राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

झक्की, अहो कॉमेडी आहात का तुम्ही? अवो उद्या कोणीही उठेल अन काहीही आक्षेप घेइल. अ‍ॅडमीननी येऊन तुम्हाला सांगतलय का, भाषेकडे लक्ष द्या म्हणून? ते म्हणतील तेव्हा हवा तो बदल करा किंवा नाही रुचलं तुम्हाला तर मग रद्द करायला सांगा. जगनमिथ्या वगैरे विसरलात की काय? Happy

झक्की, अजून एक. समजा कुठे तुमच्याकडून आक्षेपार्ह बोललं गेलं असेल (अ‍ॅडमीन तसं म्हंटले तर) तर थोडा बदल करण्यात काय हरकत आहे? त्यात चिडण्यासारखं आणि निघून जाण्या सारखं काय आहे? Happy

ह्या वरच्या डुआय लोकांकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे वरचे मोगा स्वतः वाट्टेल ते लिहित असतात कुणाची तमा न बाळगता. त्यांचा अपमान बिपमान मुळ्ळीच झालेला नाही तेव्हा इग्नोअर मारा त्यांच्याकडे.

<<मी प्रकाशकांना विनंति करतो की मायबोलीच्या नि मायबोलीच्या प्रशासकांच्या हिताच्या दृष्टीने मायबोलीवरून माझा आय डी रद्द करावा. >>
----- हे तुम्ही कुठल्या आधारावर, निकषावर ठरवले ?

सर्वान्ना दिवाळीच्या शुभेच्छा.... Happy

बाकी दलितांबद्दल व्यक्त केलेली मतं सहन व्हावीत असं वातावरण भारतात नाही. युरोप अमेरिकेतली जी प्रगल्भता आहे ती येण्यात भारतियांचं कोणतंही योगदान नाही.
>>>>

वरील चर्चेत मला सारे संदर्भ माहीत नसल्याने त्याबाबत काहीच बोलायचे नाही.
पण हे एक वाक्य ईंटरेस्टींग वाटले.
नेमके काय आणि कसे वातावरण परदेशांत आहे हे उलगडून सांगाल का. कारण परदेशांत वर्णभेदांवर काही कॉमेंट केली की खूप लफडे होतात असे मी ऐकून आहे.

>>ह्या वरच्या डुआय लोकांकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे वरचे मोगा स्वतः वाट्टेल ते लिहित असतात कुणाची
>>तमा न बाळगता. त्यांचा अपमान बिपमान मुळ्ळीच झालेला नाही तेव्हा इग्नोअर मारा त्यांच्याकडे.

सायो +१
मोगा या आयडीने इतर आयडीच्या भाषेबद्दल बोलणे म्हणजे तर उद्दामपणाचा कळसच !

नंद्या, झक्कींचा आयडी आता गेला आहे. त्यांनी स्वतःच तशी विनंती केल्यामुळे असेल किंवा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच मुहूर्त मिळाल्यामुळे असेल.
गेल्या आठवड्यात आणखी एका आयडीने माझा आयडी रद्द करा अशी विनंती केली होती विपुत. तो आयडी मात्र अजून अ‍ॅक्टिव दिसतोय. मग झक्कींची मागणी लगेच स्विकारली का बरं गेली असावी? सायबर सेलकडून प्रेशर आलं असावं का? एफबीआयने काँटॅक्ट केला असावा का असे बरेच अनुत्तरीत प्रश्न. Proud
(ज्यांना माहिती नाही त्यांच्याकरता- सायबर सेल भारतात आणि एफबीआय अमेरिकेत. आज कुठेतरी कोणीतरी म्हणालं की झक्कींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणून. मज्जाच सगळी)

झक्कींनी "त्या" कमेंटची जबाबदारी स्विकारुन माबोला रामराम ठोकलाय असं दिसतंय. पण त्याने मुळ प्रश्न सुटणार आहे का? इथे जरा कुठे खुट्ट झालं कि बत्ती लावली जाते, टाॅलरंस लगेच गळुन पडतो आणि स्कोर सेटलिंगच्या फैरी झडायला सुरुवात होते.

