राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

स्पार्टाकस भले! मग केवळ प्रतिसाद दिला नाही म्हणून एखाद्या विषयाचे जाणकार नाही असा होणारा आरोप तर कायमस्वरूपी बंद होईल!!

स्पार्टाकस, असं ़केलं तर अगणित हिट मिळून जाहिरातींमुळे ़जे उत्पन्न मिळते त्याचं काय?
सांगायला म्ह्णून उपाय चांगला आहे. मलाही ऐकायला आवड्ला विशेषतः त्याच त्याच आयड्यांचे रूटिन रडगाणे सगळ्याच धाग्यांवर ऐकल्यावर.
पण हा उपाय एखाद्या संस्थळाने लावून पहावा - नक्की तोट्यात जाणार याची हमी.
अहो , नुस्तं प्रत्येक प्रतिसादाचे प्रसिद्धीपूर्व मॉडरेशन करायला घेतलं म्हणून एक संस्थळ पूर्ण बसलं.

स्वयंनियंत्रण हा एक अवघड उपाय आहे. मतभिन्नता राखूनही चर्चा करता येते. पण भावनातिरेकात ते भान रहात नाही.

निर्णय स्तुत्य आहे....

तुमचे काम अत्यन्त गुन्तागुन्तीचे, क्लिष्ट आहे याची जाण आहे. कुठल्याही कारवाईमुळे (घागे वाहते, प्रतिसाद सम्पादित) सुक्यासोबत ओलेही जळणार नाही याची खबरदारी आपण घ्याल याबद्दल विष्वास आहे.

"प्रतिसाद अ‍ॅडमीन सम्पादित" किव्वा "सम्पुर्ण प्रतिसाद अ‍ॅडमीन यान्नी पुसला आहे" अशी टिप टाकल्यास प्रतिसाद लिहीणार्‍यान्ना/ वाचणार्‍यान्ना जाणिव होईल... शहाण्याला शब्दाचा मार पुरे. प्रतिसाद कर्त्याची कातडी जाड असेल तर जाणि होणे अवघड आहे आणि असे सम्पादन ५ वेळा झाल्यास त्या सभासदाचे सदस्यत्व रद्द करावे (आणि त्या IP कडुन येणारे प्रतिसादावर नियमन ठेवावे).

काही लोक मुद्दाम काही ठराविक इराद्याने काही धागे निर्माण करतात, यामागचा उद्देश असतो उचकविणे, डिवचणे, चर्चा घडवून आणणे आणि मग त्या धाग्याच्या विरोधात जे लोक मत मांडतील ते कसे चुकीचे आहेत आणि आपणच कसे सुधारक विचारांचे आहोत हे दाखविणे असा असतो. लिहिताना अगदी साळसूदपणे लिहित असतात.
मग यातुनच एकमेकांवर वैयक्तिक हल्ले चालू होतात. एका आयडीला धागे किती काढता येतील त्याला काही एक मर्यादा असावी, तसेच धागा प्रकाशित व्हायच्या आधी सेन्सॉर करता आला तर उत्तमच.

कोणत्याही चर्चेत आपल्यापेक्षा विरोधी मते आली की लोकांना काय होते देव जाणे, आणि मग ते सहन न होऊन विखारी हल्ले केले जातात प्रतिसादांमधुन. मी / आम्ही जे विचार लिहितो तेच बरोबर व ते सर्वांनी मानलेच पाहिजेत नाही तर टोचून टोचून बोलायचे आणि वैयक्तिक पातळीवर उतरायचे ही प्रवृत्तीच वाईट आहे.

