राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

अ‍ॅडमिन, कोणाची भाषा जास्त उद्दामपणाची, आक्रमक, विखारी, चिथावणीखोर, इ. आहे ते पाहून योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती. धन्यवाद.

झक्की हा आयडी दलित समाजाबद्दल अगदी हीन लिखाण करत असतो. कृपया समज देण्यात यावी.

सत्य आहे. वाईट आहे. मी माफी मागतो.
भारतीयांबद्दलहि वाईट वाईट लिहितो हेहि खरे आहे.

हे वाचून मी थोडे आत्मपरीक्षण केले -
- एकूणच मायबोली ही फक्त भारतीयांसाठीच आहे, जगभरातल्या सगळ्या मराठी भाषिकांसाठी आहे ही मूळ कल्पना आता भारतातल्या लोकांनी नाकारली आहे.
- एकूणच भारत नि तिथले लोक यांचा मला तिटकारा येतो.
- सुदैवाने माझा आणि त्या दोन्हींचा काहीहि संबंध नाही, दुरूनहि. तेंव्हा असू देत ते कसेहि.

त्यामुळे माझे सदस्यत्व काढून घेतले तरी हरकत नाही. मला मान्य आहे.
उगाच सत्राशे साठ उपद्व्याप करून दुसर्‍या आय डी ने इथे येणे असले प्रकार करण्याएव्हढा इंटरेस्ट नाही मला या दोन्ही समाजांमधे. जे माझे इथे मित्र आहेत त्यांच्याशी मी इतर मार्गाने संपर्क साधू शकतो. मायबोलीची आवश्यकता नाही.

अहो लोक सत्राशे साठ उपद्व्याप करतात आणि तुम्ही सत्राशे सत्तर करूनही तुमचे सदस्यत्त्व मूळ आयडीने शाबूत आहे इथेच खरी गोम आहे.
बाकी भारत आणि भारतीय यांनी तुमचे मन वीटले असेल तर तुम्ही निदान सार्वजनिकरित्यातरी या दोन्हींबद्दल कुठली उद्दाम विधाने न करणेच उत्तम!
आगामी माबोविरहीत जनसंपर्काबद्दल शुभेच्छा!

बाकी भारतीय आणि दलित यांच्याशी संबंध नसतानाही
भारतीयांविषयी 'ते आळशी आहेत, उर्मट आहेत, घाणेरडे आहेत , कामचोर आहेत, बाई दिसली रे दिसली की बलात्कार करतात' अशी विधाने
आणि दलितांविषयी-
'पूण्यातले अस्पृश्य सुद्धा इंग्रजीतच बोलतात' ' ट्राँबेचा मुख्य एखाद्या दलिताला करा - दोन अडिच हजार वर्षांची शांतता'
अशी विधाने छातीठोकपणे बरी करता येतात तुम्हाला.

बलिदान या धाग्यावर हे महाशय आरक्षण मागणारे भिक्कारडे असे बोलले होते.
जसे लोकं यांच्याकडे आरक्षण मागायला गेले होते.

अहो पण इतरांना ते परम हुश्शार, परमपवित्रं, सकलज्ञानी इ. इ. वाटतात ना!
मायबोली अमेरिकेत स्थापन झाली आणि हे पहिल्यापासून सदस्य त्यामुळे बाकीचे नंतर आलेले आणि भारतात राहणारे यांच्या मनातल्या माबोवर्णौतरंडीवर शेवटच्या पायरीवर.
भारतात रहाणारे पण संघिष्ट बिंघिष्ट असाल तर जरा वरच्या पायरीवर.
Happy

आणि यांचे भारतातले भक्त कोण तर 'भारतात काही राम नाही, संधी मिळाले की लगेच परदेशी जातो' असे बडवणारे मंदसे लोक!
Happy

अहो लोक सत्राशे साठ उपद्व्याप करतात आणि तुम्ही सत्राशे सत्तर करूनही तुमचे सदस्यत्त्व मूळ आयडीने शाबूत आहे इथेच खरी गोम आहे

सहमत.

