राजकीय आणि वैयक्तिक शेरेबाजीबाबत सूचना

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीवर सातत्यानं राजकीय चर्चांना चुकीचं वळण लागण्याच्या घटना घडत आहेत. शिवराळ भाषेचा वापर केला जात आहे. असे प्रतिसाद शक्यतोवर काढून टाकण्यात आले आहेत किंवा ते धागे वाहते केले आहेत.

मायबोलीच्या वावराच्या नियमांमध्ये भाषेच्या वापराबद्दल स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठल्याही जाती / धर्म / वंश / वर्ण यांच्याबद्दल कुठल्याही सदस्याचे अवमानकारक / बदनामीकारक लेखन आढळल्यास त्या सदस्याचे खाते गोठवण्यात येईल, हे वारंवार स्पष्ट करूनही काही मायबोलीकर सतत अयोग्य भाषेत लिहिताना दिसत आहेत. मायबोलीवरचं वातावरण यामुळे गढूळ होत आहे.

मायबोलीवर राजकीय चर्चांना बंदी नाही. मात्र या चर्चांमध्ये शेलकी विशेषणं वापरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, वैयक्तिक शेरेबाजी करणं हेच प्रकार अधिक घडताना दिसतात. मुद्द्यांवर आधारित चर्चा होताना दिसत नाही. चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.

यापुढे कोणीही कोणत्याही बाफवर अथवा विचारपुशीतून अयोग्य भाषेत चर्चा केल्यास, वैयक्तिक दोषारोप केल्यास, मुद्दाम खिजवण्यासाठी धागे काढल्यास तसेच विषयाशी संबंधित नसलेले अवांतर प्रतिसाद दिल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता त्या सदस्याचं सदस्यत्व ताबडतोब रद्द करण्यात येईल. हे आत्ताच का, अशी शंका घेण्याचं कारण नाही कारण जेव्हा जेव्हा असे प्रतिसाद वाढतात, तेव्हा सूचना देऊन कार्यवाही केली आहे.

विषय: 
प्रकार: 

बेफिकीर, अ‍ॅडमिन टीमने चर्चेला प्रतिबंध केला नाहिये. काही आयडी स्वतःवर कंट्रोल नसल्यागत नळावरच्या भांडणांचं स्वरुप धाग्यांना देत होते त्या स्वरुपाला प्रतिबंध घातला आहे. टीआरपीसाठी असं स्वरुप मायबोलीवर स्वीकारणं हे त्यांना योग्य वाटत नसेल. चर्चेच्या क्वालिटीला ते महत्व देत असतील. १३ एपिसोडची लघूकथांवर बेतलेली एखादी मालिका टीआरपी जास्त मिळवत नसली तरी ५ वर्षं चालणार्‍या जबर टीआरपी खेचणार्‍या फालतू मालिकेपेक्षा खरी कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळवून देतेच ना?

>>> अश्विनी के | 12 August, 2014 - 21:57 नवीन

बेफिकीर, अ‍ॅडमिन टीमने चर्चेला प्रतिबंध केला नाहिये. काही आयडी स्वतःवर कंट्रोल नसल्यागत नळावरच्या भांडणांचं स्वरुप धाग्यांना देत होते त्या स्वरुपाला प्रतिबंध घातला आहे. टीआरपीसाठी असं स्वरुप मायबोलीवर स्वीकारणं हे त्यांना योग्य वाटत नसेल. चर्चेच्या क्वालिटीला ते महत्व देत असतील. १३ एपिसोडची लघूकथांवर बेतलेली एखादी मालिका टीआरपी जास्त मिळवत नसली तरी ५ वर्षं चालणार्‍या जबर टीआरपी खेचणार्‍या फालतू मालिकेपेक्षा खरी कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळवून देतेच ना?
<<<

अश्विनी के,

छान प्रतिसाद! Happy

माझी नम्र मते:

मराठी ही भाषा भारतीय आहे. संकेतस्थळ कोणत्या देशातून निर्माण केले गेले हा वेगळा विषय आहे, वाचणारे भारतीय भाषेतून भारतात असलेल्यांची किंवा भारतात नसलेल्यांची मराठी भाषेतील मते वाचणार आहेत.

