निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गवार, पालक, भेंडी, वांगी आणि काही भाज्यांची रोपं लावलीयेत, सगळ्या रोपांना जवळपास ६-७ तास ऊन मिळतं मी पाणीही रोज किंवा एका दिवसाआड घालते पण सगळीच रोपं नीट वाढत नाहीयेत.
काउ मन्युअर खत म्हणून घातलेलं पण अजून काही खत घालायला हवं कां?

गवारीला आणि भेंडीला तर अगदीच ४-५ इंच रोप असतानाच फुले आली आहेत. आंबट चुका आणि पालकाला पण लगेच फुलं आली, अगदी छोटी छोटी २-२ पानं असतानाच. माझ्या दारी मुरमाड जमिन असल्याने सगळी रोपं मोठ्या कुंड्यांत लावलीयेत, हीच रोपं पुर्वी बाल्कनीत कुंड्यांमध्येही छान वाढत.

मी हा प्रश्न दुसर्‍या धाग्यावर विचारलेला पण तिकडे काही उत्तर नं मिळाल्याने इथे टाकला.

सुप्रभात.

दोन दिवस बरेच काही बोलायचेय पण काल घरीच होते त्यामुळे नुसते मोबाईलवरून नजर टाकत होते.

१९ तारखेला जि.टी.जी. वरून घरी गेले आणि घरी समोरच कुरीयरने आलेला बॉक्स पाहीला. नि.ग. कर सायलीने पाठवलेला. अजुन एक मैत्रीण जवळ आल्यासारखे वाटले. तिने पिवळी लिलि, नागपूरची खास भेंडी, टोमॅटो चे बी आणि बालसम म्हणजे डबलचा तेरडा, अस्टर च्या बियाही पाठवल्यात. सोबत स्वतः भरतकाम केलेला रुमाल हे सगळ एका सुंदरशा बटव्यात पाठवले. घरात हा कुरियर जि.टी.जी. झाल्याने मला अजुन आनंद झाला.

शशांकजी ते तण माझ्याकडेही भरपूर येते. माझ्या रानफुलांच्या रानवाटेवर सिरिज मध्ये आहे ते.

जिप्स्या फोटो लय भारी. मी आणलेत काश्मिरवरून कंद आणि बिया. पण कंद अजून उगवले नाहीत. रोज कुंडीत जाऊन वाट पाहतेय पाने येण्याची.

ह्या वर्षी तिन्-चार वर्षांचा ब्रेक घेऊन ही फुले फुललीत. शशांकजी नाव सांगा प्लिज Happy

ह्याचा पण आज सुगंध दरवळतोय.

<<मी आणलेत काश्मिरवरून कंद आणि बिया. पण कंद अजून उगवले नाहीत. रोज कुंडीत जाऊन वाट पाहतेय पाने येण्याची.<<< आम्हाला पण कश्मिरी कन्द अन बिया पायजेत. तुझ्याकडचे भरपुर वाढुन पसरले की काढुन ठेव आमच्यासाठी.

साधना, अगं आधी छान व्हायची सगळी रोपं, अळू पण मस्त वाढायचा पण आता तो ही खुरटलाय. पालकही खुरटलाच आहे. मी काहीतरी चुकीचं करत असावे बहुतेक.

जागू - हे Ground Orchid - शास्त्रीय नाव : Spathoglottis plicata हेच आहे का गुगलून पहा बरं ... Happy

१९ तारखेला जि.टी.जी. वरून घरी गेले आणि घरी समोरच कुरीयरने आलेला बॉक्स पाहीला. नि.ग. कर सायलीने पाठवलेला. अजुन एक मैत्रीण जवळ आल्यासारखे वाटले. तिने पिवळी लिलि, नागपूरची खास भेंडी, टोमॅटो चे बी आणि बालसम म्हणजे डबलचा तेरडा, अस्टर च्या बियाही पाठवल्यात. सोबत स्वतः भरतकाम केलेला रुमाल हे सगळ एका सुंदरशा बटव्यात पाठवले. >>>> वा, मज्जा आहे बुवा जागू तुझी ... Happy त्यातल्याच एखाद्या "बी" चा फोटो आहे का बघ तो वरचा - सायलीने जे कोडे घातले आहे त्याचा .... Happy

मानुषी कसले कोडे घातलेस? कोण आलेय?? लाईट??? >>>> साधना - तिच्या इथे पाऊस सुरु झालाय म्हणून लाईट गेलेत .... Happy .... साधना ... तू ही गंडतेस Happy Wink

नाही... ते गोडलिंब / कढीपत्ता चे बी आहे...
broken.jpg

जागु धन्यवाद... मला सुद्दा कुरियर पाठवतांना खुप आनंद झाला होता... अजुन बरच काही पाठवायच होते..
तुला सांगीतलच होते... पुढच्या वेळेला नक्की पाठवते...

