राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

अ‍ॅडमीन टीम,

हा धागा कृपया पाहावात. विषय जुना आहे व राजकीय आहे. अतिशय निष्पापपणे शब्दबद्ध केलेल्या मजकुराद्वारे एक असा प्रश्न विचारण्यात आला आहे ज्याला कोणतेही अचूक उत्तर असू शकत नाही किंवा अचूक उत्तर हे कोणा ना कोणाचा पाणउतारा करणारे असू शकते. त्या धाग्यावर प्रतिसाद कसे यावेत ह्याचा टोनही सेट झालेला दिसेल. तेथे 'मुद्यावर आधारीत' चर्चा होणे असंभव वाटत आहे. ही तक्रार अजिबातच नाही. फक्त आपल्या मूळ लेखात आपण हे विधान केलेले आहेतः

>>>यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास<<<

ह्यात 'साळसूदपणे वादोत्पादक मुद्यांवर धागे काढल्यास' अशीही एक तरतूद कृपया असावी अशी विनंती आहे.

अधिक उणे बोललो असल्यास 'लतोंमोघा' समजून माफ करावेत.

-'बेफिकीर'!

बेफि,

सध्या मायबोलीवर सुद्धा अशी "संरक्षित जमात" आहे, त्यांनी काही लिहिल तरी दुर्लक्षच होतय ,

काही उपाय तर सोडाच पण त्यांनी दिलेले वादग्रस्त प्रतिसाद सुद्धा डिलीट केले जाणार नाहीत,....

--

--

--

बाकी "आशा" ठेवणे हेच जिवनाच सार आहे....

चो उ बों

Rofl

सचिन पगारेंची एक विचारसरणी आहे. अगदी स्पष्ट म्हणायचे तर ती काँग्रेससमर्थक आहे. (त्कोणाला आवडत असेल तर ती गांधी घराण्याची तळी उचलणारी आहे असेही म्हणता येईल ) पण त्यानी कधी पातळी सोडून लिहिल्याचे आठवत नाही. जो मोह बर्‍याच साळसूद नरपुंगवांनाही आवरता आलेला नाही. पगारे एक 'पिल्लू' सोडून देतात आणि वाटच पहात असलेले अबेक संधी 'साधू" आपापल्या 'आयुधांसह' तेच ते मुद्दे घेऊन हजर होतात आणि नेहमीचाच तमाशा चालू होतो तोवर पगारे 'खुर्ची टाकून ' निवान्त डोक्यामागे हात घेऊन रेलून बसलेले असतात ..

मग पगारेंना पायबन्द घालायचा असेल त्याना उत्तरे द्यायचेन्बन्द करा. बेफि तुम्ही कशाला पगारेंचा शोध घेत बीबी बीबी फिरत असता...

एव्हाना तुमचा 'कॅम्प'स्पष्ट झालेला आहे आणि लेखक व कवी म्हणून तुम्ही मायबोलीवर मिळवलेला आदरपूर्ण लौकिक मातीमोल करायला निघाला आहात तेव्हा सावधान !

>>>मग पगारेंना पायबन्द घालायचा असेल त्याना उत्तरे द्यायचेन्बन्द करा. बेफि तुम्ही कशाला पगारेंचा शोध घेत बीबी बीबी फिरत असता...<<<

Lol

अ‍ॅडमीन टीमचा हा धागा येण्याआधी कित्येक दिवस मी पगारेंच्या एका धाग्यावर हेच लिहिले होते की त्यांचे धागे वरवर अतिशय निष्पापपणे शब्दबद्ध केलेले असले तरी वादोत्पादक असतात आणि त्यावर धुमाकूळ झाल्यावर वेगळ्याच सदस्यांवर कारवाई होते, पण धागानिर्मात्याला काहीच म्हंटले जात नाही. इच्छा असली तर त्यांचे धागे उघडून बघा, मी हे म्हंटलेले नक्की दिसेल. सचिन पगारे काँग्रेसचे असणे ह्यात कोणालाच हरकत घेण्याचा अधिकार असू शकत नाही, पण विशेष कोणतेही नावीन्य नसलेल्या मुद्यावर एक धागा काढायचा, संतप्त चर्चा घडवून आणायची आणि निवांत गंमत बघायची हे वारंवार होण्याबाबत बोलण्याचा इतर सदस्यांना अधिकार आहे.