हे असंच चालु रहाणार; बाहेर पडुन झक्कींनी स्वत:पुरता या प्राॅब्लेमचा निकाल लावलेला आहे...

एखादा आइडी काढला गेल्यावर १) त्याचे अगदरचे लिखाणही उडवतात का? २) जुन्या लिखाणावरचे त्याचे नाव हाइलाइट होत नाही का?

इकडची/तिकडची प्रगल्भता /ऋ
परदेशी पर्यटकांना गाइडलोक मुद्दामहून महालक्ष्मी पुलावर नेतात झोपडपट्टीचे फोटो काढण्यासाठी तसे तिकडेही अपटाऊनला नेले जाते का?

आपल्याकडे असमान समाजजीवनामुळे जो असंतोष खदखदत आहे तो बोलण्यातून आणि कृतीतून उफाळून येतोच परंतू एक जण बोलला की कारवाई होते ,वजनदार नेते करतात तेव्हा होत नाही.

झक्की यान्चा आय डी गेला... Sad

मस्करी मधे लिहीलेले आणि जाणतेपणी मुद्दाम खिजवण्यासाठी लिहीलेले यातला फरक सर्वान्नाच समजेल असे नाही. आपण ज्या एका उद्देशाने (निर्मल भावनेने) येथे लिहीतो, त्या लिहीण्याचा लेखकाला अभिप्रेत असलेलाच अर्थ लावला जाईल असे नाही. तुम्ही थट्टा मस्करीच्या भावनेने लिहीलेले आहे, पण अदृष्य, अपरिचित अशा वाचकाची आकलनशक्ती तुम्हाला माहित नाही, लेखकाला वाचकाचे आकलन कळण्याची सुताराम शक्यता नाही... मग अनेक अर्थ निघण्याचा धोका सम्भवतो.

थट्टा जरुर करा पण त्याने ज्या व्यक्तीची, जातीची, धर्माची थट्टा होते आहे त्याना दुरान्वयेही दुखवता कामा नाही... त्यान्ना पण थट्टेत सहजगत्या सामिल होता यायला हवे असा थट्टा करण्याचा स्तर ठेवा... जबाबदारी थट्टा (येथे लिहीणार्‍याची) करणार्‍याची आहे.

झक्की यान्चा आय डी रद्द झाल्यामुळे मला वाईट वाटले. अनेक वर्षान्ची त्यान्ची येथिल सेवा, लेखन, टिप्पणी लक्षात रहिल... त्यान्ना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा... गुड बाय झक्की. Happy

पूर्वी ऑफीसचं काम करता करता माबोटाईम करणा-यांसाठी खट्टी बातमी आहे.
संशोधनक्षेत्रात काम करणा-या काही माबोकरांना सुरक्षिततेच्या कारणांसाठी ऑफीसचं उरलेलं काम घरी नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे आता घरी माबोच्या वेळेत फक्त माबो (किंवा फेसबुक इ)

खाजगी क्षेत्रातल्या काहींना त्यांच्या घरच्यांनी ऑफीसचं काम करण्यास बंदी घातली आहे. थोडक्यात घरी आल्यानंतर माबोच्या वेळेत फक्त माबोच. चहासोबत चटपटीत तोंडात टाकण्याची सवय असणा-यांना फक्त चहा घ्या असं म्हटल्यावर कसं होईल तशी अवस्था झालीय काही लोकांची.

ऑफीसच्या खर्चाने नेट वापरणा-या काटक(स)र लोकांना मात्र काहीच फर्क पडलेला नाही. असे लोक शक्यतो संध्याकाळी आणि वीकेण्डला दिसत नाहीत.

तरी याबाबतीत प्रशासकांनी लक्ष घालून अन्याय दूर करावा ही विनंती.

अ‍ॅडमिननी झक्की ऐवजी वर जे खोटे आयडी आहेत त्यांना उडवायला हवे होते पण एका चांगल्या आयडीला उडवून अनेकांची मने इथे दुखावली आहेत. कदाचित झक्कींनीच प्रशासकांना विनंती केली असेल म्हणून इतक्या लवकर झक्कींचा आयडी डिसेबल झाला.

प्रशासक प्लीज त्यांचा आयडी परत ऐनेबल कराल का?

