फुसके बार – २२ जानेवारी २०१६ - रोहित वेमुला, नीतिशकुमार-लालू, १९६२ची नामुष्की

Submitted by Rajesh Kulkarni on 21 January, 2016 - 14:42

फुसके बार – २२ जानेवारी २०१६

१) रोहित वेमुला आत्महत्या – इतरांवरील कारवाई मागे घेतल्यावर मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष होणार?

आजच इतर चार विद्यार्थांवरची कारवाई मागे घेतल्याचे कळते आहे. याहीपुढे जाऊन आर्थिक मदत, कोणाची तरी गच्छंती यावर हे प्रकरण मिटले, तरी अनेक मूलभूत प्रश्न अनुत्तरीत राहणार आहेत. यात कोठेही दलित अँगल नसताना त्यावरून राळ उठवली गेली. पप्पू, ममता बॅनर्जीच्या पक्षांच्या लोकांनी तेथे भाषणे दिली. पप्पूच्या पक्षाचे सरकार केद्रात व राज्यातही असताना दहापैकी मागच्या नऊ दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. तिकडे ममता बॅनर्जी उघडपणे अनाचाराचे सरकार चालवत आहेत. अशा लोकांना आंदोलनकर्त्यांनी स्वत:ला वापरू दिले. पप्पूला तर आंदोलनकर्त्यांनी याबद्दल एक प्रश्नही विचारला नाही. जणू आधी आत्महत्या केलेल्या दलितांशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. (या अर्थाने हे आंदोलन ‘दलितां’शी संबंधित नव्हते असे म्हणता येईल).

या आंदोलनाच्या दरम्यान हैद्राबाद विद्यापीठाने या पाच विद्यार्थांची शिष्यवृत्ती सात-आठ महिन्यांपासून बंद केली असा आरोप केला गेला. आजच्या टीव्हीवरील चर्चेत ऐकले की याचा व आंदोलनाचा काहीही संबंध नाही आणि कितीतरी विद्यार्थ्याची स्कॉलरशिप थकलेली आहे. तेथील रचनेत काहीतरी बदल झाल्यामुले हे झाल्याचे व ती यथावकाश एक-रकमी मिळेल असे कळते. यापेक्षा अधिक तपशील माझ्याकडे नाही. तरीदेखील ‘दलिता'च्या पोटावर पाय असा त्याचा प्रचार केला गेल्याचे आपण ऐकले.

मूळ प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न न केल्यामुळे काय होईल, की दलितांशी संबंधित प्रश्नावरून काही राजकीय फायदा उठवता येतो का यावर ही सगळीच राजकीय गिधाडे टपून बसतील.

खरे तर आयआयटीतला अभ्यासक्रम न झेपल्यामुळे, कोट्यासारख्या ठिकाणी मानसिक ताण सहन न झाल्यामुळे किंवा असे राजकीय स्वरूपाचे आंदोलन करून आत्महत्या करणारा यांमध्ये फार काही फरक वाटत नाही. सगळ्याच घटना दुर्दैवी आहेत. यात कोठेही कोणाच्या जातीचा प्रश्न नाही. मागासवर्गीय व गरीब अशा मुलांपुढची आव्हाने इतर मुलांपेक्षा वेगळी व मोठी असतात. त्यासंदर्भात मुलांचे प्रभावी समुपदेशन करण्यासाठी देशभरात यंत्रणा उभी करण्यासाठी कोणी प्रयत्न करेल का?

'पहा, या विद्यार्थ्यावरची आधीची कारवाई चुकीची होती, हेच यावरून सिद्ध होते' अशी एक बाजू म्हणेल, तर 'आंदोलन चिघळू नये म्हणून ही भूमिका घ्यावी लागली' असे दुसरी बाजू म्हणेल. मात्र विद्यार्थ्यांनी (मग ते कोणीही असोत) राजकीय आंदोलने करावीत का, हे मूलभूत प्रश्न मागे पडतील किंबहुना अशी आदोलने करण्याचा प्रत्येकाचा हक्कच आहे, हा सोयीचा प्रस्थापित विचारच चालू राहील.

हे प्रकरण शांत झाल्यावरही यातील मूलभूत मुद्द्यांचा पाठपुरावा करत रहायला हवा. तरच आणखी दलित विद्यार्थ्यांच्या नशिबी असा अंत येणार नाही.

