राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

तुम्हीही इथे काहीही बरळलात तरी मलाही फरक पडत नाही आणि कुणाला फरक पडतो किंवा नाही हे तुम्ही सांगण्याने तर अजिबातच फर्क पडत नाही. तुम्ही म्हणजे थोर विचारवंत असल्याचा गैरसमज मी करून घेतला आहे असा तुमचा भ्रम असेल तर त्यानेही मला फरक पडत नाही.

अ‍ॅडमीन टीम च्या धाग्याचा सार म्हणजे शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा.
मला वाटत हे शब्द न वापरण हे देखील एक शस्त्र आहे. अनुल्लेखाने मारणे.
आपल्या समाजात वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या संस्कारात वाढलेले वेगवेगळ्या विचारश्रेणीचे लोक राहतात. त्यामुळे समूह जीवन जगताना मतभिन्नता येणे स्वाभाविक आहे.तरी पण आपण सगळे भारतीय राज्यघटनेने बांधलेले आहोत.प्रत्येक वेळी कायदेशीर बडग्याचाच आधार घेतला पाहिजे असे नाही तर सामंजस्य, सुसंवाद व शिस्त या मार्गाने अनेक प्रश्न सुटु शकतात यावर माझा विश्वास आहे.मतभिन्नते कडे सांस्कृतिक विविधता या दृष्टीने पाहिल्यास आपण अधिक संपन्न होउ. सर्वांचे सर्व विषयावर एकमत होणे शक्य नाही. झाले तर सगळे एका छापाचे गणपती होतील ना? मग काय मजा राहिल?
सभासदत्वचा राजीनामा देण्यापेक्षा आपल्यातल्या असंवेदनशीलतेला हद्दपार करण्याचा प्रयत्न करा. मर्यादित यश आल तरी बरच काही साध्य होईल.
सर्वांना शुभेच्छा! Happy

प्रघा

ज्या आवेगाने इथे मतं व्यक्त होत आहेत त्यापासून दूर रहावं यासाठी विनंती केली आहे. असली मतं गेली खड्ड्यात हाच हेतू त्यामागे आहे. माझ्या सदस्यत्वाबाबत मी केलेल्या मागणीचा रॉहू या सदस्याला त्रास होणे हे मनोरंजक आहे.

तुमचं म्हणणं योग्यच आहे. पण.... स्टॉप.

ती विचारवंताची शेखी तुम्हीच मिरवा. तुम्हाला तरी इथे कोण किंमत देतंय तुम्ही कितीही स्वतःला शहाणे समजले तरी. तुमचा मानभावी पणा चीड आणणाराच आहे. स्वतः होऊन गप्प रहता येत असताना आय डी गोठवण्याचे हौतात्म्य कशासाठी ? जणू फार मोठ्ठा त्याग !

आणखी काही आज्ञा ? Proud
तुमच्यासाठी मार्क ट्वेनची कहाणी लिहीलेय. सापडली तर वाचा. फायदाच होईल तुमचा. तुमच्या बरळण्याला किंमत दिलीये असं वाटतंय का हो तुम्हाला ! Biggrin

मला खरंच तुमच्या बरळण्याने काही वाटत नाही. तुमची शप्पथ !

लवकर बरे व्हा !

रॉहू तुम्हाला उपरोधात बोलले आहेत हो हेमाशेपो.

जर झ क्कीला जायएच होते तर ते गुपचुप जाउ शकले असते. पण मग साधूच्या सोंगाची लबाडी करता आली नसती !

झक्कीचे ते मी राजीनामा देतो वगैरे शोलेच्या धर्मेंद्रसारखे होते. पण त्यांच्या पापाने टाकी भरली असल्याने ते टाकीवर चढले खरे , पण ते उतरण्याच्या आतच टाकी कोसळली !

टाकी झक्कीनीच भरली , त्यावर चढलेही तेच आणि पडलेही तेच !

विनाकारण सातीमौसीला किंवा मोगूमौसीला का दोष द्यायचा ?

Proud

हेमाशेपो काहीही उपरोधात बोललेले नाहीत. ते कोण आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. पूर्ण मायबोली ला दोन्ही गटांच्या सात आठ आय डीनी वेठीस धरले आहे आणि तिची वाट लावली आहे. प्रसंगवशात माणूस प्रोवोक होऊ शकतो पण एक सूत्र म्हणून याला झोडतोच , त्याला वाजवतोच ही भूमिका २४*७ घेणार असाल तर वातावरण प्रदूषित होणारच , झालेच आहे आणि त्याचे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. जे आय डी कारवाई म्हनून उडाले ते त्यांच्या अतिरेकी वागण्याने गेले आहेत त्यांच्या बद्दल सहानुभूती असण्याचे कारणच नाही . त्यांचे दाखले देण्याची गरज नाही. झक्कींचा आयडी अशा कारवईचा भाग आहे काय ?