खरेतर हे मुक्तपीठ असल्याने कोणी कोणाला लिहिण्यापासुन रोखू शकत नाही, पण
१. तुमचा या विषयात काही अभ्यास नसल्याने बोलू नका
२. सेन्सिबल प्रतिसादांच्या अपेक्षेत
हे असे काही लिहिणे म्हणजे समोरच्याला कमी लेखून रोखणे आहे. Sad

मी जे लिहिले आहे ते केवळ राजकीयच नाही तर अन्य प्रकारच्या धाग्यांना देखील लागू आहे. उदा. सामाजिक विषय, गझल, पा.कृ., इ. सगळे नाही तर निदान अंशतः

तोडणे सोपे, जोडणे अवघड !!! सारे वादविवाद, भेदाभेद सोडून देऊन एक चांगला संवादगट म्हणुन पुढे येऊ या !

roses.jpg

>>स्वयंनियंत्रण हा एक अवघड उपाय आहे. मतभिन्नता राखूनही चर्चा करता येते. पण भावनातिरेकात ते भान रहात नाही. +१०१ आणि सहमत ! Happy

मायबोली प्रशासकांचे मन:पूर्वक आभार. व्यक्तिगत हेवेदावे आणि आरोप हे शिसारी आणण्याइतके हीन पातळीवर उतरून केले जातात, त्यावर अंकुश लावणं अत्यावश्यक आहे.

लोकसभा निवडणुकीअगोदर जे गदारोळ करत होते त्यांना मतदारांनी टुंऽऽऽई करून जसे बाद केले तसे वाचकही इकडे उटपटांग ओनामांचे (ओळखीचे नाम ,ओनाम ,आइडी) प्रतिसाद दुर्लक्षित करतील तर त्यांचाही उच्छाद कमी होईल .संपामंडळ त्यांचे काम करत आहेच .अमुक एकाकडून प्रतिसाद आला की पिँग वाजणारा सूचक वाजंत्री वाजणारा (नोटिफिकेशन) संगणकीय प्रोग्राम बनवला की संपामंचे काम सोपे होईल .अवास्तव चर्चा ,भरकटणारे धागे ,मीच शहाणा इत्यादी लेखन करायला मिळते म्हणूनतर काही भुंगे वाटिकेत भ्रमण करतात .चांगल्या लेखनाची कमळे फुलली की त्यात ते भुंगे गुंग होतील .

टुंऽऽऽई >>>>>:हाहा:

ओनामांचे >>>> ओनाम कशाला ओनापा म्हणा.:फिदी: ओनापा म्हणजे ओळखीचे ना पाळखीचे.

मी परदेशात जाणार म्हटल्यावर अनेक लोकांनी , परदेशात गेलेल्या आणि बहुतांश करुन , परदेशात न गेलेल्या लोकांनी मी परदेशात कसे वागावे ? याबाबत मार्गदर्शन केले.

पुलं.

हे वाक्य मला का आठवलं ?

आम्हाला काय माहीत्?:दिवा:

असो, वै. शेरेबाजीत काही जण खूप खालच्या पातळीवर कायम उतरतात. जो सदस्य कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसतो, त्याला कायम टिन्गल टवाळीचा विषय बनवला जातो. जसे काही जगात आणी मायबोलीवर दुसरे विषयच नाहीत. त्या सदस्याने एखादी घटना लिहीली की त्या घटनेला फिदीची स्माईली देऊन चर्चेचा विषय बनवला जातो.

आता हे काही थाम्बणार नाही हे त्रिकालाबाधीत सत्य आहे, हे निश्चीत.

व्यक्तिगत हेवेदावे आणि आरोप हे शिसारी आणण्याइतके हीन पातळीवर उतरून केले जातात>>> याचा स्वानुभव जबरदस्त आहे. इतरांचा तर त्याहून जबरी आहे.

काही दिवसांपूर्वी माझ्यावर एका महाभागांनी मी मनोरुग्ण असल्याचा बेलगाम आणि हीन आरोप केला होता.
काही मिनिटांनी ती पोस्ट एडीट होऊन तो आरोप दिसेनासा झाला! प्रशासकांनी ती पोस्ट एडीट केली का प्रकरण आपल्यावर शेकू शकेल याची कल्पना आल्यावर त्या महाभागानीच सफाईदारपणे आपण किती सभ्य आहोत हे दाखविण्यासाठी पोस्ट बदलली हे माहित नाही.
भ्याडपणे असले धंदे करण्यासाठीच डुप्लिकेट आयडींचा वापर होतो जो थांबवणे फार गरजेचे आहे.