२) बिहारमधील नीतिशकुमार सरकारने लालू व त्यांच्या मुलांवरील अनेक खटले मागे घेतले आहेत.

या खटल्यांमुळे कोर्टाचा वेळ वाया जातो, हजारो केसेस कोर्टापुढे प्रलंबित आहेत. त्यामुळे हे पाऊल उचलल्याचे नीतिशच्या पक्षाचा प्रवक्ता सांगतो आहे. मात्र मागे घेतलेल्या खटल्यांमध्ये जातीय आधारावर लालूच्या पक्षाने पुकारलेल्या बंदमुळे दाखल केलेला खटलाही सामील आहे. हा बंद पाटणा उच्च न्यायालयानेही बेकायदेशीर ठरवला होता.

मी मागेही म्हटले होते स्वच्छ नीतिशनी सत्ता राखण्याच्या व मोदींशी वैयक्तिक स्पर्धा करण्याच्या नादात चिखलात उडी मारली आहे आणि बिहारला वीस वर्षांनी मागे टाकणा-या, भ्रष्टाचार व अनाचाराच्या युगात नेणा-या लालू नावाच्या दैत्याशी संग केला होता. लालूला त्यात गमावण्यासारखे काहीच नव्हते. सौदा होणार होता तो नीतिशनी कमावलेल्या पुण्याईचा. तेच होताना दिसत आहे. अगदी दररोज.

त्यातल्या त्यात एक चांगली बातमी काल वाचण्यात आली. निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे नीतिशनी महिलांना ३५% आरक्षणाची घोषणा केली. आता केन्द्रातही हे होण्यास हातभार लागावा.

३) एबीपी न्यूजवरील प्रधानमंत्री ही मालिका

चीनशी संघर्ष

१९६२चे भारत-चीन युद्धावर या मालिकेत एक प्रकरण आहे. भारताचे स्वातंत्र्य आणि चीनमधली क्रांती या घटना साधारणपणे एकाच सुमारास झाल्या. त्यानंतर लगेचच म्हणजे १९५०मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला. त्यानंतर पंचशील करारामध्ये भारताला तर काहीही मिळाले नाहीच, पण भारताने तिबेटवरचा हक्क मान्य करून टाकला.

एकापाठोपाठ एक चुका करण्याचा विडाच नेहरूंनी उचलला होता. त्यांचे मित्र व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यात आणि लष्करप्रमुख थिमय्या यांच्यात एकमेकांचे तोंड न पाहण्याइतपत कडाक्याचे मतभेद. मेनन यांच्या मताप्रमाणे चीनपेक्षा पाकिस्तानकडून धोका अधिक होता, त्यामुळे चीनच्या सीमेवर सैन्य तैनात करायला ते तयारच नव्हते. त्यात नेहरूंनी त्याचे नातेवाईक समजले जाणारे बी. एम. कौल यांना लेफ्टनंट जनरल म्हणून बढती दिली. ते करताना त्यांनी अनेक अधिका-यांच्या वरिष्ठतेचा बळी दिला. त्यावरून चिडून जनरल थिमैया यांनी नेहरूंकडे आपला राजीनामा सोपवला. नेहरूंनी तो नाकारला. परंतु नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करणे नेहरूंनी सोडले नाही.

चीनचे सामर्थ्य ओळखून त्यांनी चीनशी मैत्री करून युद्ध किंवा संघर्ष करण्याचा प्रयत्न चालवला होता. पण हा प्रकार सशाने वाघाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करण्यासारखा होता. बरे, ब्रिटिशांनी चिनी लोकांच्या महत्त्वाकांक्षा ओळखूनच तिबेट हा एक ‘बफर’ प्रदेश तयार केला होता. परंतु त्यातून धडा घेण्याऐवजी नेहरूंनी त्यावरचा चीनचा हक्क मान्य केला. त्यानंतर फॉरवर्ड पॉलिसी या नावाने चीनच्या सीमेवर सैन्यबल वाढवण्याचे ठरले. पण जसे अर्थसंकल्पांमध्ये घोषणा तर केल्या, पण त्यासाठी निधीच उपलब्ध न करण्याचे प्रकार चालतात, तसाच प्रकार त्यावेळीही झाला. त्यामुळे या काळात जवळजवळ आठ वर्षे मिळूनही त्याकाळात काहीही भरीव प्रगती झाली नाही.