झक्की तुम्ही इथे खर्‍या आयडींचे लाडके आहात. प्लीज परत या. इथल्या खोट्या आयडीजना तुम्ही उत्तर द्यायचेच नव्हते.

मी झक्कीला प्रश्न विचारलाच नव्हता.

मी प्रश्न / विनंती अ‍ॅडमिनला केली होती. त्यानी योग्य तो रिप्लाय दिलेला आहे.

झक्कींचा आयडी गेला त्याहीपेक्षा त्या आधी जो गदारोळ इथे उठवला गेला तो थक्क करणारा आहे.

साती सारख्या आयडीकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. झक्की काहीबाही बोलतात म्हणून त्यांच्या नावानं खडे फोडणारे काही आयडी आहेत. ते आयडी स्वतः काय तारे तोड्त असतात तो विषय वेगळाच. पण साती यु टू?

जनरली, उपरोधात्मक लिहिलेलं, डार्क ह्युमर टाईपच्या त्यांच्या पोस्टी असत असं मला वाटतं. (इथे मी सांगू इच्छिते की मी झक्कींना पर्सनली ओळखत नाही, त्यांना भेटलेले नाही, झक्कींनी मला त्यांच्या पैशानं दारू पाजलेली नाही, इतकंच काय त्यांच्याशी कधी मायबोलीवरही बोलण्याची वेळ आली नाही. किंबहुना मामी नावाचा कोणी आयडी आहे याची देखिल कदाचित त्यांना कल्पना नसेल.)

केवळ ते अमेरिकेत आहेत या कारणानं त्यांनी भारताबद्दल केलेली विधानं नेहमीच काँट्रोव्हर्शियल ठरत गेली. काय चुकीचं बोलत होते ते? भारत महान आहे आणि त्याबद्दल कोणीही (विशेषतः अमेरिकेत रहात असलेल्यांनी) बोलू नये अशी भुमिका का घेतली जाते? ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या मान्य करायला काय हरकत आहे?

अमेरिकेत गेले म्हणजे काहीतरी भयानक चूक केली आहे. ते स्वार्थीच आहेत, भावनाशून्यच आहेत, त्यांना भारतातले प्रश्न कळत नाहीत अशा अनेक कमेंटस अनेकदा पाहिल्या आहेत. जे अमेरिकेतून मायबोलीवर येतात त्यांची पाळंमुळं इथलीच आहेत. त्यांचे आईबापही अजून भारतातच आहेत. ते अजूनही नित्यनेमानं भारतात येतात. इथल्या बातम्या ते वाचतात. त्यांना का अधिकार नाही भारताबद्दल बोलण्याचा? त्यांच्या बोलण्यात भारत आणि अमेरिका अशी तुलना आली की लोकं का चवताळतात इतकी? कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य दिसतं म्हणून?

दलितांबद्दल बोलू नये. मग ब्राह्मणांबद्दल वाट्टेल ते बोलतात त्याबद्दल का आवाज उठवला जात नाही? (मी ब्राह्मण नाही) जाती ऐवजी आर्थिक, सामाजिक निकष लावून त्या लोकांना फायदे द्या अशी भुमिका घेतली आहे का तुम्ही? (तुम्ही म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही.) नाही ना? जोवर जातीवरून राजकारण सुरू आहे, जातीचा दाखला दाखवून फायदे उठवले जात आहेत तोवर कोणी केवळ दुसर्‍या बाजूनं बोलला तर त्याचं इतकं भांडवल करून तमाशा का केला गेला?

कोणी देशाबद्दल, जातीबद्दल बोललं तर इतकं दुखावलं जाणं म्हणजे स्वतःला कॉम्लेक्स आहे हे दाखवून देणं आहे. जेव्हा स्वतःबद्दल असा गंड असतो तेव्हा दुसर्‍यानं काही बोललं म्हणजे मग ते भलतंच लागतं. वैचारिक मॅच्युरिटी कधी येणार?

बरं झक्कींबद्दल तक्रार करणारे किती संत महात्मे आहेत आणि त्यांचे हे कितवे जन्म आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.

झक्कींना राजीनामा देण्यास भाग पाडणार्‍यांचा मी निषेध करत आहे.