शशांक जी केन्याची फुलं खुपच गोड आहेत.. हा केना मझ्या कडे पण एका कुंडीत डोकावतो आहे...
हरतालीका / गणपतीत लागेल म्हणुन ठेवला आहे.

जिप्सी लीली अप्रतिम... जागु कडचा गुलाबी पाहुणा मस्त आहे...
आणि सोनचाफा तर काय बोलु......

अरे हो, एक आनंदाची बातमी... मी दोन महिन्यापुर्वी क्रुष्ण कमळाचे छोटेसे रोप आणले होते,
त्याला दोन इवल्याश्या कळया आल्या आहेत Happy त्या मुळे मी जाम खुष आहे :)....

हायला, आमच्याकडे येऊन जुना झालाय आणि आम्ही आता अतिथी तुम कब जाओगे ही आळवणी करतोय त्यामुळे कोणीतरी या अतिथीचे स्वागत करत असेल ही ट्युब पेटलीच नाइ..

जागु नागपूरची वांगी पण खुप छान असतात, त्याच्या पण बिया पाठवल्यात की... कुणाला हवी असल्यास ,त्याची रोप तयारकरून देऊ शकतेस पुढच्या गटग ला... Happy

आमचा आपला गरिबाचा नगरी चिरचिरा पाउस. >>>> हा हा हा ....
पण पाऊस पडतोय हेही नसे थोडके - रच्याकने, मानुषी - तिथल्या सीना नदीला कधी पूर आल्याचे आठवते का तुला ??

ग्राउंड ऑर्चिड नाव चांगले आहे लक्षात रहायला Happy धन्यवाद शशांकजी.

सायली Happy

जिप्स्या आसमंत वाचायला घेतलाय. अप्रतिम आहे पुस्तक. एक एक वाक्य मी हळू हळू वाचतेय. खुप काही शिकायला मिळतय त्यातून.

सायली आसमंत चे लेखक श्री श्रीकांत इंगळहळीकर आहेत.

अतृप्त आत्मा तुमचे स्वागत आहे. आपल्या रायगडच्या विविध भागातील निसर्गाची माहीती आणि फोटो येउद्यात.

साधना देईन तुला त्याचे कंद.

धन्यवाद मानुषीताई. हि फुले बहुतेक थंड भागात (म्हणजे थंडी असलेल्या) जास्त फुलतात वाटतं.

आर्या, हो तेथे शांतता भरपूर. प्ण १-२ दिवसापेक्षा जास्त राहु शकणार नाही. एकतर त्या भागात माणसं फार कमी आढळतात, दिवसाही तापमान थंड आणि हवामान लहरी. Happy

धन्यवाद जागु...

गुर्जी बरीच पुस्तकं वाचतात नाही! नि.ग.कर मंजु ताईंकडे एकदा विषय निघाला होता, त्यानी सांगीतले
की एका शिबीरात त्यांनी श्री किरण पुरंदरे यांना बोलवले होते त्यांनी वेगवेगळ्या पक्षांचे आवाज काढुन दाखवले
आणि मुलांकडुन सुद्धा काढुन घेतले... तेव्हा काही केल्या आठवत नव्हते या नावाचा उल्लेख कुठे बर झाला...
मग रात्री खुप वेळानी आठवले मधे गुरुजींनी च सांगीतले होते त्यांचे पुस्तक वाचायला घेतले म्हणुन... Happy

की एका शिबीरात त्यांनी श्री किरण पुरंदरे यांना बोलवले होते>>>>किरण पुरंदरेंची सगळीच पुस्तके लाजवाब. त्यांचे "सखा नागझिरा" वाचा. माझ्याकडे "पक्षी आपले सोबती", "पाणथळीचे पक्षी" हि पुस्तके आहेत.

जरुर वाचीन... >>>> पक्ष्यांची नुसती पुस्तके वाचून जराशी माहिती मिळेल इतकेच, पण त्यापुढे आपल्या परिसरात व शहराबाहेरही जाऊन पक्षीनिरीक्षण करणे खूप महत्वाचे आहे - आधी काही कळत नाही असे वाटेल पण अभ्यासाने व त्यात रस असणार्‍या कोणा जाणकाराकडून अधिक माहिती घेत घेत बरेच काही कळेलच कळेल -
असाध्य ते साध्य करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे || .... Happy
(कृपया हा सल्ला नीट लक्षात घेणे - यात कोणाला नाउमेद करण्याची इच्छा नाहीये तर घराबाहेर पडूनच पक्षीनिरीक्षण वा वनस्पतीनिरीक्षण करण्याला प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे... ऑल दि बेस्ट टू ऑल ऑफ यू (टू मी आल्सो... Happy Wink )

Pages