या सगळ्या प्रकारामुळे चीनने चढाई केली तेव्हा भारतीय सैन्याकडे दारूगोळा नव्हता, पुरेसे अन्न नव्हते, होती ती केवळ हिंमत. केवळ हिंमतीवर लढणारे सैन्य किती टिकणार? मागे मी रेझांग ला च्या लढाईत भारतीय सैन्याच्या कुमाऊं बटालियनमधील अहिर यादव जवानांच्या तुकडीने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल लिहिले होते. ज्यांची इच्छा आहे त्यांनी या लढाईचे वर्णन जरूर वाचावे.

अरूणाचल सीमेवर तैनात सैन्याचा चिन्यासारखे दिसणारे पुतळे किंवा चित्रे तयार करून त्यांच्याशी लढून बायोनेटचा वापर करण्याचा सराव चालू होता. पंचशीलचे नाटक चालू होते, तेव्हा लष्कराला सांगून चिन्यांचा कोथळा काढण्याचा सराव बंद करण्यास सांगितले गेले.

या सगळ्या प्रकाराचा परिणाम एकच झाला, भारतीय सैन्याची ससेहोलपट.

दोन्ही बाजूंचे नुकसान तपासले तर भारतीय सैन्याचे १३८३ सैनिक मृत्युमुखी पडले. १०४७ जखमी झाले, १६९६ बेपत्ता झाले तर ४००० सैनिकांना चीनने आपल्या ताब्यात घेतले. या तुलनेत चीनचे ७२५ सैनिक मारले गेले तर १७०० जखमी झाले. तर मग कोणी म्हणेल की मग यावरून भारतीय सैन्य हरले असे का म्हणतात. याचे उत्तर दोन्ही बाजूंच्या सैन्यसंख्येत होते. भारताचे १० ते १२ हजार सैनिक चीनच्या ८०हजारांपुढे कसे टिकणार होते? त्यामुळे चीनने आपला ४३,००० स्वे. किमी प्रदेश व्यापला. नेहरू या काळात काही महिने, काही वर्षे हे युद्ध टिकेल असे भाषणांमध्ये सांगत होते. पण नशीब असे (नशीबच म्हणायला हवे) की एका महिन्यानंतर चीननेच त्यांना जे हवे ते मिळाल्यानंतर युद्ध एकतर्फ़ी थांबवले.

या युद्धापूर्वी चीनने भारताला दिलेला पर्याय अस होता की अरूणाचल प्रदेशचा भाग भारताकडेच ठेवून अक्साई चीनचा भाग चीनला देण्याबाबत मान्यता देणे. पण गवताचे पातेही उगवत नाही त्या प्रदेशावरून काय लढायचे अशी नेहरूंची दूरदृष्टी होती. त्यावर तेव्हाचे खासदार यांनी चिडून व उपरोधाने आपली टोपी काढून विचारले होते की माझ्या डोक्यावरही केस उगवत नाहीत, तर माझे डोके निरूपयोगी समजायचे काय?

मागे वळून पाहिले तर पंतप्रधान नेहरू, व्ही. के. कृष्णा मेनन, ले.ज. कौल हे ती जबाबदारी हाताळण्यास अजिबात लायक नसलेले हे त्रिकूटच लष्कराचा व पर्यायाने देशाचा मुखभंग होण्यास जबाबदार होते असे म्हणावे लागते. आपण देशाचे तहहयात पंतप्रधान झालो आहोत असा समजच जणू नेहरूंनी करून घेतला होता आणि एवढ्या मोठ्या नामुष्कीनंतरही ते त्या पदावरून पायउतार झाले नाहीत. बळींचा बकरा बनवले गेले ते मेनन यांना. एवढे झाल्यावरही आपल्याकडच्या लोकांमध्ये कवित्व शिल्लक होते आणि त्यांनी मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री बनवल्यावर त्याला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला वगैरे उपमा दिल्या. धन्य असते लोकांची.

