राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

जेथे रिकामटेकडे "चाहते" वा 'समर्थक" भरपूर असतात तेथे असले विचारस्वातंत्र्य जास्त चालत नाही.>>> हे मायबोलीलाही लागू आहे!

अ‍ॅडमिन,
एकदा आयडी तयार केल्यावर एडीट करून आयडीचे वापरायचे नाव बदलण्याची सोय बंद करावी.

>>>>>मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास <<

अ‍ॅडमिन,
असे धागे अजून दिसले नाहित का तुम्हाला? फक्त दुसर्‍याची टिंगल टवाळी, कोणाहि आयडीबद्दल असे तुच्छ प्रतिसाद लिहिणे; मग ते त्यांच्या लिखाणाबाबत असो की दुसर्‍या बीबीवरच्या त्या ठराविक आयडीच्या पोस्टवर असो वा तो ठराविक आयडी कोणाच्या अध्यात मध्यात नसो तरी हे कायम चालते की त्या धाग्यावर.
मग तुमच्या धोरणानुसार कारवाई नाहि का होणार अश्या धाग्यावर? (तुमचे उत्तर अपेक्षित आहे इथे)

दिनेश ह्यांनी वरती कॉपी पेस्ट केलेला प्रतिसाद अश्याच एका धाग्यावरचा आहे.
आणि तिथे तर दिनेश वा काही ठराविक आयडीवर असेच कायम हिणकस प्रतिसाद असतात त्याचे काय?
कधी आडून त्या इतर आयडींच्या पोस्टचा रेफरन्स घेवून, तर कधी वरच्या पेस्ट केलेल्या प्रतिसादासारखा.

ह्या धाग्याचा एकुणच उद्देश खिजवण्यासाठी आहे हे पाहिलेय. नाहितर पब्लिक फोरम वर दुसर्‍यांविषयी अशी रत्ने पाजळण्यात मजा कशी काय येणार त्यांना? हो, आणि हे सुद्धा लक्ष वेधून घेण्याचेच लक्षणच आहे हो.

बाकी, दिनेश ह्यांनी कॉपी पेस्ट केलेला प्रतिसाद वाचून हास्यास्पद वाटले, दुसर्‍याला ओसीडी आहे म्हणणारी आयडीला('सायो' हि आयडी), स्वतःचा आजार दिसत नाही असे समजायचे का?
अशी दुसर्‍याची कायम टिंगल टवाळी करून दिवस घालवण्याचे ह्या आयडींना(सायो, स्वाती_आंबोळे, तृप्ती_आवटी वगैरे) कसले एवढे कंपलशन आहे की मानसिक आजार आहे?(हे असे दुखा:ने लिहावे लागतेय कारण बहुधा हिच भाषा त्या आयडी समजेल व सुधारणा होइल हि अपेक्षा) Happy

हो, आणि मला फक्त तुमच्या धोरणामुळे आठवण झाली आणि तुमचे धोरण टिकावे म्हणून सुचवतेय. नाहितर असले धागे माझ्यालेखी तरी क्षुल्लक आहेत.

मयेकर मी सचीन याना म्हणले यात तुम्हाला काय गैर वाटले? चहाच म्हणले ना? की व्हिस्की, रम्,जीन, बीअर घ्या म्हणून सान्गीतले? काय आहे, मला काही असे मित्र - मैत्रिणी नाहीत, जे तुम्हाला भाग्याने लाभले आहेत आणी जे दिनेश अथवा आणखीन काही जणान्च्या टिन्गळ टवाळ्या करत फिरतात. त्यान्च्या प्रत्येक विधानाना हसतात.

मला बोलण्या आधी जरा तिकडे बघा. तुम्ही सुद्धा मागे दिनेश यान्च्या चूका काढल्या आहेत, तेव्हा स्वतःकडे नीट बघा, तुमच्या सहकार्‍याना आधी नीट उपदेश करा आणी मग इथे येऊन दुसर्‍यान्च्या चूका दाखवा.

सचीन पगारेना जर आक्षेप असेल तर त्यान्ची माफी मनापासुन मागण्याची माझ्यात हिम्मत आहे, आणी मी त्याबद्दल दिलगीर असेनही. तुम्ही मागाल का माफी दिनेश यान्ची?

कायम काड्या घालायची सवय सोडा.

