Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, महालक्ष्मीच्या नैवेद्यात
हो, महालक्ष्मीच्या नैवेद्यात तर असतेच. ती ही पडवळ घालून.

महालक्ष्म्यांच्या नैवेद्याचा स्वयंपाक केला की मला महालक्ष्मी म्हणजे 'यांच्या घरातली मुलं (किंवा मोठेही)सग्गळ्या भाज्या खातात का नाहीत' हे तपासायला येणार्या तपास अधिकारी वाटायच्या.
आशू पण +१ मलाही नाही आवडत ती
आशू

पण +१
मलाही नाही आवडत ती पडवळभाजी वाली कढी
संपदा, आशू, ओके! कढी फक्त
संपदा, आशू, ओके!
या दमदाटीमुळे नैवेद्याच्या स्वयंपाकासाठी कढीची ट्युब पेटत नाही.
कढी फक्त पितरांसाठीच
पडवळ घालून कढी? आई गं! काय जबरदस्ती आहे...
आजोळी आमटीत वांगी, दोडकी घातली की माझा एक भाऊ बडबडायचा, 'माहितेय.. तुमच्याकडे भरपूर भाज्या येतात'
कोशिंबीर, ओली भाजी, सुकी भाजी नावडीच्या असल्यावर आमटीतही वांगी बिंगी पाहिली की 'जाए तो जाए कहां' अशी अवस्था होत असे आमची.
मुग्धे, आम्हाला बोलावशील
मुग्धे, आम्हाला बोलावशील तेव्हासाठी पाभादब हा मेनू राखून ठेव
रच्याकने, मी आज पंचामृताचे पराठे केले. फारच सुंदर झाले आहेत. चार पराठ्यांसाठी प्रत्येकी चार टिस्पून दही दूध पिठीसाखर आणि मध घेतले, कणकेत घातलेल्या चमच्यानुसार एका मापात चार पोळ्या होतात. आणि तूप फक्त दोन टिस्पून घातले. कणभर मीठ, आणि मस्त कणीक भिजवून घेतली. पाणी अजिबात घालावे लागले नाही. नेहमीसारखी घडीची पोळी लाटून तेल तूप न लावता भाजली. खूप सुंदर तलम खुसखुशीत झाली आहे. बेताची गोड आणि दह्या-मधाचा स्वाद फारच सुंदर लागतो आहे. आज डब्याला बटाट्याची रस्सा भाजी आहे, त्याच्याबरोबर खाणार.
देवकीला तिच्या विपूत धन्यवाद देऊन येते. आता वरचेवर केल्या जातील ह्या पोळ्या/ पराठे.
खूप सुंदर तलम खुसखुशीत झाली
खूप सुंदर तलम खुसखुशीत झाली आहे. बेताची गोड आणि दह्या-मधाचा स्वाद फारच सुंदर लागतो आहे. आज डब्याला बटाट्याची रस्सा भाजी आहे > काय सुरेख वर्णन आहे ! मी ही करणार आता !
मला महालक्ष्मी म्हणजे
मला महालक्ष्मी म्हणजे 'यांच्या घरातली मुलं (किंवा मोठेही)सग्गळ्या भाज्या खातात का नाहीत' हे तपासायला येणार्या तपास अधिकारी वाटायच्या. <<
कोशिंबीर, ओली भाजी, सुकी भाजी नावडीच्या असल्यावर आमटीतही वांगी बिंगी पाहिली की 'जाए तो जाए कहां' अशी अवस्था होत असे आमची. << तुमच्या खोड्याच फार डै!
पंचामृत पराठ्यांबद्दल... मध तापवू नये ना?
मध कुठे तापवला? मध घातलेली
मध कुठे तापवला?
मध घातलेली कणीक पोळ्या करताना भाजली गेली. ते तापमान ५५ अंशाच्यावर गेलं असेल तर मधाचं विघटन झालं असेल. झालं तर झालं.
तेच ना. ते चांगलं नाही ना?
तेच ना.
ते चांगलं नाही ना?
हे मला आयुर्वेदातल्या 'फळं
हे मला आयुर्वेदातल्या 'फळं आणि दूध हे विरुद्ध अन्न आहे' यासारखं वाटतं. शिकरण खाण्यात जन्म गेला.
