राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

>>>> एकावेळी दोन तोंडांनी आजवर बोललो नाही, अन बोलणारही नाही. <<<<
एकावेळी एका पीसीवरुन एकाच आयडीने (तोंडाने) मायबोलीवर लॉगिन होता येते, तर तुम्ही असा विशेष कसला कबुली जबाब का देताय? Proud काहीही हं...... Wink

एकावेळी एका पीसीवरुन एकाच आयडीने (तोंडाने) मायबोलीवर लॉगिन होता येते,

<<

हाय्ला! खरेच की क्वॉय?

>>>>> पीसीवर दोन वेगवेगळे ब्राऊजर वापरून ट्राय करा लिंबुकाका. <<<<<
अरे व्वा... एक्सपर्ट्स अ‍ॅडव्हाईस...म्हणजे खराच असणार.... Happy Proud हे माहित नव्हते.

मामी, इतर आणि बेफि यांच्याशी सहमत.
स्वत: २४*७ टाईम अड्ड्यावर ब्राम्हण जात आणि हिंदु धर्मावर असंस्कृत भाषेत गरळ ओकणार्‍या डुआयडींना आणि त्यांच्या मालकांना झक्की यांच्या कॉंमेटवर आक्षेप घेताना नवल वाटले. झक्की यांचे सर्व प्रतिसाद संसदिय भाषेला धरुन तरी असतात पण या असंस्कृत लोकांबद्दल तर बोलायलाच नको इतकी खालची पातळी गाठतात. झक्की यांचा आयडी उडवणे या असंस्कृत लोकांचा विजय समजावा का? याचा निर्णय प्रशासकांनी घ्यावा.

agadi agadi.
try karun paha.
ekat windows ie madhye 'limbutimbu' mhanun log in vha, ekat e.g. firefox madhye 'vakade' navane login vha.
donhine pratisad deta yeto ki nahi te paha.
Happy

झक्की यांचा आयडी उडवणे या असंस्कृत लोकांचा विजय समजावा का? >> झक्कींचा आयडी उडवला नाही गेला त्यांनी स्वतःच प्रशासकांना विनंती केली म्हणून तो डिसेबल झाला. प्रशासकांनी झक्कींच्या विनंतीला मान दिला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून, इथे असंस्कृत लोकांचा विजय झाला असे समजू नये.

बी, म्हणजे मंत्रीमंडलातून काढून टाकण्याआधी ते आपण्हून पक्षकार्यासाठी राजीनामा देतात तसे काय? Happy

मला असे वाटते की झक्की इथे परत येतील आणि डुआय कायमचे उडवले जातील. माझा हा विश्वास आहे. डुआय परत येतीलच पण झक्की जसे झक्की म्हणूनच येतील तसे ते येणार नाहीत. येऊ शकणार नाहीत.

@ 'बी' जी ह्या अड्डा गॅंगने जी एका वयोवृध्द माणसाबद्दल जी असंस्कृत भाषा वापरली ती पाहाता एकाद्या जेष्ठ मायबोलीकराला स्वत:हून मायबोली सोडावी वाटली तर त्यात नवल ते काय?

अधिक माहीतीसाठी प्रशासकांच्या विपूतील 'महेश' यांचा प्रतिसाद वाचा.

मामीच्या पान ७ वर लिहिलेल्या पोस्टीला अनुमोदन.

आणि अतिशय प्रॉम्प्ट अ‍ॅक्शनबद्दल अ‍ॅडमिन यांचे अभिनंदन!!!!!