१) जिथे हा चहा पिण्याचा उपदेश तुम्ही दिलाय, त्या धाग्याच्या विषयाशी व पगारेंच्या प्रतिसादाशी पगारेंची टिंगल करण्यापलीकडे वेगळा संबंध मला तरी दिसत नाही. माझ्या दृष्टीचा दोष असेल. पण पुढे त्यावर दोन हास्यदर्शक(स्मित नव्हे) स्मायलीही आलेल्या आहेत.
२) चहा पिण्यात गैर नाही आणि व्हिस्की इत्यादी पिण्यात आहे आहे कोणी ठरवले?
३) तुम्ही ज्या सदस्याबद्दल बोलत आहात त्यांच्या चुका जिथे दिसल्या तिथेच दाखवून दिल्या आहेत. अश्या चुका दाखवल्यावर पुढे काय झाले किंवा काही झाले की नाही हे तुम्हाला माहीत असेलच.
४) अश्या चुकांमुळे कधी विनोदनिर्मितीही होते, त्या विनोदावर मला हवे तिथे जाऊन हसायला मनाई नसावी; नाही का? ज्या एका अश्याच चुकीबद्दल तुम्ही बोलताय तोही एका टायपोमुळे घडलेला छान विनोद होता. आता जिथे विनोदबुद्धीबद्दलच आकस आहे तिथे हसू नये इतके तारतम्य मला आहे.
५) चुका दाखवल्याबद्दल माफी का मागायची हे कळले नाही.
६) उपदेश देण्यास आपण समर्थ आहातच. मी आणि कशाला द्यावयास हवा?
७) 'कायम काड्या घालायची सवय सोडा' : हे वाक्य वैयक्तिक शेरेबाजीत बसते का हे तपासले जावे.
तो मला असलेला उपदेश/सल्ला असेल तर मला अनाहूत सल्ल्यांची गरज नाही. उपदेश हवाच असेल तर माझे उपदेशक मी निवडेन. उपदेश/सल्ला अस्वीकार्य, सबब त्याबद्दल ध्यन्यवादही देत नाही.

दिनेश यान्च्याबद्दल मी बोलत आहे, त्यान्च्यावर एका खाजगी गप्पान्च्या बाफावर तुम्हीच आधी चूक दाखवली होती, तिचा जेव्हा मी उल्लेख केला तेव्हा त्या नन्तर तुम्ही ती व्याकरणाची चूक दिनेश यान्च्या पाककृती बाफावर येऊन परत दाखवली. मग चुक दाखवायचीच होती तर ती दिनेश यान्च्या त्या बाफावर दाखवण्या आधी दुसरीकडे का दाखवलीत? डायरेक्ट दिनेश याना का नाही दाखवलीत? आठवा जरा ते.

चूका काढण्याचा प्रश्न नाही, चूका जरुर दाखवाव्यात. पण आधी टिन्गल करणार्‍यान्च्या हातात कोलीत देऊन मग आपले उघडकीस आल्यावर परत तिथे येऊन असे दाखवणे की मी चूक सुधारत होतो, हे कुठले लक्षण आहे?

अश्या चुकांमुळे कधी विनोदनिर्मितीही होते, त्या विनोदावर मला हवे तिथे जाऊन हसायला मनाई नसावी; नाही का? ज्या एका अश्याच चुकीबद्दल तुम्ही बोलताय तोही एका टायपोमुळे घडलेला छान विनोद होता. आता जिथे विनोदबुद्धीबद्दलच आकस आहे तिथे हसू नये इतके तारतम्य मला आहे.>>>> तुम्ही हसला नाहीत, तुम्हाला हसण्यालाही मनाई नाही, पण जिथे तुम्ही ती चूक दाखवलीत ते ठिकाण दिनेश यान्च्यावर कायम शेरेबाजी करणारे ठिकाण बनले आहे, आणी याची तुम्हाला पूर्ण जाणिव आहे, तरीही तुम्हाला त्यात काहीच गैर वाटत नाही? कमाल आहे? आज माझ्याकडे तुम्ही बोट दाखवता आहात, पण जे लोक कायम दुसर्‍याला आपल्या विनोदाचे, मानसीक विकृतीचे साधन बनवतात, त्याना तुम्ही बोलणार नसालच नाही का? मग तुम्हाला मला बोलायचा काही एक अधिकार नाही.

तुम्हाला बोलणारा मी कोण? मी काही बोललोही नाही. तुमच्या दोन प्रतिसादांत विसंगती जाणवली म्हणून ते या धाग्यावर एकत्र चिकटवलेत.
तरीही, अधिकार मागायला तुमच्याकडे येणार नाही.