पूर्ण मायबोली ला दोन्ही गटांच्या सात आठ आय डीनी वेठीस धरले आहे आणि तिची वाट लावली आहे. प्रसंगवशात माणूस प्रोवोक होऊ शकतो पण एक सूत्र म्हणून याला झोडतोच , त्याला वाजवतोच ही भूमिका २४*७ घेणार असाल तर वातावरण प्रदूषित होणारच , झालेच आहे आणि त्याचे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. जे आय डी कारवाई म्हनून उडाले ते त्यांच्या अतिरेकी वागण्याने गेले आहेत त्यांच्या बद्दल सहानुभूती असण्याचे कारणच नाही .>> पूर्ण सहमत.

खरंच या सर्वच लोकांचा कंटाळा आलाय..... यांना दुसरी कामे नाहीत का? या सर्वच आयडींनी मायबोली सोडून गेल्यास जरा बरे वाटेल.

राहू तुम्ही हेमाशेपोना उपरोधाने बोललात असे मला म्हणायचे होते. माझा गर्समज झाला. माफी असावी

नंदिनी , आता तुला असा माबो सोडून जाण्याचा सल्ला देन्याचा हक्क पोचतो का , ही तुझी प्रॉपर्टी आहे का असा प्रश्न विचारण्यात येईल.

नाही नाही मी अजिबातच उपरोधाने बोललेलो नाही हेमाशेपो ची भूमिका करणार्‍याला. अगदी ओरिजिनल म्हनणे आहे. त्याचा उपरोध म्हणून अजिबात विपर्यास होऊ नये.

हूडा, तुझ्या वरील पोस्टशी सहमत.
टोळधाडीप्रमाणे या साताठ आयडी झुन्डीने "असहिष्णूततेचा" एकतर्फी कालवा करीत येथिल वातावरण अतिशय कलुषित करीत आहेत, व रक्तबीज राक्षसाप्रमाणे एकदा "उडवल्या" तरी परत परत लोचटासारखे इथेच नविन आयडीने येत आहेत.

टाकी झक्कीनीच भरली , त्यावर चढलेही तेच आणि पडलेही तेच !

तत्वज्ञानी लिंब्या ,

तुला या ओळीतील हिंदू कर्मविपाक आकळला का ?

Proud

मोंगा
रॉबीनहूड यांना मी उपरोधाने काहीही म्हटलेले नाही. ते मेले तर जग थांबेल असा जो आव आणला आहे त्यासाठी त्यंना सुनावले. प्रशासकांकडे मी केलेली विनंती हा माझा आणि त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात त्यांना पडायचे काहीही कारण नाही. रॉबीनहूड म्हणजे समीर सरवटे आहे की अजय गल्लेवाले ? असतील तर त्यांनी ख-या नावाने यावं. नसतील तर त्यांच्या मतांना कसलीही किंमत नाही.

तुम्ही मला सुनावणारे कोण ? एक भुक्कड डु आयच ना? कोण किंमत देतो हो तुम्हाला? जग थांबण्याचा आव आणण्याचा प्रश्नच नाही. असा आव कुठे आणला आहे ? मी कोणत्या नावाने यायचे हा माझा प्रश्न आहे. तुमच्या थर्ड क्लास मतांना कोण किंमत देतंय ?

ओ छपरी बास झालं आता ! अक्कल नाही काडीची आणि उपदेश करायला चालले !
तुम्ही प्रशासक आहात तर बोला नाहीतर मधे मधे कडमडायची काही एक गरज नाही. बिनडोक मनुष्य कुठला

एव्हढा संताप येतोय तर दहशतवादावर भाषणं ठोकायची गरज काय ?
आनि आटा बास करा.
तुमच्यासारखे छप्पन्न लोक झाडू मारत असतात माझ्या लेखी. उद्या तुमच्या घरात येऊन घरातल्यांबद्दल कुणी उर्मट शेरेबाजी केली तर त्यांना झक्की समजून सोडून द्या आणि मग या सल्ले द्यायला.
या आता !

तुम्ही मेलात तर खरंच जग थांबणार नाही.

झक्की समजून सोडून द्या. उत्तर दिलेत तर आपलेच शब्द आपल्याच घशात गेले असे समजा.

झक्की , तुम्हि भारत , भारतीया बद्द्ल जे लिह्ता ते फक्त आणि फक्त वडिलकीच्या नाताने. हे माझ्या साररख्या inactive लोकानापण कळत. तुम्हि आमचे हितच्नितक आहात. तुमच्या उपरोधक सल्ला चि खुप गरज आहे भारतीयाना.

झक्कींना कृपया सन्मानाने परत बोलवावे अशी मनापासून विनंती करत आहे. हा लहान तोंडी मोठा घास वाटल्यास माफ करावेत.