झक्की यांची शैली उपरोधिक आहे. मला ही शैली विलक्षण आवडते. पण या शैलीत लिहील्याने तेच मत अंतिम समजून एका मित्राचा आयडी वारंवार बॅन होत आलेला आहे. म्हणजे तशी आत्मघातकीच आहे शैली.

पण बलात्काराबाबतचं मत उपरोधिक आहे असं वाटत नाही. भारतात प्रत्येक पुरूष बलात्कार करत असता तर काय झालं असतं ? त्यांच्या मताचा प्रतिवाद करायचा नाहीय. खरं म्हणजे त्यांच्या मताचा प्रतिवाद करायला पाहीजे असं नाही. गावात एखादं खडूस म्हातारं असतं, त्याला येणा-या जाणा-याची खोड काढायची सवय असते. काही दिवसांनी लोकांना त्याची सवय होते आणि म्हाता-यालाही या सवयीची सवय होऊन जाते. थोडक्यात, चालवून घेतलं जातं.

एखाद्या वेळी जर एकापेक्षा जास्त गावक-यांना त्याचा राग आला तर मात्र विलक्षण परिस्थिती निर्माण होते तशी आता झालीय की काय असं वाटतं . माझ्या मते झक्की कुठल्याही गटाचे नाहीत. ते बिनधास्त लिहीत असतात. भारतात असं बिनधास्त लिहीता यावं असं वातावरण असावं अशी खूप इच्छा आहे. पण भारतातल्या सामाजिक परिस्थितीचा आरसा दाखवला म्हणून विचारवंतांच्या हत्या होतात. या असहिष्णुतेबाबत आवाज उठवला तर ते ही सहन न होण्यासारखे लोक आहेत आणि ते सर्वच्या सर्व फॅसिस्ट आहेत. झक्कींनी यावर लिहावं किंवा नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.

बाकी दलितांबद्दल व्यक्त केलेली मतं सहन व्हावीत असं वातावरण भारतात नाही. युरोप अमेरिकेतली जी प्रगल्भता आहे ती येण्यात भारतियांचं कोणतंही योगदान नाही. रॅशनल थिकींग आपल्याकडे ब्रिटीश आल्याने सुरू झालं. नसते आले तर आपण तेच ते निरुपयोगी शिक्षण घेत बसलो असतो. जागतिक ज्ञानाला आपली कवाडं बंदच राहिली असती असं आता नक्कीच म्हणता येतंय.

तेव्हां अमेरिकेची प्रगती झाली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेऊन आपल्या मायदेशातल्या लोकांना बोल लावण्यात कसला आलाय भीमपराक्रम ? पण तरीही झक्कींच्या लिखाणाचं आकर्षण आसल्याने प्रतिवाद करावासा वातत नाही हे ही खरंच. त्यांनी लिहीत रहावं. असं वातावरण देशातही उपलब्ध व्हावं ही कळकळीची इच्छा !

किती तो तळतळाट साती!! Happy
राजकीय बीबीवर डुआयडीने वाट्टेल त्या भाषेत नथीतून तीर मारणार्‍या शूर वीरांपेक्षा बरे आहेत. आपल्या आयडीने चूक, बरोबर, चांगलं, वाईट तरी लिहितात. मान्य त्यांची प्रत्येक पोस्ट पटण्या/आवडण्यासारखी असेल असं नाही पण ती तशी कुणाची असते? सगळ्या गोष्टी पर्सनली अंगाला लावून घेण्याचं कारण नाही.