बापरे, इकडे आग लागलीये की!
मामी आणि साधारण त्या प्रकारच्या पोस्टी टाकणार्‍यांना अनुमोदन.
रॉबिनहूड आणि हेमाशेपो. मधली बा चा बा ची वाचून डोकं गरगरलं. Proud हेमाशेपो हे डू आय आहेत हे माहितीच आहेत, पण आधी ते दीड मायबोलीकरांचे, की सातीचे, की मोगाचे (मोगा ह्या डुआयचे डुआय).... असा विचार करता करता शेवटी "तुम्ही निघा.. तुम्ही निघा" सुरु झाल्यावर ते रॉबिनहूडचे डुआय आहेत की काय असं वाटायला लागलं Proud Light 1

मो Lol पण मुली हेमाशेपो हा डुआय कुणाचा असू शकेल हे वर नाव घेऊन लिहिलं आहेस तसं लिहू नये. त्या ह्यांचा किंवा त्या त्यांचा असं लिहावं म्हणजे कुणी जाब विचारला की आपल्याला हात वर करून सुमडीत निघून जाता येतं Proud

मामीची पोस्ट ऑलमोस्ट सगळी पटली फक्त साती यू टू वाला भाग सोडून. ज्या भाषेत काल लिहून त्याचा अभिमान मिरवून झाला तशीच भाषा मी पूर्वीही वाचलेली आहे. सात्विक बुरखे फार काळ टिकत नाहीत. गळून पडतातच कधी ना कधी आणि खरं रूप दिसतंच.

ज्या भाषेत काल लिहून त्याचा अभिमान मिरवून झाला तशीच भाषा मी पूर्वीही वाचलेली आहे. सात्विक बुरखे फार काळ टिकत नाहीत. गळून पडतातच कधी ना कधी आणि खरं रूप दिसतंच.>>+१२३४५६७

झक्की यांचा आयडी उडाला याचे वाईट वाटले. उपरोधिक पण प्रामाणिक लिहिणाऱ्यापैकी ते एक होते. माबो प्रशासकांनी विचारांती योग्य तो निर्णय घेतला असणार त्यामुळे त्या निर्णयावर निषेध नोंदवणे वा आक्षेप घेणे योग्य ठरणार नाही.

झक्की तुमचा वध झाला की काय? अरेरे ! झक्कींचे सटायर आता वाचायला मिळणार नाही. जाउ द्या झक्की. अहो साक्षात महामानव अन अ‍ॅपलचा फाउंडर देखील अ‍ॅपल मधून बाहेर फेकला गेला.

रॉबिनहुडची प्रतिक्रिया बोलकी आहे. सारखे कुणालातरी प्रोव्होक करत राहायचे आणि मजा बघायची. झक्की देखील ह्याचाच बळी आहेत.

पूर्ण मायबोली ला दोन्ही गटांच्या सात आठ आय डीनी वेठीस धरले आहे आणि तिची वाट लावली आहे. प्रसंगवशात माणूस प्रोवोक होऊ शकतो पण एक सूत्र म्हणून याला झोडतोच , त्याला वाजवतोच ही भूमिका २४*७ घेणार असाल तर वातावरण प्रदूषित होणारच , झालेच आहे आणि त्याचे भयावह परिणाम दिसू लागले आहेत.
>>

अगदीच सहमत. रॉहू आणी माझी मतेही एकमेकांना पटतात असे नाही, पण तरीही एकमेकांबद्दलच्या मताबद्दल आदर आहे. तो तसा ह्या दोन्ही ग्रूप मध्ये कोणाला दिसत नाही. प्रत्येक गोष्टीला रागा असे अन मोदी तसे, संघ असा नी कॉंग्रेस तसे. असं सारखं कसं करू शकतात ही लोकं? ह्यांना २४ तास कधीही न पाहिलेल्या व्यक्तीला भांडायची वेळ कशी भेटते ह्या बद्दल कायमच आश्चर्य वाटत आलं आहे. ( माबो, मिसळपाव अन फेसबुकवर !! ) वॉव ! हॅट्स ऑफ टू देम ! कारण ही लोकं जे करत आहेत त्याने वातावरण निवळणार कधीच नाही. गढूळच होणार. जे इथे झाले आहे.

Mami + 1.