आँ ! आमचा गुढगा मनोरुग्ण आहे. त्याला धनगरी औषध लावा, असेही काही लोक सतत कोकलतात.

पण आमी कधी तक्रार केली नाही.

आणि तुम्ही कुणीतरी एकदा मनोरुग्ण बोल्लं तर किती त्रागा कर्ताय पटवर्धन बै !

तोडणे सोपे, जोडणे अवघड !!! सारे वादविवाद, भेदाभेद सोडून देऊन एक चांगला संवादगट म्हणुन पुढे येऊ या !
सहमत

ही सावित्रीबाई फुले धाग्यावरची (वाहता असला तरी) नवीन पोस्ट. अ‍ॅडमिन - कृपया लक्ष द्या. आता मात्र खरंच वीट आलाय. आणि अर्थातच लगो असल्या पोस्टी टाकण्यात एकटे नाहीत. बाकीचे अजून शांत आहेत थोडेसे दोन दिवस कीम्वा आणखी ड्युआयडी काढून इथे येतीलच

लक्ष्मी गोडबोले | 12 August, 2014 - 17:00
न्या रानडेंचे नाव द्या असे कुणीतरी बोल्ले होते इथे.

न्या रानडे म्हणजे विधवा विवाहावर भाषणे ठोकणारे आणि स्वतःची बायको मेल्यावर दुसरा विवाह विधवेशी न करता पुन्हा कुमारी मुलगी पहाणारे , तेच ना ?

तोडणे सोपे, जोडणे अवघड !!! सारे वादविवाद, भेदाभेद सोडून देऊन एक चांगला संवादगट म्हणुन पुढे येऊ या !>>> पण अचकट विचकट भाषा वापरून प्रतिसाद येतात ते बंद झाले तरच हे शक्य आहे.

सावित्रीबाइंऐवजी न्या रानडेंचे नाव का नाही दिले, असे कुणीतरी बोलले होते. माझी कमेंट त्या संदर्भात आहे.

भ्याडपणे असले धंदे करण्यासाठीच डुप्लिकेट आयडींचा वापर होतो जो थांबवणे फार गरजेचे आहे.
<<
हे मुक्ताफळांवर हलवणे गरजेचे आहे.

योग्य निर्णय अ‍ॅडमिन.
बर्‍याचदा अशा चर्चांमधले संतुलित आणि खरोखर वाचण्यायोग्य प्रतिसाद अशा अनावश्यक प्रतिसादांमुळे वाचले जात नाहीत किंवा शोधायला वेळ लागतो.

>>भ्याडपणे असले धंदे करण्यासाठीच डुप्लिकेट आयडींचा वापर होतो जो थांबवणे फार गरजेचे आहे. <<

किंवा डु आय्डी आहे म्हणुन भ्याडपणे हल्ला करायला चेव येतो, असं म्हणता येईल.

प्रशासनाने या बाबतीत "बँड एड" अ‍ॅप्रोच घेण्याऐवजी मुळावरच घाला घालावा. ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी... Happy

एक्झॅक्टली @ राज.

प्लस, निकनेम (टोपणनांव) वि. डुप्लिकेट आयडी यातला फरक लोकांच्या लक्षात यायला हवाच.

मुद्दाम शिवीगाळ करण्यासाठी वा उचकवण्यासाठी कुणी डुप्लिकेट आयड्या काढून ठेवल्या असतील, तर इतर लोकांना त्याला उत्तर देण्यासाठी तसलेच धंदे करण्याचा मोह होतो.

आयडी काढल्यापासून एकाही धाग्यावर न फिरकलेल्या अनेक स्लीपर आयडीज माबोवर आहेत, अँड आय अ‍ॅम शुअर, की त्या आयडींचे पासवर्ड्स असलेल्या एक्सेल फाईल्सही अनेक खुस्पटकाढू खंद्या वीरांजवळ आहेत. उदा. शेंडी

या सगळ्या बाबी मा. अ‍ॅडमिन व त्यांचे सहयोगी यांना माहीती नसतील असे नाही. त्यांच्यापाशी चांगला १८ वर्षांचा अनुभव आहे मायबोली चालविण्याचा. तेव्हा इथे येऊन मानभावीपणे कॉमेंट्स टाकणारे कोण, अन अ‍ॅडमिन यांनी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करणारे कोण, हा नीरक्षीरविवेक त्यांचेपाशी आहेच.

