निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्ष्यांची नुसती पुस्तके वाचून जराशी माहिती मिळेल इतकेच, पण त्यापुढे आपल्या परिसरात व शहराबाहेरही जाऊन पक्षीनिरीक्षण करणे खूप महत्वाचे आहे - आधी काही कळत नाही असे वाटेल पण अभ्यासाने व त्यात रस असणार्‍या कोणा जाणकाराकडून अधिक माहिती घेत घेत बरेच काही कळेलच कळेल -
असाध्य ते साध्य करिता सायास | कारण अभ्यास तुका म्हणे || .... स्मित++ +++ अगदी अगदी..

सर्वच फोटो मस्त मस्त. उशिरा आले की असंच सामुहिक लिहायला लागतं. सुरेख आहेत फोटो.

नगरचा पाऊस सध्या डोंबिवलीला पण तसाच आहे, मनसोक्त बरसलाच नाहीये.

नगर जिल्ह्यातील लोक मात्र अर्धा तास सलग पाऊस पडला तरी खुश होतात आणि लई पाऊस झाला हे विधान ज्याच्या त्याच्या तोंडी असतं. श्रीरामपूरचा अनुभव, मला वाटायचं काय पाऊसच पडत नाही आणि हा लई पाऊस. पण थोड्या पावसात वातावरण लगेच थंड व्हायचं आणि इथे कितीही पाऊस पडून गेला तरी तेवढ्यापुरते थंड वाटते परत गरम होते. श्रीरामपूरला पाण्याचे हाल कधीच झाले नाहीत भंडारदरा धरणाचे पाणी आणि पाट सगळीकडे. नगरला मात्र पाण्याचे हाल आहेत ना?

गप्पा वाचायला मजा येतेय. शशांक म्हणताय ते अगदी खरंय ते आणखी खरं करायला एक गटग नागझीरा व्हाया नागपूर होऊन जाऊ द्या हो नं गं सायली Happy

सगळे फोटो आणि माहिती छान आहे.

माझ्या खिडकी समोरच पर्जन्य वॄक्ष आणि उंबराची मोठी झाड आहेत. दररोज सकाळी अगदि न चुकता.. पर्जन्य वॄक्ष वर सुर्यपक्षी जोडीने हजर असतात.. आणि उंबराची फळ खायला.. आधी हळद्या मग तांबट त्यानंतर बुलबुल असे अगदि क्रमाने येतात.. गेले दोन दिवस तर ... संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास दोन वटवाघळ येतायत.. पण कावळे त्यांना हुसकावून लावतायत...

माझ्या हेलिकोनिया रोपावर काल उंदरांनी हल्ला केलाय..मोजून ४ रोपं होती ३ रोपांवरच फुल आणि एकुन एक पान कुरतडून ठेवलय... फार वाईट अवस्था केलीये. ह्या उंदरांचा काय बंदोबस्त करता येईल..

ह्या उंदरांचा काय बंदोबस्त करता येईल.. >>>> झिंक फॉस्फाईड म्हणून एक काळी पावडर मिळते - शेती/बागेसंबंधी वस्तू/औषधे/बी-बियाणे मिळते त्या दुकानात - ती पावडर तयार भज्यांमधे टाकून ती भजी त्या रोपांच्या आसपास संध्याकाळच्या सुमारास टाकून ठेवायची - अशी विषारी भजी खाऊन उंदीर्/घुशी मरतात - इतर कुठल्याही उपायाला हे उंदीर्/घुशी दाद देत नाहीत. फार त्रासदायक असतात हे उंदीर्/घुशी...

आम्ही साप पाळतो उंदरा साठी Lol

बाजारात औषधे मिळतात उंदराला मारण्याची तसेच पुठ्ठाही मिळतो त्यांना पकडायला.

झिंक फॉस्फाईड म्हणून एक काळी पावडर मिळते >>> धन्यवाद शशांकदा... ही पावडर मला भायखळ्याला स्टेशनजवळ मिळेल ना ... लगेचच शोधते..

जागूदि... पुठ्ठ्याचा वापर कसा करतात?
कारण हे रोप खिडकीच्या छज्जावर आहे आणि त्या साईडला पावसाचा मारा असतो.

आणि हो... गटग वॄत्तांत छान आहे.. जर पुढील गटग दादर किंवा ठाण्याला असेल तर मला कळवा ना..मलाही आवडेल तुम्हा सगळ्यांना भेटायला...

कुणाला गुलाबी अडेनीयमच्या बीया हव्या असतील तर मला सांगा ....

अंजू पाऊस तसा कमीच गं. पण घरी गच्चीत २ टाक्या आहेत. आणि बोअर् वेल पंप.
मुन्शिपाल्टीचं कमी पडलं की बोअर चं पाणी चढवायला लागतं.

मानुषीताई नगरला बोअरवेल असलेल्यांना नसेल जाणवत त्रास तेवढा. पण पाणी मचूळ असतं कि चांगलं असतं चवीला. इथे डोंबिवलीला आम्हाला २४ तास बोअरचं पाणी आहे पण पाणी गोड आहे चवीला आणि प्यायचे पाणी रोज सकाळी ४-५ तास मिळते.

sorry लोक्स फॉर पाणीपुराण.

कुणाला गुलाबी अडेनीयमच्या बीया हव्या असतील तर मला सांगा .... >>> मला हव्या आहेत , पुढचा गटग
ऑगस्ट मध्ये राणीबागेत होण्याचे घाटत आहे जमल्यास तेव्हा भेटु.

हे वाचा Happy

'वनाचे श्लोक' - पुस्तक रीव्ह्यु
लेखकः हर्ष परचुरे

पहाटे मनी रान ते आठवावे, तया ठायिचे मैत्र तेही स्मरावे,
तयाचे कसे प्रेम आम्हावरी ते, कसे गोजिरे रुप सांगू तुम्हां ते
http://www.loksatta.com/lokrang-news/book-review-vanache-shlok-665836/

वाचत होते पण लिहायला वेळ मिळाला नाही.
सगळे फोटो आणि माहिती छान आहे.

आम्ही निसर्ग वेडे हे ग. ट. ग. मनोगत लिहले आहे.
जिप्सी गटग फोटो कधी देणार.

वर्षूदी, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!!!!!
तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार
और हमको पार्टी मिले बार बार Happy Happy

— आम्हा सर्वांकडुन Happy

पहाटे मनी रान ते आठवावे, तया ठायिचे मैत्र तेही स्मरावे,
तयाचे कसे प्रेम आम्हावरी ते, कसे गोजिरे रुप सांगू तुम्हां ते ++++ क्या बात है!

नक्की घेइल पुस्तक.. Happy
वर्षु दी... वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

वर्षूताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

काल लंच टाईम मध्ये ऑफिसच्या बाहेर फेरफटका मारायला गेलेले तिथे हे पावसाळी पाहूणे दिसले.

कंटोळीची फुले

पुरंदरे शशांक | : मला मा. बो. चे मुले असे लिहायचे नव्हते. तिथे बसलेले मुले. ते वेगळ्याच नजरेन आमच्याकडे पहात होते. म्हणुन असे लिहले.

जागु , साधना धन्यवाद. मला ह्या संकटातुन सोडवले.

swati / kamini8 - गंमत केली गं मी - एवढे काही मनावर घेऊ नकोस .... (तिथे मी लिहिलेय ना - हलके घ्या = टेक इट लाईटली ... Happy ) टेन्शन नही लेनेका ...

Pages