमोर आणिबाणी लावली होती.पण अघोषित आणिबाणिचे काय...

Pages