तेव्हा इथे तिरकस मानभावी कॉमेंट्स टाकून, त्यांनी दिलेल्या वॉर्निंगच्या धाग्याचे रूपांतर करमणुकीच्या धाग्यात किंवा आखाड्यात करू नये ही सर्वांनाच विनंती.

तेव्हा इथे तिरकस मानभावी कॉमेंट्स टाकून, त्यांनी दिलेल्या वॉर्निंगच्या धाग्याचे रूपांतर करमणुकीच्या धाग्यात किंवा आखाड्यात करू नये ही सर्वांनाच विनंती. >>>

इब्लीस यांना अनुमोदना. अचूक अगदी

वरदा, त्या पोस्टचा टोन भडकाऊ आहे व तेथील विषयाशी संबंध नसलेला आहे हे मान्य. पण कोणत्याही सार्वजनिक व्यक्तींबाबत असे लिहीणे जर रोखले जाऊ लागले तर कोणतीच सिरीयस चर्चाही होऊ शकणार नाही. त्यामुळे अशा पोस्ट्स बाबत काय धोरण असावे हे ठरवणे कोणत्याही प्रशासनाला अवघड जाईल बहुधा. समाजात मोठी असणारी व्यक्तिमत्त्वे सुद्धा खाजगी/सार्वजनिक आयुष्यात चुका केलेली असू शकतात. त्यांच्या चांगल्या गोष्टींबरोबरच चुकांचीही चर्चा होणे यात मला काही गैर वाटत नाही (ऐतिहासिक व्यक्तींबद्दलच्या वस्तुनिष्ठ चर्चेबाबत तुझे मत एक दोन ठिकाणी वाचले आहे, त्यामुळेच हे विचारतोय. कारण अशी मते रोखली जाऊ लागली तर तशी वस्तुनिष्ठ चर्चाही होऊ शकणार नाही).

तुझा विरोध येथे भडकाऊ टोन ला आहे काय?

<विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास>

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या धाग्याचे उद्देश धाग्याकर्त्याच्या मते तरी त्या नामविस्ताराच्या निमितत्ताने सावित्रीबाईंचे स्मरण करणे , कृतज्ञता व्यक्त करणे, महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करणे हे होते असे दिसते. मग" हे नाव दिल्याने विद्यापीठाचा दर्जा सुधारणार का?"; " बाकीची ही काही नावे आठवली नसतीलच" असे प्रतिसाद विषयाशी संबंधित नसलेले, अर्थात अवांतर ठरतात की विषयाला धरूनच आहेत असा प्रश्न मला पडला आहे.

फा, माझा विरोध भडकाऊ टोनलाच आहे. न्या रानडे यांचं चरित्र सगळ्यांना माहित आहे, त्यावर सीरियस चर्चा होणार असेल तर कुणाचाच आक्षेप नसावा. पण तिथे ती पोस्ट केवळ डिवचण्यासाठी टाकली आहे हे स्पष्ट आहे. त्या आयडीच्या इतरही पोस्ट्स इतके दिवस वाचून तेवढं लक्षात येण्यासारखं आहे.

तुम्हाला सीरियस चर्चा करायची आहे, तर वेगळ्या पद्धतीने, वेगळा धागा काढून करता येतेच. पण इथे ठराविक आय्डीज सतत मुद्दाम गदारोळ करत, करवत असतात आणि मुद्दाम जिथे शक्य आहे तिथे वादावादी सुरू करत असतात आणि आपसातच ४०-५० पोस्ट्स टाकून त्या धाग्याचा बट्ट्याबोळ करतात. त्याचा अतीव वैताग येऊन माझी ही प्रतिक्रिया आहे. सावित्रीबाई फुलेंच्या धाग्यावर रानड्यांच्या खाजगी आयुष्याचा काय संबंध?