झक्कींना स्वतःचा आय डी गोठवण्याची विनंती करण्यास प्रवृत्त करणार्‍यांचा स्पष्ट निषेध! त्यांना झक्की आणि त्यांच्या प्रतिसादांमधील खरी गंमत कधी समजलीच नाही असे खेदपूर्वक म्हणू इच्छितो.

मामी, सायोनारा, श्री नंदन व बघीरा ह्यांच्याशी सहमत!

>>>> अरेरे, फारच वाईट अवस्था आहे इथे. <<<<<
नाही हो..... तस नैये ते....
एरवीच्या आयुष्यात उघडपणे "फारच व्हाईट्ट कॉलर्ड पेठी" जगायला लागते कम्पलसरी... Proud त्यामुळे येणारा उद्वेग/संताप/चीड/असुया/द्वेष वगैरे बाबी बाहेर ओकायच्या तर कुठे? इकडे.... ड्युप्लिकेट आयडी घ्यायची अन वाट्टेल त्याला वाट्टेल ते बरळायचे... व्हाईट्ट कॉलर्ड पेठी शिस्तीच्या जगण्यामुळे आलेली चीड/ उद्वेग/संताप/असुया/द्वेष वगैरे सगळ्याचा निचरा इथे करायचा.... उघड आयुष्यात असे केले तर....... तिथे शक्य नाही, म्हणुन इथे नेटविश्वात करायचे...
अहो या वृत्ती आजच्याच आहेत असे नाही. आम्ही १९९७-९८ पासुन बघतो आहोत. याहु मेसेंजरवरील रुम्स काय की ऑर्कुट/एमेसेन काय, सर्व ठिकाणी अशांची उपस्थिती होतीच....

तुम्ही मेलात तरी थांबणार नाहीच आहे. मी असा दावा कुठेच केलेला नाही. आम्ही बास कशासाठी करायचे ? हे तुम्ही सांगणारे कोण आणि तुमचे तुणतुणे चालू द्यायचे काय?

तुम्ही मोठे अकलेचे खंदक आहात हे तर दिस्तेच आहे.
तुम्हीच निघा आता....

झक्कींना कृपया सन्मानाने परत बोलवावे अशी मनापासून विनंती करत आहे.<<<<
बेफिंशी सहमत.
वास्तविक इथे काहीही लिहीण्याची इच्छा नाही आणि योग्यताही नाही माझी. पण फक्त झक्की इथे असावेत असे मनापासून वाटले म्हणून लिहिले.

बाकी सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.
संक्रांतही दोन महिन्यांवरच आलीय. तेंव्हा संक्रांतीच्या शुभेच्छाही सर्वांना आगाऊच देतो. ('आगाऊ' या आयडीचा काही संबंध नाही इथे.. हल्ली फार जपून रहावं लागतं. :फिदी:)
तिळगुळ घ्या आणि गोड गोड (विचारपुर्वक आणि मुद्देसूद) बोला.. Happy

लिंबूभाऊ,
एक्झॅक्टली.
मी, तुम्ही व ते, सगळेच हे असेच करीत असतो.
फक्त, ते करताना आपण काय व किती बोलत आहोत, याचे भान ठेवलेले बरे असते. अन्यथा राजीनामा मंजूर होतो.

रच्याकने,
डूआयडीची डेफिनिशन :
एक आयडी जिवंत व अ‍ॅक्टिव्ह असताना, फक्त दुसर्‍या कोणत्या उद्देशाने त्याच संस्थळावर काढलेला व कार्यरत असलेला दुसरा आयडी.

"फक्त गझलांवर मत नोंदविणे", स्पेसिफिक कंपूलाच अगदी शुद्धलेखनावरूनही "चिमटे काढणे", वार्तांकन करणे, किंवा संयोजनात भाग घेण्यासाठी आधीचे टोपणनांव सोडून नवे मूळ नांव घेणे, असे सकारात्मक डुआयडी असतात, त्यांना अ‍ॅप्रिशिएटही केले जातेच.

फक्त शिवीगाळ करता यावी म्हणून काढलेले आयडी = खरे डूआयडी.

एक आयडी बॅन होऊन मग दुसरे नवे सदस्यत्व घेतले, व ते नीट चालविले, तर माझ्या मते ते डुआय होत नाही.

तात्पर्य, मी डुआयडि नाही Wink

ओक्के , तुम्हाला या आय डी ला जेन्युईन आय डी म्हणून मी मान्यता देत आहे. म्हणजे एखाद्या राष्ट्राला जशी एकेक देश मान्यता देतात तसे. एखाद्याने नाही दिली तरी काही बिघडत नाही: Proud

हुडोबा,
एकावेळी दोन तोंडांनी आजवर बोललो नाही, अन बोलणारही नाही.
तरी, धन्यवाद! थँक्यू हॉन ओके प्लीज.

Pages