ब्रिगेडियर जॉन परशुराम दळवी यांनी या सगळ्या तमाशावर हिमालयन ब्लंडर हे पुस्तक लिहिले. त्यावर बंदी आणण्याचे काम मात्र भारत सरकारने तत्परतेने केले. तमाशा म्हणणे योग्य एकाच कारणामुळे वाटत नाही की नेते नेभळट निघाले तरी आपल्या जवानांनी हिमालयातल्या ऐन थंडीत आपले रक्त तिथल्या बर्फात सांडले. पुन्हा म्हणतो, या नेभळटांसाठी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नसिर,
शांतता प्रयत्न करत राहण्यावर आक्षेप नाहीच. परंतु ते करत असताना धोका न ओळखता गाफील राहून संरक्षणसिद्धता न करणे हे मान्य होऊ शकते का? त्या द्ृष्टीने पहा.
आजही आपण संरक्षणसिद्धतेच्याबाबतीत चीनशी बरोबरी करू सकत नाही हे वास्तव आहे, परंतु प्रतिकार तरी नक्की करू शकू. हे पटते का?
या तुलनेत ६२मध्ये काय झाले हे पाहू शकता.

इतका सगळा इतिहास आहे तर मोदी पाकिस्तानात साड्या वाटत आणि चीनच्या अधक्षाबरोबर झुला झुलत का फिरत आहेत ? हे नासीर यांनी माझ्या आधी लिहले आहे त्याचे उत्तर होते.

नितिन नीट समजुन वाचा. ते मुल्यमापन करत नाही आहे उलट प्रश्न करत आहे कि इतिहास ठाऊक असून सुध्दा असे का करतात.
धोरणांचे मुल्यमापन करतात.

बेफिकीर,
राहूल गांधी ही या वयात अतिशय अपरिपक्व, देशातील कोणत्याहीस मस्यांची जाण नसलेली व्यक्ती आहे आणि केवळ घराणेशाहीच्या आधारावर ती त्या पदावर आहे. कॉंग्रेसकडे चांगले व सक्षम पर्याय नाहीत असे नाही. तरी हा ठोंब्या देशाच्या माथी मारलेला आहे. केवळ ते, लालू व आणखी एकदोन व्यक्तींचा मी तसा वा एकेरी उल्लेख करतो. उद्या खरोखरच ते पंतप्रधान झाले तर पप्पू असे म्हणणे बंद करावेच लागेल.
असंबद्ध व वैयक्तिक कमेंट्सवरील प्रतिवादाबद्दल आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद. त्याबाबत मी आताच अॅडमिननाही पुन्हा एकदा विनंती केलेली आहे.

कुलकर्णीसाहेब,

एका राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्षाचा एकेरी उल्लेख आणि पप्पु संबोधन सुध्दा गैरच आहे. पक्षाचा उपाध्यक्ष अपरिपक्व असेल तर त्याची नोंद आधी काँग्रेस वर्कींग कमिटी घेईलच ना. एखादा राजकीय नेता जेव्हा दुसर्‍या पक्षाच्या नेत्यावर वैयक्तीक आरोप करतो तेव्हा जबाबदारी पक्ष घेत नाही. ते त्यांचे वैयक्तीक मत म्हणुन हात झटकतो.

आपण असे लिहु नये. पहा पटतय का ?

इतरांवर वैयक्तिक लिहिणार्‍यांनी स्वतःवरच्या प्रतिसादाचा बोंभाटा करत गावभर फिरू नये

बघा पटतय का

विषय संपला होता असे लिहले पण एक टिपण्णी आवश्यक आहे.

१९४८ - पाकिस्थानने आक्रमण करुन काश्मिरचा अर्धा भाग आपल्या ताब्यात घेतला. तो प्रश्न अजुनही युनो त आहे. पाकव्याप्त काश्मिर असे त्या प्रदेशाचे नाव आहे. जिथे पाक धार्जिणे सरकार ( युनोने मान्यता दिलेली नाही ) ना ते बफर स्टेट झाले.

१९४८ नंतर आपण चीन ने ताब्यात घेतलेला प्रदेश जे स्वतंत्र राष्ट्र होते व आपल्यासाठी बफर स्टेट होते त्या तिबेटला चीनचा अधिकृत भाग म्हणुन मान्यता दिली.

१९६२ ला गेलेला भुप्रदेश परत मिळवता आला नाही.

१९६५ सर्वच स्तरावर पाकची पिछेहाट. युध्दात निर्णायक विजय.

१९७२ आपण पाकिस्थानच्या अंतर्गत भानगडीत लक्ष घालुन बांगला देशाच्या निर्मीती साठी यशस्वी प्रयत्न केले. दोन्ही फ्रंट वर लढाई ( पुर्व आणि पश्चिम ) आता करावी लागणार नाही. उत्तम निती होती. या करता अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरजी यांना वाखाणले आहे.