भारतातील नागरीक राजकारण, क्रिकेट व चित्रपट ह्याबाबत संवेदनशील असतो व हे सत्य झुगारणे वेडेपणा ठरेल. इतर अतीप्रगत देशांतील नागरिकांचे छंद बाकीच्यांकडून पटकन आत्मसात केले जातात कारण ते प्रगतीचे लक्षण ठरते, तसे भारतीयांच्या बाबतीत होत नसले तरीही भारतीयांच्या मते हे तीन विषय हृदयस्पर्शी आहेत व त्यांचा आदर राखला गेलेला त्यांना हवा असतो ह्यात वाद नसावा.

कित्येक राजकीय निर्णयांचा दैनंदिन जीवनावर फरक पडत असतो, जसे पेट्रोल, डिझेल, एल पी जी चे भाव किंवा इतर कोणतेही कायदे!

भारत ह्या देशात लोकशाही आहे व लोकशाहीत पंतप्रधानाच्या तोंडावर त्याच्याविरुद्ध बोलता येते.

सर्वोच्च सभागृहात अत्यंत हीन पातळीवर व मुद्देहीन स्वरुपाची चर्चा होताना ती प्रक्षेपीतही होते.

हे सगळे लक्षात घेतले तर एक संकेतस्थळ, जे कित्येक हजार सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्यात वर्षानुवर्षे सहज यशस्वी झालेले आहे, ते ह्या विशिष्ट बाबतीत अत्यंत आत्मविश्वासाने प्रश्नांना सामोरे जायला पाहिजे.

ज्याला येथे (उदाहरणार्थ) फेकू किंवा पप्पू म्हणण्यात येते त्याला इतर कित्येक व्यासपीठांवर तसेच म्हणण्यात येते. ह्या संज्ञा मायबोलीने अस्तित्वात आणलेल्या नाहीत.

आय हॅव सम थाऊझंड फॉलोअर्स! एव्हरीवन हॅज वन'स ओन से इन एव्हरीथिंग! अ‍ॅन्ड आय अ‍ॅम प्राऊड टू अलाऊ देम टू यूझ दॅट राईट अ‍ॅज द सिटिझन्स ऑफ द लार्जेस्ट डेमोक्रसी!

नेमके काय चुकले ह्यात? Happy

आय हॅव सम थाऊझंड फॉलोअर्स! एव्हरीवन हॅज वन'स ओन से इन एव्हरीथिंग! अ‍ॅन्ड आय अ‍ॅम प्राऊड टू अलाऊ देम टू यूझ दॅट राईट अ‍ॅज द सिटिझन्स ऑफ द लार्जेस्ट डेमोक्रसी! >>> इफ यू ऑब्झर्व, ओन्ली फ्यू (इन्क्ल्युडिंग सो कॉल्ड ड्यू आयडीज) वेअर पार्टिसिपेटिंग, आउट ऑफ थाऊझंड्स. अदर्स चोझ टू स्टे अवे ड्यू टू डिस्गस्टिंग नेचर ऑफ डिस्कशन्स. सो, दीज आयडीज डू नॉट रिप्रेझेंट मायबोली पॉप्यूलेशन अ‍ॅट लार्ज.

>>>इफ यू ऑब्झर्व, ओन्ली फ्यू (इन्क्ल्युडिंग सो कॉल्ड ड्यू आयडीज) वेअर पार्टिसिपेटिंग, आउट ऑफ थाऊझंड्स. अदर्स चोझ टू स्टे अवे ड्यू टू डिस्गस्टिंग नेचर ऑफ डिस्कशन्स. सो, दीज आयडीज डू नॉट रिप्रेझेंट मायबोली पॉप्यूलेशन अ‍ॅट लार्ज.<<<

हा बाहेरच्यांचा प्रॉब्लेम नाही आहे अश्विनी के Happy

बाहेरच्यांना माहीत नाही कोण आय डी आहे आणि कोण ड्यु आय डी!