आज कि नै, आमच्या यांनी सहा तोळ्याचा हार आणलाय, पाडव्यासाठी ! सरप्राईझ म्हणून Proud
,
,
,
,
,
,
,
,
चोरून उघडून पाहिलं गिफ्ट तर तूरडाळीचा हार Sad

माझा हा एकमेव आयडी आहे मायबोलीवर.
दुसरा आयडी प्रशासक देत नाहीत. त्यांच्यावर कोण कारवाई करणार ? Proud

सायोनारा Happy

ताणतणावातून मुक्तता हवीशी वाटली तर मायबोलीवरील झक्कींच्या पोस्ट्स आणि प्रशासकांच्या विपूत आलेल्या काही विपू वाचणे हा एक छान उपाय आहे. झक्कींनी मुद्दाम केलेली थट्टा गंभीरपणे घेणे हे कशाचे लक्षण आहे ते येथे लिहायचेच म्हंटले तर मूळ धाग्यातील सूचनेचेच उल्लंघन केल्यासारखे होईल. Happy तसे ते इतर धाग्यावरही मी करत नाही म्हणा!

मला समजलेले झक्की कसे आहेत ते काही नवीन मायबोलीकरांना माहीत करून द्यावे म्हणून मी झक्कींबाबतचे मी लिहिलेले दोन धागे वर आणले. झक्की जेव्हा भारतीय आणि भारतावर टीका करतात तेव्हा ते भारतातून सध्या येणार्‍या बातम्यांमुळे त्यांना आलेला उबग व राग व्यक्त करत असतात. कुठेतरी ते भारताबद्दल काहीतरी चांगले शोधायचा प्रयत्न करत असतात पण ते मिळत नसल्यामुळे ते मुद्दाम अश्या कडवट प्रतिक्रिया देत असतात. माझे हे म्हणणे स्वतः झक्कींनाच पटत नसेल तर माझी चूक होत असेल.

बाकी 'झक्की' ह्याच आय डी च्या अश्या पोस्ट्सना इतके का कव्हर केले जाते? असे जर कोणाच्या मनात असेल तर (पुन्हा, माझ्या मनातले व काल्पनिक) उत्तर असे की ते व्यक्तीशः कोणालाही दुखवत नाहीत. ते एका अख्ख्या गटाला उद्देशून जे लिहायचे ते लिहितात. (पुन्हा, अपवाद असलेच तर ते अपवाद म्हणून असतील).

सायो, एखाद दुसरी वेळ असली तर इतका तळतळाट झाला नसता गं!
पण 'ते एक छान गंमतीशीर लिहितात' या आड त्यांची सगळी वक्तव्ये दडून जातात.
आणि त्यांना जनाची मनाची काहीच नसल्याने कधी आपले प्रतिसाद गुपचूप मॉडिफाय करून तर कधी वरकरणी माफी मागून तर कधी 'मला असे नाही तसे म्हणायचेय हो 'असे कांगावे करून ते अलगद्सुटतात.

तुमच्या प्रत्यक्ष संपर्कात असल्याने ते खरोखरच कसे आहेत हे तुम्हाला माहितही असेल पण आम्ही केवळ त्यांचे प्रतिसाद वाचतो आणि त्यावरून तर ते दलित आणि एकंदर भारतीयांविषयी आकस असणारे एक खडूस जातीयवादी आजोबा वाटतात. Happy

बाकी राजकीय धाग्यांवरच्या ड्यू आय डींपेक्षा यांचे वक्तव्य शुद्ध भाषेत लिहिलेले असते म्हणून त्यांना चांगले म्हणणे मला तरी शक्य नाही.
आणि ते मूळ आय डी ने लिहितात याचे कारण त्यांनी कितीही अचकट विचकट लिहिले तरी त्यांचा हा आय डी उडत नाही हे आहे.
त्यात त्यांचे कर्तृत्व काही नाही.
Wink

पण उद्या खाकी चड्डीवाले आणि त्यांच्या ब्रह्मचर्याबद्दल वादग्रस्त पोस्ट आली तर ती देखील खिलाडूपणे लोक घेतीलच Happy

देवळातले पुजारी बलात्कार करतात अशा अर्थाचे वाक्यही लोकांनी चालवून घ्यावे. असा माझ्या वरच्या पोष्टीचा अर्थ कुणी काढला तर तो नाकारता येणार नाही. खरंच असं झालं तर लोक चालवून घेतील. अनुपम खेर यांनी नाही का मोर्चा काढला अगदी तस्स्सं !!

