निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली त्या क्रुष्णकमळाचे प्रचि नक्की टाका.

पावसाळी पाहूणे दिसले. >> जागुताई पाहुणे सुंदर आहेत पण खाण्या लायक आहेत की नाही हे कसे ओळखायचे.

जागुताई पाहुणे सुंदर आहेत पण खाण्या लायक आहेत की नाही हे कसे ओळखायचे>>> त्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार.

अळूची पानं कुंडीत लावण्याचे दिवस आलेत पण त्याही पानांच्या वड्या खायला मिळाल्या की काय आनंद होतो. Happy

वर्षु, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
जागु, अळंबीचा फोटो छान आलाय.
सायली, कृष्णकमळ माझं अतिशय आवडत फुल. फोटो नक्की टाक.
मागे मला वाटत तुच एका फुलदाणीत कृष्ण्कमळांचा फोटो टाकला होतास ना? तो ही खूप आवडला होता. आता झाडवरच फुल बघु या.

मित्रमैत्रीणींनो तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा पोचल्या बरं इथपर्यन्त..... भरुन पावले..
Happy

दिनेश कुठे आहे सध्या?????????

हम सब नि.ग. के इस धागे पे हात रख के कसम खाते है जो भी कहेंगे सच कहेंगे और सच के अलावा कुछ नही कहेंगे.:फिदी:
अ‍ॅड. उज्वला (उजु), वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!!

— आम्हा सर्वांकडुन

नमस्कार, सुप्रभात!!!!

बोर्डी, घोलवड येथे बहावा लावायचा आहे. कसा लावावा?... बिया पेरून, फांदी लावून की आणखी काही पद्धत आहे? बियाणे / फांदी कुठे मिळेल? या हवामानात लावले तर चालेल का? लागवड करताना काही खास काळजी घ्यावी का? ....

कदाचित नि.ग.वर चर्चा झाली असेल. पण मला शोधायचा आळस...

उजू,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जागू,जिप्सी,नलिनी फोटो छान.

मनीमोहोर,ईनमीन तीन -सायली तिच्या बागेतल्या कृष्ण्कमळांचा फोटो टाकेलच.तोपर्यंत ....

मधु मकरंद, बहावा मोठ्या नर्सरीत मिळतो. बियांपासुनही लागवड करता येते. सध्या शेंगा लागलेल्या असणार बहव्याला. अजुन एकाध महिन्यात काळ्या होऊन दिसायला लागतील झाडावर. त्यांच्यातुन बीया काढायच्या, धुवायच्या आणि पेरायच्या. येतात रुजून. जिप्स्याकडे आलेल्या. त्याला जास्त माहिती आहे.

जिप्स्याकडे आलेल्या. त्याला जास्त माहिती आहे.>>>>>हो मधु मकरंद. मी बहाव्याच्या बियाच लावलेल्या. मला मायबोलीकर अभिजीतने शेंग दिलेली. त्यातील बिया काढुन स्वच्छ धुतल्या, उन्हात वाळवल्या आणि मग लावल्या. त्यातुन एक झाड आलंय. Happy आता चांगल दिड फूट झालंय. मस्त हिरवीगार कोवळी पाने आली आहेत. बहुतेक पुढच्या महिन्यात ते यो रॉक्सच्या गावी कायमचे स्थायिक होईल. Happy

(बिया धुऊन वाळवण्याचे कारण कि याच्या शेंगातील गर गोड असतो आणि तशाच बिया लावल्या तर मुंग्या/किडे त्या पोखरतात. म्हणुन हि आयडिया केली आणि ती सफल झाली. :-))

सुदुपार...
उजु... वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

नितीन, हेमा ताई... नक्की प्र.ची. टाकीन...
अरे व्वा सरिवानी छानच फोटो टाकला आहे....
हा आज सकाळचा माझ्या ऑफीस च्या टेबलावरुन...
Photo1169.jpgPhoto1170.jpg

नलिनी नेहमीच छान छान फोटोज टाकतेस... Happy

ईनमीनतीन - नक्कीच भेटु. माझ्याकडे तुळस आणि सदाफुलीच्याहि बिया आहेत.. त्याहि घेऊन येते.

उजू ...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वर्षुदी .... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ऊशिराने..

नलिनी .. दोन्ही फोटो मस्त..

दादरला वसंत वाचनालयाच्या बाजुला कृष्ण्कमळांचा मोठा वेल पसरला आहे. नेहमी त्यावर भरपुर फुलं फुललेली असतात..

व्वा जिप्सी छान आयडीया... कुठला बहावा आहे? गुलाबी का पिव़ळा?

मी पुण्याला पहिल्यांदा गुलाबी बहावा पाहिला... खुप सुंदर दिसतो...
नेमकी मी ऑटो मधे बसले होते आणि तो रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होता... तरी सुद्दा डोकावुन
तो दिसेनासा होईस्तोवर बघीतले... Happy

उजू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना मनापासून धन्यवाद!

जिप्सी, फोटोवरून नजरच हटत नाही. Happy

सारीवा, सायली, कृष्णकमळ मस्तच. मी दोनदा लावलेला कृष्णकमळ, पण दोन्हीवेळेस घुल्यांचा खूप त्रास झाला होता मग परत कधीच लावला नाही .
मामी, मोठ्या साईजमधला फोटो पाठवू का? आणखी काही क्लिक्स आहेत त्याच दिवशीचे.

वर्षू, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! (उशीरा देतेय, रागवू नको हां! )
त्या बद्दल हे घे.
DSCN0159.jpg

उजू, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
DSCN1051.jpg

साधना, जिप्सी... धन्यवाद. ज्या मैत्रीणीला ही माहीती हवी आहे, तिला नक्की देईन.

ईथे शंकानिरसन लगेच होते याची खात्री होतीच!

अ‍ॅड. उज्वला (उजु), वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!!! >> आमच्या कडुन पण भरपुर शुभेच्छा.

नलिनी , रारिवा सायली सुंदर प्रचि. Happy

बोर्डी, घोलवड येथे बहावा लावायचा आहे. कसा लावावा?... >> बहाव्याच्या शेंगा हव्या असतील तर मी देऊ शकतो जरुर कळवा.

Pages