दलितांबद्दल बोलू नये. मग ब्राह्मणांबद्दल वाट्टेल ते बोलतात त्याबद्दल का आवाज उठवला जात नाही? (मी ब्राह्मण नाही) जाती ऐवजी आर्थिक, सामाजिक निकष लावून त्या लोकांना फायदे द्या अशी भुमिका घेतली आहे का तुम्ही? (तुम्ही म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही.) नाही ना? जोवर जातीवरून राजकारण सुरू आहे, जातीचा दाखला दाखवून फायदे उठवले जात आहेत तोवर कोणी केवळ दुसर्‍या बाजूनं बोलला तर त्याचं इतकं भांडवल करून तमाशा का केला गेला? >>>

वेगळा बाफ सुरू करावा, इथे त्यावर चर्चा करणे योग्य नाही. ही मतं खोडून काढणे अशक्य नाही.
मामी
लॉजिक तर गंडलं आहेच. पण देशात कुणाच्या हत्या होतात यावर थोडा वेळ काढून गुगल सर्च करा. त्या का झाल्यात याची कारणे कुणी समजावून सांगण्याचीही आवश्यकता पडणार नाही. बाकी आरक्षण कशासाठी याचा इतिहास माहीत नसल्यास सांगता येईल. ही माहीती दिल्यानंतर मतं बदलण्याची तयारी असेल का एव्हढाच प्रश्न आहे. ते या धाग्यावर मांडता येईल काय ?

उदाहरण म्हणून सांगता येइल..

दिल्लीतल्या निर्भया कांडाच्या वेळी स्त्रियांच्या ज्या भावना असतात त्या दलित हत्यांच्या बाबतीत आणि अन्यायाच्या बाबतीत दलितांच्या असू शकतात यावर विश्वास आहे का ? निर्भया हत्याकांडाच्या वेळी संपूर्ण देश एक होता. मात्र खैरलांजी हत्याकांडात स्त्री शरीराची त्याही पुढे विटंबना झाली आणि क्रौर्याने कळस गाठला. या प्रकरणात एकाच गटाने अस्वस्थ व्हावं याला आणखी काय म्हणणार ? फायदे उपटणं. बरं हे एकच प्रकरण आहे का ?

आत्ता लेटेस्ट प्रकरण आहे, फरीद्बादचं. कुत्ते को पत्थर मारा तो वालं. त्या नंतर दोन दिवसात दलिताच्या मुलाने वरच्या जातीतल्या मुलीशी लग्न केलं म्हणून त्या परिवारातल्या सर्व स्त्रियांना नग्न करून भर बाजारात धिंड काढली. पोलीस फक्त बघत होते. एफआयआर दआरल करायला गेल्यावर त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची धमकी दिली गेली.

काय झालंय विवेकाला ?
एक आयडी ज्याने वादग्रस्त वक्तव्य केलंय हे प्रशासनाला पटले असेल तर कांगावा कशासाठी ? निरर्थक कारणांसाठी उडवले गेलेले आयडीज नाहीतच कि काय मग ?

>>>>>> रॅशनल थिकींग आपल्याकडे ब्रिटीश आल्याने सुरू झालं. नसते आले तर आपण तेच ते निरुपयोगी शिक्षण घेत बसलो असतो. जागतिक ज्ञानाला आपली कवाडं बंदच राहिली असती असं आता नक्कीच म्हणता येतंय. <<<<<<
एकीकडे म्हणायचे की "अमकेतमके शिक्षण देत नव्हते," अन दुसरीकडे म्हणायचे की तेच ते निरुपयोगि(?) शिक्षण घेत बसलो असतो..... गम्मत वाटली.
इंग्रज यायच्या आधीही सुताराचा मुलगा बापाला गुरु मानुन सुतारकीचे शिक्षण घेऊन उपजिविका करीतच होता, व हेच बारा बलुत्यांबद्दल वा गावगाड्याबद्दल चालत होते. ते शिक्षण तेव्हाच काय, आजही उपयुक्तच आहे. पण म्हणतात ना, कशाचाही कुठेही संबंध लावायचा म्हणल्यावर..... जौद्या...