>>>एव्हाना तुमचा 'कॅम्प'स्पष्ट झालेला आहे आणि लेखक व कवी म्हणून तुम्ही मायबोलीवर मिळवलेला आदरपूर्ण लौकिक मातीमोल करायला निघाला आहात तेव्हा सावधान !<<<

Lol

आपण त्याची काळजी करत नसालच, पण करत असाल तर अजिबात करू नका. मी आदरपूर्ण लौकीक मिळावा म्हणून लिहायचे ठरवले असते तर येथल्या तथाकथित धुरंधरांप्रमाणे पॉलिसी वगैरे ठरवून, कंपूत शिरून, वादग्रस्त न होता आणि गुडी गुडी लेखन केले असते. मायबोलीकरांनी मला दिलेले प्रेम हे कधीच 'आपल्या कंपूतील एक' म्हणून दिलेले नाही आणि केलेली टीका ही अक्धीच 'दुसर्‍या कंपूतील कोणी' म्हणून केलेली नाही.

(तसेच, कृपया विषय भरकटवू नका माझ्या लौकीकाबाबत वगैरे बोलून)

-'बेफिकीर'!

अ‍ॅडमीन टीमचा हा धागा येण्याआधी कित्येक दिवस मी पगारेंच्या एका धाग्यावर हेच लिहिले होते की त्यांचे धागे वरवर अतिशय निष्पापपणे शब्दबद्ध केलेले असले तरी वादोत्पादक असतात आणि त्यावर धुमाकूळ झाल्यावर वेगळ्याच सदस्यांवर कारवाई होते, पण धागानिर्मात्याला काहीच म्हंटले जात नाही.
---- त्यान्ची कार्य पद्धती एकवेळा माहित झाल्यावर प्रतिसाद द्यायलाच हवेत अशी सक्ती नाही आहे... त्यान्नी कशा प्रकारचे धागे काढावे हे प्रतिसादान्चे रतिब ओतुन आपणच ठरवतो.

ठीक आहे मी तुमची प्रचारक म्हणून नोंद घेतो....
----
रॉहु यान्नी बेफ़िकीर यान्ची प्रचारक अशी नोन्द घेतली आहे या प्रतिसादाची मी नोन्द घेतो. Happy

हो ना. सचिनजींच्या ( हो आमच्यात 'जी ' लावण्याचा रिवाज आहे :)) धाग्याला गोण्याच्या गोण्या प्रतिसादाचे खत आणि ट्यांकरच्या ट्यांकर पाणी कशाला घालावे? ते निष्पापतेचे कातडे पांघरून वादोत्पादक असले तरी? मग घालायचे तर घालायचे मग कधीतरी 'विचार 'मांडताना अतिउत्साहात 'वाकुडे पाऊल 'पडल्याने आय डीचा वध झाल्यावर बाकीच्यांनी त्या करता गळा कशाला काढावा? मुख्य म्हनजे सचिनजींच्या नावाने का बोटे मोडावीत हा आज्च्या भाष णाचा मुख्य विषय आहे. ज्याला त्याला आपला आय डी ( धोतराच्या कासोट्यासारखा ) सांभाळता येऊ नये ? ( इंग्लिश मल्लास श्रद्धांजली !)

हे म्हणजे जुगारात हरल्यावर क्यासिनोच्या मालकाला , अथवा राख रांगोळी झाल्यावर दारुच्या गुत्त्याच्या मालकाला शिव्या देणे उर्फ वार्‍याशी भांडण्यासारखे नव्हे काय , वाचकहो ? ( वाचकात प्रचारक येत नाहीत, वाचाकांचा उद्देश वेगळा , प्रचारकांचा वेगळा. वाचक ज्ञान संपादण्यासाठी, मनोरंजनासाठी येतात....)

तर सचिनजींवर कारवाई करण्याचे कारण दिसत नाही.... ::फिदी:

निव्वळ संदर्भ म्हणून ही कमेंटची लिंक देत आहे.

http://www.maayboli.com/node/47715#comment-3034740

विषय ताणून धरण्याचा हेतू मुळीच नाही, पण वरवर विधाने केली असे वाटू नये म्हणून ही लिंक पेस्ट केली इतकेच.

या विषयावर सहजच एक उपाय सुचला म्हणून सांगतो.
आक्षेपार्ह प्रतिसाद admin ना कळविण्यासाठी प्रत्येक प्रतीसादासोबत "+१" सारखे "Report Abuse " चे एखादे बटन देता येयील काय? असे बटन इतर संकेत-स्थळांवर असते. जेंव्हा एखाद्या प्रतिसादाला ठराविक संख्येचे रिपोर्टिंग होयील तेंव्हा तो प्रतिसाद आपोआप अदृश्य होयील व तिथे "पेंडिंग moderation" असे दिसेल. त्यानंतर admin-team तो प्रतिसाद वाचून ठेवायचा कि उडवायचा ते ठरवतील. जर प्रतिसाद उडवला तर त्या सदस्याला "इशारा" जाईल.
एखाद्या सदस्याचे २-३ असे प्रतिसाद उडवले कि त्याचा ID बंद करता येयील.
अर्थात हे सगळ करणं किती सोपं / अवघड आहे माहित नाही.