हा अंतर्गत स्वरुपाचा प्रॉब्लेम आहे.

आणि त्यावरही काल लिहिणार होतो, तेही आवरले.

मूळ लेखातले ते वाक्य अज्जिबातच पटलेले नाही.

>>>चर्चांना लागलेल्या या वळणांमुळे बहुतेक मायबोलीकर या धाग्यांपासून दूर झालेले दिसतात.<<<

हा अक्षरशः जावईशोध म्हणावा लागेल. कोणत्या मायबोलीकराला सुसंबद्धपणे चर्चा करण्यास मज्जाव केला गेलेला आहे? कोणालाही नाही. दहाजण अर्वाच्य भाषेत बोलत असले तरीही तुमच्याशी जर एकजण नीट बोलत असला किंवा तुम्ही कोणाही एकाशी नीट बोलू शकत असलात तर तेथे 'लिहूच नये' असे वाटते हे कशाच्या आधारावर? काही सदस्यांनी व्यक्त केलेल्या मतांच्या? मी तर उलट म्हणतो की सूज्ञ प्रतिसाद देणार्‍यांनी स्वतंत्र समांतर चर्चा चालू ठेवावीच, ज्यायोगे तथाकथित (तथाकथित, इन द सेन्स, बाह्य जगाला माहीत नसलेले पण आतल्यांना माहीत असलेले) ड्यु आय डी बोलून बोलून कंटाळतील.

लोकांना येथे लिहू नये असे वाटते त्याची कारणे मला ही वाटतात. इतरही असतीलः
१. इतर कचरा पोस्ट्स इतक्या असतात की आपली पोस्ट वाचली जाईल की नाही याची शंका येते,
२. नाहीतर आपल्या पोस्ट वर कोणीतरी वैयक्तिक लिहील, मग आपणही त्यात खेचले जाऊन उगाच वाद होतील व वेळही वाया जाईल
३. अ‍ॅडमिननी आख्खा धागाच उडवला तर आपण (स्वतःच्या मते) योग्य लिहीलेल्या पोस्ट्सही उडतील. मग कशाला लिहायची तसदी घ्यायची
४. जेव्हा वैयक्तिक चिखलफेक सुरू होते तेव्हा आपण तेथे जाऊच नये असे वाटते, म्हणूनही.

वरदा तुझे मत थोडे पटले व थोडे बेफिंचेही (त्या पोस्टबद्दल). पण ती विषयाला धरून ही नाही असे मला जास्त वाटते. स्त्रीशिक्षणाशी संबंधित बाफवर रानड्यांच्या त्याच्याशी संबंधित नसलेल्या विषयामुळे. रानड्यांवरचाच जर बाफ असता तर कदाचित अवांतर ठरली नसती (टोन तरीही भडकाऊच आहे).

>>>४. जेव्हा वैयक्तिक चिखलफेक सुरू होते तेव्हा आपण तेथे जाऊच नये असे वाटते, म्हणूनही.<<<

ह्या एका मुद्याशी सहमत! (म्हणजे असे काहीजणांना वाटू शकते हे समजण्याइतपत क्षमता माझ्यात उरलेली आहे म्हणून सहमती दर्शवत आहे, कृपया गैरसमज नसावा). Happy

आधीच्या तीन मुद्यांशी असहमत! क्षमस्व! Happy

>>>स्त्रीशिक्षणाशी संबंधित बाफवर रानड्यांच्या त्याच्याशी संबंधित नसलेल्या विषयामुळे. रानड्यांवरचाच जर बाफ असता तर कदाचित अवांतर ठरली नसती (टोन तरीही भडकाऊच आहे).<<<

हे अवांतर आहे ह्याची नम्र जाणीव आहे, पण वर आलेल्या (कोटेड) विधानाला अनुसरून आहे म्हणून येथेच लिहिण्याची परवानगी असावी अशी विनंती!