तिकडे मोदींविरुद्ध आग ओकणे, इकडे मायबोलीवर झक्कींविरुद्ध.... समान सुत्र वा रिहर्सल दिसते आहे Proud
बाकी झक्कींसारखी व्यक्तिमत्वे बाहेर पडू लागली असतील्/बाहेर पाडली जात असतील, तर लौकरच विघ्नसंतोष्यांमुळे माबोला टाळे लागण्याची शक्यता बळावते आहे हे निश्चित.
असो. कालाय तस्मै नमः...

हेमाशेपो, मला वेगळा बाफ काढून राजकारणाचं दळण दळण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे क्षमस्व.

इथल्या धुरंधर राजकारणी टिप्पणीकारांनी तलवारी घेऊन कितीही हाणामारी केली तरी जे देशाचं राजकारण करत आहेत त्यांना काहीही फरक पडत नाही हे सत्य मला माहित आहे. आणि मला कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल सहानुभुती नाही.

दळण दळू नका. आक्षेपार्ह मतं असल्याने खोडता येतील इतकंच म्हटलंय. ती मतं मांडण्याचं ठिकाण हे नव्हे.
उद्या कुणी स्त्रियांबद्दल अनुदार उद्गार काढले तर असेच सौजन्य दाखवण्यात यावे म्हणजे काव्योचित न्याय होईल.

मामी प्रत्येक वाक्याशी सहमत.
हेच लिहायचे होते. पण या डुआयड्यांनी जो काही बाजार मांडला आहे त्यात माबोवर कुठेही काहीही लिहावेसे वाटत नाही आहे.
आपला आयडी जाणार आहे तोपर्यंत काहीही लिहुन घ्या असा यांचा नविन प्रोटोकॉल आहे.
त्यात येथिल प्रथितयश समजले जाणारे आयडी सामिल आहेत. त्या सगळ्यांचा खरा चेहरा वेगळाच आहे हे हळुहळू सगळ्यांना कळत आहे.
जर एका समुहाबद्दाल अपशब्द बोलणे चुक तर तेच दुस-या कोणत्याही समुहाबद्दल ही बोल्णे चुक नाही का? त्याबद्दल या प्रथितयश समाजसुधारकांनी कधी ब्र काढल्याचे वाचनात नाही. (मी ही ब्राम्हण नाही.)
हा भेदभाव फक्त समुहाबद्दल नसुन, पक्ष, विचारसरणी, व्यक्ती, ईतिहास आणि संस्कृती या सगळ्यांबाबात केला जातो आहे. हे सगळे करणारे खर्या आयुष्यात मान सन्मान मिळनारे पेशातील व्यक्ती आहेत. त्यामुळे येथील भोळे लोक त्यांना चांगले आणि हुशार समजतात. हे अगदी चित्रपटातील हिरो म्हणजे चांगला आणि खलनायक म्हणजे प्रत्यक्ष्य आयुष्यात वाईट व्यक्ती असे समजणा-या भोळ्या लोकांप्रमाणेच होत आहे.
तरीही आता या प्रथितयश दुट्टपी लोकांच्या बाजुने इथलेच जाणते भोळेपणाने वकिली करायलाय येतील याचे वाईट वाटते.

बाकी झक्कींसारखी व्यक्तिमत्वे बाहेर पडू लागली असतील्/बाहेर पाडली जात असतील, तर लौकरच विघ्नसंतोष्यांमुळे माबोला टाळे लागण्याची शक्यता बळावते आहे हे निश्चित.
>>
+१

एक आयडी ज्याने वादग्रस्त वक्तव्य केलंय हे प्रशासनाला पटले असेल तर कांगावा कशासाठी ?

सहमत. लिखाण आक्षेपार्ह होतं म्हणूनच कारवाई झाली. तक्रार करणार्‍याना बदनाम करण्याचं किंवा झक्कीला धर्मवीर हुतात्मा बनवण्याचं नाटक कृपया करू नये.

वर स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे....

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे

झक्कींप्रमाणेच माझाही आयडी काही दिवस गोठवण्यात यावा ही नम्र विनंती.
??
Happy
त्यापेक्षा आपणच काही दिवस उपवास केला तरी चालेल. प्रशासकांना कशाला हत्येचे पातक ?

Pages