.

हेच ते.:स्मित: विषय बदललात. माझ्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाहीत. आणी देणार नाही याची पण कल्पना आहे. सो, इथेच थाम्बते.

सॉरी. तुमचा अपेक्षाभंग करताना वाईट वाटतंय.
< तिचा जेव्हा मी उल्लेख केला तेव्हा त्या नन्तर तुम्ही ती व्याकरणाची चूक दिनेश यान्च्या पाककृती बाफावर येऊन परत दाखवली>
http://www.maayboli.com/node/45813 याबद्दलच बोलताय ना?

तुमचा ठळक अक्षरांत दिलेला प्रतिसाद तिथे येऊन अ‍ॅक्नॉलेज केलाय की; तसेच तुम्ही म्हणताय तसं मूळ पाककृतीतल्या व्याकरणाच्या वा अन्य कोणत्याही चुकीबद्दल मी काही लिहिलेले नाही. फक्त तुमच्याच प्रतिसादातली शुद्धलेखनाची चूक तेवढी दाखवली. ते आवडले नसेल तर त्याबद्दल तुमची क्षमा मागायला हवे असल्यास सांगा.

रच्याकने, दिनेशदांसारख्या पाककृती मला जमत नसतील. पण मला ज्या काही जमल्यात, त्या मायबोलीवर शेअर केलेल्या आहेत, अगदी स्पर्धेत भाग घेऊन. तसंच जमलेल्या सगळ्याच पाककृती इथे टाकायलाच हव्यात असे नाही. पण मला काय काय पाककृती करता येतात, ते आजमावायचे असल्यास स्वागतच आहे.

आता मात्र दिनेशदांच्या लेखनावरच्या प्रतिसादांबद्दलच्या चर्चेला माझ्याकडून लेखनसीमा.

च्च! अहो माझी चूक नव्हती ती, दिनेशजीनी चुक असे लिहीले, तेच तुम्ही आधी त्या बाफावर लिहीण्या ऐवजी दुसर्‍या बाफावर टाकले. आणी त्याची नन्तर तिथे नेहेमीप्रमाणे टर उडवली गेली. यालाच माझा आक्षेप आहे. माझी माफी तुम्ही मागावी अशी माझी लायकी खरच नाही. मानाने आणी अनूभवाने तुम्ही मोठे आहात, पण जेव्हा इथे दिनेश यान्च्या सारख्या अनूभवी आणी जगन्मित्र माणसाची कायम अवहेलना केली जाते तेव्हा मात्र चीड येते.

माझ्याकडुन हा वाद इथे समाप्त. मी सम्पादन केलीय माझी पोस्ट, कारण वाटले होते की माणसात बदल घडु शकतो, पण जित्याची खोड म्हणतात तेच खरे.

>>>मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही<<<

हे विधान अ‍ॅडमीन टीमच्या वरील लेखातील विधान आहे.

आणि ह्या लेखाखालीच नेमकी एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत आणि मुद्यांवर आधारीत चर्चा होत नाही आहे.

(असे मला वाटते).

अ‍ॅडमिन बहुतेक हा धागा काढून विसरून गेले की काय ?
अनेक यशस्वी खेळाडूंनी नेहेमीप्रमाणे येथेही मैदान काबिज केलेले आहे. Happy

बेफि आणि महेश,

१०००% अनुमोदन,

जे सदस्य टी आर पी बाढवतात त्यांना ईथे अभय आहे, काही निवडक आयड्यांवरच नेहमी तलवार फिरते.

ईथे ह्याच धाग्यावर डकवलेले पुरावे तर नष्ट केले जातातच आणी त्या पुरावा दिलेल्या आयड्यांना ही अश्या

घोडचुकीची शिक्षा मिळते,

धन्य आहे तुमची अ‍ॅडमिन साहेब

काय आहे ना,

तो स्र्कीन शॉट इब्लिस च्या प्रतिक्रियेचा होता, ईथे डकवला आणि लगेच उडाला. पण ईथे भरत मयेकर नी डकवलेले स्क्रीन शॉट मात्र शाबुत रहातात.

यातच सर्व आल !!

तुम्हाला शान्ताराम २ काढायला लागेल
<<
<<
'आंबा' आणि 'शेळी' अशी आयडींची एक मालिका या आधीही इथे येऊन गेल्याचे आठवते. Happy

Pages