त्या धाग्यावर सावित्रीबाईंऐवजी कोणाची नांवे देता आली असती असा विषय लगोंनी काढलेला नव्हता, कोणी इतरांनी काढलेला होता व त्यावर तो प्रतिसाद आलेला होता.

वास्तविक पाहता चर्चा इतकीच असायला हवी होती की पुणे विद्यापीठाला पुणे विद्यापीठ म्हणण्याऐवजी काही इतर म्हंटले जाणार आहे अश्याने काय होईल व सावित्रीबाई फुलेंचे नांव दिले ह्याबद्दल अभिनंदन करावे.

दॅट्स इट!

मात्र विपर्यास झाला. सावित्रीबाईंचे नांव देणे अत्यंत योग्य आहे म्हणणार्‍यांनीही (माझ्यासकट) त्यात विद्यापीठातील कार्यशैलीबाबत मतप्रदर्शन केले व त्याचा अर्थ असा काढला गेला की इतर कोणाचे नांव दिले असते तर हे मतप्रदर्शन झाले(च) नसते. प्रॉब्लेम हा आहे.

माझी विनंती आहे की हा प्रतिसाद ह्या मूळ धाग्याशी संबंधीत नसला तरीही कृपया उडवला जाऊ नये. Happy

फा, लोकांना लिहावेसे वाटत नाही याची कारणे तुम्हाला वाटलीत तशी असोत किंवा नसोत, मी इथे काय करतो, ते माझ्यापुरते लिहितो.

मी इथे लिहितो, अन वादावादीच्या धाग्यांवर बरेचदां जशास तश्या खडूस शब्दात लिहितो, कारण वाचणार्‍या वाचनमात्र तिर्‍हाइतांना दुसरी बाजू समजलीच पाहिजे म्हणून.

अशा धाग्यांवर अनेक आयडीज अभ्यासू अन संयत असण्याचा आव आणून अत्यंत बायस्ड पोस्टी टाकत असतात. त्यांचा प्रतिवाद केल्यास त्यांचेच डूआयडीज विकृत अनुमोदने, प्लस उत्तर देणार्‍याचा पाणउतारा करतात. त्यात काही तथाकथित समन्वयवादी वेगळ्या गमती करतात.

यांपैकी नीट बोलणार्‍यांना, वा प्रश्न विचारणार्‍यांना मी नीटच उत्तरे दिली आहेत. अन तिरकस शब्दांना तिरकस उत्तरेही. पण त्या त्या ठिकाणी मला आवडणार्‍या आयडिऑलॉजीला धरून, त्या तत्वज्ञानाच्या समर्थनार्थ लिहिले गेलेच पाहिजे असे मला वाटते.

आता तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांबद्दलः

१. माझी आयडी पाहून मी काय म्हणतोय, हे अनेक लोक नक्कीच पहाणार याची मला खात्री असते, कारण मी मनापासून लिहितो. त्या पोस्टचा अर्थ कोण कसा काढणार हे त्या-त्या व्यक्तीच्या चष्म्यावर अवलंबून, पण म्हणून मी माझे मनापासूनचे मत मांडणे थांबवायला नको.

२. सभ्य उत्तरास सभ्य प्रत्युत्तर, अन वाकड्यात घुसला तर दुरुत्तर करता येत नसेल, तर असे लोक कधीच कुठेच काहीच बोलत नाहीत, हा अनुभव आहे.

३. धागा उडवला तर माझी मते वाहून जातील म्हणून मी काय वाट्टेल ते ऐकून घेत नाही. हे असे वागणारे लोक ओळखीच्या डू आयड्यांकडे दुर्लक्ष म्हणून असे वागतात, पण मी तरीही लिहीतोच. कारण पुन्हा तेच. वाचनमात्र असलेले तिर्‍हाईत, ज्यांना खाचाखोचा ठाऊक नसतात.