१९९८ ( कारगील ) ज्या लश्करी ठाण्यावर पाकिस्थान्/अतिरेकी कब्जा करुन होते त्यांना हाकलुन लावले गेले. तरी सुध्दा प्रोअ‍ॅक्टीव्ह राहीलो नाही हा धोरणाचाच पराभव आहे.

२०१५ ? अद्याप असे काही घडलेले नाही. ज्याचे मुल्य मापन करावे.

नितीनचंद्र,
कॉंग्रेस त्याची नोंद घेती तर काय हवे होते?
माझ्या द्ृष्टीने त्याची अपरिपक्वता हा प्रश्न नाही, तो त्याच्या कर्माने जाईल, पण त्याच्या रूपात देशाला चांगला विरोधी नेता मिळत नाही हा खरा प्रश्न आहे. लालूचा मुलगा व पप्पू यांच्यात अपरिपक्वतेची स्पर्धा होऊ शकते. फरक एवढाच,पप्पूच्या अपरिपक्वतेचा विपरित परिणाम तो सत्तेत नसतानाही देशावर होतो. कारण कॉंग्रेस हा ेकमेव दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे.

१९४७ मधे देश स्वातन्त्र झाला.... अनेक दिग्गजान्नी देश स्वातन्त्र होण्याकरता (अनेक मार्गान्नी) लढा दिला. त्याच वेळी शेजारी पाक या नवदेशाची निर्मिती झाली. एकाच वेळी, दोन स्वातन्त्र झालेले देश यान्ची पुढे प्रगती वेग-वेगळ्या मार्गान्नी झाली. आज पाक कुठे आहे, भारत कुठे आहे अशी तुलना केल्यास आपण अनेक आघाड्यान्वर, अनेक योजने प्रगती केली आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही यशस्वीपणे ज्या देशात रुजली, फुलवली त्याचे श्रेय मी कुणाला द्यायचे ? आज ८४ कोटी लोकान्ना मतदानाचा हक्क आहे. सरकार जनतेसाठी काम करत आहे आणि त्या कामा बद्दल जनता समाधानी नसेल तर आपल्याला सरकार बदलण्याचा फार मोठा हक्क लोकशाहीने बहाल केला आहे. जेव्हा जेव्हा भारतात निवडणुका होतात त्या प्रत्येक वेळी मी जगाला अभिमानाने निवडणुक प्रक्रिया आणि त्यात असलेला क्लिष्टपणा, आव्हाने सान्गत असतो. ८४० मिलीयन, ८४ कोटी लोकानचे मतदान प्रक्रिया हेच गिनीज बुकातले रेकॉर्ड आहे. दर पाच वर्षान्नी आपल्याला मतदान करण्याचा पवित्र हक्क मिळाला आहे.... हे सर्व खुप कौतुकास्पद आहे. जगात अनेक देशात ३० - ३५ वर्षे त्याच राजवटी निमुटपणे सहन करावी लागणारे लोक पण आहेत.

लोकशाही सोबतच देशाने विज्ञानाची कास धरली... नेहेरुन्च्या कार्यकाळात देशात पाच IIT, जवळपास ३० राष्ट्रिय प्रयोगशाळा national labs स्थापन करण्यात पुढाकार घेतला गेला. नियमाने भारतिय विज्ञान परिषदेला त्यान्ची हजेरी असायची, ते चर्चेत भाग घ्यायचे, शास्त्रज्ञान्शी चर्चा करुन विज्ञानाची दिशा जाणायचे, मार्गदर्शन करायचे. त्यान्च्याच शब्दात
"If modern life depends on Science and Technology, then we must seize hold of them, understand them and apply them."

त्याकाळात लावलेल्या छोट्या रोपट्याला आज भरभरुन फळे येत आहे. आपले अवकाश तन्त्रज्ञान जगात अत्यन्त अव्वल दर्जाचे आहे. एकाच वेळी १० satellites अवकाशात पाठवण्याचा यशस्वी प्रयत्न (हा जागतिक विक्रम आहे) आपण २००८ मधे केला,

http://www.universetoday.com/13926/10-satellites-launched-in-record-sett...