>> त्यांना जनाची मनाची काहीच नसल्याने>> त्यांनी एक जनरलाईज्ड स्टेटमेंट केलं आणि तुम्हां मंडळींचा तीळपापड झाला लगेच. पण इथे तर तू पर्सनल अटॅक करायलाही मागेपुढे पाहिलेलं नाहीस की. हे आलं का लक्षात? Wink

Tumha lokankade diwali nahi ka?
Kiman ya diwasanmadhe tari he sagale khel khelu naka...
Uralele ३६० diwas ahetach hech sagal karayala.
Mabocha diwali ank nahi tar kiman ithala vavar tari prasanna theva ki

सायो, एकाच व्यक्तीवर दोषारोपण करायचे असल्याने ते वैयक्तिकच होणार ना!

मला काही 'काही अमेरिकन भारतीय' 'स्वतःच्या पोटासाठी भारत सोडून गेलेले तरी उगाच भारताला नावे ठेवणारे'
असे अमेरिकेत रहाणार्‍या सगळ्यांबद्दल म्हणायचे नाहीये.
एका झक्कींपायी मला अमेरिकन भारतीय जनसमुदाय टारगेट करायचाच नाहीये.
म्हणून पर्सनल अ‍ॅटॅक.

रिया, तू अगदी 'दिवाळीत तरी मांसाहार करू नका रे' टाईप पोस्ट टाकलीयस. Happy
यू कॅन इग्नोअर ऑल डिस्कशन इफ इट डजन्ट कन्सर्न यू.

Nakkich Sati pan kantala alay ya sagalyacha mhanun mhanala kiman kahi tari bar wachayala milav ya diwalit...
Aso chalu dya tumach

रीया,

ही पोस्ट तुला आणखी एका पानावर टाकता येईल, वेळ असला तर Wink

पण तिथे ते 'दादा' तुझे स्वागत करतात त्यामुळे नांव सांगत नाही पानाचं Happy

Bhushan Dada , honestly mazyashi pratyek panawar changalch bolal jaat ani jya panawar ha asala prakar chalu asato tikde mi firakat nahi farashi.
Aaj faravh vaitag ala mhanun lihil.

Sati, Nandini chya bb madhale online ank vachun zale. Anakhi link se asatil tar

साती तुम्ही उगाच झक्कींना शब्दश: वाचता. पण त्यातला उपरोध पहा.
तुम्ही स्वतःही इतके छान अभ्यासपूर्ण लिहिता की यावेळेस तुमचा त्रागा मला जरा आश्चर्यकारक वाटला. विचार करा.
तुम्हा दोघांहीमुळे मायबोली प्रगल्भ वाटते.

अर्थात जाती पाती, भारत_अमेरिका अथवा तत्सम वैचारीक बाबतीवर लिहीण्याचा माझा अधिकार नाही. पण तरिही मला असे वाटते की जे स्वतः सच्चे आहेत त्यांना बोलू द्द्यावे. तुम्ही आणि ते. दोघेही. अगदी तुम्ही आणि ते असले तरी.

कळावे, लोभ असावा. आपला नम्र

(मी कधी कधीच लिहीतो पण मनापासून लिहीतो. बाजू न घेता. कारण मला माहिती आहे. कुठलिही बाजू सरळ नसते कारण स्वतः पृथ्वी गोल आहे)

असो.

Sati yea Happy

मी प्रकाशकांना विनंति करतो की मायबोलीच्या नि मायबोलीच्या प्रशासकांच्या हिताच्या दृष्टीने मायबोलीवरून माझा आय डी रद्द करावा.

सार्वजनिक ऑन लाईन लिखाणाबाबत भारतात काय लिखित, अलिखित नियम आहेत ते मला माहित नसल्याने मी इथे न लिहीणेच बरे.

धन्यवाद.

Pages