>>>कोणत्याही सार्वजनिक व्यक्तींबाबत असे लिहीणे जर रोखले जाऊ लागले तर कोणतीच सिरीयस चर्चाही होऊ शकणार नाही<<< +१

>>>वरदा, त्या पोस्टचा टोन भडकाऊ आहे व तेथील विषयाशी संबंध नसलेला आहे हे मान्य<<<

भडकाऊ आहे ह्याच्याशी सहमत, विषयाशी संबंध नसलेला आहे ह्याच्याशी असहमत! लगो ह्यांनी अत्यंत सुसंबद्ध मुद्दा अत्यंत भडकाऊ पद्धतीने नोंदवलेला आहे इतकेच. बाकी लगो ह्यांनी जी लिंक दिलेली आहे त्या लिंकपैकी त्यांनी 'कदाचित' त्यांना हवा तोच मुद्दा अधोरिखीत केल्याप्रमाणे नोंदवला हे एकांगी म्हणावे लागेल.

>>>अशा पोस्ट्स बाबत काय धोरण असावे हे ठरवणे कोणत्याही प्रशासनाला अवघड जाईल बहुधा<<<

ह्याबद्दल कालच लिहिणार होतो, आवरले. संसदेत आणि विधानसभेतही मुद्याला धरून चर्चा होत नाही. किंबहुना चर्चाच होत नाही. नुसताच 'अभूतपूर्व' (अ‍ॅज दे से, एव्हरीटाईम) गोंधळ होतो. मात्र तेथे कोणत्याही खासदाराचे / आमदाराचे सदस्यत्व गोठवणे, स्थगित करणे असे होत नाही. बहुधा ह्याचे कारण हे आहे की त्या त्या नेत्यांसाठी मतदान झालेले असणे हे कारण असते. येथील प्रतिसाददाते हे 'आम आदमी' असतात आणि त्यांना लोकशाहीव्यतिरिक्त काहीही पाठिंबा नसतो. खरे तर तो स्थळालाही नसतो. अश्या परिस्थितीत वादग्रस्त ठरले जायला नको म्हणून स्थळे असा निर्णय घेणे ह्यात गैर नाही. पण 'स्टेप अहेड' जाणे म्हणजे हेच ठरेल जेव्हा एखादे स्थळ म्हणेल की माझ्याकडे सुमारे दहा हजार मतप्रदर्शक आहेत आणि ते एकमेकांची आणि एकमेकांच्या पक्षांची पूर्ण खिल्ली उडवतात, आम्ही त्यांना तसे करू देतो कारण लोकशाही आहे आणि एवढे करून ह्या स्थळापलीकडे ते निव्वळ एक नागरीक म्हणूनच वावरतात अशी माहिती आमच्याकडे आहे. ह्यापलीकडे माहिती आमच्याकडे नाही. आंतरजालीय लोकशाही ही संज्ञा आता फार लांब राहिलेली नसावी.

'संकेतस्थळ कोणीही रिफर केल्यास अतिशय वाचनीय वाटावे ह्या उद्देशाने केलेला हा नियम स्तुत्य आहे व ह्यात कोणतीही गळचेपीही नाही. व्यक्त व्हायला पूर्ण वाव आहे पण पातळी सोडायला मज्जाव आहे हे नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र भारतीय नागरीक राजकारणाबाबत पॅशनेट असतो व त्यामुळे धडाकेबाजपणे लोकशाहीचा फायदा व्यक्त होण्यासाठी घेतो ह्याची दखल न घेतली गेल्यामुळे संकेतस्थळ धाडसी व दखलपात्र बनवण्याची एक चांगली संधी ह्या नियमाद्वारे हातातून जात आहे असे वाटते'.

हेच लोक येथे हे नाही बोलले तर इतर कोणत्यातरी सार्वजनिक व्यासपीठावर कधीतरी बोलणारच!

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

Pages