तसंच हे मधाचं. खोकल्यावर बेहडा उगाळून ते गंध मधात कालवून जरा तापवून चाटलं की आराम पडतो. अर्थात हे खोकल्याची सुरूवात असताना केलं तरच... त्यापुढे प्रकरण गेलं तर डॉक्टर गाठण्याशिवाय पर्याय नाही. कारण दिवसन् दिवस हा उपाय करण्याचे पेशन्स अंगात नाहीत.
त्यामुळे, मध ५५ अंशाच्यावर तापवला गेला तर त्याचं विघटन होत. म्हणजे काय होतं? मधाचे औषधी गूण लाभणार नाहीत. नाही तर नाही लाभले. एरवी असा नाही तर तसा मध जातोच पोटात.
मंजुडी, सिरियसली आपल्याला
मंजुडी, सिरियसली आपल्याला भेटणे आहेच विक्रोली ला, महा गटग साठी. कधी येताय ते बोला.
मंजूडी,, धन्यवाद. आम्ही
मंजूडी,, धन्यवाद. आम्ही वीकेंडला प्रयोग करणार होतो. तुम्ही त्याआधीच चीटशीट बनवून् दिलीत.
मंजूडी, पंचामृत पराठा वर्णन
मंजूडी, पंचामृत पराठा वर्णन भारीये. आता खाऊन बघायलाच हवेत!
तराना, मेनूत सुकी भाजी सोप्पी हवी असेल तर बटाट्याची डोसा भाजी बेस्ट आहे. किंवा बटाटा काचऱ्या.
नीधप, स्टफ्ड पराठे व सोबत लोणचे / चटणी / दही. किंवा एखादी सुकी भाजी. पोटासाठी दमदमीत राहील. फॉईल रॅप करून नेता येईल. फॉईलचे चौकोनी डबे मिळतात त्यांतही नेता येईल. किंवा झिपलॉक.
लिस्टमधे टाकते. शनिवारी
लिस्टमधे टाकते. शनिवारी १०-२०-३० करून ठरवणार.
डी, त्या पराठ्याची बैजवार
डी, त्या पराठ्याची बैजवार कृती योजाटा कृपयाच!
पडवळ घालून कढी? >>> म्हणजे
पडवळ घालून कढी? >>> म्हणजे कशी करतात.मला फक्त सोलकढी, ताकाची कढी इतकंच माहित आहे.
मंजूडी, मी पोळ्या/ पराठ्यात
मंजूडी, मी पोळ्या/ पराठ्यात मध कमी घातला होता आणि खडीसाखर घातली होती.
रच्याकने, एरवीही पराठ्याची कणीक भिजवताना दही घालावे.मस्त चव,पोत येतो.
देवकी, भेंडी घालून करतात तशीच
देवकी, भेंडी घालून करतात तशीच असावी.
भेंडी चिरून तेलात परतून घ्यायची शिजेतो आणि मग कढीसारखी कढी करून त्यात परतलेली भेंडी घालून उकळून काढायची.
(No subject)
मी कढी हल्ली भाज्या
मी कढी हल्ली भाज्या घातल्याशिवाय करतच नाही. कमीतकमी दोन भाज्या. मुलगा भाज्या खात नाही पण कढी त्याला खुप आवडते म्हणून आयडीया. आजच दुधी आणि कोबी घालून केलीय.
पडवळ, भेंडी, तोंडली, पालेभाज्या, शेवग्याच्या शेंगा असं काहीही घालते. आवडंत आम्हाला.
तुपाची फोडणी करुन त्यातच भाज्या परतते. थोडसं पाणी टाकुन, झाकण ठेऊन वाफवते मग त्यात बेसन, ओट्स घातलेलं ताक घालते आणि ठेचा, मीठ्,कोथिंबीर,ओवा, मिरपुड वगैरे आणि उकळवते.
अंजू, ही रेसिपी जरा वेगळा
अंजू, ही रेसिपी जरा वेगळा धागा काढून टाका बरे. ही वेगळी आहे आणि लक्षात राहणार नाही.