४. वैयक्तिक चिखलफेक. कुणी माझ्यावर चिखलफेक केली, तर मी ती गुपचूप सहन करून, समोरच्याला अधिक चिखलफेक करायला उद्युक्त करणे हे योग्य वाटते काय? मी गांधीवादी आहे, याचा अर्थ गांधीवादी बुळचट असतात असा होतो काय?
पण अमका तमक्यावर चिखलफेक करतोय, तर मी माझे ओरिजिनल सरळ मत तिथे मांडल्याने चर्चा रुळावर येण्यास मदत होते, तेव्हा नक्कीच लिहिले पाहिजे असे माझे मत आहे.
Evil is powerful when good men are timid.

इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
शुभरात्री.

बेफि, क्षमस्व काय त्यात? मते सारखी नसणे हे काय अनकॉमन नाही. आणि सहमत "लोकांना असे वाटते" या माझ्या मताशी नाही, की लोकांचे जर पहिल्या तीन मुद्द्यांसारखे मत असेल तर त्याच्याशी सहमत नाही? Happy

इब्लिस - पोस्ट मधे बरेच मुद्दे आहेत. नंतर लिहीतो.

या धाग्याबद्दल अ‍ॅडमिन टीमच्या विपूत लिहीलेलं आहे.

रोज शंभर शंभर पोष्टी टाकून धागा भरकटवणारे इथे गीता सांगत आहेत.

कट्यार ... वय ५ आठवडे राहणार ससेक्स यू के... माहिती आवडली. !

(ही माझी पोस्ट निरुपद्रवी असून कोणाचाही पाण उतारा करण्यासाठी, भावना दुखावण्यासाठी, अथवा चिखलफेकीसाठी उद्युक्त करण्यासाठी टाकलेली नाही असे मी जाहीर करतो. तरीही कोनाला तसे वाटले तर तो त्याबुदोस.... )

ही कला जमली म्हणजे कारवाई होत नाही Lol

( सा.फु. धाग्यावर पहिली काडी रॉहू यांचीच होती असं मी कुठेही म्हटलेलं नसल्याने त्यांनी माझ्यावर विनाकारण राग धरू नये ही विनंती आणि अपेक्षा आहे. ते राग धरत नाहीत असं ऐकून आहे. तरी त्यांनी कमी वयाचे आणखी आयडीज या धाग्यावर सापडतात का ते पाहून सांगण्याचे करावे ही उपविनंती ).

या धाग्यावर अनेक साधू संतांची मतं आवडली.

अस्सल ओरीजिनल आयडीला घेऊन "अरे वा, अरे वा " करत रोज प्रत्येकी शंभर पोस्टी एकाच धाग्यावर ओतणारे, संध्याकाळच्या वेळी तरल वातावरणात जिकडे तिकडे निरागस ओल्या पोस्टी टाकणारे आणि नुकतंच जन्मून पोस्टी कशा लिहायच्या यावर बेछूट विधानं करणा-या आणि इग्नोरलेल्या एका अस्सल ओरीजिनल बाईंनी इथं जे मनोरंजन केलं आहे त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद.

अरेरे येथे सुद्धा अनेकांचे मतपरिवर्तन होत नाहीये. "जशास तसे" प्रकारे लिहिण्याने कोणाचेही म्हणणे योग्य आहे असे होत नाही.
लोक चर्चेला चर्चेपुरतेच का ठेवत नाहीत देव जाणे. स्वत:ला पाहिजे तशीच मते लोकांकडून यायला हवीत आणि नाही आली तर युद्ध हे काय आहे ? कोणीच समजुतदारपणा नाही दाखवला तर हे कधीच थांबणार नाही का ?

या धाग्यावर आलेल्या पोस्टस पाहून सुज्ञ वाचक आपले आपणच जाणून घेतील असे वाटते.

एक सुचना चांगली वाटली "समांतर चर्चेची", खरच असे करता येऊ शकेल काय ? प्रतिसादांच्या मार्‍यातुन (प्रसंगी वैयक्तिक सुद्धा) स्वतःला वाचवून अगदी स्थितप्रज्ञपणे समांतर चर्चा चालू ठेवता येऊ शकेल ? Uhoh

महेश,
गरळ ओकणे हाच ज्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ते कुठेही गेलं तरी तेच करणार ना? इथेही एकमेकाना समर्थन देणा-यांनी कंपूशाही जोरात सुरु केली आहे आणि वर इतरांच्या नावाने शंख करण्यास मोकळे.