सेनापती +१

सारखे कुणालातरी प्रोव्होक करत राहायचे आणि मजा बघायची. झक्की देखील ह्याचाच बळी आहेत. >> हे काही पटले नाही केदार.. झक्कींना काहीही लिहण्यासाठी कोणिही प्रोव्होक केलेलं नव्हतं. त्यांच्या काही वाक्यांवर आक्षेप नोंदवला होता ज्यानंतर हे सगळं घडलं आहे.. जुन्या सदस्यांना झक्कींची लिहायची स्टाइल माहिती आहे शिवाय ते टाइमपास म्हणून घ्यायचं असतं हेही माहिती आहे पण सगळे तसाच विचार करतील असं नाही. 'दिसली बाइ की कर बलात्कार' असली वाक्यं वाचल्यावर ज्यांना झक्कींविषयी फारशी माहिती नाही त्यांना खटकणं साहजिक आहे. (मला आणि तुला ते कदाचित जास्त खटकणार नाही कारण झक्की ते उपरोधानं लिहित आहेत हे माहिती आहे)

अ‍ॅडमीननी झक्कींच्या विनंतीवरून आणि काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल याची मला खात्री आहे..

>>रॉबिनहुडची प्रतिक्रिया बोलकी आहे. सारखे कुणालातरी प्रोव्होक करत राहायचे आणि मजा बघायची. झक्की देखील ह्याचाच बळी आहेत.

+१ केदार आणि मामी.

मनीष तू जे वर लिहीले आहेस तेच दीड्मा, साती, भम, मोगा आणि सक्रीय .. यांच्याही पोस्टींना लागू होते.

"जुन्या सदस्यांना झक्कींची लिहायची स्टाइल माहिती आहे शिवाय ते टाइमपास म्हणून घ्यायचं असतं हेही माहिती आहे पण सगळे तसाच विचार करतील असं नाही."

>> 'दिसली बाइ की कर बलात्कार' <<

सिरियस्ली? या वरील वाक्यावरुन तो गदारोळ उडाला? याहि पेक्षा घाणेरडी वाक्यं लिहिली गेलेली आहेत (झक्कींकडुन नाहि); त्यावेळेस का नाहि आवाज उठला? समविचारी, कंपुबंधु म्हणुन?

वरचं वाक्य निव्वळ एक निमित्त होतं, झक्कींवर बर्‍याच लोकांनी फार पुर्विपासुन डुख धरलेला होता. एखाद्या जंटल्मन सारखं त्यांनी जबाबदारि स्विकारुन माबोपासुन फारकत घेतलेली आहे. यात झक्कींना "हिरो" बनवण्याचा हेतु अजिबात नाहि पण या कटात (हो कटच) सामिल झालेल्यांना, आत कुठेतरी, आपण चुकलो असं वाटल्याशिवाय रहाणार नाहि...

राज यांच्याशी सहमत.
थोड्या काळापुर्वी झक्कींनी शांतीप्रिय समुहाबद्दल काही लिहिले होते. (जे त्यांच्या पवित्र पुस्तकाला अनुसरुनच होत) तेव्हा काही जणांना "अगदीच राहावले नव्हते" तेव्हापासुनच मला संशय येत होता.

मायबोलीचे एका डेरेदार वृक्षात रुपांतर झाले आहे. एका छोट्या रोपट्यापासून ते इथपर्यन्त च्या प्रवासात बर्याच जणांचे योगदान आहे. संभाळायला म्हणुन दिलेल्या व्यक्तीच्या दुर्लक्ष करण्याने सगळी वाळवी हा वृक्ष पोखरुन काढणार. झाडावर येणारे पक्षी काय दुसरे झाड शोधतील पण ज्याने पुत्रवत या रोपट्याचे झाड होई पर्यन्त संगोपन केले त्या चे ही दुर्लक्ष होत आहे.
यावर्षी दिवाळी अंक बंद झाला. पुढच्या वर्षी गणेशोत्सव होईल कदाचित. मागच्या काही वर्षात महिलांचा गृप (नाव लक्षात नाही. मिपा वर अनाहिता आहे तसा) बंद झाला.
असो, कालाय तस्मै नमः

Pages