हम्म्म. सहज लिहिलं. माझं
हम्म्म.
सहज लिहिलं. माझं अंदाजपंचे दाहोदरसे असते म्हणून वेगळा धागा नाही काढला. :).
नीधप बरोबर आहे तुमचं. ह्या
नीधप बरोबर आहे तुमचं. ह्या धाग्याचा विषय थोडा वेगळा आहे.
धाग्याचा विषय म्हणून नाही.
धाग्याचा विषय म्हणून नाही. मला वेळेला सापडायला हवीये म्हणून..
मुलीच्या वाढदिवसासाठी मेन्यु
मुलीच्या वाढदिवसासाठी मेन्यु काय करावा. प्लिज़ सुचवा.
गेल्या वेळेस इडली सांबार व त्या आधी एकदा पाव-भाजी हा बेतवा करुनि झालाय. पोटभरीसाठी सोबत पुलाव/मसालेभात होता.
गोडासाठी केक असतोच.
मेन्यु लहान - मोठे सर्वाना चालेल असा हवाय.
किती जण आहेत माहित नाही पण
किती जण आहेत माहित नाही पण रगडा पॅटिस कसे वाटेल ? पॅटिस, रगडा, चटण्या सगळं आधी करून ठेवता येईल, ऐन वेळी खटपट नाही, रगडा जरा वार्म केला की झाले. बरोबर दही वडे, किंवा आमरस / कस्टर्ड घालून फ्रूट सॅलड.
मुलगी केवढी आहे? तिला काय
मुलगी केवढी आहे? तिला काय आवडते??
आप्पे आणि टॅमरिंड किंवा पुलिओग्रे सारखा एखादा भात चालेल का?
मी_चिऊ, ही काही नेहमीची
मी_चिऊ,
ही काही नेहमीची यशस्वी काँबोज् -
बटाटेवडे-सांबार-चटणी / मेदूवडा - सांबार - चटणी / तिखटाचे आप्पे व चटणी
डोसा गाडी लावून डोसे किंवा उत्ताप्पे, सोबत चटणी व सांबार
पाणीपुरी + दही बटाटा शेव पुरी + भेळ / कच्छी दाभेली / कचोरी चाट
छोले भटुरे / छोले पुरी, चाट
मिसळ व दहीवडा
रगडा पॅटीस, पापडी चाट किंवा इतर चाट प्रकार
साबुदाणा वडे, काकडीची दह्यातली कोशिंबीर / दही, चटणी
कटलेट्स् - सॉस - चटणी - ब्रेड स्लाईस
पिझ्झा / पास्ता
मी लहान असताना वाढदिवसासाठी दडपे पोहे, उपमा, साखि व कधी सोबत थोडेसे वेफर्स, बाकरवडी, साखर लावलेले कोरडे गुलाबजाम अशा पदार्थांची व मेनूची चलती होती. घरी केलेला ताजा पातळ पोह्यांचा चिवडाही असायचा वाढदिवसाच्या मेनूत. लक्ष्मीनारायण चिवडा म्हणजे ऐश. ढोकळा (विकतचा!) असेल तर वाह रे वा!
गेले ते दिन गेले! 
मुलगी तर लहानच आहे, ३
मुलगी तर लहानच आहे, ३ वर्षांची. त्यामुळे तिची स्वतःची अशी खास आवड नाही.
वाढदिवसासाठी साधारण मोठी १२ -१५ व लहान १०-१२ माणस येणार आहेत.
रगड़ा पॅटीस साठी थर्मोकोल
रगड़ा पॅटीस साठी थर्मोकोल च्या डिस्पोझीबल डिश चालतिल का? की सांडलवंड होउ शकते?
अकु इतके सगळे काॅम्बो सुचवल्या बद्दल धन्स.
डिस्पोजेबल प्लेटमध्ये
डिस्पोजेबल प्लेटमध्ये डिस्पोजेबल बोल ठेवून त्यात रगडा दिला तर नीट खाता येइल. शिवाय प्लेटमध्ये बोलच्या बाजूला इतर काही पदार्थ असल्यास तो देता येइल.
Pages