याक्षेत्रात आन्तरराष्ट्रिय स्तरावर विश्वास निर्माण करणे मोठी मजल आहे. यशस्वी असे चान्द्रयान, मन्गळ यान (mars mission) हा महत्वाचा टप्पा आहे.

नेहेरुन्नी अनेक चुका केल्या असतील... त्याच वेळी त्यान्नी देशाला सशक्त अशी लोकशाही आणि विज्ञान या दोन खुप मोठ्या भेटी देण्यात अत्यन्त महत्वाचे योगदान दिलेले आहे. त्याची फळे आज आपली पिढी चाखते आहे. अन्यथा आपणही पाकच्या मार्गाने गेलो असतो तर आज कुठे असतो ?

आपल्याला हेच कार्य अजुन एक पायरी पुढे कसे नेता येणार आहे यावर मी विचार करेन.

लेखात रोहितने आत्महत्या केलिय ह्या अनुषंगाने लिहिलेय मात्र आजच्या काही व्रुत्तपत्रात खालील बातमी आलिय.

http://m.esakal.com/details.aspx?sid=28&sn=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E...

रोहीतच्या मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे तो अत्यंत निडर होता तो आत्महत्या करणे शक्य नाही. मी सुध्दा एका व्हिडियोत त्यालि दहा बारा जणांनी घेरले होते त्यांच्याशी त्याची बाचाबाची सुरू होती त्यात तो निडरपणे त्यांना नडत होता. आंबेडकरी विचारांचा,देव कर्मकांड ह्यापासुन मुक्ति मिळवलेला निडर रोहित आत्महत्या करु शकतो हे मनाला पटत नाही.ह्या बाबत सखोल चौकशी झाली पाहिजे. मरणापुर्वी त्याने एक चिठ्ठि लिहली असे म्हटले जाते(?) त्या चिठ्ठितही खाडाखोड आढळलीय. रोहितच्या मरणाचे कारण काय हे गुढ वाढतच चाललेय.

राहुल गांधि आणि लालुप्रसाद ह्या बद्दल लेखकाने त्याचे मत मांडले आहे माझेही मांडतो.राहुल गांधिंवर त्यांच्या कुटुंबियांवर अत्यंत हिन शब्दात टिका होते. पण अत्यंत सुसंस्कारीत घराणे असल्याने ते आपली मर्यादा सोडत नाहित प्रतिवाद करत नाहित त्यामुळे हाथि चले बाजार......... हजार ह्या म्हणीप्रमाणे विरोधकांची अवस्था होउन जाते.राहुल गांधिंना दुर्लक्षित करणे कुणालाही शक्य होत नाही.कारण विरोधकांच्या मनात सुप्त भिती आहे न जाणो हा परतुन आला तर.आपल्या भरलेल्या शिडातील हवा एकच व्यक्ति काढु शकते ती म्हणजे राहुल गांधि हे विरोधकांना पक्के ठाउक आहे.राहुल गांधि सामान्य आहे,अपरिपक्व आहे असे बोलले जाते मग का त्यांच्या प्रत्येक हालचालिवर नजर ठेवतात, तुटुन पडतात कारण..भिती.....ह्या माणसाकडुन आपल्या सत्तेला धोका आहे ही मनात असलेली जाणिव.लोकसभेत कोन्ग्रेसच्या चव्वेचाळिस जागा आल्या पक्ष संपला असे भासवण्यात आले पण आज काय स्थिती आहे मोदिंखालोखाल प्रसिध्दी राहुल गांधिना मिळते .असे का?कारण ह्या सामान्य कुवतिच्या अपरिपक्व माणसाकडे असामान्यांना पुन्हा सामान्य बनवण्याची क्षमता आहे. सध्या देशाला असहिष्णुतेचा ज्वर चढलाय तो उतरुन नाँर्मल झाला कि पुन्हा देशाला पुर्विसारखे बलशाली, सहिष्णु करण्याचे काम हे काँग्रेसकडुन राहुल गांधिंच्या नेत्रुत्वाखाली होइल ह्यात शंका नाही.