नाही.. आम्ही एक आयडी मेल्यावर दुसरा घेतो.

पण इथे असे काही महाभाग आहेत. ते एकाच वेळी चार आयडी घेऊन स्वतःशीच बडबडत. बसतात.

खरय!

>> त्यान्ची कार्य पद्धती एकवेळा माहित झाल्यावर प्रतिसाद द्यायलाच हवेत अशी सक्ती नाही आहे... त्यान्नी कशा प्रकारचे धागे काढावे हे प्रतिसादान्चे रतिब ओतुन आपणच ठरवतो. <<
मागेहि कुठेतरी मी म्हटलं होतं की पगारे, जामोप्या, पैलवान, जोशी यांच्यासारखी मंडळी संकेतस्थलळावर कार्यरत असणं गरजेचं आहे; अर्थात मर्यादा सांभाळुन. रोजच्या अळणी/वरण-भात चर्चांना झणझणीत फोडणी देण्याचं महत्वपुर्ण काम हि मंडळी इमानइतबारे करत असतात... Happy

>>> लबाड लोक शेकडो आयडी काढुन नको असलेल्या लोकाना उडवुन लावतील.

हा मुद्दा बरोबर आहे. पण एखादा प्रतिसाद उडविण्यासाठी फक्त सदस्यांचा reporting एवढेच पुरेसे नाही. शेवटी admin वाचून ठरवणार कि प्रतिसाद ठेवायचा कि उडवायचा.

बरोबर.. ‘ओसामाजी’ तुमच्यातच म्हणतात ना?
>>
नाही, आमच्यात अटलजी, अडवानीजी,विनोदजी, नितीनजी, पाचपुतेजी, खतगावकरजी,सुर्यकांताजी म्हंतेत

>>> मग सध्या एडमिन काय करतात असं म्हणताय तुम्ही? न वाचताच उडवतात की काय?

नाही, असं काहीही मी म्हणत नाही .

मला म्हणायचे आहे कि अश्या बटनामुळे सदस्यांना आक्षेपार्ह मजकुराची सूचना admin ना देणे खूप सोपे जायील . त्याचबरोबर admin ना सुद्धा "काय उडवायचे" हे पाहणे खूप सोपे जायील.

सहजता व सोपेपणा हा उद्देश . बाकी काही नाही.

माननीय प्रशासक,

गीतेच्या धाग्यावर अत्यंत खालच्या स्वरूपाच्या वैयक्तिक प्रतिक्रिया प्रसिद्ध होत आहेत कुणाची बायको निघून गेली, कुणाचे लग्न झाले नाही ह्या वैयक्तिक गोष्टींशी मायबोलीकरांना कसलेही घेणे देणे नाही. तुमच्या धाग्यानुसार वैयक्तिक निंदा नालस्ती करणारा आयडी हा कारवाइस पात्र होतो. परंतु ह्या धाग्य बाबतीत अपवाद केला आहे का?

गीता वाचून त्यावर चर्चा करून जर अश्या प्रतिक्रिया येत असतील तर काय कामाचे ते वाचन हा प्रश्न पडतो.

५६३४९ हा धागा बंद करण्यात यावा तसेच त्यावर विकृत भाषेत लिहिणार्‍या आयडींवर कारवाई करण्यात यावी ही विनंती.

अहो तो आय डी सगळ्या भारतीयांवरच असहनीय भाषेत टीका करत असतो.
तशी हामेरिकेतल्यांच्या मानाने सगळे भारतीय दलितच की!

इतक्या वर्षांत त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही, आता कसली होत्येय?
त्यांनी फक्तं आपले प्रतिसाद संपादित केले की त्यांची सगळी पापेही धुवून निघतात.
Happy

हो. पण तक्रार करणे हे आपले कर्तव्य आहे .

नैतर अ‍ॅडमिन म्हणेल की कुणी तक्रारच केली नव्हती मग अ‍ॅक्शन कशी घेणार ?

http://www.maayboli.com/node/30577#new

महेश या आवडीच्या मानभावीपणाचा हा कळस. मंद जोशात कोसळलेला भाग म्हणून शिव्या दिलेल्या त्यांना चालतात. भाजपच्या पराभवाबाब्त चर्चा त्यांना विक्रूत वाटते. त्यांनी केलेलीवैयक्तिक शिवीगाळ नजरेस आणून दिलेली आहे. या आयडीचे काय ते पहावे ही विनंती.

Pages