सचिन अ‍ॅज अ खेळाडू आणि लालू अ‍ॅज अ पोलिटिशियन यांची नक्कल होऊच शकत नाही का? एव्हडेही सहन होत नसेल तर त्यानी सार्वजनिक जीवनात न येता घरी बसावे हरी हरी करीत.माझ्या मते लालू काही म्हणणार नाहीत कारण त्यांच्या पुढ्यातच त्यांची नक्कल केली जाते आणि ते दिलखुलास हसून दादही देतात. शेखर सुमन त्यांची नक्कल करीत असल्याची तक्रार त्यांच्यापर्यन्त गेली तेव्हा ते म्हणाले 'अगर मेरी नकल करके कोइ पेट भरता है तो करने दे.."

अर्थात आर जे टिंगल करीत होते म्हणजे काय करीत होते पहायला पाहिजे. त्यांना अगदीच मूर्खात काढीत असतील तर बाब वेगळी. सचिनच्या गैरहजेरी बद्दल काही असेल तर ही दिझर्व्ह्ज इट... खासदार खासदारासारखे वागत नसेल तर खासदाराचे टीकेपासून संरक्षण त्याने का वापरावे?

सचिन, लालू च काय पण कोणाचीही नक्कल त्यावर बंदी घालण्याएवढी गोष्ट आहे? ती सतत करणे योग्य की अयोग्य यावर वाद होऊ शकतो, औचित्य वगैरे काही वेळेस योग्य मुद्दा होईल, पण बंदी?

त्यांचा आवाज वापरून.. हे महत्वाचं आहे.

>>> नक्कल तर त्यांच्याच आवाजात केली जाते ना? मागे कोणाच्या व्यंगचित्रावरून पोलीस केसेस झाल्या होत्या. तेव्हा पंतप्रधान असलेल्या मॅगी थॅचर यांचे न्यूड असलेले राजकीय व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. तेही पदावर असताना . आपली लोकशाहीची लायकीच नाही आहे हे आपण पुनः पुनः सिद्ध करीत आहोत !

http://www.dnaindia.com/india/report-jaya-bachchan-demands-action-agains...

The language used by radio jockeys on private channels is extremely objectionable. Now they've started giving news of the Parliament and they mimic a lot of MPs. I want to know whether the government will do something about it,"

I never said we object to mimicry on MPs. Anybody can Mimic us. People can make fun; we never mind Today Jayaji and other MPs raised objections on vulgarity & double meaning jokes by RJs. I said "we ll look into it". : जावडेकर

तेव्हा पंतप्रधान असलेल्या मॅगी थॅचर यांचे न्यूड असलेले राजकीय व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. तेही पदावर असताना . >>> अमेरिकेतील एका टीव्ही सिरीज मधे काही माजी अध्यक्षांबद्दल (प्रेसिडेण्ट) बरीच खमंग चर्चा त्यातील बायका करतात असा सीन होता. आपल्याकडे कल्पनाही करता येणार नाहे अशा चर्चेची.

तसेच मधे एकदा सेरा पेलिन च्या ऑफिसबाहेर "वर्स्ट गवर्नर" म्हणून बोर्ड हातात धरून एक शिक्षिका उभी होती. त्यावर सेरा पेलिन ने तिच्याशी बोलताना डोळे "रोल" केले म्हणून तिच्यावरच (पेलिनवर) मीडियाने टीका केली होती. त्या शिक्षिकेचे बरोबर असेल, चूक असेल, पण तिला तसे करायचे स्वातंत्र्य आहे हे तेथे गृहीत धरलेले होते.

जेथे रिकामटेकडे "चाहते" वा 'समर्थक" भरपूर असतात तेथे असले विचारस्वातंत्र्य जास्त चालत नाही. कारण नेत्यांपेक्षा चाहत्यांचा राग अनावर होणे, भावना दुखावणे वगैरे प्रकार आधी होतात Happy

Pages