लालुप्रसाद हे भारतिय राजकारणातले अजोड व
यक्तिमत्व आहेत. बिहार निवडणुकीत भाजपला लोळवण्याचे मोठे श्रेय हे त्यांना जाते. संघाच्या विचारधारेविरुध्द समोरासमोर बोलण्याची हिंमत दाखवणारे लालुप्रसाद हे नेते आहेत. राकुंच्या परिपक्व पक्षाने नि त्यांच्या परिपक्व नेत्यानी १९९२ ला रथयात्रा काढुन सार्या देशातील वातावरण अशांत केले होते तेव्हा त्या रथयात्रेला अडवुन परिपक्व नेत्यांना रोखण्याची हिम्मत लालुंनी दाखवली होती.आज देशाला लालुंसारख्या नेत्याची गरज आहे आणि त्यांचे पुनरागमन हे अत्यंत योग्य वेळी झालेय.

मा. अ‍ॅडमिन,

आपण दिलेल्या वॉर्निंग नंतरही,

यांच्या मतांशी सहमत नसणार्‍यांबद्दल राजेश कुलकर्णी हे वारंवार उद्धट व घाणेरडी भाषा वापरीत आहेत. उदा. नुकतेच निनाद१ हे "बेअक्कल आहेत हे सिद्ध झाले" "घरातले निर्णय घ्यायचीही लायकी त्यांची नाही" असा शोध त्यांनी लावलेला आहे.

उदा. बीजेपीचा प्रोपोगंडा त्यांनी करायला हरकत नाही, पण मग ते तसा करतात, हे दाखवून दिले तर त्यांचा इतका जळफळाट का होतो ते समजत नाही.

यांच्या लिखाणाचा बेस रोजच्या बातम्या इथे डकवणे, कुठलीतरी पुस्तके वाचून त्याचे उतारे डकवणे, वगैरे असतो, अगदी फेसबुकावरल्या मंगूची पोस्टही हे इथे डकवतात. त्यात थोडा पदरचा मसाला घालतात, पण त्यात कोणताही अभ्यास न करता काय वाट्टेल ते दडपून दिलेले असते. मी प्रवचन देतो. मग तुम्ही मला (मी सुचवल्यात त्याच) थोड्या शंका विचारा. मग मला सोयीस्कर शंकांची उत्तरे देत मी पुढची "चर्चा" करीन असे यांचे म्हणणे आहे.

नेहरूंची विनाकारण बदनामी करणारे धागे लागोपाठ दोन दिवस यांनी आणले. राहुल गांधींना पप्पू म्हणणे. ठाकरेंना ठकवणारे म्हणणे वगैरे उद्धटपणा तर सुरूच असतो.

मायबोलीची लेखनसुविधा यांच्या मर्जी/मालकीच्या फेसबुक पेजसारखी चालावी, त्यातले प्रतिसाद उडवायची पॉवर यांना मिळावी अशी यांची इच्छा आहे.

एकंदरितच या महान व्यक्तीमत्वाचे लेखन आमच्यासारख्या अतीसामान्यांना दिसणे बंद करता येईल अशी सोय करता येईल तर बरे होईल.

एकंदरितच या महान व्यक्तीमत्वाचे लेखन आमच्यासारख्या अतीसामान्यांना दिसणे बंद करता येईल अशी सोय करता येईल तर बरे होईल.

>> त्यापेक्शा त्यांचे धागे टिचकी मारून न उघडणे हा सोप्पा उपाय आहे. तो युम्ही का बरे अवलंबित नाही. जसे म्हस्केंचे धागे मी अजिबातच उघडत नाही त्यामुळे म्हस्केंचा मला अजिबात त्रास नाही. ते त्यांच्या जगात आणि मी माझ्या जगात खुशाल आहोत. हाकानाका?

दीड मायबोलीकर, कपोचे, सकुरा, निनाद१,
दीड मायबोलिकर यांनी सुचवलेले "एकंदरितच या महान व्यक्तीमत्वाचे लेखन आमच्यासारख्या अतीसामान्यांना दिसणे बंद करता येईल अशी सोय करता येईल तर बरे होईल." हे मलाही मान्य. मीदेखील केव्हापासून तेच सुचवतो अहे. तुम्ही माझ्या पोस्टवर अाला नाहीत ते बरे होईल. मी तुमच्या एकाही पोस्टवर कमेंट करत नाही, त्यामुळे तुमचे कुठलेच लेखन मी वाचण्याचा प्रश्न नाही, कमेंट करणे तर दूरच.
तरीही मायबोली हा पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, आम्ही येथे येऊन कमेंट करूच, वगैरे आगाऊपणा तुमचाच आहे. तेव्हा आता शहाणपण सुचले आहे असे समजतो.
दीड मायबोलिकर, मी भाजपचे समर्थन करतो असे तुमच्या डोक्यात आहे. तेव्हा ते माझ्या माथ्यावर थोपू नका. पुन्हा एकदा सांगतो तुमच्याकडून एकही सकारात्म कमेंट होत नाही, तुमच्या अर्थहीन कमेंट्सचा प्रतिवाद करण्यात माझाच वेळ फुकट जातो. तेव्हा तुमच्यासारख्यापासून सुटका झाली तर उत्तमच. बेअक्कल हा शब्द निनाद१ यांच्या संबंधित कमेंटमध्ये वापरलेल्या शब्दाला उद्देशून होता. त्याबद्दल तसे लिहिलेही होते. त्याचे भांडवल करण्याचा दळभद्रीपणा तुम्ही केलात त्याचे अजिबात अश्चर्य वाटत नाही.
तुमच्यावाचून कोणाचेही काही अडणार नाही. तुम्ही माझ्याबद्दलही तसेच म्हणाला तरी मला फरक पडणार नाही. तुमच्यासारख्यांची ब्याद टळली तर मला हवेच आहे. येथे माझ्याशी व्यवस्थित संवाद साधणारे अनेकजण अाहेत. त्यामुळे लवकरात लवकर टळा. त्यासाठी अॅडमिनना तसदी द्यायची गरज नाही. तुम्ही स्वत:च येथून निघून गेला तर ते आपोआप होईल.

दीड मायबोलीकर | 23 January, 2016 - 09:41 नवीन
मा. अ‍ॅडमिन,
आपण दिलेल्या वॉर्निंग नंतरही,
यांच्या मतांशी सहमत नसणार्‍यांबद्दल राजेश कुलकर्णी हे वारंवार उद्धट व घाणेरडी भाषा वापरीत आहेत.
<<

@दीड मायबोलीकर
तुम्ही जे इतर सदस्यांना भिकारचो* वगैरे म्हणता ती सभ्य आणि चांगली भाषा असते का हो?

नरेंद्र मोदी जी,

ये रोना धोना बंद कीजिए. आप प्रधानमंत्री हैं देश के. और आप ये क्या कहते हैं कि "कारण कुछ भी हो... मां भारती ने अपना लाल खोया है."

आपकी शिक्षा मंत्री ने 26 दिनों के अंदर तीन चिट्ठियां लिखकर रोहित का सामाजिक बहिष्कार करवाया, और आप कहते हैं कारण कुछ भी हो.

चीफ प्रॉक्टर प्रॉक्टर प्रोफेसर आलोक पांडे संघीय विचारधारा का पब्लिकली समर्थन करते हुए भी बहिष्कार करने के फैसले में शामिल होते हैं, और आप कहते हैं कि कारण कुछ भी हो.

यह यूनिवर्सिटी न तो बंदारू दत्तात्रेय के चुनाव क्षेत्र में है, न शिक्षा उनका विभाग है, फिर भी वे मनुस्मृति ईरानी को चिट्ठी लिखकर बताते हैं कि रोहित जातिवादी है, राष्ट्र विरोधी गतिविधियों में शामिल है, और आप कहते हैं कि कारण कुछ भी हो.

इनमें से एक ने भी इन बातों से इनकार नहीं किया है. इसलिए जांच होने तक इन तीनों को निलंबित रखिए.

वरना आपके रोने धोने का देश क्या करे. आपके तो आंसू भी नहीं निकलते.

साभार- फेबु..

>>>> २०१५ ? अद्याप असे काही घडलेले नाही. ज्याचे मुल्य मापन करावे. <<<<<<
नितिनचंद्रजी, खलिस्तानवाद्यांना पाठबळ ते मुंबईवरील हल्ल्यासहित अनेक घटनांमधुन तसेच सध्याच्या नक्षली/ब्रिगेडींची पाठराखण अन दरम्यानच्या काळात मिडीया/कॉन्गीमधे घुसखोरी करुन कॉन्गीन्चे खरेतर पिढिजात शत्रु असलेल्या कम्युनिस्टांशी त्यांची हातमिळवणि घडवुन आणण्यापर्यंत जे काही धागेदोरे पसरलेले आहेत ते एका छुप्या युद्धाचाच भाग आहेत. (हे माझे मत आहे).

Pages